Friday, May 29, 2015

आपल्या पेज चा एक मित्र सागर अक्कलकोटे याने पाठवलेली कथा
मित्रानो... या पेजवरील इतर मित्रांच्या कथा वाचून मी देखील माझा अनुभव लेखानाचा प्रयत्न करीत आहे...
गोष्ट आहे साधारण आठ ते नऊ महिन्याखालची... मी तसा सोलापूरचा पण पुण्यातील काही भटक्या (ट्रेक वेड्या) मित्राच्या नादी (? !) लागून जसा वेळ मिळेल तसा भटकंती करण्यास अधून मधून जात असे...
असाच एकदा प्लान ठरला... धुळे जिल्ह्यातील जमतील तेवढे किल्ले दोन दिवसात सलग संपवण्याचा ... भामेर, सोनगीर.. लळिंग...वगैरे ...
पुण्याहून निघून शनिवारी सुरुवातीचे कांही किल्ले संपवून भामेर गावी मुक्कामाची सोय झाली... गाव तसे छोटे .. दिवस असतानाच गावात पोहचलो...मात्र गाव आडवळनाचे असल्याने गावामध्ये विजेची सोय नव्हती ..गावातील एका कुटुंबाने आमची जेवणाची आणि मंदिरात झोपण्याची सोय केली... जेवणाची तयारी होई पर्यंत दिवसभराचा शीण घालवण्यासाठी आम्ही गप्पा मारत पहुडलो... दिवसभर बका बका हादडलेल्या वडा सांबर आणि इतर तत्सम पदार्थांनी आता आर्तस्वर द्यायला सुरुवात केली होती ....
साधारण रात्रीचे आठ नउ वाजले असेतील संपूर्ण गावात अंधार कीर्रर्रर्र होता... आणि अशा वेळी नेहमी सोबत देणारा जयू पाठक विधीसाठी यायला तयार झाला... मग विनीत ..मग अजून ऐक... असे करत सगळे तयार झाले.... गावातील एका पोरयाला सोबत घेऊन आमची स्वारी बॅटरी आणि डबा घेऊन शेताच्या दिशेने निघाली... गावाच्या वेशी बाहेरचां तो टिपिकल सीन होता.. प्रचंड मोठे वडाचे झाड.. त्याच्या लोंबणा-या पारंब्या ... झाडाच्या पारंब्या आणि त्याच्या पानातून येणारा चंद्राचा मंद प्रकाश... सर्व मंडळी गप्पा मारत निघाली होती...... त्या झाडाखालीच ऐक छोटेखानी मंदीर होते.. . कशाचे होते काही कल्पना नाही...
मंदीरामध्ये अगदी लहानसा दिवा लावलेला होता.. कुतुहूल म्हणून सहज नजर गेली ... मंदिरात ऐक शुभ्र वस्त्र परिधान केलेली ... डोक्यावर तसाच शुभ्र वस्त्रांचा फेटा बांधलेली मांडी घालून बसलेली मूर्ती होती... त्या मंद दिव्याच्या प्रकाशात मूर्तीच्या चेहऱ्यावरचे तेज अजुनच झळाळून दिसत होते... हा सर्व प्रकार आम्ही चालत होतो तेव्हाचा आहे... आणि अचानक मी जसा पुढे सरकतोय तसा ती मूर्ती माझ्याकडे वाकून पाहतेय असे वाटले... पुन्हा एकदा त्या मूर्तीवरून नजर हटवली आणि पुन्हा मूर्तीकडे पाहिले तर पुन्हा तोच प्रकार... मंदिराच्या दरवाजातून जोपर्यंत मूर्ती नजरेसमोरून जात नाही तोपर्यंत ती मूर्ती माझ्याकडे पाहत होती आणि अगदी शेवटच्या क्षणाला...ऐक स्मितहास्य त्या मूर्तीच्या चेह-यावर दिसले... ... बापरे... हा काय प्रकार असा विचार करीत पुढे निघालो... बाकीच्या लोकांना हा प्रकार सांगावा की नको असा विचार करीत ज्या कार्यक्रमासाठी आलो.. तो संपवला आणि पुन्हा परत निघालो.... साहजिकच मागचा जो प्रकार झाला तो भास कि काय? असा प्रश्न मनात ठेवून त्या मंदिराजवळ आलो आणि पाहतो तर काय मंदिरातला दिवा विझला होता आणि आता तेथे फक्त काळोख होता... मूर्ती तर दिसायचे नावही घेत नव्हती... मनात हा सगळा काय प्रकार असेल असा विचार करीत पुन्हा आम्ही सगळे मंदिरामध्ये गप्पा मारीत बसलो... तो गावातील सोबत घेतलेला पोरया सोबत होताच.. शेवटी ना राहवून मी विषय काढला....आणि सर्वाना घडलेला प्रकार सांगितला...
त्या गावतील पोरयाने सांगितले की ते जे मंदीर होते ते कोणत्या देवाचे नसून मुंजाचे आहे... मुंजा म्हणजे काय याचे उत्तर जयू ने सांगितले की....मुंजा म्हणजे ज्याची मुंज झाली आहे परंतु सोडमुंज झालेली नाही, लग्न झालेले नाही आणि हे सर्व व्हायच्या आधीच ज्याला मृत्यू आला तो मुक्ती न मिळाल्याने मुंजा बनतो.... बापरे...... त्या पोराने पुढे सांगितले की तुम्हाला जसा अनुभव आला आहे तासच आणखी लोकाना देखील आला आहे.....

No comments:

Post a Comment