Sunday, May 31, 2015

देव उपासना भाग १७

देव उपासना
भाग १७
विश्रामला एवढा मोठा धक्का बसला होता कि तो काहीच बोलत नव्हता... त्याच्या पाठोपाठ भाऊ साहेब आणि पुरुषोत्तम पण खोलीतून बाहेर येतात... ते दोघे खूप आश्चर्यचकित आणि चिंतीत होते... त्यांना काहीच समजत नव्हते कि शेवटी गोष्ट काय आहे... ह्याला झालं तरी काय....
"विश्राम, काय झालं... तू काही बोलत का नाही...??" भाऊ साहेब विश्रामच्या खांद्यांवर हात ठेवत बोलले... पण विश्राम काहीच बोलत नाही... शून्यात पाहत पुढे चालत असतो...
"हो बेटा बोल ना काय झालं..., हा दरवाज का तोडलास तू..." पुरुषोत्तमने विचारले...
तेव्हा घनश्याम खालून विश्रामला आवाज देतो आणि विचारतो, "छोटे मालक, सर्व माणसं तैयार आहेत, निघूया का..?"
विश्राम कुठल्या तरी विचारात हरवलेला असतो.. मग काही विचार करून बोलतो, "आज राहू दे, ते सर्व नंतर बघूया..."
"काय बोलतोयस बेटा...!! असे तर गावतील लोकं डोक्यावर चढून बसतील..." पुरुषोत्तम बोलले...
"एक-दोन दिवसात काही वादळ नाही येणार काका..." विश्राम बोलला...
"पण गोष्ट काय आहे... काही सांगत का नाही...? सुनबाई बोलत होती कि संगीता होती खोलीमध्ये...?? ती होती तर गेली कुठे...?" भाऊ साहेबांनी विचारले...
"असं काहीच नाही आहे.., तिला भास झाला असेल..." विश्राम बोलला...
"मग तू दरवाजा का तोडलास... तो बाहेरून बंद होता ना...!!" भाऊ साहेबांनी अचंबित होत विचारले...
"बाबा दरवाजा अडकला होता... त्याला खोलण्याचा प्रयत्न करत होतो... बस एवढीशी गोष्ट आहे..."
"मग सुनबाई का बोलत होती कि संगीता खोलीत आहे ते...!!"
"तिचं डोकं खराब झालाय बाबा... दरवाजा अडकला होता... त्यामुळे तिला वाटले कि संगीता आतमध्ये आहे..." पल्लवी तिथेच उभी राहून हे सर्व ऐकत होती...
"डोकं तर ह्याचं खराब झालं आहे... हुंह..." भाऊ साहेब बोलले आणि तिथून रागाने निघून गेले... पुरुषोत्तम पण तिथून चुपचाप निघून जातो...
विश्रामने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी आपल्या खोलीकडे निघून गेला... पल्लवी पण त्याच्या मागोमाग खोलीत आली...
"काय हो... काय बोललात तुम्ही... माझं डोकं खराब आहे...!!! तुम्ही संगीताला आपल्या खोलीत नाही पाहिलं का, सांगा ना..??" पल्लवीने विचारले...
"तू जर गप्प बसतेस का... माझं भांडण करायचं मूड नाही आहे..." विश्राम बोलला...
"पण हे सर्व होतं तरी काय...?" पल्लवीने विचारले...
"मी बोललो ना चूप बस... आपलं काम बघ जाउन... मला एकटा सोड..."
पल्लवी रूममधून बाहेर निघून पुन्हा स्वयंपाक घरात येते...
"काय झालं मालकीणबाई..." नोकराने विचारले...
"काहीच नाही काका... चला जेवण तैयार करूया..." पल्लवी एक दीर्घ श्वास घेत बोलली...
जंगलामध्ये...
"आदित्य केव्हा पर्यंत आपण बसून राहणार ह्या गुहेत..." सई बोलली...
"असं वाटतंय रस्ता साफ आहे... खूप वेळ झाला आहे अजूनतरी आवाज नाही आला... असं करतो हा दगड थोडासा बाजूला करून पाहतो..." आदित्य बोलला...
"हो बघो... पण जरा सांभाळून..."
"तू त्याची चिंता नको करूस, आणि दगड सोडून मागे हो, मी बाहेर डोकावून पाहतो..." आदित्य बाहेर डोकावून पाहतो...
"कोणीच दिसत नाही आहे, असं वाटतंय रस्ता साफ आहे.. ये चल निघूया..."
"ठीक आहे चल लवकर... आपल्यांना कुठल्याही परीस्थित आज घरी पोहचल पाहिजे..."
"ठीक आहे ये..." दोघेही गुहेच्या बाहेर येवून सकाळच्या थंड हवेमध्ये श्वास घेतात, आणि चहु बाजूला बघतात कि काही धोका तर नाही आहे ना...
"थांब मी हि मोठी काठी घेतो... रस्त्यामध्ये कामाला येईल..." आदित्य बोलला...
"ठीक आहे... एकदम बरोबर बोलतोयस ज्या प्रकारचं हे जंगल आहे, आपल्या जवळ पण काही ना काही तरी असलं पाहिजे..."
"हि घे एक काठी तू पण पकड..." आदित्य एक मोठी काठी सईला पण देतो...
"संतोष आणि संगीता कोणास ठावूक कुठे असतील...? ते लोकं गावी पोहोचले असतील काय...?" सईने विचारले...
"माहिती नाही... कोणास ठावूक ते पण आपल्या सारखेच भटकत असतील...?"
"हम्म... बिलकुल असू शकतं..." सई बोलली...
-------------------------------------
संगीता आणि संतोष पण इथे आपली भूक शांत करण्यासाठी काही फळांचे झाड सापडतं का ते शोधत चालले होते.. चालता चालता संतोषला एक पेरुच झाड दिसतं ते दोघेही त्या झाडापाशी जावून पेरू खात बसतात...
गावतील दृश्य...
"उपासना मी शेतात जातोय, असं माहिती पडलं आहे कि भाऊ साहेबांच्या माणसांनी काल रात्री शेतात काही तरी विचित्र पाहिलं आहे..." देव उपसनाला बोलतो...
"मी पण पाहिलं आहे देव... काल सकाळीच मी स्वतः खूप विचित्र सावलीला शेतात शिरतेवेळी पाहिलं आहे... ते पण एकदा नाही दोन वेळा... मी आणि बाबांनी पूर्ण शेत पालथं घातलं पण आम्हाला काहीच सापडलं नाही... काल संध्याकाळी तर तू हि ती किंकाळी ऐकली होतीस..."
"हो ऐकली तर होती... पण ह्या सर्व गोष्टीने कोणत्या निष्कर्षावर तर नाही पोहोचू शकत... आता दिवस आहे, एकदा मी पूर्ण शेत चांगल्या प्रकारे बघून घेतो, तेव्हाच कुठे सांगू शकतो..." देव बोलला...
"मी पण तुझ्यासोबत येणार देव..." उपासना बोलली...
"केव्हा पर्यंत सोबत येशील उपासना, मी जीवनातून निवृत्ती घेतली आहे... आज इथे आहे तर फक्त देशभक्तीसाठी नाही तर, कुठे तरी समाधीमध्ये बसलो असतो..?"
"हे काय बोलतोयस देव...!! हे दुखः देण्यासाठीच तू परत आला आहेस काय...? मला वाटलं माझ्या प्रेमाने तुला इथे खेचून आणलं आहे... पण नाही.. तू तर देशावरती प्रेम करतो... माझी ह्या देशा समोर काय लायकी आहे... हो ना..." उपासना स्फुंदत बोलली...
देव तिच्याकडे पाहतच राहतो, त्याच्या जवळ उपासानाच्या ह्या प्रश्नांचे काहीच उत्तर नसतं...
क्रमशः...

No comments:

Post a Comment