Thursday, May 28, 2015

रहस्यभेद ३ ..

रहस्यभेद ३ ..
नायक/नायिका :: आदित्य ,दीक्षा ,जानवी , निनाद
तो लखलखणारा विजांचा थयथयाट, त्या रुद्ररुपी ढगांचे विचित्र आकार, एकमेकांना धडका देऊन देऊन गरजत होते. जणू काही एक विचित्र अनपेक्षितसे घटणार होते कि कोणी घडवून आणणार होते माहित नाही.. "एय पाक चीज को नापाक करने कि ताकत रखणेवाले शैतान हाजीर हो.. तेरा ये नुमाइन्दा ये तेरा गुलाम तेरी गुजारीश कर रहा है ... ये या पृथ्वीवर नरकातून परत मला तुझी गरज आहे मला माझ्या ताक्ती परत हव्या आहेत मी तुझ्यासाठी हि नरबळी देतोय " रंकाळा तांत्रिक त्यावेळी जणू नर्कलोकातून शैतानास पृथ्वीवर आणण्यासाठी महावघ्रपूजा करीत होता..पण तरीही त्याला कोणाची तरी उपस्थिती तेथे जाणवत होती... कोण होते माहित नाही पण असे जणू कोनि त्याच्या पूजेत अडथळा आणणारे तो इकडे तिकडे पाहत होता..परत तो पुजेस लागला अफाट शक्तींचा मालक त्याला व्हायचं होत. त्याचा अवतार देखील एखाद्या शैतानासारखाच जणू होता लांबसडक सरळसुतासारखे केस पाठीवरती लटकत असणारे त्याचा चेहरा आणि पूर्ण अंग जणू राखेने माखलेले..माथी जणू भुवयाचा भयंकर अर्धचंद्राकार साठा.. मोठे डोळे जणू पापण्या नव्हत्याच कंबरेस गुंडाळलेले एक पिवळेसे फडके.. अंगात चामडी विजार ..आणि काळा असा गुडघ्यापर्यंत आलेला एक अंगरखा हातात एक लांबलचक अशी कणखर काठी जिच्या टोकास काळा हिरा होता... आणि एका हातात मोठा धारदार असा कोयता आणि पुढ्यात एक नग्न मुलगा पूर्ण अंगास ओले हळद कुंकू असलेला तो बेशुद्ध झाला होता आणि रंकाळाने त्याचे केस धरून त्याचे मुंडके वर उचलले होते आणि तो जोरात ओरडून वार करणारच होता कि इतक्यात. कोणीतरी लांबूनच त्याच्या हातावर गोळी झाडली ते पोलीस होते आणि जानवी व तिची टीम ... तेथे रंकाळा रंगे हात पकडला गेला होता.. पोलिसांनी त्यास पकडले होते जानवी च्या चतुराईने आणि तिच्या पेशा मुळे हे सर्व साध्य झाले होते. आणि त्या मुलाचा प्राण देखील वाचवण्यात आला होता.. पण रंकाळा जानवी कडे रक्तलेल्या लाल डोळ्यांनी रागाने पाहत होता... आणि तो करड्या भयंकर आवाजात गरजला " तो आलाय त्याचा अंश आलाय तो तुला सोडणार नाही सैतान आलाय नरकातून बाहेर माझी पूजा भंग केली ना तू तरीही तो आलाय आता फक्त पाहत रहा .."
काही तासापूर्वी....
"जानवी ..अग कुठेयस तू? काय करतेयस ? " जानवी ची मैत्रीण वैतागून तिला हुडकत होती जानवी आपल्या केबिनमध्ये कंप्युटरवर काहीतरी करीत होती . जानवी एक पत्रकारिता होती आजवर कित्येक पत्रकार होऊन गेले असतील. सर्व जणू राज्यातील चालू घडामोडीवर विज्ञान आणि त्याच्या अलीकडील गोष्टीवरच खबर मिळवायचे आणि लोकांसमोर मांडायचे. पण कधी कोणी विज्ञानापलीकडे जाऊन तेथील घडणाऱ्या गोष्टीवरील पडदा बाजूला सारण्याचा विचारच केला नाही. पण जानवी हि या गोष्टीसाठी नेहमी तत्पर होती. अश्या अवैज्ञानिक गोष्टीत तिचा रस खूप नव्हता पण ती त्यांच्या शोधात मात्र होती. आपल्या छोट्या शहरात तिचे ते सर्व होते.. आज ऑफिसमध्ये काही खास असा दिवस गेला नाही.. म्हणून असेच दिवसभर बसून बसून.. बऱ्याच बातम्या रोज प्रमाणे बनवून त्यांना संपादित करून टाकल्या. पण त्या बातम्या मध्ये तिला हवी असणारी गोष्ट तशी मिळालीच नाही जानवी आपल्या मैत्रिणीकडे पाहत उत्तरली "काय अग? आहे न मी इथेच ओरडतेयच का ?" त्यावर जानवी ची मैत्रीण तिला तसेच वैतागून म्हणाली "अग ऑफिसमधले सर्व जन गेले आहेत आणि आपण दोघीच आहोत इथे आणि तू हे नेट वर काय पाह्तेयस ..." जानवी नेट वरती online कोणाचे तरी प्रोफाईल पाहत होती. विचित्र होते ते एकदम एक मुलगा होता. त्याच्या प्रोफाईलवरती सर्व भूतखेत प्रेतात्मे यांच्या बाबतीत सर्व काही दिसत होते. त्या मुलाने स्वतःच्या बद्दल फक्त एक वाक्य लिहिले होते "i can see that thing which you can't, they talks to me. they are always with me..." ते वाक्य त्या मुलाचे ते विचित्र प्रोफाईल आणि त्याचा स्वतःचा तो फोटो हे पाहून जानवी ची मैत्रीण तिला हसू लागली "हहहा.. अग जानवी तुला आता हे वाटते आहे का कि या मुलाने हे प्रोफाईल बनवले आहे याचा अर्थ असा थोडी झाला कि त्याला खरच भूत दिसतात अग इंटरनेटवरती असे हजारो असतात पडलेले काय तू पण न चल आपल्याला उशीर होतोय .. " पण जानवी ने तिचे काही ऐकले नाही आणि तिने तेच वाक्य त्या मुलाचे कॉपी करून गुगलवरती टाकले ..तेव्हा तिला तेथे एक विडीओ दिसला जानवीने त्यावरती क्लिक केले. आणि तो थोड्याक्षणात सुरु देखील झाला... त्यात एक मुलगा होता सायंकाळ होती.. तरी हि एक निळसरसा काळोख तेथे तिला दिसत होता... त्या दोघी टक लावून तो विडीओ पाहू लागल्या... पण त्या विडीओ मध्ये तो मुलगा एकटाच दिसत होता .. आणि त्याच्यासमोर एक बाहुली होती तो त्या बाहुलीस पाहत पाहत तिलाच जणू बोलतोय असे दिसत होते. आणि लगेच विडीओ संपला देखील त्या दोघींना कळलेच नाही कि यात होते काय.. कि अचानक जानवी च्या लक्षात आले ते वाक्य "i can see that things which you cant " जानवी आपल्या मैत्रिणीस तात्काळ म्हणाली "अग रेणू !! समजले मला या क्लिप मध्ये तो मुलगा ज्यास बोलतोय ते आपल्याला नाहीत दिसू शकणार ते फक्त त्यालाच दिसतील आपण त्याच्या प्रोफाईलवर ते sentense वाचले होते न .." त्यावर जानवी ची मैत्रीण तिला म्हणाली "अग हो पण यात हे कसे कळणार कि तो मुलगा कोणाला तरी पाहतोय ते .. हे खर आहे का ? नाही अग जाणू अश्या भरपूर पडून असतात तू हल आधी पाहू खूप उशीर झालाय आपल्याला " जानवीने तिला थोड थांबण्यास सांगितले व तो विडीओ आपल्या पेनड्राईव्ह मध्ये घेतला. व त्या दोघी निघाल्या.. रस्त्याने जात जात.. जानवी त्या मुलाचाच विचार करीत होती,, कि अचानक गाडीचे ब्रेक लागले गेले .. आणि तिने समोर पाहिले जानवी ची मैत्रिण कोणास तरी ओरडत होती "काय बाबा बघून चलता येत नाही का फूटपाथ नाही का चालन्यासाठी " जानवी त्या समोर असलेल्या तांत्रिकपोशी व्यक्तीकडे पाहतच राहिली तो रंकाळा होता. लंगडत लंगडत .. हातातील ती काठी घेऊन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता.. वाहणारे वाहने तो पाहत नव्हता.. खुन्नशीने बोलणाऱ्याकडे पाहत चलत होता. जानवी ची मैत्रीण त्याला ओरडत होती पण तरीहि तो तसाच निघून गेला.. आणि त्या दोघीहि निघाल्या जाता जाता मागून जानवी त्याला पाहत होती आणि तो जानवीला.. जानवीचे घर आले होते.. तीच घर देखील शहरा पासून बरेच तसे विरळ भागात होत.. आजूबाजूने पहाडी भाग आणि तसेच एकीकडे असणारी भयान अशी स्मशानभूमी जानवी गाडी हून खाली उतरली आणि आपल्या मैत्रिणीचा निरोप घेऊन ती आपल्या घरात आली येताच थकून पडली होती उठली आणि पुन्हा फ्रेश होऊन आली आणि पुन्हा टीव्ही पाहण्यात गुंग झाली. कि तेवढ्यातच तिच्या लक्षात आले तिने आपल्या पेनड्राईव्हमध्ये त्या मुलाचा विडीओ तिने आणला होता तिने तो आपल्या laptop ला लावला आणि तो विडीओ चालू केला. पण आता हि त्यात तिला काहीच दिसेना आवाज वाढवून ऐकला तरी तो मुलगा जे बोलेल तेच ऐकू येत होते. तेव्हा दहावेळा पहिल्यानंतर तिने ठरवले कि याचे इफेक्ट्स वगेरे चेंज करून पाहावे म्हणून तिने नेगेटिव, सोफिया सर्व करून पहिले पण कोणीच दिसले नाही शेवटी थर्मल इफेक्ट राहिला होता.. तिने तो दिला आणि तो विडीओ प्ले केला .. कि त्याचक्षणी तिने जे पाहिले ते पाहून तिच्या अंगाचा थरकाप उडाला... तिचे अंग लटलट कापू लागले ... तीच्य सर्वांगास घाम आला ... आणि जानवी ती क्लिप परत परत पाहू लागली ... यावेळी त्या मुलाच्या पुढ्यात तिला एक स्त्री बसलेली दिसली.. एक भयंकर स्त्री तर कधी मुलगी.. जानवी ते पाहतच राहिली.. तील काय करावे सुचेना झाले पण अखेरीस तिला कळाले होते कि तो मुलगा असे का म्हणत होता "i can see that thing which you can't " जानवी ला अखेरीस वाटत होते तिचा एक शोध संपला आजवर ती ज्या गोष्टीच्या शोधात होती ती आता तिला मिळणार होती असा विचार करीत ती आपल्या रूमच्या खिडकीजवळ आली आणि तिने खाली पाहिले तेव्हा तिला खालून कोणी तरी स्मशानभूमीत जाताना तिला दिसू लागले .. लंगडत लंगडत तो रंकाळा जात होता. "तो स्मशानात का जात असेल? यावेळी ते पण " असा विचार जानवी च्या मनात आला होता म्हणून असा विचार करीत ती तत्काळ आपल्या घरातून बाहेर आली पण खाली येताच तो तिला दिसेनासा झाला तसी जानवी त्या स्मशानभूमीकडे जाऊ लागली.. अफाट शांतता.. आणि त्यातच कुठेतरी अर्धी अधुरी जळणारी चिता तिला दिसू लागली होती.कि तिला त्या चितेजवळ एक आकृती तिला दिसू लागली असे वाटत होते कि तिथे कोणी आहे आणि तो त्या चितेस काही तरी छेडछाड करतोय. जानवी झाडाआड लपून सर्व पाहत होती तिला दिसले कि तो रंकाळाच होता.. त्याने चितेतून काहीतरी जळते बाहेर ओढून काढले आणि ती एक जळतो खोपडी होती. त्याला पाहून जानवी ला ओकारी आली पण तरीही तिने स्वतःला .. कसे बसे तोंड दाबून सावरले. तिला पुढील पाहता येईना झाले ... ती तेथूनच माघारी फिरणार कि रंकाळाचा आवाज तिला ऐकू आला.. त्या फक्त स्मशानभूमीत होणारे बदल जानवी ला दिसून येऊ लागले होते.. ते गडगडाट करणारे ढग.. त्या चमकणाऱ्या विजा जानवीने चतुराईने आपली टीम आणि पोलिसांना फोन केला.. आणि त्यांना सर्व काही संगितले... जानवी ची टीम त्या रात्री येण्यासाठी अतोनात नकार देत होती .. पण बऱ्याच धमक्या देऊन तिने त्यांना अखेर बोलवलेच.. आणि पोलीस देखील पोलिसांना देखील तेथे पोहचल्यावर स्मशानातील वातावरण भयानक दिसत होते... सर्वजन रंकाळाचा शोध घेऊन लागले कि त्याच वेळी जानवी च्या नजरेस तो पडला.. तो त्या मुलावर वार करणारच कि तितक्यात पोलिसांनी त्याच्या हातावर गोळी झाडली,, तसे एक जोरदार वाऱ्याचा झोत सर्वांच्या आरपार गेला.. आणि स्मशानात जळणाऱ्या एकंदरीत सर्वच चिता झपाट्याने विझल्या... पोलीस आणि जानवी ची टीम हेही दचकले पण तरीही त्यांनी धाडस करून सर्व शूट करून घेतले पोलिसांनी बेड्यांनी रंकाळाला जखडले... आणि घेऊन गेले दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये रंकाळाच्या बातमीने सर्वशहरात धुवा उडाला.. जानवी ला हि बडत मिळाली.. आणि आता जानवी ला शोध घ्यायचा होता त्या मुलाचा... आता फक्त तोच तिच्या साठी महत्वाचा होता.. इंटरनेट द्वारे त्याने कसेबसे करून त्याचा पत्ता अखेरीस मिळवलाच... ती जायच्या तैयारीस लागली होती.. जाण्याआधी तिने तेथे स्वतःसाठी किरायाचे घर घेतले. तो अत्यंत घनदाट भाग होता. रात्रीच दहा वाजता ती रेल्वेने निघाली तेथे त्या घनदाट वाडीत लपलेले एक नवीन रहस्य तिची वाट पाहत होते. आणि हीच खरी सुरुवात होती 
जानवी आपल्या रेल्वेच्या प्रवासात होती ... झाडे, आकाश, वारे या सर्वांना मागे टाकून तिची रेल्वे त्या ठिकाणापर्यंत जात
होती तो डोंगराळ भाग त्या डोंगराळ भागात नदी तलाव अत्यंत अथांग पसरले
होते. पण बाहेरील ढगात जणू सूर्याचे चिन्ह देखील दिसत नव्हते संपूर्ण ढगाळ
वातावरण तिथे कडाक्याची थंडी भयंकर होती जानवीने आपल्या bagमधून शोल
काढून ती अंगाभोवती गुंडाळून घेतली. आणि म्हणता म्हणता रेल्वे पूलावर
आली रेल्वेने पूल ओलांडला त्या पूलाहून गाडी जात असतानाच तिला त्या
खिडकीतून ते गाव दिसू लागले ... विभिन्न असे राखाडी रंगाची घराची छपरे सर्वत्र
पसरलेले हिरवळ धुकेच धुके जणू सर्वत्र होते आणि चहाची शेते सर्व ती पाहतच
होती कि अचानक जानवी ज्या खिडकीतून बाहेर पाहत होती तिच्या काचाजवळ
एक घुबड येऊन बसले ते घुबड मान वळवून आत बसलेल्या जानवीकडे पाहू
लागले...त्याचे गोल मोठे डोळे एकटक जानवीकडे पाहत होते पण जानवीचे लक्ष
त्याच्याकडे नव्हते पण ते सतत तिलाच पाहत जात होते. पण अचानक जानवीचे
लक्ष त्या घुबडाकडे गेले ते काळे राखाडी रंगाचे होते... त्याला पाहताच जानवी
दचकून आपोआप मागे सरकली गेली ते तिला पाहत जात होते....जानवीला हे
वेगळे वाटण्याऐवोजी तिने हे सहजपणे घेतले व त्याला हातवारे करून उडवून
लावले.. आणि तशी थोड्या वेळभरात स्टेशनच्या पाट्या काही चिन्हे दिसू लागली
आणि त्या पैकीच एका बोर्डवर तिला या ठिकाणाचे हि नाव दिसले "बहुरगढ "
आणि तेव्हा तिची रेल्वे स्टेशनवर थांबली. जानवीने बाहेर पाहिले व आपले सामान
घेतले आणि खाली उतरली तिने इकडे तिकडे आपली नजर टाकली तिला तिच्या
त्या घरातील चाकर "नाथू" येणार होता न्यायला आणि तो तेथेच तिची वाटच
पाहत होता त्याला तिने फोनवरून निघतानाच कळवले होते कि ती आज येतेय.
म्हणून तो हातात तिच्या नावचा एक बोर्ड घेऊनच उभा होता.. तिने उतरताच
त्याला पाहिले जरासा उंचीने कमी... गोलसा चेहरा डोक्यावारती केस उडालेले
गळ्यात मानेभोवती मोफलर गुंडाळलेले आणि अंगात स्वेटर असा होता नाथू .
नाथूच्या हातातील बोर्ड पाहताच जानवी त्याच्या कडे गेली आणि म्हणाली "मी
जानवी तुम्ही त्या गेस्ट हाउसचे " त्यावर नाथू तिचे वाक्य तोडत दात इचकत
म्हणाला "आ ..हो हो .. मी नाथू मीच तुम्हाला फोनवरती बोललो होतो तुम्ही
जानवी मडेम होय ना " त्यावर जानवी त्याच्याकडे असे गोंधळलेल्या नजरेने पाहू
लागली आणि आपले डोळे उघडझाप करून पुन्हा म्हणाली "हो मीच जानवी
आणि आपण गेस्ट हाउस वरती कसे पोहचनार आहोत " त्यावर नाथू म्हणाला
"मडेम मी आहे न मी गाडी घेऊनच आलेलो आहे तुम्हाला न्यायला चला माझ्या
सोबत बाहेर लावली आहे मी " असे म्हणत नाथूने जानवीचे सामान उचलले व तो
पुढे चालू लागला आणि ते दोघेहि स्टेशनच्या बाहेर येऊन गाडीत बसले.. जानवी
थकून गेली होती आणि बाहेर थंडी देखील होती "नाथू जरा गाडीचे ब्लोअर ओन
कराल का खूप थंडी आहे बाहेर " त्यावर नाथू पुढच्याच सीटवर गाडी
चालवण्याकरिता बसलेला होता त्याने आपली मान वळवली आणि जरास गंभीर
कुचकट हसत म्हणाला "मडेम ... ब्लोअर खराब झालाय मी सर्व खिडक्याची काच
चढवतो म्हणजे थंडी नाही वाजणार तुम्हाला " असे म्हणत त्याने गाडीचे काच
वरती केले आणि गाडी त्या हायवेने जाऊ लागली . आजूबाजूला असेलेली हिरवळ
अतिशय सुंदर होती.. पण आभाळात सूर्याच्या अनुपस्थितीमध्ये ते सर्व भकास
वाटत होते. मजल-दरमजल करीत अखेरीस गाडी गेस्टहाउस वर पोहोचली जास्त
मोठे देखील नव्हते ते पण तिच्यासाठी कामचलाऊ होते .. राहण्याची उत्तम सोय
होती.. आणि घराची चाकरी करणारा फक्त नाथूच तेवढा होता घराच्या आजूबाजूने
असणारी वर्दळ होती पण कोणाशी संपर्क न करता येणारीच होती. जानवी
थकव्यामुळे गाडीतच झोपी गेली होती. नाथूने तिला हाका मारून उठवले ती
उठली "मडेम पोहोचलो बघा आपण " असे म्हणत नाथूने जानवीला उठवले व तो
आधी खाली उतरून सामान बाहेर काढू लागला.. जानवी दरवाजा उघडून बाहेर
आली आणि ते घर पाहूनच सरसरून तिच्या अंगावर काटा उभा राहिला.
दिसण्यासाठी ते सुंदर आणि तितकेच भयंकर होते.. ती नाथूकडे वळली आणि
नाथूला बोलणार तितक्यात तिला तेथे नाथू दिसलाच नाही ती गाडीच्या आजुबाजूस
नाथूला पाहू लागली पण नाथू तेथे कोठेच दिसत नव्हता.. तिने हाका मारण्यास
सुरुवात केली .. कि गजबच झाले .. गाडीच्या बॉनेटवर "फडफड ..फडफड "
असा आवाज करीत तेच घुबड येऊन बसले आणि जानवीकडे पाहून आवाज
करू लागले "व्हुऊ.... व्हूउ " त्याचा तो भयंकर आवाज आजूबाजूच्या झाडीत
घुमला जाऊ लागला होता ... जानवीने त्याला पहिले आणि ती थोडीशी घाबरली ...
तिला कळेनाच झाले कि याला तर आपण रेल्वेतून येताना पाहिले होते.. असे
विचार करीत जानवीने खालील छोटा दगड उचलून त्यावर मारला ... आणि ते तसे
उडत उडत जाऊन समोरच असलेल्या झाडाच्या फांदीवर बसले... आणि
जानवीकडे पाहू लागले तशी जानवी मागे मागे सरकू लागली ... कि अचानकच ती
कोणास तरी थडकली ... आणि तिने दचकून मागे पाहिले ... तर तो नाथू होता.
आणि त्याचे ते विक्षिप्त हसू त्याच्या चेहऱ्यावर होते . ते पाहून तर जानवी
त्याच्यापासून दूर झाली "मडेम काय झाले ? मी सामान आतमध्ये ठेवत होतो
तुम्हाला सांगायचे विसरलो " नाथू म्हणाला ... "बर बर असूद्या मला थकवा आला
आहे खूप मला माझी खोली दाखवा " जानवी थोडे खेकसून उद्गारली नाथू पुन्हा
तेच कुचकट हसू चेहऱ्यावर आणत उत्तरला " हो हो .. चला ना मडेम " नाथूने
जानवीस आतमध्ये आणले व तिची खोली दाखवली.. आणि म्हणाला "मडेम
तुम्हाला भूक लागली असेल काही बनवू का " त्यावर जानवी म्हणाली "ठीक आहे
मला हाक मारा मी माझ्या खोलीतच आहे " असे म्हणत जानवी आतमध्ये गेली व
नाथू किचनमध्ये थोडावेळ झाला आणि नाथूने जानवीला हाक मारली "मडेम ..
जेवण तयार आहे बघा गरमागरम आहे या खाऊन घ्या ... " जानवी तसे हातात
काही कागद घेऊन खाली आली आणि जेवणाच्या मेजवरती आली जेवता जेवता
तिने नाथूचे कौतुक देखील केले ..."व्वा !! नाथू तुम्ही तर एकदम डीलीशियस
..जेवण बनवले आहे " नाथू नाकाच्या फुफड्या फुगवत हसत म्हणाला "आता
त्यात काय मडेम .. जे येत ते बनवतो आम्ही .. मालक गेले शिकवून " जानवी खात
खात तसेच त्याला बोलू लागली "ओह असे .. बर नाथू मला तुम्ही या पत्त्यावर उद्या
न्याल का ? तिनें आपल्या हाताने नाथूला तो पत्ता देऊ केला आणि विचारले " नाथू
तो पत्ता पाहून थोडा चमकलाच आणि म्हणाला .."मडेम या पत्त्यावर काय काम
आहे तुमचे इथे चांगली लोक नाहीयेत " त्यावर जानवी म्हणाली "तुम्ही फक्त
एवढे सांगा कि तुम्हाला हा पत्ता माहित आहे कि नाही ? मला खूप महत्वाचे काम
आहे तेथे तुम्ही नसाल नेणार तर मी जाईन " त्यावर नाथू थोडे दातस खाऊन
म्हणाला "नेईन मडेम ..नेईन" आणि जानवीचे जेवण देखील झाले होते म्हणून ती
उठली व आपल्या खोलीत परतली... आणि पडूनच विचार करू लागली कि "खरेच
तो मुलगा आत्म्यांशी संपर्क करू शकत असेल का ? जे काही आहे ते उद्याच
कळेल .." असे म्हणून जानवीहि झोपी गेली ...आणि अचानक झोपेत "तो आलाय
.. तो आलाय... तो तुला सोडणार नाही ... हा रंकाळा बोलतोय .." असे म्हणत
आणि जणू कोणीतरी तिच्या अंगावर धावून तिला मारण्यासाठी येत होते ... आणि
जानवी स्वतःचा जीव वाचुवून पळतेय .. ती पळत होती ... तिच्या अंगाचा थरकाप
उडाला होता ... सर्वांग घामाघूम झाले होते कि अचानकपणे तिचे डोळे उघडले व
तिने स्वतःला आपल्या बेडवर पाहिले... तिने आपल्या कपाळावर आलेला घाम
पुसला कि अचानक तिची नजर त्या खिडकीकडे गेली ... तिथे तिला काहीतरी
चमकताना दिसू लागले .. पिवळसे डोळे .. तिने नीट निरखून पाहिले तर ते
घुबडाच्या आकाराचे होते.. ते जानवीकडेच पाहत होते ... आणि अचानक ते फड
फड आवाज करीत तेथून उडून गेले.. जानवी खूप घाबरली होती ती परत आपल्या
जागी आली आणि पांघरून गच्च घेऊन झोपी गेली... आणि तसेच सकाळ
झाली आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात तिला जाग आली. पण रात्रीचे ते शब्द
अजूनदेखील तिच्या कानात घुमत जात होते तरीही जानवी उठली आणि
बाथरूममध्ये गेली आणि अंघोळ करून बाहेर आली .. तिने नाथूस सांगून ठेवले
होते कि आज जायचे आहे म्हणून नाथू खाली गाडीजवळ उभा राहून तिची वाट
पाहत होता जानवी हि आली ... व गाडीत बसली... आणि नाथू तिला घेऊन जाऊ
लागला ... रस्त्याने जात जात ते ढगाळ वातावरण तसेच कायम राहिल्यासारखे
दिसत होते.. आणि तीच हिरवळ आणि तेच धुके .. गाडी आता मुख्य शहरात
आली.. आणि काही बरेच वळणेवाळणे घेऊन ते एका जुनाटश्या एका
वाड्यासारख्या घराजवळ येऊन थांबले तेव्हा गाडीतून जानवी खाली उतरली पण
नाथू उतरण्यास तयार होईना तो गडबडीतच तिला म्हणाला "म म मडेम...तुम्ही
तुमचे काम करून या मी बाहेरच्या गल्लीजवळ थांबतोय हा " असें म्हणत नाथू
गाडी घेऊन तेथून बाहेर लांब जाऊन थांबला आणि जानवी त्या घराकडे आतमध्ये
जाऊ लागली.. आणि तिने तो जुनार दरवाजा आपल्या हातानी आत ढकलला तो
क्र्रर्र्र... क्र्र्रर्र्र्र आवाज करीत आत सरकला गेला .. आत जाताच जानवी ला एक
वयस्क स्त्री तिच्याकडे येताना दिसू लागली.. दिसण्यास तर असे वाटत होते कि
तीने रडून रडू स्वतःचे हाल करून घेतले होते . ती जानवी जवळ आली आणि
तिने रागात तिला विचारले "कोण आहात तुम्ही आणि कोणाला भेटायचे आहे
तुम्हाला ? माझ्या मुलाला " असे बोलत ती अचानक रागाच्या भरात रडत ओरडू
लागली "अरे का पिच्छा सोडत नाही आहात तुम्ही माझ्या मुलाचा का आम्हांला
छळताय...नाश व्हावा त्याच्या त्या ताकतीचा त्याला ते पिशाच दिसतात तुम्ही तेच
छापनार आहात न तुमच्या पेपरात ... निघ आमच्या घरातून चालती हो आताच्या
आता .. " जानवी आधीच सौम्य भावनेची होती आणि अश्यात तिच्यावर ती स्त्री
ओरडली त्याने जणू तिच्या डोळ्यात घळाघळा पाणीच आले... ती स्त्री जानवीवर
हात उगारणार होतीच कि इतक्यात तिचा हात मागून कोणीतरी धरला आणि
तिला जानवीस मारण्यापासून अडवले ... त्या स्त्रीने व जानवीने मागे पाहिले .. मागे
एक तरुण मुलगा उभा होता तो त्याला स्त्रीकडे पाहत म्हणाला "नाही आजी
...यांना माझी गरज आहे " आणि तो तरुण होता निनाद आणि काहीवेळात
जानवीने आपल्या बद्दल सर्वकाही त्यांना सांगून दिले त्या स्त्रीने जानवीची माफी
मागितली... आणि जानवी व निनाद त्या घराच्या मागे आले व तेथे निनाद समोर
असलेल्या बंद पडलेल्या घराकडे पाहू लागला जानवी त्याच्या बाजूलाच बसलेली
होती आणि निनाद कडे पाहत होती.. ती निनादला म्हणाली "काय पाहतोयस तू
त्या बंद घराकडे ?" त्यावर निनाद उत्तरला "नितीन ला पाहतोय तो त्याच्या
आईबाबा सोबत खेळतोय " त्यावर जानवी म्हणाली "नितीन कोण?" त्यावर निनाद
म्हणाला "तू इथे हेच पाहायला आली आहेस न.. कि मला काय दिसते मी कोणाला
बोलतो ?" त्यावर जानवी म्हणाली "हो ..पण म्हणजे सध्या तू तेच पाहतोयस ज्याचा
मी विचार करतेय ... आत्मा " त्यावर निनाद फक्त तिच्याकडे पाहून हसला आणि
तो पुढ म्हणाला "काही दिवसा पूर्वी नितीनचा अपघात झाला होता आणि त्यात तो
वारला होता ८ वर्षाचा होता तो त्याची आई वर्षा तिला वेड लागले होते ती रोज
तिच्या नव-यास म्हणायची आपला नितीन परत आला हो .. आणि अशा वेडातच
वर्षाने स्वतःचा जीव दिला ... आणि त्या मागेमागे तिच्या पतीने देखील आत्महत्या
केली आणि आता तेच तिघे इथे मला दिसतायत " जानवीने त्या घराकडे पाहून
भीतीने आवंढा गिळला आणि म्हणाली खरच तुला दिसतायत ते निनादने तिला
आपला कॅमेरा काढून त्या घराचे फोटो काढून घेतण्यास सांगितले व तिने आपला
डीजीटल कॅमेरा काढला व त्या घराचे काही फोटो काढले ... आणि ते दोघे तेथून
उठणारच कि इतक्यात तेथे एक आवाज आला "व्हुऊ ... व्हूउ ...." कि तो आवाज
ऐकताच निनाद आणि जानवी जागीच थांबले जानवी मागे वळून त्या झाडावरून
आलेल्या त्या आवाजाकडे वळली आणि तिने पाहिले तर तेथे तेच घुबड बसले
होते... जानवी त्याला पाहून थरथर कापत होती तिने निनादचा हात भितीने गच्च
पकडला पण निनाद त्या घुबडाकडे पाहत होता... जानवीने त्याला सांगितले ते
कसे कसे तिचा पाठलाग करत आले आहे .. निनाद तेच घुबड पाहत होता
त्याच्या चेहऱ्यावरील भाव गंभीर झाले होते त्याने आपली मान नकारार्थी झटकली
आणि" नाही ! हे नाही होऊ शकत नाही" म्हणत बाजूच्या असणाऱ्या लाकडी
कुंपणास हाताने धरून उभा राहिला त्यावर आणि जानवी त्याच्या जवळ आली व
म्हणाली "काय नाही म्हणतोस काय झाले आहे ?" त्यावर निनाद म्हणाला "हे ठीक
नाहीये ... खूपच मोठे संकट येत आहे .. तुझा जीव धोक्यात आहे .."

निनादचे ते वाक्य ऐकताच जानवीस जणू धक्काच बसला. कसेबसे ती बोलू लागली " मी कोणाच काय बिघडवले आहे? ते माझ्या मागे का लागले आहे? " त्यावर निनाद उत्तरला "नाही हे साधेसुधे घुबड नाहीये हे एक पिशाचरूप आहे. याला तुझ्यामागे कोणी तरी सोडलय ? कोण पाठवले यास माहित नाही पण सध्यातरी ..तुला काळजी करण्याची गरज नाहीये तू मेनॉरला जा मी येईन तेथेच आपण या सर्वाचा विचार करूयात आणि कोठे दुसरीकडे जाऊ नकोस.. " जानवी त्याकडे पाहत घाबरलेल्या नजरेने बोलली "म्हणजे ??" .."नाही तुला तेथे आल्यावरच सर्व काही सांगेन तू फक्त गेस्ट हाउसमध्येच रहा " "बर ठीक आहे .." असे म्हणत जानवी गल्लीबाहेर उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसली. नाथू तिला पाहताच चटकन गाडीत बसला आणि त्याने गाडी पळवत पळवत मेनोरवर आणली जानवी आपल्या विचारात गुंग होती हातात असलेल्या त्या कॅमेरात नितीनच्या घराच्या फोटोना पाहत होती. नाथू तिला म्हणाला "मडेम उतरा आता आणि हे घ्या तुम्हाला चाव्या मी नाही थांबू शकत इथ मी जातोय आता " नाथूने जानवीकडे तिच्या उत्तराची अपेक्षा देखील केली नाही आणि जानवीच्या हातात त्या मेनॉरच्या चाव्या ठेवून तो जणू तेथून पळूनच गेला. जानवी त्याला मागून गाडी पासूनच हाका मारू लागली "नाथू ... थांब ... नाथू ..प्लीज " पण तो तिचे काही ऐकण्यास तयार होईना व तसाच तो पळून गेला. जानवी त्या घरात पूर्णपणे एकटीच होती. आत जाण्यास देखील तिची हईगई होऊ लागली... पण तरीही ती आपली खांद्यावरील bagच्या बंधास हाताने घट्ट आवळून आत जाऊ लागली तेथे पसरलेली ती भयंकर अंगास झोंबनारी थंडी, मेनॉरच्या मागून येणाऱ्या त्या घनदाट जंगलातील श्वापदांचे आवाज, ते सर्व भयानक होते. जणू निसर्ग तेथे कोणाच्या तरी उपस्थितीची जाणीव करवून देत होता जानवीस असे भासत होते कि कोणीतरी येत आहे. जानवीने एक पाउल पुढे टाकताचक्षणी समोर असलेले मेनॉरचे मुख्यद्वार आपोआप उघडले जानवीचा श्वास वरखाली होऊ लागला होता. पण तरीहि ती हिम्मत करून तडतड चालत त्या घरात, त्या मेनॉरमध्ये गेली आत जरासा काळोख होता. म्हणून तिने कसेबसे मेणबत्ती शोधून काढली व पेटवून तेवढाच तिचा उजेड स्वतःपुरता केला आणि आपल्या खोलीकडे जाणाऱ्या पायऱ्या चढू लागली. "ठप्प ..ठप्प .." असा आवाज तिच्या पायाचा प्रत्येक पायरीवर पडल्यास येत होता.. जानवी आपल्या खोलीपर्यंत पोहोचली. आणि मेणबत्ती बाजूला मेजवर ठेवत खोलीचे कुलुप काढू लागली तिने हातातील चावी आत कि-होल मध्ये घातली. कि "खटट " असा आवाज करीत कुलूप उघडले आणि तितक्यातच खोलीपासून काही अंतरावरील अंधारश्या भागातून तिला एक अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला "ठSS...ठSSक.. " जानवीने आपली सर्व हालचाल बंद केली आणि तिने नीट शांतपणे लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आणि आता तो आवाज तिला स्पष्ट आणि ठळक ऐकू येऊ लागला "..ठाSSSक....ठाSSSSSक ....ठाSSक ठाSSSक ठाSSSक .. " तो आवाज अंधारातून जणू सरसर कोणीतरी पळत जानवीकडे येतय असा तो आवाज वाढला होता आणि जवळ येत होता तो जवळ येत होता. जानवीचे डोळे मोठे होत जात होते. तिचा श्वास भरला जात होता तिला काही सुचेना झाले ते जे काही त्या अंधारात होते ते आता आपल्यावर वार करेल याची तिला पूर्वकल्पना झाली आणि तिने तेवढ्यात चपळाई दाखवून खोलीचे दार उघडले व स्वतःला झपाट्याने आतमध्ये झोतून दिले. आणि दार लावून घेतले व दारास टेकून उभा राहिली कि "धाड..." दाराला एक जोरदार धक्का बसला ... जणू दाराच्या पलीकडे कोणीतरी होते आणि त्या सोबतच तो ठाक ठाक असा आवाज ते दार वाजवत होते . नाही "ते दार जबरदस्तीने उघडत होते . जानवी आपला सर्व जोर लावून दार उघडण्यापासून अडवू पाहत होती.. पण तिच्या पाठीस खूप धक्के बसले जात होते.. जानवीने आपला सर्व आवाज गोळा करून ओरडली " चूSSSपSSS..." तिच्या त्या ओरडण्याने सर्व शांत झाले दार वाजणे आणि तो आवाज हि बंद पडला.. आणि तशी जानवी आपल्या डोक्यास हात लावून खाली बसली.. आता बाहेर जाणे देखील जीवावर बेतणारे होते.. निनाद येणार होता पण तो हि अजून तिला आलेला दिसत नव्हता. तरीही बाथरूम मध्ये जाऊन तिने आपला चेहरा धुतला व फ्रेश होऊन बाहेर येणारच कि तिच्या लक्षात आले कि तिने नितीनच्या घराचे फोटो आणले आहेत ते एकदाचे पाहून घ्यावेत.. असा विचार करून ती पाहणार होतीच कि तिने आधी दरवाजा पूर्ण बंद केला .. सुरक्षे करिता तिने.. दारास खुर्ची देखील अडकवून ठेवली आणि आपल्या बेडवर येऊन ते फोटोज पाहू लागली पण त्यात काहीच दिसत नव्हते.. कि अचानक तिच्या लक्षात आले तिने असाच निनादचा पण एक विडीओ पाहिला होता.. आणि त्यात तिने तो थर्मल व्हीजन वापरून पाहिलेले .. ते लक्षात येताच जानवीने त्या फोनमधील फोटोचे इफेक्ट चेंज करून पाहिले तेव्हा तिला त्यात त्या फोटोतील घरामध्ये नितीन आणि त्याचे आईवडील खेळतानाचे फोटो दिसू लागले...ते पाहून जानवी हदरून गेली ..तिला हे तर सिद्ध झाले होते कि निनाद खरे बोलत होता.. जानवीने ते फोटो बंद करून बाजूला ठेवून दिले.. कि खालील असलेले मुख्यद्वार कोणीतरी ठोठावल्याचा आवाज जानवीला आला... जानवी बाहेर न येताच खोलीच्या खिडकीतून तिने बाहेर पाहिलं तर निनाद तेथे होता.. जानवीने आव बघितला न ताव ती धावतच खाली आली .. तिने कोणाचा देखील विचार केला नाही ती पळतच खाली व दार उघडून ती निनाद चा हात हातात घेऊन त्याच्याजवळ रडू लागली " कोठे होतास तू ? येणार म्हणाला होतास आणि इतका उशीर ..प्लीज मला इथून बाहेर काढ ... त्यावर निनाद म्हणाला "जानवी अग घाबरू नकोस! तू इथे राहणे देखील बरोबर नाहीये तुला येथून जावच लागेल " त्यावर जानवी निनाद कडे आशाभूत नजरेने पाहत म्हणाली "तू पण चल माझ्यासोबत नाहीतर मी जाणार नाही " निनाद गोंधळला "पण हे कस शक्य आहे ..मला इथे" तेवढ्यात जानवी त्याचे वाक्य तोडत त्याला म्हणाली "तुला माझी शपथ आहे . मला भीती वाटतेय चल माझ्या सोबत तू देखील " जानवीच्या त्या हट्टासमोर निनाद ला झुकावेच लागले .. कि काय माहित त्या दोघांमधील जवळीक वाढत होती.. ते एकमेकांच्या जवळ येत होते. निनाद आणि जानवी दोघेहि जानवीच्या त्या घरी परतले. असेच काही दिवस उलटून गेले .. जानवीला इथे झालेला त्रास त्या घरी होत नव्हता.. पण एकेदिवशी जानवी आणि निनाद सायंकाळी निनादच्या ताकतीबद्दल चर्चा करीत होते.. निनादला विचित्रसे भासू लागले.. त्याची तबियत जराशी ढासू लागली.. निनादसमजू लागला कि काहीतरी विचित्र घडणार आहे... त्याला आजवर कधी असे झाले नव्हते..निनादला त्या घरात देखील कोणाची तरी उपस्थिती जाणवू लागली. त्याने या बाबतीत जनविला काही सांगितले नाही. पण त्याच रात्री. गूढ झोपेत असणाऱ्या निनादला जाग आली.. बाहेर रातकिडे किर्रर्र किरर्र करीत ओरडत होते... निनाद बेडरूम मधून बाहेर आला.. आज त्याला खरे काही ते कळणार होते.. कि काय आहे नेमके जानवीच्या मागावर.. असा विचार करीतच तो .. बेडरूममधून बाहेर आला व खाली हॉलमध्ये येऊ लागला.. पायऱ्याहून खाली येत येत.. त्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे अस त्याला वाटू लागले तो आता खाली आला होता.. आणि खाली येताच त्याच्या मागून एक आवाज त्याला ऐकू येऊ लागला "खंरर्र्रर्रर्र्र ....खंरर्र्रर्रर्र्र "..जणू कोणीतरी एक लोखंडी, जड , लांब अशी वस्तू जमिनीवर टेकवून ओढत ओढत त्याच्याकडे येत होते. निनादने आपली मान हलकेसे वळवून मागे पाहिले.. कोणाची तरी अंधुकशी कान्या डोळ्याने पाहिल्यास त्याला ती त्याच्याकडे येणारी प्रतीकृती दिसली.. निनाद ने एका झटक्यातच मागे पाहिले.. कि मागे मागेतर कोणीच नव्हते... निनादच्या सर्वांगास एक हलकेसा वाऱ्याचा झुळूका सरसरून शिवून गेला.. निनाद थोडा थरथरला.. निनाद स्तब्ध उभा होता आणि त्याच वेळी त्याला त्याच्या कानाच्या एकदम जवळ कोणीतरी बोलल्याचे ऐकू आले .. "नी...नाSSSSSद.....खीहिहिहिहीखीखी.. त्या आवाजाने निनादच्या मनात धस्स झाले त्याला छातीत एक चमक येऊन गेली डोक्यात मुंग्या झाल्या.. तो आवाज जनु एका स्त्री आणि पुरुषाचा एकत्र होता. घोगरा असा.. कर्कश्श निनाद ने आपल्या कानावर हाताने झटकून मागे झाला ... आणि त्याचे लक्ष तेवढ्यात त्या हॉलच्या वरच्या कोपर्यातून घरंगळत खाली येणाऱ्या रक्तावर पडली.. ते रक्त निनाद कडेच येऊ लागले ... होते ..निनाद थोडा मागे सरकला आणि रक्त जेथून येत होते तेथे तो पाहत जाऊ लागला .. आणि असे करत करत त्याचे लक्ष पुन्हा त्याच कोपऱ्यात गेले आणि तिथे त्याने जे पाहिले .. ते पाहताच.. त्याच्या अंगातून एक सणसणीत.. अशी लहर पसरली गेली छाती जड झाल्यासारखी वाटत होती. समोर त्या कोपऱ्यात एक विभिन्न गोष्ट बसलेली होती. आपले दोन्ही हात आणि पायाचे तळवे भिंतीस चिटकवून एक पिशाच आपले दात इचकवत निनादला पाहून हसत होत. पण निनादने यापूर्वी फक्त आत्मे पहिले होते, पिशाच नाही. आज त्याने प्रत्यक्षात दुष्टआत्मा पहिली होती. तिला पाहताच नीनादचे डोके भयंकर रीतीने त्रासु लागले त्याची तबियत बिघडू लागली. तो स्वतःचे डोके जोरजोरात झटकू लागला कि, अचानक त्या समोरील पिशाचाने बोलण्यास सुरुवात केली "हेहेहे...स्स्सस्स्स त्रास होतोय न ..हिहीह्ह .. चूक केली तिने ....खूप मोठी चूक माझी पूजा भंग करून स्स्सस्स्स्स " त्यावर त्या पिशाचाच्या बोलण्याने भानावर आला आणि म्हणाला"कोण... कोणती चूक ? आणि कोण आहेस तू ? " त्यावर ते पिशाच भर्रकन .. उडत निनादच्या चेहऱ्याजवळ आले... त्याचे ते विखुरलेले तापट लालकाळे जळलेले केस.. चेहऱ्यावर कापाचे निशान . डोळ्यांनातर जणू पापण्या नव्हत्याच .. गच्च भरलेल्या केसाळ भुवया..तो जणू रंकाळाच वाटत होता त्याने पिशाचाने पुढे बोलण्यास सुरुवात केली त्याच्या अंगातून सडका वास येत होता .. तरीही निनाद जागेवरचा हलला नाही तो त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला पाहत होता "जानवी तिने चूक केलीय .. फक्त चूक त्याचीच शिक्षा द्यायला आळोय स्स्स्सस... जीव घेणार मी तिचा.. तिला तडतड तडपावून ..सिहीहीहीस्स्सस्स.. " निनाद उत्तरला "मी तुला असे करू देणार नाही ..." निनाद चे ते वाक्य ऐकताच ते पिशाच .भयानक रीतीने हसू लागले त्याचा आवाज जिकडे तिकडे घुमला ..आणि काही क्षणातच ते पिशाच घुबड होऊन .. फड फड उडत ..जानवीच्या खोलीत शिरले .. निनाद बाहेर हॉलमध्येच होता कि जानवीच्या खोलीतून एक किंकाळी निनादला ऐकू आली .. आणि त्याने जानवीच्या खोलीकडे धाव घेतली आतमध्ये जानवीची ती अवस्था पाहून निनाद थंड पडला ..जानवी समोर फुटलेल्या खिडकीच्या तावदांनान पाहत होती..निनाद येताच ती भीतीने त्याला जाऊन बिलगली .. आणि रडू लागली आणि म्हणाली "ते ... ते ..घुबड निनाद .. ते घुबड .. परत आले ..." असे म्हणत जानवी अत्यंत वेडेपनाणे रडू लागली होती ..पण तरीही तिला सावरत त्याने झोपवले.. आणि तो हि तिच्या बाजूस झोपला ...आणि सकाळ हि झाली होती..निनाद आता जाणविला एकटे सोडणे बरोबर समजत नव्हता.. तो तिच्या पाशीच पडून होता रात्री जानवी झोपल्यावरच तो झोपी गेला ... पण त्याच्या हि मनात धाकधूक होतीच .सकाळी तो जानवी आधीच उठला होता आणि चहा घेत जानवीच्या उठण्याची वाट पाहू लागला .. तसेच त्याला आठवले कि आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे आणि त्याने लगेच गडबडीत तेव्हा आपल्या खिशात हात घालून एक कार्ड बाहेर काढले त्यावर नाव होते paranormal प्रोफ्रेष्णलीस्ट mr.आदित्य गुप्ता व दीक्षा गुप्ता त्याला ते आठवले कारण ज्या दिवशी जानवी निनादला भेटण्यास आली होती त्याच्या आधी आदित्य व दीक्षा देखील निनादला आपल्या टीमला जॉईन करण्याचे निमंत्रण घेऊन आले होते ...पन निनादने त्यावेळी नकार दिला होता म्हणून त्याने यावेळी त्या दोघांना बोलवण्याचे ठरवले आणि त्या कार्डवरील नंबरवरती फोन लावला "हेलो .. आदित्य आहेत का ??" तिकडून उत्तर आले "नाही मी दीक्षा आहे आपण कोण " त्यावर निनाद इकडून उत्तरला "मी निनाद मला तुमची गरज आहे .."

निनादचा फोन आहे हे ऐकताच दिक्षाचा आंनद मावेना झाला होता तिला कधी एकदा आदित्यला सांगेन असे झाले होते. पण निनादचा असा इतका गंभीर स्वर ऐकून दिक्षा त्याला म्हणाली 'काय झाले निनाद? एनी प्रोबलेम ' त्यावर निनाद म्हणाला "होय मी सध्या तुमच्याच शहरात आहे एका फ्रेंडच्या घरी आहे आणि इथे " असे म्हणत निनाद ने दिक्षाला घडलेला सर्व घटनाक्रम विस्तारपूर्वक सांगितला. दिक्षा निनादचे ऐकून थोडी गंभीर झाली आणि विचारात पडली आदित्य आणि आपल्या टीमला बोलावण्याची गरज आहे. पण आदित्य तेव्हा एका दुसऱ्या कामगिरीवर होता. एक जुनाट असे मेंटल हॉस्पिटल होते तेथे भुताटकीचा रहवास होता. आदित्य आपल्या टीम सोबत तेथे गेला होता.. बऱ्याच वर्षाआधी एक वेडा सिरीयल किलर जेल मधून तेथे आणण्यात आला होता त्याचे नाव होते" जग्ग्या ". त्याने निर्घृणरित्या लोकांचे मुडदे पाडले होते. म्हणून त्याला जेलची सजा झाली होती त्याच सोबत मेंटल हॉस्पिटल पण एके दिवशी त्याच मेंटल हॉस्पिटलमध्ये निम्म्याहून जास्त लोकांना वेडाच्या त्याने ठार केले होते त्याच्या उपद्रवाने शेवटी पोलिसांनी येऊन त्याला तेथेच मारला. पुन्हा ते हॉस्पिटल चालू झाले होते पण त्या हॉस्पिटलमध्ये जग्ग्याचे भूत काही जणांना दिसले होते त्याच्या आत्म्याने तेथे कहर माजवला होता. म्हणून ते हॉस्पिटल सुनसान पडले होते. डॉक्टरानी भीतीपोटी तो दवाखाना बंद करून टाकला. आदित्य तेथे जग्ग्याचे भूत पकडण्यास आला होता. आदीने आपल्या टीमला देखील सोबत आणले होते. पण आज त्यांची देखील घाबरगुंडी उडाली होती. आदित्य हातात टोर्च घेऊन सर्वत्र जग्ग्याला शोधण्याचा प्रयत्न करू लागला..आदित्यसोबतचे त्याचे मित्र देखील सरतेशेवटी इकडे तिकडे हातात टोर्च घेऊन फिरु लागले जग्ग्याचा रॉकी आपले थर्मल विजन चे कॅमेरे घेऊन सर्वत्र फिरत होता.. त्याला कुठेतरी रेंज मिळत होती.. आणि काही वेगवेगळे रंग त्या कॅमेऱ्यात दिसत होते.. आदित्य एका ठिकाणी अडगळीत पोहोचला.. तेथे थोडासा कुबट असा वास होता. ते हॉस्पिटलचे मुडदा घर होते आदित्य टोर्च मारत थोडा पुढे गेलाच कि "खळलंकखळलंक... असा चाकाचा आवाज करीत तेथे असलेले स्ट्रेचर बाजूला झाले आदित्यने उजेड मारून नीट पाहिले तेव्हा त्याला समोर मोकळा भाग झालेला दिसला.. आणि त्या मुडदाघराच्या शेवटच्या कोपऱ्यात जग्ग्या उभा असलेला दिसला.. हातात रक्ताने माखलेला कोयता बलाढ्य शरीर चेहयावर गच्च भरून दाढी पांढरे डोळे ..डोक्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे ओले झालेले केस त्याच्या चेहयावर चिकटत होते.. नि असाच तो गुर्रर गुर्रर्र्र करीत आदित्यला पाहत होता..आदित्यने खिशातून वॉकीटोकी काढला आणि हळूच म्हनाला "गाईज कम इन मोर्ज ..हि इज हिअर " आदित्यने आपल्या टीमला संकेत दिला आणि ते तेथे येऊन पोहचणार होते कि मुडदाघराचा दरवाजा बंद झाला ते बाहेरून दार वाजवत होते.. पण काहीच उपयोग नव्हता.. आदित्य जग्ग्या समोर एकटाच होता.. पण तरीही आदित्यने आपला चाबूक जवळ ठेवलेलाच.. आणि त्याने तो सररर.. आवाज करीत पाठीवरून काढला "आणि जमिनीवर चोपारला ... त्याचा पूर्ण आवाज त्या वार्डमध्ये घूमला आणि बाहेर हि ऐकू आला तेव्हा बाहेर उभे असलेले त्याचे टीममेट म्हणाले चला झाल काम आपली गरज नाही आता तो येईल लगेच बाहेर आणि तसेच झाले आदित्य एका थैलीत राख भरून घेऊन बाहेर आला आणि रॉकीकडे फेकत म्हणाला 'हा धर जग्ग्या यात आहे ' नि से म्हणत सगळेजन बाहेर जातच होते कि आदित्यला फोन आला आणि त्याने पहिले तो दिक्षाचा होता "अरे वाह मिसेस हेल्लो माझी राणी काय म्हणतेयस हम्म ? " तिकडून दिक्षा उत्तरली "आदी अरे तुला निनाद आठवतोय का ज्याच्या गावी आपण गेलो होतो त्याच्या पावर्सबदल जाणून घ्यायला त्याला आपली टीम जॉईन करण्यासाठी आपण आमंत्रित केले होते पहा "आदित्य "हो हो आहे माझ्या लक्षात पण त्याचे काय झाले आहे " त्यावर दीक्षा म्हणाली "त्याला एक प्रोबलेम आहे तू येशील सध्या मी त्याच्या घरीच आले आहे " आदित्य उत्तरला "ओके आय'ल बी राईट देअर येतोय मी " आदित्य तेथे पोहोचला जानवी दीक्षा आणि निनाद तेथे हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते व आदित्यची वाट पाहत होते जानवीने त्यांच्यासाठी चहा बनवला आणि निनादने त्यांना झालेले सर्व सांगितले कसे कसे जानवी त्या तेथे निनादला भेटण्यास गेली कसे ते घुबड तिच्या मागे लागले .ते विचित्र आवाज आणि रात्री घडलेला प्रकार आदित्यने तात्काळ पाउल उचलण्याचे ठरवले आदित्य सर्व घर पाहू लागला..आणि दिक्षा देखील फिरून पाहू लागली. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी पाहत होते. दिक्षा जानविच्या खोली पर्यंत गेली.. जशी जशी ती जानवीच्या खोलीजवळ जात होती तसे तसे दिक्षाला एक दुर्गंध येऊ लागला.. खूप घाणीचा दुर्गंध विष्ठेचा.. दिक्षाने आपल्या रुमालाने आपले तोंड नाक दाबून घेतले व ती हळू हळू तेथे जाऊ लागली..आतमध्ये खोलीतून एक आवाज तिला येत होता काही तरी पुढे मागे होतय एखादी लाकडी वस्तू जी जोर पडताच चर्रर्रर्र्र्र ...च्र्रर्र्रर्र्र " आवाज करीत हलत होती.. दिक्षाने जानवीच्या खोलीच्या दरवाज्याला आपले कान लावले व ती ऐकू लागली..त्या दरवाज्याच्या पलीकडे कोणीतरी होते.. आराम खुर्चीत बसून हलत होते कि दाराच्या पलीकडून दीक्षाला अत्यंत कानाच्या जवळ एक आवाज ऐकू आला "हिह्ह्हिह्हि.....दिक्षांSSSSSS !!!" ते ऐकून दिक्षाने धाड्कन दरवाजा उघडून आत पहिले आणि आत आत तर कोणीच नव्हते दिक्षा समजून गेली कि हा चकवा आहे... आपल्याला इथून बाहेर निघावे लागणार कि तितक्यात मागून दीक्षाला कोणी तरी आत ढकलले व दार आपोआप बंद झाले दीक्षा ओरडली "आSSSदित्य !!!... आदित्य sssss ..." दिक्षाचा आवाज ऐकून आदित्य जानवी आणि निनाद धावतच वरती आले आणि त्यांनी दार उघडण्याचा अतोनात प्रयत्न केला...पण उघडेना कि त्याच वेळी दीक्षा ज्या खोलीत होती तेथे गूढ अंधार जमा झाला. आणि तेथेच तिला एक आवाज कानी पडू लागला "क्र्रर्रर्रर्र्र्रर्र्र्र... क्र्रर्र्रर्र्रर्र्र " तो त्या आराम खुर्चीचा होता त्यावर कोणी तरी बसले होते..दीक्षा पुढे सरसावून ते पाहणारच होती कि तितक्यात त्या खुर्ची वरील प्रेताने तिच्या वर झडप... घेतली आणि दीक्षा किंचाळत त्या खोलीतून बाहेर आली ... बाहेर आदित्य उभा होता ती त्याला जाऊन बिलगली. व सांगू लागली.. "आदी आदित्य आपल्याला लवकरात लवकर काही तरी केले पाहिजे..." आदि उत्तरला "हो ठीक आहे .. आजच करूयात काय ते. असे म्हणत आदित्यने " आपली गाडी काढून बाहेर काही तरी आणण्यासाठी गेला . बराच वेळ झाला होता सायंकाळ हि होत आली.. तेव्हा दीक्षा जानवी आणि निनाद हॉलमध्ये आदित्यची वाट पाहत होते आणि तेवढ्यातच घरात एक भयान शांतता पसरली होती... आणि त्यातल्या त्यात दीक्षा उठून बाहेर जाऊन आदित्य आला कि नाही हे पाहत होती..कि घराबाहेर असणाऱ्या स्माशानाकडे जाणाऱ्या त्या रस्त्यावर लंगडत लंगडत चलत कोणी तरी जात होते.. दिक्षा मागून ते पाहतच होती.. तो सरळ चालत च जात होता.. अंगावर काही तरी काळे घोंघड पांघरलेले होते त्याने खाली काटे रुतलेले देखील तो व्यक्ती न पाहता चलत होता. तो तसाच करून पुढे आत स्मशानात पोहोचला. दिक्षा त्याच्या मागे मागे निघू लागली ... दिक्षा त्याच्या मागेच जात जात स्मशानात पोहोचली पण तेथे सायंकाळच्या वेळी सुद्धा धुके असे भासत होते.. आणि आजू बाजूने जळणाऱ्या चिता.. अखेरीस शोधल्यास दिक्षाला तो व्यक्ती दिसला... तो एका चिते जवळ काठी टेकवून उभा राहून पाहत होता.. दिक्षा त्याच्या जवळ जाऊ लागली .. कि तो एखाद्या फकीर बाबाच्या करड्या आवाजात म्हणाला "आलीस... मुझे मालूम था तू जरूर आयेगी ये ...तुला सांगतो काही सत्य " त्यावर दीक्षा म्हणाली कोण तुम्ही आणि इथे काय करताय? तो म्हणाला "मी लोकांचे मरण जगण दुख सुख सगळ पाहतो..हे सगळे सांगतात मला " दीक्षा म्हणाली कोण? तो उत्तरला "या जळणाऱ्या चिता " असे तो म्हणताच त्या स्मशानात एक किंकाळी घुमली दीक्षा घाबरली त्यातच तो म्हणाला "डर मत .. हे सगळे मुक्त होतायत त्यांच्या मुक्तीचा आवाज आहे हा सगळा आणि लवकरच असा आवाज तुझा पण घूमेल " दीक्षा म्हणाली "मला काही समजले नाही .. काय म्हणताय तुम्ही ?" "त्या घरात प्रेत हे रंकाळाने लावलय रंकाळाने त्या दुष्ट आत्म्याचे प्रेत जिवंतपणी अर्धेच जाळले आहे ते पूर्ण जाळले तरच ते प्रेत देखील नष्ट होईल .पण रंकाळा त्या प्रेताच्या श्रापाने काळोखात हरवलाय नष्ट झालाय सडून मेलाय तो .. आणि ते प्रेत आता बेलगाम झालेय...कोणी हुकुम देणारा नाही त्याला " मग हे सगळे तुम्हाला कस माहित दीक्षा त्या व्यक्तीस म्हणाली "आहे त्या वरच्याची करणी मला अस बनवल त्याने .."तुझी मदत करायला आलोय "त्या प्रेतास एक सज्जन आत्माच नष्ट करू शकतो... इस दुनिया मे जहा बुराई है वही उसे मिटाने के लिये अच्छाई हमेशा जन्म लेती है इन्सान रूह यह आत्मा इन सबका मिलन सिर्फ यही होता है कब्रीस्तान उस रूह ने भी यही से शुरुवात कि है उसका अंत भी यही है . मैने देखा था तब उसे इस कब्रसे उठते हुये इसलिये तुझे आगाह कर रहा हु.. तू कर सकती है सिर्फ तू हि कर सकती है जा उस लडकी को बचा ले मैने तुजे रास्ता दिखाया है अब उसपे तुझे चलना है प्र याद रखना कुर्बानी तो देनी हि होगी... " असे म्हणत तो व्यक्ती त्या धुक्यात मागे मागे सरकला गेला.. आणि हवा जसे हवेत विरघळते तसाच तो विरघळून गेला दिक्षा त्याला बोलणार कि तो गेला होता.. इकडे आदित्य तिला मागून हाक मारत मारत तेथे आला "दिक्षा SSS ... दिक्षाSSSS " दीक्षा हि त्याच्या हाकेस उत्तर देत म्हणाली "आदित्य मी इथे आहे " आदित्य धावत धावत तिच्या पाशी आला आणि म्हणाला आग इथे काय करतेयस तू ? त्यावर दीक्षा म्हणाली या सर्वाची सुरुवात इथूनच झाली आहे .. जानवीच्या मागे ते प्रेत रंकाळा नावाच्या तांत्रिकामुळे लागले आहे आणि ते एक श्रापित पिशाच आहे.. त्याचा अंत फक्त इथे या स्माशाणात होऊ शकतो...आणि त्यासाठी ते पिशाच येथे आणावे लागणार ..त्यावर आदित्य म्हणाला "हो पण तुला कस कळले हे " दीक्षा म्हणाली "मी तुला ते सर्व नंतर सांगेन पण आपल्याला ते प्रेत इथे आणावेच लागेल आणि हे काम फक्त जानवीच करू शकते असे म्हणत दीक्षाने आदित्यला .. जानवीकडे परत चलण्यास सांगितले ते दोघे धावत तेथे परतले आणि आत गेले आतमध्ये जानवी कोठेच दिसत नव्हती निनाद जानवीला हाक मारून मारून इकडे तिकडे शोधू पाहत होता. पण त्यांना जानवी कोठेच सापडेना झाली होती. कि त्याच वेळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात विचित्र आवाज येऊ लागले .. व्हुह्हऊ .. व्हुह्हऊ... सर्वत्र घुबडच घुबड वाटत होते... निनाद म्हणाला "ते परत आलेय " आदित्यने निनादला सांगितले काहीही करून जानवीस शोधले पाहिजे.. त्यांनी जानवीला इकडे तिकडे शोधले. सर्वजन विखुरले गेले..आणि वेगवेगळे होऊन जानवीस शोधू लागले ... निनाद घराच्या एका कोपऱ्यात पोहोचलाच होता...कि तेथे त्याला आवाज आला 'हीहीही निनाSSSद अरे इकडे बघ " निनादने मागे पाहिले तर मागे छतास उलटे लटकत निनाद ला बोलत होते तेथे धावत आदित्य आणि दीक्षा आले ते पाहून आदित्य जागेवरच थांबला होता... आदित्यला पाहताच ते प्रेत आपल्याच साउलीत विरघळून नाहीसे झाले.. आदित्य त्याच्या साउलीवर धावला ... पण त्याची साउली देखील तेथून नाहीशी झाली.. आता यावेळी सर्वत्र अंधार पसरला होता. घराबाहेर आणि घरात देखील पण जानवी कोठेही नव्हती कि घरातच बेसमेन मधून दीक्षाला आवाज ऐकू आला ती जानवी होती...तिने आदित्यला हाक मारून ते बेसमेन चे दार उघडवले आणि ते तिघेहि आत गेले पण ... आत मध्ये एक गुडूप अंधार होता पण कोठे जानवी दिसत नव्हती.. जानवीचा आवाज मात्र त्यान ऐकू येत होता.. आदित्यने दीक्षाचा हात धरून तिला म्हणाला "हे काय होतय ? याचा अर्थ काय नेमका " त्यावर दीक्षा निनाद कडे वळली आणि म्हणाली "निनाद तुझ्या ताकतींची आता खरी गरज आहे आपल्याला जानवीचा जीव वाचवायचा आहे आणि त्या पिशाचास आपल्याला स्मशानाकडे न्यायचे आहे " निनादने दीक्षा आणि आदित्यकडे पहिले निनादने आपली सर्व शक्ती जमा केली .. त्याचक्षणी तेथे एक विस्फोटके झाली ... व त्या अंधारात पसरलेल्या पिशाचाच्या वास्तव्याचे नेमके ठिकाण निनादला भेटले. आणि त्या सोबत जानवी देखील निनादने जानवीस त्याचक्षणी आपल्याकडे घेतले आणि तो तिला म्हणाला जानवी काहीझाले तरी मागे न पाहता आपल्याला त्या स्मशानात पोहोचायचे आहे .." पण जानवी भीतीपोटी थरथरत होती. तिला काहीच समजेना झाले होते. सर्वांनी ठरवले कि तेथे जाऊन ते प्रेताचे अर्धे शरीर जाळावेच लागणार ते हि जानवीच्या हस्ते.. दीक्षाने जानवीस उठवले.. व आदित्य त्यांच्या मागे मागेच येऊ लागला ते आपल्या घराबाहेर पडलेच होते.. कि तेथे त्यांच्या पुढ्यात ते पिशाच येऊन उभे राहिले.त्याला पाहूनच त्यांनी आपला रस्ता बदलला आणि कसेबसे तेथे जाऊन पोहोचले.. दिक्षास जन आपोआप सर्व जाणवू लागले... कि त्या पिशाचाचे प्रेत तेथे कुठे आहे. आदित्यने दिक्षास कळवले दीक्षा काही झाले तरी ते पिशाच आपल्याला यात नाही यशस्वी होऊ देणार.. आपल्याकडे इतका वेळ नाहीये. नाही आदित्य काहीही केले तरी जानवीचा जीव वाचवायचा आहे आपल्याला हो पण... कि कोणाची तरी हाक आदित्यच्या कानी पडली ..."आदीभाई.... ये आद्या कुठेयस तू ? आदित्य ,," कधी सौम्य कधी दरडा आवाज असे दोन चार आवाज आदित्य आणि दीक्षास हाक मारत होते आणि ती लॉक म्हणजे होती आदित्यची टीम गोविंद, प्रज्ञा, रॉकी सर्व आदित्यच्या मदतीस आले होते... सर्वांनी तेथे येऊन आदित्यची मदत करण्यासाठी सुरुवात केली व अखेरीस ते प्रेत उकरून काढले.. पण त्यातच अचानक कुठून तरी ते पिशाच उडत आले .. आणि पाहता पाहता त्याने एका धक्क्यातच सर्वाना एकमेकापासून दूर पाडले.. प्रेततर बाहेर काढलेलेच होते पण ते मात्र अर्धे जळाले होते.. त्या प्रेताने जानवीस आपल्या ख्रूर नखांनी आवळले.. ते हवेत तरंगत होते..सर्व त्याच्याकडे पाहत होते. ते जानवीस दोन्ही हातानी केसांना धरून फरफटत एका जळणाऱ्या चितेकडे नेऊ लागले. हे सर्वजन जणू स्तब्ध झाले होते अखेरीस निनादने ते अर्धे जळलेले प्रेत उचलेले .. आणि स्वतः पळत जाऊन त्याने जळणाऱ्या चितेत उडी घेतली ... निनादच्या त्या झटापटीत केलेल्या कृत्याने... सर्वाना थक्क केले होते... निनाद जानवीकडे पाहत हसत हसत .. त्या प्रेतास घेऊन जळत होता जानवी त्याला पाहत राहिली आणि ते पिशाच देखील जानवीपासून दूर झाले व त्याच चितेत जळू लागले.. त्याच्या प्रत्येक अंगातून लाव्हा बाहेर पडल्यासारखे वाटत होते .. सर्व चितेतून एकच स्वर बाहेर पडत होता... मुक्तीचा स्वर आणि तोच स्वर देखील त्या भूतामधून निघत होता .. सर्वजन जळणाऱ्या निनाद ला पाहत होते... जानवीतर तेथेच स्तब्ध राहून पाहत होती... तिला थोडेसे भान येताच ती देखील त्याच चीतेत जाणार होती. कि दिक्षा आणि प्रज्ञाने जानवीस मागे खेचले जानवी रडू रडू ते सर्व पाहत होती..पन काहीच पर्याय नव्हता काळाच्या ओघात तो विलीन झाला होता.. ते सर्वजन तेथेच उभा होते आणि अचानक त्या जळणाऱ्या चितेच्या पलीकडून कोणी तरी लंगडत लंगडत चालत येऊ लागले ... दिक्षा त्या पडणाऱ्या साउलीस पाहून ओळखून गेली कि ते कोण होते.. तो तोच व्यक्ती होता जो दिक्षाला भेटला होता दिक्षा त्या चितेकडे पाहतच आणि त्या व्यक्तीकडे गेली ते सर्व दिक्षाकडे पाहत होते कि ती कुठे जातेय .. त्यांना काहीच कळेना झाले कि दिक्षा आता कुठे जातेय कोणालाच तो व्यक्ती दिसेनासा झाला होता... पण तो दिक्षाला मात्र दिसत होता..आदित्य तिला मागून हाक मारू लागला ... पण दिक्षा त्या चितेच्या पलीकडे जाऊन एकदम गायबच झाली .. ती त्या व्यक्तीला बोलू लागली ..."तुम्ही याच कुर्बानी बद्दल बोलत होतात का ?" त्यावर तो उत्तरला "मौत तो सिर्फ उपरवाले का एक मकाम है... हर किसीको इसे पार करना पडता है .. पर ये भी उसी कि मर्जीसे होता है ..अपनी खुद कि मर्जीसे नही... " त्यावर दिक्षा थोडी चपापली "म्हणजे ..." त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मतलब तू भी समझ गयी है पर जान बुझकर अनजान बन रही है | "असे म्हणत त्याने चितेत जळणाऱ्या निनादकडे पाहिले "वो लौट आएगा ... वो जरुर लौट आएगा... यह तो बस एक इम्तिहान था उसका .... हहहहाह" आणि असे हसत तो नाहीसा झाला ... कि तेथे पसरलेल्या चितेच्या धुरातून आदित्य आणि इतर सर्वाना दीक्षा येताना दिसली ..पण सोबत अजून कोणीतरी होते आणि तो होता ......................................"निनाद ..." समाप्त 

1 comment:

  1. सर आपली कथा एकदम रोमाचाकारक आहे .कथा वाचताना अगदी तल्लीन होतो.कथा अशी होती की ती संपूच नये असे वाटते खरचं आपल्या लिखाणात जादू आहे

    ReplyDelete