Wednesday, May 27, 2015

नमस्कार मी मनीष गुप्ते आज आपल्या समोर माझ्या सोबत घडलेली एक सत्य घटणा सांगत आहे

सेल्समन च्या job मुळे मला देशात
ठिकठिकाणी फिरायचा योग आला. ऑफिस
मधून टारगेट घ्यायच आणि आज हे गाव तर उद्या ते
गाव अशी भटकंती करत रहायच.
सकाळी मुंबईहुन निघालो तर
संध्याकाळी कधी कोकण तर कधी विदर्भ
असा प्रवास व्हायचा. गाव तिथे S.T.
आणि आवडेल तिथे प्रवास हे S.T. चे धोरण
मी पूर्णपणे आणि आनंदाने राबवत होतो.
प्रवास माणसाला बरच काही शिकवतो.
बारा गावाच पाणी पीण म्हणजे काय हे
मी पूर्णपणे अनुभवल होत.असो।
भिमाशंकर वरुन मुंबई ला जाणारी st पकडली.
रात्रीचे साधारण 9 वाजले होते. बस
तशी रिकामीच होती. कदाचित पावसाचे
दीवस असतील म्हणून प्रवासी कमी असतील अस
वाटल.
खिड़की जवळची जागा मिळाली अगदी आरामात.
प्रवास करायचा असला म्हणजे मी काही खात
नाही. फ़क्त अधे मधे 1-2 कप
चहा घ्यायचा तो सुद्धा झोप
उडवायला.बाकी प्रवासात झोप
उडवायला रस्त्या वरचे खड्डे पुरेसे असतात. पण
काही लोक तरीही गाढ झोपेत असतात. कस
काय जमत या लोकाना कुणास ठाउक?
गाडीने बघता बघता भिमाशंकर सोडल
आणि हाईवे ला येउन मुंबई च्या दिशेने वळली.
पावसाचा शिडकावा सुरु झाला म्हणून
मी खिड़की लाउन घेतली. Conductor त्यांच काम
करत होते. कपळावर गंधाचा टिळा आणि गळ्यात
माळ. प्रत्येक टिकिट फाडल्यावर पांडुरंग अस
बोलून दुसरया प्रवाशाकडे वळायचे.
गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे
त्यांना माझ्याकड़े यायला अजिबात वेळ
लागला नाही."माउली कुठे जाणार? "Conductor
नि विचारले. " मुंबई दया मास्तर " conductor
ना मास्तर म्हणतात हे आता अंगवलणी पडल होत.
" मास्तर, गाडी मध्ये कुठे थांबणार का? म्हणजे
लोकाना जेवणासाठी वैगेरे" मी आपला उगाच
गप्पा मारायच्या मूड मध्ये. पाटी वाचलित
ना? तिथेच थांबणार" मास्तरांना बहुतेक
माझा चेहरा आवडला नसावा. " घ्या टिकिट
आणि पैसे मोजुन घ्या. पांडुरंग हरी " मास्तर
पुढच्या प्रवाशाकडे निघाले.
बस वर लिहिलेल्या पाटी प्रमाने बस मंचर येथे
थांबणार होती. जवल जवळ 40-50 km चे अंतर होत.
म्हणून मी डोळे मिटायचे प्रयत्न केले पण बाहेर
पडणारा पाऊस आणि अंधारात
सुद्धा खड्ड्यातुन धावताना बसणारे धक्के झोपुन
देइनात .
तरी मला झोप लागलीच.
रात्रीचे 11.30 व्हायला आले. मंचर स्टैंड
वरच्या गोंधळाने जागा झालो. बस platform वर
लागतच होती. " गाडी थेट पुण्याला थांबेल.
मधल्या प्रवाशानी चढू नये. फ़क्त 15 मिनट
गाडी थांबेल " मास्तारांचा तार स्वर लागला.
मला चहाची तलफ आली होती. मंचर स्टैंड वर
सुंठ , आल घातलेला चहा मिळतो हे सवयीने
माहीत होत म्हणून पावल तिकडे वळली .
वाफाललेला चहा घेता घेता स्टैंड चे निरिक्षण
करायला लागलो.इथे बर्यापैकी गर्दी दिसून येत
होती. तालुक्याचे ठिकाण आणि बारामती,
अकलूज ला जायला इथून रस्ता असल्याने
कदाचित गर्दी असेल.
पाउस थांबला होता. वातावरण ढगाळ होत.
चन्द्र पण कुठे दिसत नव्हता. हवेत
कमालीचा गारवा जाणवत होता म्हणून
चहा संपवून बस मध्ये जाऊन बसायच ठरवल.
आता बस मध्ये थोड़ी गर्दी झाली होती.
सीट्स बर्यापैकी भरलेल्या दिसत होत्या.
अहो आश्चर्यम!! माझी सिट चक्क
रिकामी होती. मनातल्या मनात आनंद
झाला. चला आता पुण्या पर्यन्त ऐसपैस
पसरता येइल अस म्हणत खिड़की उघडली.
एव्हढ्यात एक पोटूशी बाई
स्वताला कशीबशी सावरत वर
चढताना दिसली. इकडे तिकडे नजर फिरवून
माझ्या शेजारी येउन बसली.
आता बाई, त्यातून पोटूशी म्हान्ल्यावर
मी जरा अवघडलो, आणि तीला थोड़ी अधिक
जागा करून दिली.
सर्व काही स्थिरस्थावर झाले. गाडी सुटली.
मास्तरांची टिकिट फाड़न्यासाठी लगबग सुरु
झाली.आता मी त्या बाईच निरिक्षण करू
लागलो.
नाकि डोळी नीटस , कपलावर भान्गेत कुंकू,
अंगकाठीने साधारण. बहुतेक
आजुबाजुच्या खेड्यातली असावी. पण
एव्हढ्या रात्रि हे वाढलेल पोट घेउन ही बाई
निघाली कुठे? हा प्रश्न आता मला सतवु
लागला.बर, तिच्याकडे काही सामान दिसेना.
थोडस दुर्लक्ष करायच ठरवल.
मास्टरानी पुढच्या सिट वाल्यांच टिकिट
फाडल आणि माझ्याकडे बघताच " पांडुरंग हरी "
अस बोलुन पुढच्या सिट कड़े वळले .
अरेच्चा ! मास्तरांनी ह्या बाईला तिकिटच
नव्हत विचारल. मी थोडासा गोंधळलो,
त्या बाई कड़े पाहिले आणि काही बोलणार
एव्हढ्यात ती बाईच बोलली " त्यों नाय
यायचा"
मी परत गोंधळलो . " तुम्ही टिकिट
नाही काढ्लत" मी विचारल.
" मला टीकटाची गरज नाय" बाई.
"कुठे जाणार आहात तुम्ही?"
मी चौकशीची खिड़की उघडली. " मी जीथ
जाणार तीथ तू येणार हाईस का? नाय ना. मंग
ग़प बस" हे ज़रा अतिच झाल. मी ज़रा आस्थेने
चौकशी करायला गेलो तर हीच उलट उत्तर.
थोडा वेळ गेला. पाउस परत सुरु
झाला.आता चांगलाच जोर पकडला होता.
हवेतला गारवा आणि पाउस आत येउ नये म्हणून
सर्वानी खिडक्या लावल्या.
थंडी वाजायला लागली म्हणून बँगेतुन चादर
काढली आणि अंगावर घेणार तेव्हढ्यात परत बाई
कड़े लक्ष गेल.
गरोदर बाई त्यातून थंडी, पाउस. स्त्री दक्षिण्य
म्हणून मी चादर पुढे सरकावली.
" मला नाय गरज " ती गरजली. म्हणल ठीक आहे.
नको तर नको . ज्याच कराव भल,
तो म्हणतो माझच खर. जाऊ दे ना. मला काय
त्याच अस म्हणून मी स्वताला चादरीत
गुरफाटल .
ही बाई आल्यापासून झोपेच पार खोबर झाल
होत. अस्वस्थपणे मी आजुबाजुला नजर
फिरवली.बस मध्ये अंधार पसरला होता''
"झोपले समदे" बाईच्या तोंडातून आवाज आला.
" कुत्र्या , मांजरावानी झोपली समदी"
" अहो बाई काय बोलताय तुम्ही? माणस आहेत
ती. तुमच्याकडे अशी भाषा वापरतात का?"
"मंग कुत्र्याला कुत्र नाही बोलायच तर काय
बोलायच?"
"अहो कोण कुत्रा , कोण मांजर?"
" समदे बाप्ये कुत्रे आणि समद्या बाया मांजरी"
बापरे तीच हे विधान मला फार अस्वस्थ करून गेल.
"अस का म्हणता? म्हणजे तुमची काहीच हरकत नसेल
तर तुम्ही मला सांगू शकता"
" मंग ऐक तर. म्या दिसाया कशी हायॆ? "
"चांगल्या आहात की"
"मंग माजा दादला मला का जिव लावत नाय"
"आता तुम्हा नवरा बायकोत काय झालय ते
मी कस सांगू?"
"पण म्या सांगतो ना.
त्यों त्या सटवीच्या नादाला लागला हाय
ना"
"अच्छा अस आहे तर"
"तिला बघून कुत्र्यावानी लाळ
घोटाया लागला आणि आणली ना घरात" तिचे
डोळे संतापाने लाल दिसु लागले.
"तुम्हाला सासु-सासरे कोण आहेत का?"
"बर झाल. मेली ती अदूगरच. ह्याची थेर
बघाया राहिली नाहित".
मी दीर्घ उसासा टाकला. आता एकदम स्पष्ट
झाल होत. नवर्या बरोबर भांडंण करून ही बाई घर
सोडून निघाली होती.
मला आता तिची दया येउ लागली.
"मग तुम्ही विरोध नाही केला का?"
"इरोध.... लय झगडा झाला. पण म्या ठरली बाई
माणूस त्यातून पोटुशी. माज कोण ऐकतो?"
"रोजच झगडा. त्या सटवीन तर पार इस्कोट
केला माज्या संसाराचा. माज्या बा च
बी नाय ऐकल त्यान" ती संतापाने थरथरत
होती.
"म्या पोटुशी. माज्याकड़न काय
त्येला मिळना , म्हणून माजा जादा राग
कराया लागला"
बापरे ! काय माणस असतात. गरोदर बाई कडून
ही अपेक्षा. शी शी...
"आज सांजच्याला आला पिउन.
ती बसली व्हति भाईर . शिवायच नव्ह्त ना.मंग
आला मज्याकडे. लागला झोंबाया अंगाला.
ती बी आली त्येच्या मदतीला."
मी सुन्न झालो.अस घडू शकत?
""दोगानी पाडली मला. कापड फाडली.
उदरातल्या बाळाची बी दया नाय आली."
देवा देवा... आता मला कससच व्ह्यायला झाल.
पण ती तीच मन मोकळ करत होती. एव्हढा वेळ
दाबुन ठेवलेली गरल भडाभडा ओकत होती.
नवर्या बद्दलचा राग काढत होती.
" म्या फार रडले, ओरडले. पण काय बी उपेग नाय
ज़ाला.त्या दोघांपुढ मी पोटुशी काय
करणार? पण येक
दांडका गावला आणि हाणला त्येच्या टालक्यात."
मी हादरलो ." म्हणजे तू खून करून आली आहेस"
मी जवळ जवळ ओरडलोच .
आजुबाजुला शांतता होती. सगले गाढ़ झोपेत
होते.
" येक नाय अजुन दोन खून केले.
त्या सटवीला बी संपवली. त्योच
दांडका घातला तिच्या बी टालक्यात.
दोघबी खपली."
मी विस्मयपणे तिच्याकडे पाहत राहिलो.
" पण तू तर बोललीस की अजुन 2 खून केलेस."
"व्हय नवर्याला खपवल्यावर
सटवीला मारली आणि मंग..."
ती जरा थांबली, आपल्या पोटावरुन हात
फिरवत बोलली" ह्याला बी मारला"
मी पूर्णपणे आ वासून तिच्याकडे पाहत होतो.
स्तब्ध पणे. काहीच सुचेना.
"बाहेर आल्यावर जाउन नदीत उडी मारली"
"काय???? "
मी उडालोच. त्या थंडीत सुद्धा मला घाम
फुटला. आणि माझी शुद्ध हरपली.
" पांडुरंग हरी, उठा माउली मुंबई आली"
मास्तरांच्या आवाजाने जागा झालो.
बाजुला बघितल, ती बाई नव्हती.
"मास्तर, माझ्या बाजुला इथे एक गरोदर बाई
बसली होती , तुम्ही पाहिलत का तीला ?"
"रामकृष्ण हरी. अहो भिमाशंकर पासून तुम्ही एकटेच
बसलेला होतात. काय स्वप्न बघितल की काय?"
शक्य आहे. स्वप्नच असेल कदाचित.
मी सामान घेतल आणि बस मधून उतरलो.
स्टैंड च्या बाहेर येउन
टैक्सी पकडली आणि घरी आलो.
आंघोळ केली.बायको ने चहा आणून ठेवला.
चहाचा घोट घेता घेता आजचा पेपर
वाचायला घेतला आणि एका बातमी कड़े लक्ष
गेल.
"भिमाशंकर जवळ च्या गावात एका गरोदर बाइने
नवरा आणि सवतिची डोक्यात दांडका घालून
हत्या केली आणि नंतर स्वत नदित उडी मारून
आत्महत्या केली. तिचे प्रेत मिळाले असून पोलिस
अधिक तपास करत आहेत"
म्हणजे ते स्वप्न नव्हत. ती मला भेटली होती.
मी तिथेच बेशुद्ध पडलो.

No comments:

Post a Comment