Thursday, May 28, 2015

पापी... एक गूढ सत्य भाग सातवा

पापी (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय तिसरा विधी

भाग सातवा


त्या मुलीने शुद्धीवर येत हळू हळू तिने आपले डोळे उघडले... तिला त्या खोलीचा अंदाजा घेता घेता थोडा वेळ लागला... काही वेळा नंतर तिला माहिती पडलं कि ती खोलीच्या मधोमध उभी आहे, तिचे दोन्ही हात एका दोरीने सिलिंग पंख्याशी बांधलेले आहेत... आणि पाय पण एका लोखंडाच्या साखळीने बांधलेले आहेत. ती समजून चुकली होती कि ती आपल्या जागेवरून किंचित सुद्धा हलू शकत नव्हती... ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली कि कोणी तरी यावं आणि मला संकटातून सोडवावं...

"कसं वाटतंय आता तुला...?" एका व्यक्तीने खोलीत येवून विचारले...

"कोण आहेस तू...? आणि मला असं बांधून का ठेवलं आहे...?" त्या मुलीने आपल्या कंपन पावणाऱ्या आवाजात विचारले...

"तू इथे एका महान कार्याचा एक भाग बनण्यासाठी आणण्यात आली आहेस..."

"ए हे तू काय बरळत आहेस..? कोणतं काम...? ...... तू माझा रेप करणार आहेस काय...?" त्या मुलीने घाबरत विचारले तिच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते...

"नाही मला तर फक्त तुझं रक्त पाहिजेय..." ती व्यक्ती एकदम शांतपणे बोलली...

"काय...?" ह्या उत्तराने त्या मुलीचा भीतीने थरकाप उडाला...

"खूप झाल्या गोष्टी आता काही काम पण करूयात.." एवढं बोलून त्या व्यक्तीने टेपने त्या मुलीचं तोंड बंद केलं...

ती व्यक्ती तिच्या समोर आली आणि आपल्या एका हातात घेतलेला वाडगा तिच्या पोटा समोर धरला... दुसऱ्या हातात त्याने एक मोठा चाकू घेतला आणि तिच्या पोटावर ठेवून डोळे मिटून तो मंत्रोच्चारण करू लागला... काही वेळाने त्याचे मंत्रोच्चारण बंद झाले आणि त्याने आपले डोळे उघडले... त्याच्या समोर एक भीतीने थरथरणारी मुलगी होती, पण ती व्यक्ती एकदम शांत पणे उभी होती...

आता त्याने तो चाकू पूर्ण जोराने तिच्या पोटात खुपसला... जसंच त्याने तो चाकू तिच्या पोटात खुपसला तिच्या पोटातून रक्ताची धार निघाली... तिच्या तोंडावर टेप असून सुद्धा वेदनेने तिची किंचीतशी किंकाळी ऐकू येत होती... काही वेळानेच तो वाडगा तिच्या रक्ताने पूर्ण पणे भरला... त्या मुलीने आपल्या पूर्ण ताकदीनिशी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण असमर्थ राहिली...

आता तिचा चेहरा काळा पडायला लागला होता... तिच्या कपाळावरची नसं हिरवीगार होवून दिसायला लागली होती... असं वाटत होतं जणू ह्या मुलीच्या शरीरात काही रक्तच उरलं नव्हतं... ती मुलगी वेदनेने विव्हळत होती... तिला हलायचाही मुळीच चान्स नव्हता... अशी वेदना जी मृत्यू पेक्षा भयंकर होती... ह्या वेदनेतून तिची लगेच सुटका व्हावी म्हणून आपल्या मनात कुठे ना कुठे ती प्रार्थना करत होती.. पण हे सर्व काही क्षणाचा खेळ आहे हे तो माणूस जाणून होता... त्या मुलीच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून सुद्धा त्या व्यक्तीचं मन पाघळल नाही एवढा निर्दयी होता तो... त्याने तिच्या रक्ताने आधी तिच्या पाठीवर काही चिन्ह काढले आणि मग भिंतींवर... जाता जाता त्याने एक स्प्रे पूर्ण खोलीत मारला आणि एकवार सर्वीकडे नजर फिरून पाहिलं कि काही उरलं तर नाही ना...

'माझे मालक तुमच्यासाठी रक्त आणलंय ते स्वीकार करा...' तो व्यक्ती व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर स्मित आणत बोलला आणि तिथून निघून गेला...

भिंतीवर आता नवीन चिन्ह आणि नवीन नंबर्स दिसत होते... थरार आणि रहस्य अजूनच वाढत जात होतं... प्रश्नच प्रश्न.... का तो एवढे खून करत आहे...? तो खरोखर कोणत्यातरी आत्माला आणण्याचा प्रयत्न करत आहे का...? पण कोणाच्या...? पाहूया पुढच्या आणखीन काही भागात.... लवकरच तुमच्या समोर त्याची उकल होईल... अरे ते चिन्ह तर राहिलेच कि... तुम्ही पण विचार करून सांगा त्या चिन्हांचे व नंबर्सचे रहस्य काय असणार...

33, 44, ┴, =

क्रमशः...

No comments:

Post a Comment