नमस्कार मी अविनाश गुरव आज तुम्हाला माझा मित्र वैभव याला त्याच्या मित्राने सांगितले एक प्रसंग सांगणार आहे.... तर झाले असे की एके दिवशी शंकर नाना हे दरवेळी प्रमाणे घरचा बाजार भरण्या साठी गावापासून 5 किलोमीटर लांब असलेली आठवड्याची बाजार पेठे येथे सायकल घेउन गेले होते.... दरवेळी पेक्षा त्या दिवशी नाना बजारपेठेतुन उशिरा निघाले होते जवळ जवळ रात्रीचे आठ वाजले होते रोजच्या प्रमाने नाना भजन कीर्तन म्हणत सायकलचा वेग समान्तर ठेवत आपल्याच धुंदीत चालले होते न अचानक त्यांच्या लक्षात आले की त्यांनी सायकलला मागे बांधलेली पिशवी गळत आहे थोड़ी फार सामग्री तिथेच पडू लागली म्हणून नाना सायकल थाम्बउन पिशवीत सामग्री भरु लागले तेव्हा नानांच्या समोर एक देखनी काष्टा पातळ घातलेली एक तरुनी आली तिने नानां ना पुढच्या गावात सोडण्याची विनंती केलि नानांनी सामानाची पिशवी पुढे बांधली न तिल मागे बसायला सांगितले काही अंतर पुढे जाताच तिला विचारले "" कुठच्या गावात जायचेय"" ती मुलगी म्हणाली ""दाखवतेकी मी तुम्ही नका काळजी करू ""न हसू लागली .... नानान्ना हे उत्तर ऐकून जरा अजबच वाटले त्यांना वाटले एखादी वेडी बीडी तर नाही ना ही...पुढच्या गावात गेल्या वर गावकर्यान्नाच विचारुया हिला काही विचारण्यात अर्थ नाही..... असेच थोड्या अंतरावर एक जुना ओढा होता तिथे गेल्यावर नानान्ना सायकल थोड़ी थोड़ी करत जरा जास्तच जड़ वाटु लागली त्यांनी मागे तिरकस नजरेने पाहिले तर त्या तरुनिचे केस खुप मोठे झाले होते ते लांब पर्यन्त जमिनीवर लोम्ब्कळत होते तिच्या हाताची नखेहि लांब झाली होती ती जमिनीला टेकायचिच राहिली होती नानान्ना हा काय प्रकार आहे हे लक्षात येताच त्यांनी जोरजोरात हनुमान चालीसा म्हणायला सुरवात केलि "" राम दुवारे तुम रखवारे | होत न आज्ञा बिनु पैसारे || सब सुख लहै तुम्हारी सरना |तुम रच्छक काहू को डरना || आपन तेज सम्हारो आपै |तीनो लोक हाँक तें काम्पै || भुत पिशाच निकट नहीं आवै | महावीर जब नाम सुनावे || हे ऐकताच ती तरुनी सायकल वरुण उतरली न जोरजोरात ओरडून बोलत होती ""बंद कर बंद कर....जा सोडला तुला ...जा " नाना थोड़े पुढे जाताच ती रागाताच बोलली ""वाचलास .....वाचलास माझी नखे जिथे जमिनीला टेकली असती तिथेच तू संपला असतास "" नानान्नी मागे न बघताच तड़क गाव गाठले....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी या पेजचा नियमित वाचक आहे. ही माझ्याबरोबर घडलेली घटना आहे. मी त्यावेळी दुयर्या वर्षाला अमरावतीला शिकायला होतो. बर्याच दिवसांनी सुट्टीला घरी आलो होतो. त्यावेळी लोडशेडींगचा प्रॉब्लेम होता म्हणुन शेताला रात्रीच्या वेळी पाणी सोडले जाई. दुसर्या दिवशी बाबा शेतात गेले होते आणि आईला सांगितले की मागाहुन डब्बा पाठवुन दे. रात्री ८:३०-९:०० च्या दरम्यान मी डब्बा घेऊन निघालो वाटेत मला जुना मित्र अनिल भेटला तो पण त्याच्या शेतावरच जात होता चला त्याची सोबत मिळाली आम्ही ग्पा मारत मारत निघालो माझ शेत आल मी त्याचा निरोप घेऊन शेतात वडलांना आणि मला पाण वाढली. जेवता जेवता वडलांनी विचारले येताना काही भीती वाटली नाही ना , मी म्हणालो नाही अनिल सोबतीला होता ईथवर मग तो पुढ गेला आन मी शेतावर आलो. बाबा २ मिनट काहीच बोलले नाही आणि त्या रात्री मला शेतावरच थांबवुन घेतल. सकाळी आम्ही दोघेही घरी आल्यावर चहा पाणी उरकल्यावर बाबांनी मला जवळ बेलावून विचारले. तुला खरच अनिल दिसला का मी हो म्हणालो त्यावर बाबांनी सांगितले की अनिल २० दिवसाआधीच ट्रकखाली येऊन वारला.
No comments:
Post a Comment