Saturday, May 30, 2015

देव उपासना भाग १३

देव उपासना
भाग १३
संतोष ज्यावेळी सांगितला बोलतो कि, 'मनात प्रेम जिवंत ठेव संगीता... आपल्याकडे हीच तर सर्वात मौल्यवान ताकद आहे...' तेव्हा संगीता हताश झालेल्या शब्दात त्याला बोलते, "हि प्रेमाची ताकद आपल्यांना ह्या भयावह जंगलातून सुकरुप काढू शकते का..?"
संगीता जीवनाच्या वास्ताविक्तेला पाहून थोडी घाबरत होती... आता पर्यंत तिने फक्त वाड्याची जीवनशैली पाहिली होती, दुनियादारी काय असते तिने कधीच पाहिली नाही... त्या जीवनात तिला आरामच आराम होता. एका सर्वसामान्य माणसाच्या जीवना विषयी तिला काहीच माहिती नव्हतं. आपल्याला जंगलात असल्या हलातीत पाहून ती हताश आणि निराश आहे... पण हे स्वाभाविक आहे.
संतोष कदाचित तिच्या मानतील घाळमेळ समजतो आणि बोलतो, "मी समजू शकतो कि... तुझ्यासाठी तर हे सर्व विचित्र आहे... पण काल जंगलात शिरण्यापलीकडे आपल्यांना काहीच गत्यंतर नव्हतं... मी फक्त तुझ्यासाठीच शेतातून पळालो, नाहीतर मी आपल्या शेताला सोडून मुळीच पळालो नसतो..."
"मी काय करू संतोष... मी पहिले कधीच अशी घरातून बाहेर नाही निघाली... आज ह्या प्रकारे जंगलात रात्र घालवावी लागणार हे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता..." संगीता बोलली..
"मला दुखः आहे संगीता कि तुला माझ्यामुळे एवढं काही सहन करावं लागतंय ते... दिवस उजाडू दे, मला पूर्ण विश्वास आहे कि इथून निघण्याचा कोणता ना कोणता तरी मार्ग जरूर आपल्याला सापडेल..." संतोष तिला धीर देत बोलला..
"मार्ग मिळाला जरी तरी आपण कुठे जाणार संतोष...?"
"माझ्या काकांच्या गावी जावूया... बस इथून निघण्याची वेळ आहे... पुढे मी सर्व काही सांभाळून घेईन..." संतोष बोलला.
"ठीक आहे... मी सदैव तुझ्यासोबत आहे... आता घरी परत तर नाही जावू शकत... आता पर्यंत तर घरात वादळ आलं असेल..."
"हो.. ते तर आहे... माझ्या घरी पण सर्वजण काळजी करत असतील... तरीपण ती दोघं..." संगीता बोलतच होती कि संतोषने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला... संगीताला समजून चुकलं कि आता आपल्यांना बोलायचा नाही आहे..., त्यामुळे तिने आपला श्वास रोखून काहीच हालचाल न करता बसली...
संगीताला झाडाखाली कसलातरी आवाज येतो... ती हळूच आपली मान खाली करून पाहते, ते दृश्य पाहून तिचे डोळे मोठे होतात... आणि भीतीची एक शिरशिरी तिच्या अंगात शिरते... कारण खाली एक तरस फिरत होता... कदाचित त्याला झाडावर कोणीतरी आहे ह्याची जाणीव झाली असावी... त्याला पाहून संगीता लगेच संतोषला जोराने मिठी मारते...
संतोष हळूच तिच्या कानात बोलतो... "घाबरू नकोस, काहीच नाही होणार, आपण इथे झाडावर सुरक्षित आहोत..."
संगीता, संतोषला प्रेमाने पाहते आणि संतोष तिच्या डोक्यावर एक चुंबन देतो आणि बोलतो, "तू झोपून जा, हे जंगल आहे इथे हे सर्व असंच होत असतं..."
------------------------------
जंगलातच दुसरीकडे एका गुहेच्या बाहेरचं दृश्य....
"आदित्य... ह्या गुहेत जाणं उचित असेल काय...?"
"हो... हो... हि गुहा रिकामी दिसते.. बघ मी आतमध्ये दगड मारला होता... कोणता जनावर असला असता तर नक्की काही ना काही तरी हालचाल झाली असती... नाही तरी आपण रात्रभर असे ह्या जंगलात भटकत नाही राहू शकत... खूप भयावह जनावर आहेत इथे... आपल्यांना इथेच थांबलं पाहिजे..." आदित्य बोलला.
"ठीक आहे... चल..." सई बोलली...
"थांब पहिले गुहेचं दार बंद करण्यासाठी काही तरी उपाय करतो... कारण त्याने कोणताच धोका होणार नाही..."
"हा दगड कसा आहे आदित्य...?" सई ज्या दगडावर हात ठेवून उभी होती त्याविषयी विचारते...
"अरे कदाचित हा ह्याच गुहेसाठी आहे, ह्यालाच इथे लावूयात..."
आदित्य त्या दगडाला धक्का देत गुहेच्या दारापाशी आणतो आणि रुपाला बोलतो, "चल आतमध्ये, मी आतमधून ह्याला इथे ह्या दारापाशी खेचून घेईन... मग कोणत्याच जनावराची भीती नसेल..."
रूपा आतमध्ये जाते आणि आदित्य तो दगड खेचून दारावर लावून तिला विचारतो, "आता ठीक आहे ना...!!"
"काय ठीक आहे... किती काळोख आहे इथे... बाहेर कमीत कमी चंद्राचं चांदण तरी होतं..."
"आता जंगलात ह्याही पेक्षा चांगलं ठिकाण भेटणं कठीण आहे... असं वाटतंय इथे जरूर कोणीतरी माणूस राहत असणार, नाहीतर हा दगड तिथे बाहेर कसा काय असता... हम्मम एकदम बरोबर गुहेच्या दारासाठीच ह्या दगडाला बनवला आहे..."
"आदित्य घरी सर्व चिंतीत असतील..."
"ते तर आहे... तू चिंता नको करूस... आपण उद्या सकाळीच कोणत्याही परीस्थित गावी परत जावू..."
"मला नाही माहिती होतं कि... हे जंगल एवढं मोठं आणि भयावह आहे ते..." सई बोलली...
"मला तरी कुठे माहिती होतं... त्या संतोषच्या शेतात गेलो नसतो तर बरं झालं असतं... इथे तरी फसलो नसतो..."
"पण आदित्य... ते शेतात काय होतं...?"
"काय माहिती... मी तर फक्त एकच नजर त्याला बघितलं होतं... माझ्या अंगावर तर शहारे आले... त्याला पाहून..."
ते दोघे आता बोलतच होते कि गुहेच्या बाहेर...
"गुर्र... गुर्र... गुर्र..."
"आदित्य... (दचकून) हा आवाज कसला आहे...??" सई विचारते
"असेल कोणता तरी जनावर...!!"
"तो इथे तर नाही येणार ना...!!" सईने घाबरत विचारले...
"अरे नाही गुहेच्या दारावर भलं मोठं दगड आहे, घाबरायचं काहीच कारण नाही आहे..."
"आदित्य मला भीती वाटते..."
"अरे सोड... असेल कोणता तरी जनावर... हे जंगल आहे..." पण तो एवढं बोलतच होतं कि त्याला दिसलं कि गुहेचा दगड थोडा हलत आहे..
आदित्य पळत जावून त्या दगडाला जोराने पकडून ठेवतो... आणि सईला बोलतो, "तू चिंता नको करूस... कदाचित जंगली कुत्रे असतील... ते हा दगड कधीच बाजूला नाही करू शकत..."
रूपा पण त्याच्या बाजूला येवून त्या दगडाला पकडण्यात त्याची मदद करते...
"गुर्र...गुर्र...गुर्र..." गुहेच्या बाहेर परत तोच आवाज येतो..
गुहेच्या बाहेर गुर्र गुर्रण्याचा आवाज येत असतो... सई आणि आदित्य तो दगड पकडून हळू हळू बोलत असतात...
क्रमशः

No comments:

Post a Comment