आजची स्टोरी आपल्या पेज ची एक मेंबर " सायली शिखरे " हिने पाठवली आहे. हि एक कथा नसून तिला तिच्या मामाच्या गावी असताना आलेला एक अनुभव तिने तो शेअर केला आहे. ती म्हणते तुम्हा सर्वांच्या गोष्टी वाचून तिलाही हा अनुभव आपल्याला सांगावासा वाटला.
मी मामाच्या गावी गेले असताना हा अनुभव मला आला पण मी अजूनही नीट समजू शकले नाही कि नक्की तेव्हा काय झाल होत. असेच उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मामच्या गावी गेले होते. अस म्हणतात मामा जिथे राहतो तिथे एका अमानवीय शक्तीचा वास आहे. पण दुसरा काही राहण्याचा पर्याय नसल्यामुळे मामा तिथेच राहतो पण मला या गोष्टींवर विश्वास नव्हता. एके दिवशी गाव फिरून झाल्यावर आम्ही सगळे जेवण आटपून बाहेरच्या खोलीत झोपलो आणि मामा त्यादिवशी एकटा एका कोपर्यात असलेल्या खोलीत झोपला होता जी कधी सहसा वापरत नसत.
ती अमावस्येची रात्र होती . रात्रीचे २ वाजले असतील सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज फक्त ऐकू येत होता. अचानक त्या भयाण शांततेला तडा जाईल असा मोठा आवाज झाला जिथे मामा झोपला होता त्या खोलीतून तो आवाज आला होता . मामाची निघालेली किंकाळी आणि काहीतरी आदळण्याचा मोठा आवाज झाला आणि सगळ पुन्हा शांत झाल. अशा थरकाप उडवणाऱ्या आवाजाने प्रथम झोप उडाली आणि भीतीची एक लहर अंगातून निघाली. मामीनी लगेच लाईट लावली आणि आम्ही सगळे धावतच मामच्या खोली मध्ये गेलो. आणि जे पाहिलं ते भयावह होत कारण मामा आपल्या बेड पासून ७ ते ८ फूट लांब जाऊन निपचित पडला होता आणि तिथली खिडकी सुधा उघडी होती. आम्ही सगळेच घाबरलो मामीने पळत जाऊन पाणी आणल आणि मामाच्या तोंडावर शिंपडल. मामा शुद्धीवर आला पण काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याला घेऊन आम्ही बाहेरच्या खोलीत आलो. त्याने सगळ्यांना झोपायला सांगितले. आणि स्वताही झोपी गेला.
आता सकाळ झाली होती पण रात्रीच्या प्रकाराने सगळेच तणावाखाली दिसत होते. मामा ला उठता हि जमत नव्हते मामी डॉक्टरांना आणण्यासाठी गेली होती. आणि मी मामाच्या बाजूला बसले होते. न राहवून मी मामाला विचारले कि मला सांग रात्री नक्की काय झाले होते तू किंचाळलास का आणि बेड पासून एवढ्या लांब जाऊन कसा पडलास.
तेव्हा मामाने सांगितले हे बघ सायली काही गोष्टी सांगायच्या नसतात तरी सुधा मी तुला सांगतोय
जेव्हा मी रात्री झोपलो होतो अचानक माझ्या अंगावरची चादर कोणीतरी ओढतय असा मला भास झाला मी आधी दुर्लक्ष केल पण दुसर्याच क्षणी माझ्या अंगावरची चादर उडून खाली पडली आणि अचानक मी बंद केलेली खिडकी सुधा उघडली आणि एक थंड वार्याची झुळूक कानाला स्पर्श करून गेली.
अमावस्या असल्यामुळे खिडकीतून बाहेरच काहीच दिसत नव्हत नुसता कळाकुट्ट अंधार मी उठलो आणि आणि खिडकी बंद करण्यासाठी जाणार तोच एक विचित्र आणि विद्रूप पांढरी आकृती खिडकीच्या बाहेर उभी होती सोडलेले पांढरे केस, हातात एक काठी आणि विचित्र वाकडे दात असलेली एक वृद्ध स्त्री मला दिसली एवढ्या अंधारात हि ती अमानवीय शक्ती मला स्पष्ट दिसत होती आणि मी भीतीने किंचाळलो आणि अचानक मला कोणी तरी खिडकी कडे जोरात ओढतय अस वाटल आणि त्याच वेगाने मी खिडकीला जाऊन आपटलो.
आणि मामा बोलता बोलता थांबला आणि शांत झाला पण मला जाणून घ्यायच होत कि मामानी खिडकीत जे पाहिलं ते नक्की काय होत. पण मामानी ते मला कधीच सांगितलं नाही. कि का असा अचानक खिडकीत ती वृद्ध स्त्री कोण होती का आली होती आणि कुठे गेली आणि त्याला नुकसान पोहचवल बहुदा त्या अनामिक आणि अमानवीय शक्तीचा जसा तो आदेशाच होता कि ते कोणाला कळू नये.
पण गावकर्यांकडून कळत कि जिथे मामाच घर आहे तिथे पूर्वी एक चेटकीण रहायची आणि मामा ज्या खोलीत झोपला होता त्या खोलीत ती काळीविद्या आत्मसात करायला पूजा करायची. त्या नंतर ती खोली कायमची मामाने बंद करून टाकली आणि ती आजतागायत बंदच आहे. आणि मामला कोणताही त्रास आता होत नाही.
मित्रानो माझा हा छोटासा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्की कळवा.
धन्यवाद
कथा - सायली शिखरे
धन्यवाद
कथा - सायली शिखरे
No comments:
Post a Comment