Saturday, May 30, 2015

देव उपसना भाग १०

देव उपसना
भाग १०
वाड्यात सर्वचजण घाबरलेल्या मनस्थितीत होते. संगीताचा अजूनही कुठेच पत्ता लागत नव्हता आणि वरून वाड्याच्या मागून भयावह किंकाळी ऐकायला येत होती... सर्व जणांच्या काळजाला चिरून टाकणारी किंकाळी.
इथे शेतात देव उपसानाला बोलतो, "उपसाना चुपचाप माझ्या मागोमाग ये आपल्यांना इथून निघायचं आहे..."
"पण देव... शेतात कोण आहे...???"
"श्श... चूप बस जास्त बोलू नकोस... पहिले इथून निघुया नंतर ह्या विषयी चर्चा करूया..."
"पण तो आपल्या मागे आला तर...??" उपासना भीत बोलली.
"खूप वेळेपासून काहीच हालचाल किंवा आवाज झाला नाही आहे, मला असं वाटतंय तो जो कोणी होता आता तो इथे नाही आहे, आणि जर असला तरी बघून घेवू... चल आता..." देव उपसानचा हात पकडून तिला त्या शेतातून बाहेर आणतो आणि गावाच्या दिशेने चालायला लागतो.
"देव तुला भीती नाही वाटत..."
"मला बस फक्त तुझी चिंता आहे, आणि मी कुठल्याच वस्तूशी घाबरत नाही, बोलणं जरा कमी कर आणि पटापट चल..."
पण ते आत्ता चार पावलंच पुढे गेली असतील कि त्यांना त्यांच्या मागून कोणीतरी पळत पळत येत आहे ह्याची चाहूल लागते. देव मागे वळून पाहतो.... लांबून तर त्याला काहीच दिसत नाही पण तो अंदाज लावत बोलतो, "अरे कुठे हे राहुल आणि उर्मिला तर नाहीत ना...??"
"असू शकतात... आपल्यांना थांबलं पाहिजे देव...!!"
जेव्हा त्या दोन सावल्या त्यांच्या जवळ पोहोचतात तेव्हा देव त्यांना लगेच ओळखतो आणि विचारतो, "तुम्ही दोघं इथे काय करत आहात...???"
"स्वामीजी आपण ठीक तर आहात ना...!!!"
"हो-हो मी तर ठीक आहे... पण तुम्ही दोघे इथे का आलात...??? मी तुम्हाला गावात थांबायला सांगितलं होतं ना... आणि गोविंद कुठे आहे...?"
"तो तर गावात आहे, आम्ही तर इथे ह्यासाठी आलो होतो कि तुम्हाला आमची काही गरज भासली तर त्यासाठी आम्ही तुमच्या कामी येवू..."
साधना हे ऐकून दचकते... ती हळूच देवच्या कानाजवळ पुटपुटते, "हि लोकं तुला स्वामीजी का बोलत आहेत...?"
"चल पहिले इथून निघुयात... आरामत सर्व काही सांगतो..." देव उपसानाला बोलला.
"स्वामीजी ती किंकाळी कसली होती...!!"
"तुम्ही दोघांनी पण ती ऐकली काय...!!"
"हो स्वामीजी... तेव्हाच आम्ही इथे पळत सुटलो... पूर्ण गावात ती किंकाळी ऐकायला आली होती..."
"आता तर काहीच बोलू शकत नाही... नंतर चर्चा करूया..."
"ठीक आहे स्वामीजी..." ते दोघे बोलले.
"उपसाना हा आहे अजय आणि हा विजय दोघेही माझे खास शिष्य आहेत..." देवने त्या दोघांचा परिचय दिला..
उपसनाच्या हे सर्व समजण्या पलीकडे होतं. तिच्या मनात खूप सारे प्रश्न येत होते... ज्याचं उत्तर तिला माहिती करायचं होतं... पण त्यावेळी तिने काहीच नाही विचारलं आणि चुपचाप देव सोबत गावाकडे निघाली.
अचानक पुन्हा तीच आगतिक, भयावह किंकाळी येते आणि ते सर्व तिथेच थिजल्या सारखे उभे राहतात.
"उपासना तू ह्या दोघांसोबत घरी जा, तुझे बाबा तिथेच आहेत. माझा एक मित्र गोविंद पण तिथेच असेल. मी इथे बघतो कि काय मामला आहे तो..." देव बोलला.
"नको प्रेम तू इथे एकटा....?"
हे ऐकून अजय आणि विजय हसायला लागतात.
अजय बोलतो, "स्वामीजी कोणालाच नाही घाबरत, उलट ह्यांना पाहून तर भले भले भूत-पिशाच्च पण पळत सुटतात..."
"गप्प बस अजय..." देव बोलला...
"हो स्वामीजी... क्षमा करा..." अजय बोलला...
"उपसाना, मला जाउन पाहिलंच पाहिजे कि, शेवटी ह्या शेतात काय आहे..." देव बोलला.
"मग मी पण इथेच राहणार तुझ्यासोबत देव... तुझ्याशिवाय मी इथून जावू नाही शकत..." उपासना त्याला विनवणी करत बोलली.
देव कोणत्यातरी विचारात हरवतो आणि काही वेळ विचार केल्यानंतर बोलतो, "चल पहिले तुझ्या घरी जावूया... नंतर विचार करूया कि पुढे काय करायचे आहे...?"
उपासनाला हे ऐकून मनात आनंद होतो... पण लगेच पूर्ण दिवसाची आठवण येताच तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं वादळ पुन्हा निर्माण होतं.
अजय आणि विजय देवला ह्या रुपात पाहून अचंबित होतात... पण त्या दोघांनाही हे विचारायची हिम्मत होत नाही...
अजय, विजयला हळूच विचारतो, "स्वामीजी एका मुलीसोबत... काही विचित्र नाही वाटत...?"
"चूप बस्स स्वामीजींनी ऐकलं तर ओरडतील..." विजय हळूच अजयला दटावतो..
"काय गोष्ट आहे अजय...!!" देवने विचारले...
"काहीच नाही स्वामीजी... बस असंच..." अजय उत्तरला...
जवळ जवळ अर्ध्या तासात ते शेतातून निघून गावात उपासनाच्या घरी पोहोचतात.
क्रमशः

No comments:

Post a Comment