तसे आपले डोळे बंद करून मंत्र पुटपुटत गुरवानी खाडकन डोळे उघडले आणी म्हणाले " तुला अशा ताकतीचा सामना करायचा आहे जीला तीन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभुत करू शकला नाही आणि पराभुत करूही शकत नाही, जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक तुला मदत करून त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही.. या युध्दासाठी नियतीन तुझीच निवड का केली हे त्या नियतीलाच माहीती... देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे... आणखी एक गोष्ट ...मृत्युचा तांडव खुप आधी सुरू झालाय..." प्रियंकाचा भयभीत चेहरा पाहुन गुरव पुन्हा आवाज चढवून मोठ्याने म्हणाले... " पोरी घाबरू नकोस...तुझ्यात हिम्मत आहे .. निसर्गाचा नियम आहे, युद्ध त्यांच्यावरच लादली जातात ज्यांच्यात लढण्याची हिम्मत असते...स्त्री ही आदिशक्ती आहे आणि त्यामुळेच या युद्धासाठी एका स्त्री ची निवड झाली..." प्रियंकाला गुरवानी सांगितलेल कोड उलगडल नव्हत पन येणा-या प्रसंगासाठी तीन आपल मन घट्ट करत पुन्हा मागे वळून देवळातील देवीच्या मुर्तीकडे पाहुन मनापासुन.आशीर्वाद मागीतला आणि सासरी निघाली... त्या दोघाचा संसार छान चालला होता. अविनाशचा स्वभाव तापट होता पन ती समजु घेऊ लागली... काही दिवसातच ती गुरवानी सांगितलेल सार विसरून आपल्या संसारात रमली.. तीला चौथा महीना सुरू झाला आणि एरवी तापट स्वभावाचा अविनाश देखील आता तीची काळजी घेउ लागला... एक दिवस ते प्रियंका आणि तीच्या पोटातील बाळ सुखरूप आहे का याच चेकअप करून घरी परतले... प्रियंका आनंदी असली तरी अविनाशचा चेहरा मात्र काळजीने व्यापला होता... तो प्रियंकाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पन धाडस होत नव्हत... जेवण आवरून दोघे आपल्या बेडरुम मधे गेले... नवरा उदास आहे हे लक्षात येताच ती म्हणाली.... " काय झाल .... तुम्हाला बर वाटत नाहि का.." म्हणत ती त्याच्या कपाळाला हात लावून पाहु लागली तसा अविनाशने तीचा हात आपल्या हाती घेत जड अंत:करणाने म्हणाला. " पियु....आ....आय लव यु..." त्याचे थरथरते शब्द ऐकताच प्रियंकाला थोडी काळजी वाटली.. "लव यु टू...पन काय झालं... इतके का अस्वस्थ आहात..." "पियु.... तुला मन घट्ट कराव लागेल..." " प्लिज... काय झाल सांगाल का..." तसा अविनाश शांतपने सांगु लागला... " डॉक्टरानी तुझ चेकअप करून मला आपल्या केबीन मधे बोलवल होत...त्यांनी सांगितल की आपल्या बाळाच्या ह्रदयात छिद्र आहे ... ते जन्मले तरी जास्त दिवस नाही जगणार..." त्याचे शब्द कानावर पडताच प्रियंका स्तब्ध झाली.. तीच्या डोळ्यातून अश्रु आले.. थरथरत्या आवाजात ती म्हणाली.. "हे.....हेे.....हे...खोट आहे ...माझ्या बाळाला काही झालेल नाही .. " तीला सावरत अविनाशने जवळ घेत म्हणाला.. "Abortion हा एकच पर्याय डॉक्टरानी सांगितलाय...मी उद्या त्यांची वेळ घेतो..." अविनाश कधीच झेपी गेला, पन तीची झोप उडाली होती.. ती ही झोपण्याचा प्रयत्न करत होती पन आपल्या मातृत्वाचे स्वप्न तुटलेले पाहून तीचे अश्रु अजुनही गालावरून ओघळत केसामधे विरून जायचे... आपल्या पोटावरू हात फिरवाना तीला आणखीनच भरून यायच... तसाच विचार करत ती झोपली पन डोळा लागतो न लागतो तोच तीच्या पायाच्या तळव्यावरून बोट ओढल्याचा भास झाला आणि झटक जागी झाली .. खुप दिवसानी हा भास झाला होता त्यामुळे थोडी घाबरली.. काही वेळ तशीच शांत बसुन राहीली तोच कसला तरी आवाज आला. ती शांतपने श्वास रोखुन ऐकू लागली तशी एक लहान मुलगी हूंदके देत रडत असल्याच जाणवल.. अविनाशला उठवायचा प्रयत्न करावा तर तो दिवसभराच्या कामाने कंटाळला होता... म्हणून ती स्वता:च उठून आवाजाचा वेध घेत बेडवरून खाली उतरली तोच प्रियंकाला खाली पाणी सांडल असल्याच जाणवल... तीला आश्चर्य वाटल ' पाणी इथ कोणी सांडल..' म्हणत ती चालू लागली.. आवाज बाथरूम मधून येत होता म्हणून तीन बाथरूम कडे पाहिल, आणि तीच्या काळजात चरर्रर्र कन झाल... दचकून ती जागेवरच उभी राहीली.. बाथरूममधून एक बुटकी आडीज, तीन फुट ऊंचीची काळीकुट्ट आकृति तीला वाकून पहात होती तीच्या चेह-याचा थोडाच भाग दीसत होता.. केस लांब आणि पाण्याने भीजले होते. तीच्या भिजलेले केसामधून पाणी खाली फर्शीवर पडत होत.. प्रियंका हळु हळु तीच्याकडे चालू लागली तशी ती आकृति आत सरकली... स्वताला सावरत प्रियंका बाथरूम चा दरवाजा उघडीन आत मधे गेली तशी तीच्या भोवतीच वातावरणच बदलू लागल...बाथरूमच्या पांढ-या फर्शीवर झाडाचा पाला पाचोळा दीसू लागला... ती भयभीत नजरेने आजुबाजूला पाहू लागली तस काळोखात तीच्या भोवती नारळीची छोटीछोटी एकसरखी झाडे दीसु लागली.. तीथच मधे रीकाम्या जागेत एक खोल खड्डा खणला होती जो पावसाच्या पाण्याने पुर्ण भरला असल्याच दीसू लागले.. या दृष्याने प्रियंका थरारली, काही समजायच्या आत पुन्हा तीला कोणीतरी हूंदके देत रडत असल्याचा आवाज येऊ लागला... ती शांतपने तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली तस तीच्या लक्षात आल की तो आवाज त्या खड्या मधल्या पाण्यातून येत होता. तीची नजर खड्या मधील पाण्यावर गेले.... झाडाचा पाला पाचोळा पडून ते पाणी काळेकुट्ट दिसत होत.. ती सावध होऊन एकसारखी त्या पाण्यात पहात होती, इतक्यात तीला कोणीतरी हाक दिली.. "आई.......मला वाचव ग..." आणि दुस-याच क्षणात त्या खड्या मधून एका मुलगीचा हात बाहेर आला... तशी प्रियंका थरारली, तीचा तोल गेला पन मगे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरच ते भयान दृष्य धडधडत्या काळजाने पाहु लागली...त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली ....
समोरच दृष्य पाहून प्रियंका डोळे बंद करून खाली बसली.. तशी पाण्यातील गाळ आणी लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत,सरपटत ती उठून उभी राहिली... तीच्या केसामधे चिखल, पाणी खाली ओघळत होत... लाल रक्ताळलेल्या डोळ्यानी ती प्रियंकाकडे पहात म्हणाली... " आई..." आणि आपल्या हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली.... तीच्या आवाजाने प्रियंकाच्या मेंदून झिणझीण्या आल्या. तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रियंका पाहू लागली... तर समोरच एका नारळीच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या तीन, चार वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपवण्यासाठी अंगाई म्हणत होती... प्रियंका उठून चालत त्या बाईकडे जात तीच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली तस तीच्या लक्ष्यात आल की हीच ती मुलगी जी आता त्या खड्यातून बाहेर आली आणि चिखलाने बरबटली होती... थरथरत्या नजरेन प्रियंकान त्या बाई कड पाहील तशी तीची दातखिळीच बसली... तीला दिसल की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतलय... या भयान दृष्याने ती जोराने किंचाळली.. तसा अविनाश धावत आत आला... ती थरथर कापत होती... तीला सावरत अविनाश आत घेऊन आली... तीच सगळ ऐकुन घेत अविनाश म्हणाला.. "तुला एखाद वाईट स्वप्न पडले असेल..." पन ती अजूनही थरथर कापत होती.. दुस-या दिवशी दोघेही hospital मधे गेले... तीथ नेहमीचीच गर्दी.. दोघे नंबर वाट पहात बसलेले अविनाशचा मोबाइल वाजला, फोन वर बोलत तो बाहेर गेल तस प्रियंकान आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहीला पन तीला तस काहीच problem दिसला नाही... तशीच ती डॉक्टराना भेटायला केबीन मधे गेली... डॉक्टरानी जे सांगितल ते ऐकून तीच्या पायाखालची जमीनच सरकली... आपला हूंदका आवरत ती तीथून बाहेर पडली ती अविनाशला न भेटताच घरी आली... आईला फोन करायचा प्रयत्न केला पन तीचा फोन लागत नव्हता... आपल्या रूम मधे बसुन हूंदके देत रडत होती... थोड्या वेळातच अविनाश घरी आला... त्याला पाहून ती खुपच चिडली... "तुम्ही माझ्याशी खोट बोललात...इतका मोठा विश्वासघात....का.....? मला माहिती आहे पन मला तुमच्याकडून उत्तर हव आहे ..." तीच बोलन ऐकून घेत अविनाश शांतपने म्हणाला....
" Sorry ..मला माफ कर मी खोट बोललो तुझ्याशी... पन माझा नाईलाज होता... माझ्या आई वडिलांची हीच इच्छा होती.. पन त्या आधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजुन शांति नाही भेटलेली...माझ्यासाठी नाही पन त्यांच्यासाठी..." अविनाशच बोलन ऐकुन ती संतापली... " म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ...नाही मी या बाळाला जन्म देणार..." तीच बोलन मधेच थांबवतो तो म्हणाला... "मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमच जाव लागेल..." एवढ बोलून अविनाश गाडी घेऊन office ला गेला पन त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली... त्या रात्रि अविनाश घरी उशीरा परतला पन तो खुप प्यायला होता... तो काही न बोलता तसाच झोपी गेला...प्रियंका त्याच्या शेजारीच बसलेली... आज तीच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता... सगळ शांत, भकास वाटत होत... डोळे मिटून ती पडून राहीली.. तोच तीला कसलासा आवाज येत असल्याच जाणवल... आपले अश्रु स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली... कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास झाला... तीन अविनाश ला उठवण्याचा प्रयत्न केला पन तो गाढ झोपेत होता... न रहावून ती उठली आणि हळुच दरवाजा उघडून बाहेर आली... बाहरचे लाइट्स बंद होते त्यामुळे तीला नीटस काही दिसत नव्हत..पन एक अस्पष्ट पांढरट आकृति पाय-या उतरुन खाली जात असल्याच जाणवल...तशी प्रियंकाही लाइट्स न लावता तीच्या मागे चालू लागली...इतक्यात चालताना तीचा धक्का लागून फ्लावरपॉट खाली पडला, प्रियंकान तो उचलुन वर ठेऊन समोर पाहील तर कोणीच नव्हत... भास झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉल मधील सोफ्यावर डोळ बंद करून बसली, तोच तीला पुन्हा एक वेगळाच आवाज येऊ लागला... ' खंन्...खंन्.....खंन्...' अशा आवाजाने ती सावध झाली आणि उठून त्याचा वेध घेत चालू लागली... दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला... आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजुने येत होता... ती हळू हळू पुढे निघाली...इतक्यात तीला दीसु लागले की बागेतील एका अंधा-या जागेवर तीच पांढरट आकृति उभी आहे, तीच्या हाती असलेल्या हत्यारान ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करतेय... प्रियंकाला थोडी भीती वाटली पन ते कोण आहे हे पहाण्यासाठी ती आणखी पुढे निघाली... पुढे जाता जाता ती आकृति थोडी स्पष्ट होऊ लागली... प्रियंकाला दिसू लागल की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करतेय... तीच्या लांबसडक केसानी तीचा चेहरा पुर्ण झाकला गेलाय... जमीनीवर प्रहार करताच तीच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या...तीच्याकडे पाहून प्रियंकाच्या अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला... प्रियंकाची चाहूल लागताच त्या स्त्री ने जोरात हातातली कुदळ जमीनीत घुसवली आणि खाली वाकून आपली मान तीरकी करत प्रियंकाकडे पाहु लागली...तिच्याकडे पहताच भीतीने प्रियंकाचे डोळे पांढरे झाले... खाली वाकल्याने तीचे मोकळे केस तोंडावर आले होते, तीचे पांढरे कपाळ आणि डोळयांच्या रिकाम्या काळ्याकुट्ट खोबण्या पहाताच प्रियंका जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पन तीच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर येत होती... तीला ओरडताही येत नव्हत... ती स्त्री हातातली कुदळ सोडून सरळ उभी राहात वर तीच्या बंगल्याच्या त्या खिडकीकडे पाहु लागली.. तस प्रियंकाने ही वर पाहिल आणि तीच्या काळजाचा थरकाप उडाला...कारण तीच्या समोर उभी तशीच स्त्री, वरून तीच्या बेडरूमच्या खिडकीतून रखरखत्या नजरेने पहात होती... काय चाललय हे समजण्या पलीकडच होत...प्रियकाच लक्ष पुन्हा समोर उभ्या त्या बाईकडे गेले तसा तीचा अर्धा केसामधून उघडा चेहरा क्रुर आणी विद्रुप होत असल्यासारख वाटू लागल , अचानक तीचा आवाज घोगरा झाला. आपल्या डोळ्याच्या रीकाम्या खोबण्या आणखी मोठ्या करत ती प्रियंकाकडे पाहू लागली... तसा प्रियंकाचा प्राण कंठाशी आला...
भीतीन तीचे पाय जमीनीत रूतून बसल्यासारखी ती स्तब्ध होऊन पहात होती.. हळु हळू समोर उभ्या त्या स्त्री ने आपल्या हाताचे बोट पुढे करून खुणावले.. तस प्रियंका ने ही आपल्या मागे पाहील आणी भीतीने आपल काळीज छाती फोडून बाहेर आल्यासारखे धडधडू लागले... कारण तीच्या पाठीमागुन काहीच अंतरावरून एक काळीकुट्ट बुटकी आक्रती ओरडत वेगाने धावत तीच्या दिशेने येत होती. त्या भयान घोग-या आवाजाने प्रियंकाच डोक बधीर होऊ लागल... भयभीत नजरेने ती धावत येणा-या आकृतिकडे पहात होती...घोग-या आवाजात धावत त्या आकृतिने त्या नारळीच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अद्भुष्य झाली, तशी ती समोर उभी स्त्री हातात कुदळ घेऊन जोरजोरात रडत, ओरडत किचाळत त्या झाडाखालील जमीन खोदू लागली... समोर घडलेले हे भीषण द्रूष्य पाहून तीला भोवळ आली आणी ती तीथेच बेशुध्द झाली... प्रियंका शुध्दीवर आली तसा अविनाश तीच्या जवळ बसलेला आणि बाजुला उभा वयस्कर वाचमन काहीतरी बोलत होता... " सायब... वर्षभरापुर्वी तुमचे आई वडील त्याच जागेवर hartattac ना मरण पावले . तुमचा आधीचा वाचमन देखील त्या जागेवर मरुन पडलेला दिसला..." तसा अविनाश वैतागून बोलला... " काय म्हणायच आहे तुम्हाला..." तसा वाचमन हात जोडून बोलू लागला... रागवू नका सायब..पण मलाही वाईट अनुभव येत आहेत ... कोणीतरी पायावर बोट फिरवून गेल्यासारख, कोणीतरी रांगत, सरपटत फिरतय आहे असा भास होतोय... " प्रियंका शांतपने त्यांच बोलन ऐकत होती.. वाचमन तीथुन गेला तसे तीने डोळे उघडले आणि आता आपन ठीक आहोत म्हणत अविनाश ला office ला जायला सांगितले... तसा तो ही office ला निघुन गेला... वाचमनच्या बोलणायाचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली... वाचमन बंगल्याच्या आवारातली स्वच्छता करत बसलेला... त्याच्या जवळ जात ती म्हणाली "काका... कधीपसुन तुम्हाला हे विचित्र भास होत आहेत..." तसा तो म्हणाला.. "मालकीनबाई तुमच लग्न व्हायच्या वर्ष भर आधी मी रहायला आलो.. तेव्हा पासुन कधीतरी हे भास होतात..." प्रियंकान पुन्हा प्रश्न विचारला... "आणि अविनाश चे आईवडील कसे वारले.." म्हणत ती बंगल्याच्या पायरीवर बसली... तसे ते म्हणाले... " ते नारळीच छोट झाड अपशकुन आहे ... सगळ्यात आधी तुमच्या सासुबाई वारल्या त्या झाडाखाली त्या मरून पडलेल्या दिसल्या...डॉक्टरानी तपासुन सांगितल की त्यांना hartattac आला होता. त्या कशाला तरी खुप घाबरल्या होत्या त्यांच्या ह्रदयाच्या शीरा आतून फुटून रक्तस्त्राव झालेला..." प्रियंका शांतपने ऐकत होती... खाली जमीनिवर बसत वाचमन पुढे म्हणाला.. " कोणीतरी सांगितल की हे पिशाच्याच काम आहे पन साहेबानी विश्वास ठेवला नाही ... आणि त्याचा आधीचा वाचमन ही अगदी तसाच मेला...." त्याच बोलन ऐकत प्रियंका मनात म्हणाली 'इतकी भयंकर घटना इथ घडली आणि मला कोणीच सांगितल नाही..' आपल्या डोक्यावर बांधलेल्या कापडाने तोंड पुसत वाचमन पुढ म्हणाला... " मालकीनबाई तुमच्या सास-यानी मोठा पुजारी आणला... खुप मोठा यज्ञ घातला त्याने... लाखाच्या वर पैसै नेले ... खुप मांत्रीक,तांत्रीक केले... सर्व काही केले त्या मांत्रीक लोकानी पन खुप बुडवले याना... प्रत्येक जन येऊण म्हणायचा... माझ्या तकतीने तो आत्मा नष्ट केला ..निश्चिंत रहा ... आणि काही दिवसातच साहेबांचे वडील ही अशाच एका भयानक मरणाने गेले.." प्रियंकान आश्चर्यान त्याला विचारल... " काका इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकल असताना तरी तुम्ही इथ काम करायला तयार कसे झालात.." त्यावर तो हसुन म्हणाला ... " पोरी तु माझ्या लेकीसारखी ग... एकच मुलगा मला.. लगीन केल... त्यांना माझी आडचन व्हायला लागली... म्हणून त्यांनी बाहेर काढायच्या आत कुठेतरी चार घासासाठी काम करून जीव जगवायचा...कसलीच भीती नाही बघ..." त्यांच बोलन ऐकून प्रियंका शांतपने आत गेली. तीला गावच्या गुरवानी सांगितलेले शब्द आठवले... " तुला अशा ताकतीचा सामना करायचा आहे जीला तीन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभुत करू शकला नाही आणि पराभुत करूही शकत नाही, जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक तुला मदत करून त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही.. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे... "
क्रमश:
क्रमश:
कथा लेखक - संजय कांबळे
No comments:
Post a Comment