Wednesday, May 27, 2015

एक सत्य घटना

Abhishek Dhawale
नमस्कार मित्रांनो मी Ash पुन्हा एकदा एक सत्य घटना घेऊन आलो आहे हा अनुभव माझ्या ओळखीच्या एका व्यक्ति ला आला आहे काही कारणास्तव नाव नाही सांगु शकत पुढील अनुभव तिच्या शब्दात आज घरांची किंमत मोठ्या शहरात किती आहे हे तर तुम्हाला माहितच आहे किंमत पेक्षा एका चांगल्या एरियात मिळावे अशी अपेक्षा लोकांची असते पण आजकाल घरांच्या किंमती कॉंट्रेक्टरच ठरवतात हयात दुमत नाही माझी दीदी आणि तिचे पति खुप दिवसा पासून एका घराच्या शोधात होते त्यांना एक bunglow हवा होता जीजू मोठ्या कंपनीत असल्यामुळे ते लागेल तितकी किंमत afford करू शकत होते काही दिवस लागले पण शेवटी एक घर मिळालं शहराच्या बाहेर होतं पण अतिशय पॉश आजुबाजुला घरं होती पण त्यात अंतर खुप होतं 3 मजली बँगला टेरेस स्विमिंग पुल गार्डन पण इतक्या सोई सुविधा असलेला हां बंगला थोड्या कमी किंमतीत मिळत होता ते म्हणतात ना स्वस्त वस्तु कधी कधी महागात पडतात पण बंगल्याला कुठेच नाव ठेवण्यासारखी जागा नव्हती आणि दोन जणांना राहण्या साथी ही जागा पुरेशी पेक्षा खुप जास्त होती तर deal ठरली घर ही नावावर झाले दुसऱ्या दिवशी सर्व वस्तुंची शिफ्टिंग करण्यासाठी सगळे तिथे आले कॉंट्रेक्टर त्याचे percentage घेण्या साठी आला तेव्हा जीजू ने विचारले सोनी साहेब किंमत खुपच कमी सांगितली मालकांने असं का हो?
तर सोनी साहेब म्हणाले त्यांना विदेश जायचे होते त्यामुळे घाई गड़बडित बंगला विकायला काढला हेच कारण आहे त्यामुळे त्यांनी किंमती वर जास्त आढ़ेवेढे नाही घेतले पण जाउद्या तुमचा तर फायदा झाला ना! आणि ते दोघे हसण्यात मश्गुल झाले मी तिथेच होते मी बंगल्या च्या बाहेरून एक राउंड मारायला बाहेर आले आणि बंगल्याच्या तीन बाजूला गार्डन होते तीथेच स्विमिंग पुल होता त्याच्या मागे एक मोठी भिंत होती दुसऱ्या बाजूला त्याच्या तुलनेत छोटी होती टी त्या लहान भिंती मागे एक बँगला होता तिथून एक फॅमिली आम्हाला न्याहाळत होती मी तिकडे पाहिले तर त्यांनी लगेच नजर दूसरी कड़े फिरवली शिफ्टिंग झाली दुसऱ्या दिवशी राहायला यायचे होते तिथे दुसऱ्या दिवशी आम्ही आलो तिथे राहायला मला सुट्या असल्यामुळे दिदीने मला राहण्या साठी फ़ोर्स केला पाहिले 2-3 दिवस खुप छान गेले तिथल्या वातावरणात मी खुप रमले होते जीजू सकाळी ऑफिस ला गेले की संध्याकाळी 7-7.30 लाच घरी यायचे दीदी ला तिथे एकटे एकटे वाटू नये म्हणून त्यांनीच दिदिला मला ईथे राहण्यासाठी फ़ोर्स करण्यास सांगितले, पण त्या दिवशी वेगळेच काहीतरी झाले दिवस भर दीदी व मी खुप timepaas केला एक हॉरर मूवी देखील पाहिली जिजू आले सर्वांचे जेवण वगैरे झाले मग आम्ही झोपायला गेलो आमचे बेडरूम एकमेकांच्या शेजारिच होते बेडरूम खुप छान होते माझे बेडरूम बहुतेक एक छोटया मुलाचे असावे कारण बेड च्या वर एक मोठी काच लावली होती ज्यातून आकाशातील तारे दिसत असत ते पाहत पाहत झोप कशी लागते ते कळतच नाही पण अचानक काही वेळाने मला जाग कसला तरी गुरगुरण्याचा आवाज आला लक्ष्य त्या काचेवर गेले तिथे काहीतरी होतं एक सावली मी लाइट लावली तर त्या सावलीत काहीतरी चमकलं आणि अचानक अदृश्य झाली मी जरा गड़बडले घाबरुन गळा सुकला मी पानी पिण्यास खाली किचन मध्ये गेले तिथे एक वेगळंचदृश्य होतं एक बाई किचन मध्ये भिंतीला स्वतःचे डोके आपटून घेत होती मला पहिले काही कळाळेच नाही मी तिच्या जवळ जात होते तोच ती थांबली आणि मागे वळाली एक निस्तेज पूर्ण पांढरा असा तिचा चेहरा होता डोळ्या खाली काळी वर्तुळे इतकी डार्क होती आणि डोक्यातून फक्त जखम झाली झाली होती पण रक्त येत नव्हते तिचं ते रूप पाहुन मी दोन पाऊल मागे झाले तेच ती अचानक माझ्या सामोर उभी राहिली ते पाहुन मी किंचाळळे आणि धडपडत स्टेअर्स पाशी आले दीदी आणि जीजू देखील पळत पळत आले त्यांनी विचारलं काय झालं मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली ते माझ्यासोबत किचन मधे आले पाहिलं तर काहीच नाही सर्व जसे च्या तसे त्यांनी तो प्रकार हसन्यावर घेतला दीदी म्हणाली की अगं बहुतेक दुपारी ती हॉरर फ़िल्म पाहिली ना त्यामुळेच हे सर्व झालं असावं मग आम्ही झोपलो दीदी माझ्या जवळच झोपली नंतर काही झाले नाही.
दुसऱ्या दिवशी मी सुद्धा तो एक भ्रम होता असे समजून नॉर्मल झाले जीजू ला सुट्टी होती त्यांनी आम्हाला फिरवायला नेले नंतर संध्याकाळी त्यांनी स्विमिंग पुल मधे पाणी सोडले पाहता पाहता तो भरला मीपाण्यात पाय टाकून बसले तोच कोणितरी माझ्या पायाला पकडले असे वाटले कालच्या प्रकारच्या अनुभवाने मी पूर्ण सावरले नव्हते आणि आता अजुन एक प्रकार माझ्या समोर घडत होता मी हळू हळू पाण्यात खेचले जाऊ लागले मी जिजुना आवाज दिला ते पळत पळत माझ्याकडे आले तोच माझा पाय हलका झाला पण आता मी चांगलीच घाबरले होते त्याना सगळं सांगितलं त्यांना परत खोटंच वाटलं म्हणून त्यांना मी माझा पाय दाखवला माझ्या पायावर ओरखडल्याचे निशान होते त्यांनी मग पाण्यात न उतरता काय आहे हे पाहण्यासाठी टॉर्च लावली तोच ती सावली त्या पाण्यात दिसली व अचानक गायब झाली जीजू ते पाहुन थक्क झाले ते जागेवर बसले त्यांचे डोळे विस्फारलेले होते थोड़ी परिस्थिति नार्मल होते की तेच दिदीच्या किंचाळण्याचा आवाज आला आम्ही दोघे पळतच घरात गेलो घरात ठिकठिकाणी रक्त पडलेले होते ते पाहुन दीदी ओरडली असावी असे वाटले पण कारण काही वेगळेच होत.
े दिदीच्या म्हणण्या नुसार तिने एका बाईला स्वतः चा गळा कापून घेताना पाहीले ते पाहुन ती चक्रवालेल्या अवस्थेत होती तीला आम्ही सावरले हे प्रकार रोजचेच चालु झाले होते कधी ती बाई आमच्या मागे पायाचा आवाज करत पळत जायची तर कधी ती काळी सावली टेरेस वर दिसायची कधी दरवाज्या वर रात्रि बेरात्री दरवाजाची बेल वाजायची पण बाहेर कोणीच नसायचे आम्ही तर आता एकत्रच झोपायचो त्या स्थितीत झोप सुद्धा लागत नव्हती एके दिवशी आम्ही माझ्या बेडरूम मधे झोपलेलो असताना वर त्या टेरेस वर लावलेल्या काचेवर ठक ठक असा आवाज आला आम्ही सगळे जागे झालो वर पाहिले तर तिथे ती काळी सावली जिचा चेहरा सुद्धा आता स्पष्ट दिसत होता अतिशय भयानक ते स्री होतं कि पुरुष काही कळत नव्हतं चेहरा पूर्ण पांढरा जसे त्याच्या बॉडीत रक्तच नाही डोळे देखील पांढरे आणि गुरगुरण्याचा तो भयानक आवाज यामुळे आमची भीतीने गाळण उडाली तोच ती काच टुटली आणि ते पिशाच आमच्या समोर उभे राहिलं आम्ही रूम मधुन पळत सुटलो दरवाज्यात ती बाई उभी होती आता तरइकडे आड़ आणि तिकडे विहीर अशी situation झाली होती काय करावे ते सुचत नव्हते मग जीजू ने विचार केला की हे पिशाच आपल्या समोर उभे आहे पण आपल्याला काही करत नाहीये फ़क्त समोर येतेय आणि घाबरवतेय आपल्या जवळ असे काय असेल की ज्यामुळे ते आपल्याला काही करत नाहिये ते जास्त विचार करत बसले नाही त्यांनी मग सरळ देव घराचा रस्ता पकडला बाकीची रात्र तिथेच काढली सकाळ झाली आम्ही तर पूर्ण रात्र जागुनच काढली होती सकाळी जीजू नी पाहिलं की आमच्या तिघांच्या गळ्यात एक ॐ च लॉकेट होतं जे माझ्या वडिलांनी आणलं होतं आज कुठेतरी त्याच लॉकेट च्या मुळे आम्ही सर्व जिवंत होतो मग आम्ही लगेच शेजारच्या लोकांना विचारपुस करण्या साठी गेलो आमची हालत पाहुन ते फार चकित झाले नव्हते त्यांनी आम्हाला आत बोलावले ही तीच फॅमिली होती जिचा उल्लेख मी आधी केला होता त्यांनी त्यांच्या लहान मुलास बाहेर खेळण्यास पाठवले व आम्हाला फ्रेश होण्यास सांगितले सर्व झाल्यावर ते गृहस्थ म्हणाले "तुम्ही इतके दिवस त्या भुतबंगल्यात राहिलेत कसे याचेच मला अजब वाटते तिथे 5-6 वर्षा पूर्वी तिथे एक कुटुंब राहायचे एकदा काही वादा मुळे तिथे राहणाऱ्या स्त्री ने स्वतः चा गळा कापून आत्महत्या केलि आणि तिच्या पतीने टेरेस वरुन उडी मारली व स्वतः देखील आत्महत्या केली का केलि ते कारण देखील कळालं नाही त्या नंतर बरेचजन तिथे राहायला आले काही पळून गेले काहीना आपला जीव गमवावा लागला बऱ्याच जणांनी तिथे पूजा केलि पण काहीच फरक पडला नाही आणि ते सांगता सांगता थांबले हेच चांगल राहील की तुम्ही ते घर सोडावं कारण तिथे राहणं धोक्याचं आहे जिजु विचारात पडले त्यांनी कंपनीत फोन केला तात्पुरत्या एका flat ची सोय केली पण दूसरे घर घेण्यासाठी पैसे तर ते घर विकुनच मिळणार होते. मग जीजूनी पप्पा ना फोन केला आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला पप्पा इकडे आले त्यांनी ज्यांच्या कडून ॐ चे लॉकेट आणले होते ते सुद्धा त्यांच्या सोबत होते त्यांनी मग तिथे पूजा करायचे असे ठरवले त्यांनी मग त्या घरात प्रत्येक कोपर्याला खिळे ठोकले पूजा केलि हवन केलं पूजा सलग 3 दिवस चालली आम्ही सर्व एका वर्तुळात झोपायचो रात्रि कोणीही त्या वर्तुळच्या बाहेर जात नसत. तीन दिवसा नंतर घरातल्या सर्व रूम मधे त्या हवन ची राख फुंकलि आजुबाजुला सर्व परीसरात व स्विमिंग पुल मधे सुद्धा. ते बाबा म्हणाले की आपण दोन दिवस ईथे राहुन पाहु काही परिणाम झाला की नाही ते? त्यांचे दिसणे बंद झाले होते पण गुरगुरण्याचा आवाज काही बंद झाला नाही ते बाबा थोडे चिंतीत झाले ते म्हणाले की आपली कोणती जागा बाकी राहिली आहे का? जीजू म्हणाले नाही अशी कोणतीच जागा नाही जी राहिली असेल ते बाबा म्हणाले नाही हे शक्य नाही तुम्ही शोधायला लागा एक जागा राहिली आहे आम्ही सर्व मग जागा शोधायला लागलो सारे घर शोधून झाले पण अशी जागा काही सापडली नाही मग त्यांनी निरीक्षणकरायला सुरुवात केली त्यांनी विचारले की बोअर कुठे घेतली आहे? जीजू म्हणाले नाही माहित त्यांनी बोअर चालू करायला लावली boar चा आवाज जमीनी खालून येत होता मग ते पळत पळत किचन मधे आले त्यांनी भिंती चाच पडल्या मग एक कपाट पाहिले त्याला लॉक होते एव्हाना सूर्य मावळला होता त्यांनी त्या कपाटाची चावी मागीतली पण त्याची चावी जीजुकडे नव्हती मग त्यांनी लॉक तोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी लॉक तोडले त्याच्या आत एक अरुंद बोळ होती तिथून एक रस्ता खाली जात होता ते म्हणाले तुम्ही जाऊन वर्तुळ जिथे आखले होते तिथे जाऊन थांबा आणि हो मी कितीही आवाज दिले कोणालाही बोलावले तरी वर्तुळाच्या बाहेर कोणीही यायचे नाही जो पर्यन्त मी येत नाही असं म्हणून ते आत गेले आम्ही सगळे वर्तुळाच्या आत जाउन थांबलो काही वेळ गेला त्या कपातच्या आतमधून धुर येत होता बहुतेक तिथे बाबानी पूजा चालू केलि होती तोच तिथून बाबांचा आवाज आला " वाचवा रे" तिथून आवाज आला पण कोणीही गेले नाही दोन तिनदा तसाच आवाज आला आता दुसरा आवाज आला ये येतो का, की मारुन टाकू याला मग बाबांचा आवाज आला "अरे हे मारून टाक़तील मला वाचवा कोणीतरी! माझे पप्पा जाणार इतक्यात जीजू नी त्यांना अड़वले खुप वेळ झाला पणकुठलाही आवाज आला नाही तोच त्या किचन मधून ती बाई बाहेर पळत आली तिने आमच्या समोर स्वतः चा गळा कापला आणि समोरच्या दरवाज्यातुन एक ओरडन्याचा आवाज आला आणि धपकन एक बॉडी वरतुन खाली पडली, थोड़ा वेळ गेला आणि बाबा त्या कपाटातून बाहेर आले आम्ही त्यांना खुप सारे प्रश्न विचारले ते इतकेच म्हणाले की मि कुठलाही आवाज दिला नाही आणि आता हे घर पूर्ण मोकळे झाले आहे ईथे तुम्ही आता राहु शकता. 4-5 वर्ष झाले या गोष्टी ला माझी ताई आणि जीजू खुप खुश आहेत आणि त्यांना एक 3 वर्षाची गोड मुलगी देखील आहे. झाडे लावा झाडे जगवा असे म्हणणारे खुप असतात पण खरंच झाडे लावणारी माणसे खुप कमी असतात तसेच स्टोरी पोस्ट करा असे म्हणणारेही खुप असतात पुढचं तुम्हाला कळालं असेलच की Lets do it guyz 95K like असणाऱ्या पेज वर पोस्ट ची कमी राहिली नाही पाहिजे धन्यवाद...!

2 comments: