वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक पोलिसाच्या चेह-यावर दिसत होती .
'मला अभिनव सपकाळ ला भेटायचे आहे' ती उद्गारली ...
बाई त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही मीनलकडे न बघता हवालदार म्हणाला .. पण माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे .. बाई कशाला त्या नागाला भेटता आहात ..खुनी आहे तो आणि ते सुद्धा तीन तीन
पाणीप्रश्न , भ्रष्टाचार , नवीन सिनेमे ,इकडे लक्ष द्यायचे सोडून तुमच्यासारख्या शिकलेल्या वार्ताहराने इकडे यायचे आणि उगीच फुकट वेळ घालवायचा .. शासनाचा आणि तुमचा ..
बर आता तुमच्या शासनानेच पत्र दिले आहे ना... मग सोडता का मला मीटिंग रूम मध्ये ? बर तुमच्या झडती वगैरे फोर्म्यालिटी करून घ्या .. तसे आम्हाला आमचे पेन हे शस्त्र पुरेसे असते साहेब आणि मी शस्त्र बाळगत नाही ..
घुगे बाई , बाईंची झडती घ्या आणि त्यांना मीटिंग रूम मध्ये बसवा आणि त्या अभिनव सपकाळ ला आणा आणि हो... बेड्या तशाच ठेवा लई बाराचा आहे तो .
परब हवालदार दुरून मीनलचा आढावा घेत, तंबाकू चोळत कोठावळे हवालदाराला म्हणाला ..' आयला बाई वरपासून खालपर्यंत कसा आयटम बॉम्ब आहे आणि म्हणते की माझ्याकडे काही शस्त्र नाही '
मीटिंग रूम मध्ये दोन लाकडी खुर्च्या आणि एक मोठे टेबल होते दोन खुर्च्यामध्ये बरेच अंतर .. एक छोटा ६० चा दिवा आणि तो जवळजवळ १५ फूट उंच त्यावर सुरक्षा टोपी आणि जाळी लावलेली ..
एक पंखा ... आयुष्याची शेवटची घटका मोजत असल्यासारखा फिरत होता
..बाई बसा .. आणि हो नुसते बसा आरोपीच्या जवळ वगैरे जायचे नाही .. तशी ऑर्डर आहे ...
साहेब मी एक जबाबदार नागरिक आहे .मला माझे काम करायचे आहे ..मी गप्पा मारयला नाही आले सपकाळ कडे ..मीनल पोलाईट अशी हळुवार बोलली . ' नाही म्हटले नियम सांगितलेला बरा'... परब टोपी सावरत म्हणाले .
अभिनव आला .. मिनलच्या बरोबर समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला ...
हातात बेड्या .. चौकडा शर्ट , जीन्स , चौकोनी मेटल फ्रेम चष्मा. ..पोलीस कोठडीमध्ये दोन दिवस राहिल्यामुळे थोडीशी खुरटलेली दाढी ..५ फुट १० इंच उंची .. सोल्जर कट केस कापलेले ...स्थिर दृष्टी आणि
चष्मा नाकाला खाली आल्यानंतर थोडेसे वर करण्याची सवय . कुठल्याही माणसाला हा बाहेर भेटल्यास हा एक हुशार सी ए किंवा इंजिनीअर आहे असेच वाटले पाहिजे आणि टी डी एच कॅटेगरी मध्ये येणारा असल्यामुळे
ब-याच मुलीनाही तो हवा हवा वाटेल असा ... हा मनुष्य खुनी .. काही पटत नव्हते
एम एस सी बायो केमिस्ट्री फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळवणारा अभिनव सपकाळ खुनी ... काही मनाला पटत नव्हते म्हणून आले ..' हाय 'आय अॅम...'.... मीनल जोग ना? अभिनव उद्गारला ..
तुम्हाला माझे नाव कसे माहिती? मीनल थोडी आश्चर्याच्या धक्का लागून न दाखवता म्हणाली .. अहो माझे शिक्षण तुम्हाला माहिती .. मार्क माहिती .. मग मला तुमच्यासारख्या पब्लिक फिगर चे नाव नको माहिती ?
पण मी एक वार्ताहर आहे दर वर्षीचा युनिवर्सिटी चा निकाल मला माहित असतो .. आणि तडफदार लोकांबद्दल माहिती ठेवणे हा माझा छंद आहे .. अभिनव पुटपुटला ..
असो अभिनव मला तुझी कहाणी ऐकायची आहे ... मला अजूनही विश्वास बसत नाही की असे काही घडले असेल .. मी अॅडवोकेट परांज्प्यानाही ओळखते त्यांना मी ही केस समजावून सांगते ..
जर जगातून एक हुशार माणूस या सिस्टीमच्या हलगर्जीपणामुळे जाणार असेल तर माझी लढ्याची तयारी आहे ...
थ्यांक यु मीनल तो एकेरीवर आला ...खरे म्हणजे एक खुनाला फाशी आणि दोन खुनाला तर नक्कीच मिळणार म्हणून मी अशा सोडून दिली होती .. पण तू आलीस आणि आधार वाटला .. फील सो रील्याक्सड ..
पण अभिनव यात तू अडकलास कसा .. आय मीन सिस्टीम मध्ये पाणी मुरते पण कुणालाही ती खुनासाठी नक्कीच पकडत नाही ...
मीनल मी एम एस सी झालो आणि काहीतरी करावे जगाला काहीतरी द्यावे याने झपाटून उठलो .. मी एका ग्यारेज मध्ये एक छोटी प्रयोगशाळा चालू केली .. रात्रंदिवस तिथे पीपेट आणि ब्युरेट माझे मित्र बनले ..
एक शोधाने मी झपाटून गेलो होतो. जेवायची शुद्ध नव्हती. आणि तो दिवस उजाडला .. मी माझे रिसर्च पूर्ण केले होते ... प्रयोग यशस्वी झाला होता...
कुठला शोध ? ' अभिनव ने इकडे तिकडे पाहत हळूच मीनल ला सांगितले याबद्दल कुणाजवळ सुद्धा बोलयचे नसेल तर मी सांगतो कारण सध्या हे फक्त मलाच माहित आहे ..
मीनलची उत्कंठा वाढत होती ...ट्रस्ट मी आणि तुझ्याकडे कदाचित ऐकून घेणारे आणि पोहचणारे अजून कुणी आहे असे मला वाटत नाही ..
अभिनव हळूच म्हणाला .. मी एक ..वॅक्सीऩ तयार केले आहे ...... कसले .?..अॅन्टी वायरस ... जे कुठल्याही वायरसपासून तुम्हाला प्रोटेक्ट करेल ..तुम्हाला मुक्त करेल अशी संजीवनीच समज ना...
मीनल आवक होऊन त्याकडे पाहत होती ... अॅन्टी जीवाणू औषधे ..वॅक्सीऩ आहेत पण हे जरा विचित्र आणि अभिनवच होते ...
हे मग तू कुणाला प्रेजेंट का केले नाहीस . त्यातच प्रोब्लेम झाला मीनल ...आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला
मीनल ला काही समजेना .. तिने शांत राहूनच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला ..एक पाच मिनिटानंतर त्याने पुन्हा बोलायला सुरु केले
मी गिनिपिग वर ते प्रयोग केले पण मला माणसावर तो प्रयोग करायचा होता . मी माझ्यावर तो केला असता पण त्यावेळी जर काही घडले तर उपाय करायला कुणी असायला हवे म्हणून मी माझ्यावर केला नाही.
एके दिवशी मी रात्री मानखुर्द हून परत येत होतो .. स्टेशनवर उतरलो .. सामसूम होती ..एक तरुण मुलगा मला दिसला ... तो चालत होता त्यावेळी मी म्हणालो सेक्टर २१ ला जाताय का ? तो म्हणाला नाही १९ ..
मी म्हणालो आपण बरोबर चालत जाऊ या का ? मला कुत्र्यांची जाम भीती वाटते ... मग आम्ही चालता चालता कळले की तो कॉल सेंटर मध्ये कामाला होता ...
मग त्याला मी माझी कथा सांगितली आणि हळू हळू जर प्रयोग यशस्वी झाल्यास त्याला रीतसर मानधन देण्याची कबुली दिली .. मुलगा तयार झाला ... तो माझ्याबरोबर आला .. मी रूम वर आलो आणि त्याला बसायला सांगितले हळूच मी सिरींज आणि फ्रीजमधून ..वॅक्सीऩ काढले ... छाती धडधडत होती ...त्याला दिले आणि त्याला हळू हळू अंधारी यायला लागली .. मी त्याला विचारले कसे वाटते आहे ? तो म्हणाला खूप झोप येते आहे ..
मग हळूच त्याच्या खिशाकडे माझे लक्ष गेले .. मला एक हाताने वळलेली सिगरेट दिसली .. मला त्यात हशीश होते हे कळायला वेळ लागला नाही ..
मी त्याला बाहेर पोहचवले आणि घरी जायला सांगितले .
सकाळी उठलो तर रस्त्यावर बरीच गर्दी होती पाहिले तर रात्रीचा मुलगा होता .. तो मरून पडला होता ... मला कळून चुकले होते .. की त्याच्या ड्रग घेण्यामुळे ..वॅक्सीऩ ने काम केले नव्हते आणि कदाचित ड्रग ओवरडोस मुळे त्याचा मृत्यू झाला होता ..
मी घाबरलो आणि तिथून निघून गेलो ... कदाचित मी खून केला आहे असेच लोक समजतील म्हणून मी ती जागा सोडली ... काही ..वॅक्सीऩ बरोबर घेतल्या ..
सेक्टर ४९ मध्ये घर घेतले .. तीन महिन्यानंतर पुन्हा प्रयोग चालू केले एका गायीवर आणि कुत्र्यावर केले आणि ते यशस्वी ठरले .. पुन्हा मला माणसाची गरज होती जो याला तयार होईल ..
एकदा पनवेलहून रात्री येत होतो ... उतरलो आणि चालू लागलो ... गाडी सायडिंग ला जाणार होती .. अचानक मला लेडीज डब्यात एक वेडसर बाई दिसली .. तिने मला पाहताच वडा पाव वडा पाव असे ओरडायला चालू केले..
मला वाटले हीच एक संधी आहे .. ही काही ड्रग घेणारी .आजारी दिसत नाही . वेडाचा सबंध मेंदूशी ... मी हळूच माझ्याजवळ असलेले चिप्स काढले आणि तिला दिले ..
ती अधाशासारखी तुटून पडली .. मी हळूच सिरींज आणि ..वॅक्सीऩ काढले .. आणि तिला दिले .. २० मिनिटानंतर तिला चक्कर यायला लागली .. माझ्या ..वॅक्सीऩ दिल्याचा अर्धा प्रयोग यशस्वी झाला होता.
हातावर एक फोड आला होता.. मला प्रयोग यशस्वी वाटला ...आणि नंतर अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली ... मी तिला ओब्सर्व करायला सुरु केले ...तिचा श्वास बंद पडू लागला होता..
अचानक तिच्या डोक्याला ती झटके देऊ लागले .. आणि ती बहुतेक गतप्राण झाली ..
दोन्ही वेळी माझ्या ..वॅक्सीऩ मुळे काही न होता त्यांच्या आजारामुळे मला अपयश आले होते ..मी घाबरून पळ काढला पण सिरींज तिथे होते ..
काही महिन्यानंतर पोलिसांनी मला पकडले आणि आता मी कोठडीत आहे ..
मीनल चे डोके सुन्न झाले होते दोन तास कधी संपले ते तिला कळले नाही .. ती तडक तिथून उठली आणि चालू लागली..
तुम्ही तरी विश्वास ठेवाल वाटले होते .. अभिनव आशेने म्हणाला ...पण तिने परत मागे पाहिले नाही ..
दोन दिवसांनी ती परत पोलीस चौकीवर आली .. यावेळी ती जास्त निर्विकार आणि ठरवून आल्यासारखी वाटत होती ...
तिने पुन्हा फोर्म्यालिटी केल्या .. परवानगी मिळवली .. अभिनव यावेळी जास्तच भयानक वाटत होता .. त्याला कदाचित थर्ड डिग्री मिळाली होती .. रक्त साकळल्यासारखे वाटत होते.
त्याच्याकडे पाहून तिने एक स्मित केले आणि म्हणाली .. अभिनव आय अॅम विथ यु .. मी दोन दिवस विचार केला नेटवर माहिती काढली ...तुझा शोध जगापुढे पोहचवणे आवश्यक आहे ... मला सांग मी कशी मदत करू शकते .. मी माझ्यावर प्रयोग करायला तयार आहे .. पण अभिनव म्हणाला मला बेड्या आहेत .. आणि ..वॅक्सीऩ घरी आहे .. पोलिसांनी घर सील केले आहे ...
ती म्हणाली ते माझ्यावर सोड .. मी उद्या परत येईन .. तुझी सुटका माझ्यावर लागली .. आणि जगाच्या पुढे शास्त्रज्ञ आणण्याचे क्रेडीट माझे ...दोघांनी एक स्मित केले
सेक्टर ४९ च्या खोलीकडे मीनल गेली ... आढावा घेतल्यावर कळले .. पोलिसांनी दरवाजा सील केला होता पण खिडकी नीट बंद नव्हती तिने हळूच ती उघडली .. फ्रीज समोर होते . वार्ताहराच्या जीवनातला सर्वात थरारक क्षण ती अनुभवत होती . तिने खिडकीला हलवले आणि दोन गज गळून पडले .. मुंबईच्या पावसाने आणि खा-या हवेने तिचे काम सोपे केले होते .. खिडकी गंजलेली होती ..
तिने आत चढून व्याक्सिन आणि सिरींज घेतली पर्स मध्ये टाकली .
दुसरा दिवस एक ऐतिहासिक ठरणार होता .. तिला झोप येत नव्हती .. कसे बसे झोपून सकाळी १० वाजता तिने पोलीस चौकी गाठली ...
परब कोठावळे हवालदार आता मीना जोग ला जणू ओळखायला लागले होते .. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी झडती वगैरे झटपट होऊन गेली ...
आधी मीटिंग रूम च्या शेजारी उभ्या राहणा-या कॉन्स्टेबल घुगे बाई इकडे तिकडे टंगळ मंगळ करत होत्या .
अभिनव आला ... आज तो बराच बारा दिसत होता .. डोळ्यात कसली तरी चमक वाटत होती . तो तिथे बसला ..
मीना जोग ने कन्सेंट बरोबर लिहून आणले होते .. हा प्रयोग ती स्वखुशीने करत आहे हे त्यात नमूद होते ... पण कुठे ना कुठे अभिनव वर विश्वास बसला होता ..
तिने अभिनवच्या मार्गदर्शनाने व्याक्सिन सिरीन्ज्मध्ये घातले आणि आपल्या उलट्या हातावर च्या शिरे मध्ये हळूच सोडले .. अर्ध्या तासासाठी चक्कर येणार हे तिला माहित होते .. यामुळे ती चक्कर आल्यावर निषींत होती ..पण अभिनव ने तिला विचारले ... आता कसे वाटते आहे ?
ती म्हणण्याच्या अगोदरच तो म्हणाला आता तुला हळू हळू सुन्न वाटू लागेल आणि डोळ्यासमोर अंधारी यायला लागेल..',मीना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सगळ्यांना असेच होते' अभिनव थंड पणे उद्गारला
... हे वाक्य ऐकताच तिला धक्का बसला .. तिन हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण शरीर अधू वाटू लागले होते. अभिनवच्या चेह-यावर एक आसुरी आनंद यायला लागला होता ... अत्यंतबेडरपणे त्याने हसायला चालू केले
आणि म्हणून लागला ' इनिस्पेक्टर सांवत ने मला सांगितले होते की त्यांच्या चौकीत आता आलेला खुनी फासावर गेल्यावर सुटका होते .. तू २ ३ लोकंना विनाकारण आपल्या विकृत मनोवृत्तीने मारुन टाकले आता बघू कसे मारशील ?'
मी बाहेर कुत्री गाई माणसे मारली .. मी म्हणलो होतो ना त्यांच्यावर प्रयोग केला ....
मी मनाशी ठरवले होते .. 'आयला पोलीस कोठडीत मारण्यात एक वेगळेच थ्रील आहे' ...आणि या वाक्याने मीनल ने हंबरडा फोडला .. पोलीस गोळा झाले .. सिरींज पाहिल्यावर मीनल जगणार नाही हे त्यांना कळून चुकले होते..
३ खून करणा-या नराधम अभिनव ला चौथ्या खुनानंतर सुद्धा एकदाच फाशी होणार होती .. कदाचित मनोरुग्ण म्हणून त्याला असायलम मध्येच जिवंत ठेवावे लागणार होते ..
परब यांना मी शस्त्र बाळगत नाही या मीनल च्या वाक्यावर खूप वाईट वाटले .. आणि त्यांनी मनाशी म्हटले बाई तुम्ही शस्त्र नाही ठेवले पण एका खुन्यावर विश्वास ठेवला ..खुन्यावर विश्वास ठेवला
जेडी
३ मार्च २०११
या कथेतील ठिकाण आणि पात्र या सर्व काल्पनिक आहेत ..कृपया यावरून कुठलाही ग्रह माणू नये किंवा विचार करू नये
No comments:
Post a Comment