Wednesday, May 27, 2015

भय...! (Short) {Horror, Suspense & Thriller} 1

भय...! (Short) {Horror, Suspense & Thriller}



Update 1



मला वेळेचा काहीच अंदाजा नव्हता.


रात्रीची एक सगळ्यात महत्वाची लक्ष देण्यालायक  गोष्ट म्हणजे, कि रात्री प्रत्येक छोटासा छोटा आवाज पण ऐकायला येतो. माझा अर्थ असा कि दिवसा तुमचे शेजारी कितीही भांडो, कितीही ओरडो तुम्हाला ऐकायला नाही येणार. पण रात्री प्रत्येकजण जरा सांभाळून बोलतो, कारण इथे आवाज थोडा मोठा झाला नाही कि पूर्ण सोसाईटी ला माहिती पडतं कि तुमच्या घरात भांडण होत आहे.


कदाचित ह्यामुळेच भांडणं जास्त करून दिवसाच होतात.


पण मी माझ्या आई वडिलांना दिवसा कधीच भांडण करता ऐकलं नाही आहे?


कदाचित ते खूप हळू आवाजात भांडत असतील जेणेकरून मला ऐकू येवू नये. आणि माझा रूम पण जरा साईडलाच आहे, त्यामुळे ते भांडत जरी असतील तरी त्यांचा आवाज मला ऐकायला कुठे येत असणार?


पण आज रात्री तर ऐकायला आलं होतं.


हो.., पण आज रात्री ते तर भांडत थोडी होते. जे मला ऐकायला आलं होतं ती तर एक किंकाळी होती, माझ्या आईची किंकाळी.


लक्ष देण्यालायक बाब अशी आहे कि माझ्याशिवाय हि किंकाळी कोणीच नाही ऐकली होती. रात्री आपल्या घरात कोणी बाई ओरडणार आणि तुम्ही उठून बघायला नाही जाणार? असं कसं असू शकतं.


पण असं झालं. माझी आई एकदम जोरात किंकाळली होती, तरीपण अजूनपर्यंत कोणीच नाही आलं होतं.


काय...! कोणी किंकाळी ऐकली नाही..?


नाही नाही असं कसं असू शकतं. रात्रीच्या शांत वातावरणात हि किंकाळी हमखास पूर्ण सोसाईटीत ऐकायला गेली असणार.


मग कोणी आलं का नाही अजूनपर्यंत?


किंकाळी कोणी ऐकली नाही वा कोणाला ऐकायची नव्हती? नाहीतरी आजकाल मदत कोण कोणाची करतात? हि तर जुनी गोष्ट आहे कि एक शेजारी शेजाऱ्याची मदत करायला येत होता, कोणीही कोणाच्यापण सुख दुखात सहभागी व्हायचे. आत्ता कोण असं करतात. आत्ता तर लोकांना स्वतःला वेळ द्यायला फुरसत नसते तर ते दुसऱ्याला काय मदद करणार.


कुठे गेली माणुसकी?


मला आत्तापण वेळेच काहीच अंदाजा नव्हता. डोळे बंद करून, श्वास थांबवून मी एकाच कुशीवरती कधीपासून झोपलो होतो मलाच नाही माहित. रात्रीची शांतंता एवढी होती कि बारीक, बारीक आवाज पण ऐकायला येत होता.


पण कदाचित त्यावेळी, त्या परिस्थितीमुळे माझे कान मलाच धोका देत असावेत.


कदाचित मलाच प्रत्येकवेळी आवाज ऐकायला येत होता. जे पण असो, त्यावेळी पण असं वाटत होतं कि आपल्या हृदयाचे ठोकेपण एक आवाज आहे.


साला.. मला माहिती असलं असतं कि आज असं होणार आहे तर मी संतोषच ऐकल असतं. तो बोलला होता कि थांब आजची रात्र माझ्या घरी, मजा करूया. पण नाही, मला तर आपल्याच घरात यायचे होते. आत्ता घे.


माझ्या खोलीत मला आत्ता फक्त ४ आवाज ऐकायला येत होते.


एक स्वतःच्या श्वासाचा आवाज, स्वतःच्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज, त्याच्या श्वासाचा आवाज आणि काहीतरी ओढत घेवून जाण्याचा आवाज.


हॉलमधून आमच्या बाबा आदम जमान्यातील घड्याळाचा टिक टोक चा आवाज ऐकायला येत होता.


माझा प्रयत्न एवढाच होता कि मी माझे डोळे जास्त हलवू नये. तुम्ही कोणाचे डोळे बघून सांगू शकता कि तो झोपला आहे कि झोपण्याचं नाटक करत आहे. माझा अर्थ असा कि, जर बंद पापण्यांमध्ये डोळे हलत आहेत तर तो माणूस झोपायचं नाटक करत आहे, कारण जो माणूस खरोखर झोपला आहे तर त्याचे डोळे एकदम स्थिर असतात, हलत पण नाहीत.


जर एखाद्याने आपले डोळे एकदम घट्ट मिटून ठेवले आहेत तरीसुद्धा तुम्ही फक्त बघूनच सांगू शकता कि तो झोपण्याचं नाटक करत आहे. कारण जो खरोखर झोपला आहे त्याचे डोळे एकदम शांत बंद असतील, कसलीच परवा नाही एकदम शांत.


त्यामुळे मी आपले डोळे एकदम घट्ट मिटले नव्हते आणि डोळ्यांना फिरवत पण नव्हतो, कारण त्याला असे वाटले पाहिजे कि मी झोपलो आहे.


तेव्हा हॉल मधून टन टन टन अशी घंटा वाजायला लागली, जणू घड्याळ रात्रीचे ३ वाजले आहेत असं सांगत आहे.


ह्याचा अर्थ असा कि मला एकाच कुशी वरती झोपून २ तास झाले होते.


भय पण एक विचित्र वस्तू असते. एक वेगळी भावना असते. मी ऐकलं होतं कि ३ वस्तू माणसांमधल्या जनावराला बाहेर आणते. सेक्स, राग आणि भय. माणसाने आपल्या चेहऱ्यावर कितीही मुखवटा लावला, ह्या ३ वस्तू खरोखर त्याच्यातल्या जनावारला बाहेर आणते.


जसं लाज लज्जा सोडून माणूस सेक्स मध्ये गुंतला असतो, त्याला आजू बाजूच्या गोष्टींचा त्यावेळी काहीच भान नसतं, त्याच्यात फक्त त्याची वासना असते आणि त्यावेळी त्याच्यातला जनावर बाहेर येतो.
असंच काहीतरी रागाबद्दल आहे, जेव्हा राग माणसाच्या डोक्यावरती येतो तेव्हा तो मागचा पुढचा कसला हि विचार नाही करत. रागात पहिले डोकं काम करायाल बंद करतं, रागाच्या भरात काही हि न विचार करता तो काहीपण करत असतो.


आणि असंच काही माझ्या बरोबर झालंय. फक्त फरक येवढा आहे कि मी वासना वा रागाचा शिकार न होता तिसऱ्या गोष्टीचा शिकार झालो आहे. भय, काही तासांपूर्वी मी स्वतः ला ओळखलो आहे कि, बाहेर मी कितीही बिनधास्त असलो तरी आतून मी एक घाबरगुंडा आहे. ह्यावेळी बिछान्यावरती पडून, डोळे बंद करून मला माझा असली चेहरा दिसला आहे, एक घाबरगुंड्याचा चेहरा.


आणि हाच होता माझ्या आतमधला जनावर, एक घाबरगुंडा उंदीर जो हलक्याश्या आवाजावर आपला जीव वाचवून पळून जातो.


असं नाही आहे कि मी विचार नाही केला होता. मीने खूप आईडिया लावले होते कि मी काय करू, वा मी काय करू शकतो पण काही समझूच शकलो नाही. आणि तसेपण डोळे बंद करून, झोपायचं नाटक करणारा एक भयभीत व्यक्ती काय करू शकतो.


आणि आत्ता माझं विचार करणं माझ्याशिवाय कोणाच्या कामी येणार नव्हंत. मी एक डरपोक, घाबरगुंडा आहे हे मी समझलो होतो. ३ तासांपूर्वी मी उठून आपल्या खोलीतून बाहेर निघालो होतो, त्या वेळी मी काही केलं असतं तर मी डरपोक ठरलो नसतो, पण मी काहीच करू शकलो नाही.


मी रात्री कितीतरी वेळा उठायचो. हि माझी लहानपणासून सवय होती. एकाच  रात्री मी कमीत कमी ३ वेळा तरी लघवीला उठायचो. किती तरी वेळा मला हे वाटायचे कि हा एक आजार आहे, ज्याच्यामुळे मला डॉक्टरला दाखवायला पाहिजे, पण मग विचार केला तर सामाझलो कि आजार ह्याचं कारण नाही आहे. कारण होतं माझं ज्यास्त चहा पिणं. मी दिवसातून 12 ते 13 कप तरी चहा प्यायचो.


आणि गम्मत तर अशी आहे कि रात्री झोपण्यापूर्वी पण चहा पीत असे, उलट मला चहा नाही पिला तर झोपच नाही लागत. आहे ना कमालीची गोष्ट...? जिथे लोक जागे राहण्यासाठी चहा, कॉफी पितात, तिथे मला झोपण्यासाठी एक कप चहा लागतो.


दुसरी गोष्ट अशी कि त्या रात्री मी कफ सिरप पिऊन झोपलो होतो. दारू प्यायची तर मला सवय नव्हती पण सिरप माझ्यावर दारूसारखी नशा करायची. एक घोट कफ सिरप घेवून मी आरामात तीन ते चार तास झोपायचो. पण चार ते पाच घोड सिरप घेवून जर मी झोपलो तर त्याची नशा मला सकाळ पर्यंत जाणवायची जसे  मी रात्री दारू पिऊन झोपलो आहे.


खोकला मला त्या रात्री झोपून देत नव्हता, त्यामुळे मी कफ सिरप च्या पाच ते सहा घोट पिऊन एकदम गार झोपलो होतो.



क्रमशः

No comments:

Post a Comment