Thursday, May 28, 2015

नमस्कार मित्रांनो मी अविनाश गुरव
पुन्हा तुमच्या साठी घेउन आलोय एक रोमांच कारी न सत्य घटना....
ही घटना 5/6 वर्षा आधी माझ्या गावी घडली आहे...
तर झाले असे की आमच्या गावी (गावाचे नाव मुद्दाम टाळत आहे) जानेवारी मधे हरिनाम सप्ता भरत असे सप्ता / परायण आठ दिवस , दिवस रात्र चालत असे.
आमच्या गावातील काही लोक गावाबाहेर तर काही जण आप आपल्या शेतात घर बांधून तेथेच राहू लागले होते,तेहि सप्त्या साठी गावात येत असत.
असाच एक दिवस आमच्या गावातील एक गृहस्त पाटिल वय 55 च्या आसपास हे सप्त्या साठी रात्रि 8:00 च्या दरम्यान आले आणि त्यांना घरी जाण्य़ासाठी 12:00 वाजले , पाट्लांचे घर गावाबाहेर 20/25 मिनिटांचा अंतरावर होते.
पाटलान्नी आता गाववस्ती ओलांडली ते आता शेता शेतातून बँट्रीच्या उजेडात वाट काढ़त निघाले , आता ते एका विहिरी जवळ आले .त्या विहिरी मधे दोन विवाहित तरुनीनि एकत्रच जीव दिला होता का त्या विहिरीत पडल्या हे अजुन कोणाला माहित नाही.
पाटलान्ना ही हे माहित होते , आणि त्या मुली खुप जन्नाना दिसल्याचेही पाटलान्नी ऐकले होते, पण पाटलांचा तिकडे दिवस भर वावर असतो त्यांना तर कधी असा अनुभव आला नव्हता ,म्हणून पाटिल आपल्या धुंदीत घराकड़े निघाले, पाटिल विहिरीच्या बाजूला पोहचताच पाटलान्ना विहिरीत कोणतरि बोलत आहे असे ऐकू येउ लागले, रात्रीच्या शांततेत तर अगदी स्पष्टच पण पाटलान्नी त्या कड़े दुर्लक्ष केले आणि पुढे चालु लागले, थोडेच पुढे गेल्या वर त्यांना रस्त्यावर पडलेल्या पाला पाचोल्याचा असा आवाज येउ लागला की कोणी तरी त्यांच्या दिशेनी उड्या मारत येत आहे, आता मात्र पाटलान्ना चांगलीच भीती वाटु लागली ते जरा जोरात चालू लागले तसा त्यांचा मागुन जोर जोरात किर्कश हसण्याचा आवाज येउ लागला .
आता पर्यन्त हा काय प्रकार आहे हे पाटिल कळुन चुकले होते ,त्यांचे घर अजूनही दहा मिनिटांवर वर होते , आता तो हसण्याचा आवाज पाटलानच्या
डोक्यावरुन येऊ लागला पण पाटिल इकडे तिकडे पाहताच नव्हते ते फक्त बँट्रीच्या उजेडात घरा कड़े भरा भरा चालू लागले.
येव्हाना हसण्याचा आवाज बंद झाला आणि एकदम आवाज आला " काय पाटिल कुठं निघालास येवडा घाइत " आणि पुन्हा हसण्याचा आवाज येउ लागला पण पाटिल काही त्यांना प्रतिसाद देत नव्हते .
ते भीतीने थर थर कापू लागले होते न येव्ह्ड्यात काय झाले काय माहित पाटलांची बँट्री बंद पडली...
आता पाटिल पुरेपुर घाबरून गेले होते . आता तो हसण्याचा आवाज पाटलानच्या डोक्यावरून (पंख्याच्या पात्यां सारखा) घुमू लागला, पाटिल पूर्ते रडकुंडीला आले होते, पाटिल दोन चार पावलांवर पुढे जाताच , पाटलानच्या समोरच दोघी जनी उभ्या होत्या न वेगळ्याच आवाजात किनकाळत होत्या ...
पाटलान्नी तसेच मागे वळुन धडपडत धडपडत अंधारात वाट काडत कसे तरी गाव गाठले न झाला प्रकार गावकर्यांना सांगितला तसे 15/20 जन बँट्री काठ्या घेउन पातलान्ना भास झाला की कोणी खोडसळांनी भीती दाखवली असेल या उद्देशाने पाटलान बरोबर त्या विहिरी जवळ गेले असता अचानक चारही दिशान्नी त्यांना कर्कश हसण्याचा आवाज येउ लागला, ते सर्व जन चारही दीशेला बँट्रीचा प्रकाश फेकू लागले येव्ह्ड्यात अगदी रागावलेल्या न क्रूर स्वरात एक आवाज आला " आम्हाला शोधताय काय!!!!! बँट्रिक बंद करा " (तो आवाज येव्ह्ड़ा मोठा होताह म्हणतात की कोणी तरी माइक वरुण बोलत आहे असे भासत होते) आणि चारही दिशेला असनारी मोठी मोठी झाडे जोरजोरत हलू लागली जनु काय मोठे वादळच आलेय पण तिथे अगदी सोम्ये हवा होती.
आता सर्वांची घाबरगुंडी उडून घाम फुटला होता .
मग काय सर्वान्नी तिथून काड़ता पाय घ्यायचे ठरवले, पण तो हसण्याचा आवाज काहि थांबत नव्हता ते सर्वजन गाववस्ती जवळ येइ पर्यन्त कानात गरमतेल ओतल्यासारखा सर्वांचे डोके उठले होते ते हसने येकुन ,
गावात येताच तो आवाज थांबला न सर्वान्नी सुटकेचा श्वास टाकला परंतु झालेल्या प्रकारा मुळे काही जन आठवडा भर अंथरुनात पडून होते हे सर्व सांगतानाही थर थर कापत होते......
अजूनही गावकरी ही घटना सांगताना भीतीने गुरफटून जातात...

No comments:

Post a Comment