Thursday, May 28, 2015

पापी... एक गूढ सत्य भाग ९

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय तिसरा विधी

भाग ९

इथून १०० मैल लांब दोन आत्म्याचं भेट होत होती, ती एक अशी जागा होती जिथे असल्या लोकांना मंत्र शिकवले जातात... ते ठिकाण काळी जादू करणार्यांसाठी होतं...

"राहुल, तू माझा खरा अनुयायी विध्यार्थी आहेस, तू  मला पुन्हा ह्या जगात आणलंस, जेव्हा मी तुला पहिल्यावेळी पाहिलं तेव्हाच मी समजून चुकलो कि तूच पुढे माझा वारसा चालवणार आहेस... आणि आज तू मला एकदम बरोबर सिद्ध केलंस, मला तुझा अभिमान आहे.." बोल भावूक होते पण शब्द एकदम कणखर होते ज्यामुळे ती भावुकता दिसतच नव्हती...

"असं नका बोलू मालक, उलट मी लज्जित आहे कि मी ह्या कामासाठी पूर्ण १० वर्ष लावलीत..."

"मला माहिती आहे कि हे काम जेवढं दिसत आहे तेवढं सोप्प नाहीये... आपल्या साम्राज्यात कोणाचीही हिम्मत होत नव्हती हे कार्य करण्यासाठी, पण माझा तुझ्यावर सुरुवातीपासून विश्वास होता आणि आज ते तू पूर्णपणे सिद्ध आणि पूर्ण करून दाखवलंस..."

"पण अजूनही काम अर्धवटच झालं आहे... पुढच्या कामासाठी आपल्यांना त्या पुस्तकाची गरज भासणार आहे..." राहुल बोलला...

"हो पण त्या पुस्तक धारकाला तू त्याच्या बिळातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं आहेस, आता आपल्यांना त्याचा पाठलाग केला पाहिजे कारण तोच आपल्यांना पुढचा रस्ता दाखवणार..."

"हो पण आता आपल्यांना एका शरीराची गरज आहे, कारण विधी अजूनही अर्धीच झाली आहे..."

"शरीर तर सापडेल, माझ्या डोक्यात एक व्यक्ती आहे... आता तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण आता मी तुझ्या सोबत आहे मीच आता तुला ह्यापुढे मार्गदर्शन करत राहीन.."

"मालक जर तुम्ही माझ्या सोबत असाल तर कोणाचीही मला थांबवण्याची हिम्मत होणार नाही, जो कोणी माझ्या ह्या १० वर्षाच्या स्वप्नांवर पाणी टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला मी जिवंत सोडणार नाही..." एवढ्या वर्षापासून पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण होतांना पाहून राहुलच्या आवाजात एक वेगळीच धमक होती...

"त्या माणसाची चिंता करायची काहीच गरज नाही आहे, तो माणूस साळुंखे एवढा बुद्धिमान नाही आहे... तू फक्त त्याच्याशी खेळत राह एक न एक दिवस तरी तो त्या पुस्तकाची मदद घेईलच आणि आपल्यांना ती संधी मिळेल..."

"थोडा आराम करून घे, लवकरच आपल्यांना दुसरं चरण सुरु करायचं आहे... हि पूर्ण श्रुष्टी हादरली पाहिजे आणि आपल्या समोर सर्वांचे गुढघे टेकले पाहिजेत..."

तो व्यक्ती आता आपल्या योगाच्या आसनातून उठून उभा राहिला... त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मिता आणि चमक होती... त्याने पुन्हा आपल्या छातीवर चाकूने क्रोसचा आकार बनवला आणि बिछान्यावर पडून आरामात झोपी गेला... पण त्याच्या चेहर्यावरची स्मिता अजूनही तशीच कायम होती...

***************************** 

दुसरीकडे मुंबईमध्ये डॉ. अवधूत, संत्या आणि शिऱ्या स्पेशल इन्वेस्टीगेशन ब्रांचच्या ऑफिसमध्ये बसलेले होते... संत्या आणि शिऱ्या अजूनही आत्ता थोड्यावेळापूर्वी डॉ. अवधूतने जे काही सांगितले त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत होते...

"महासागर आटेल...? ह्याचा अर्थ काय आहे...!" राहून राहून संत्याच्या मनात हाच प्रश्न येत होता...

"शिऱ्या मला जरा आज पर्यंत मेलेल्या मुलींची नावं सांग जरा...?" डॉ. अवधूतने विचारले...

"मेघना, जी एक वेश्या होती, त्याच्या नंतर पल्लवी जी अनाथ होती जिला एका मंदिरातून उचललं होतं, आणि अलिशा, कॉल सेंटरमध्ये कामाल होती, जेव्हा ती आपली नाईट शिफ्ट संपवून घरी जात होती तेव्हा तिचं अपहरण करण्यात आलं होतं..." शिऱ्या बोलला...

"अलिशाचं पूर्ण नाव काय आहे...?" डॉ. अवधूतने विचारले...

"अलिशा खोत...!"

"मला हेच समजत नाही आहे कि नावात काय ठेवलं आहे...?" संत्या आता चिडत बोलला...

"माझं एवढंच म्हणणं आहे कि जवळ जवळ सगळ्याच धर्मात काळी जादू बंद करण्यात आली आहे आणि त्यावर खूप कठोर शिक्षा पण आहे... पण ह्या व्यक्तीने ज्या मुलींची हत्या केली आहे त्यांच्यामध्ये एक मुस्लिम, एक हिंदू आणि क्रिश्चन आहे... मी जेव्हा तुम्ही पाठवलेले फोटो पाहिलेत तेव्हा मला वाटलं कि कोणी एक काळी जादू करणारा माथेफिरू फक्त आपली शक्ती वाढवण्यासाठी आपल्या गुरुला बोलवत आहे, पण हे तर काही विचित्रच आहे, पण हा माथेफिरू तर एका समुदायातला आहे..."

"कोणता समुदाय...?" संत्या आणि शिऱ्या हे सर्व ऐकून गोंधळलेच होते...

"तुम्हाला गवंडीचा समुदाय किंवा इल्लूमीनटी समुदाय माहितीच असेल, तुम्हाला मला ह्यांचा भूतकाळ सांगायची गरज नाहीये... पण काळी जादू करणार्यांमध्ये पण असलाच एक समुदाय होता. ते स्वतःला पापी समजायचे... ज्यांनी देवाच्या आदेशाला पण आव्हान दिलं होतं, त्यांना सैतानाचा समुदायाने पण ओळखलं जायचं. त्यामुळेच त्याने त्याच ३ मुलींची निवडणूक केली आणि त्यांची हत्या करून त्याचं रक्त एका आत्माला अर्पण केलं... पण हि तर फक्त अर्धीच गोष्ट आहे... त्यांनी तर फक्त त्या आत्माला इथे बोलावले आहे, आता त्या आत्माला कोणत्या तरी शरीरात टाकायचं काम अजूनही बाकी आहे..." एवढं बोलताच भीती त्या दोघांच्याही चेहऱ्यावर डॉ. अवधुतांना जाणवत होती...

"असं नाहीये कि सर्वचजण ह्या समुदायातलेच असतील, खूप कमीच लोकांना म्हणजे जी व्यक्ती ह्या विद्येमध्ये अगदी हुशार असतात त्यांनाच ह्या संघटनांमध्ये घेतलं जातं, ती लोकं आपल्या काळ्या जादू मध्ये एकदम निपुण असतात... आणि हि गोष्ट वेगळीच आहे कि बाकी सर्व संघटना एकमेकांना सतत भेटत किंवा एकमेकांशी बोलत असतात, पण पापी लोकं कधीच एकमेकांना भेटत नाहीत, ते एकमेकांपासून खूप लांब असतात आणि पूर्ण दुनियेच्या लोकांशी पण दोन हात लांबच असतात. एक पापी आपली पूर्ण शक्ती आणि निपुणता आपल्या एका शिष्याला देतो आणि तोच आहे जो हे सर्व १० वर्षांपासून करत आहे, ज्याने आपल्या सैतान गुरूला पुन्हा ह्या जगात आणण्यासाठी हे सर्व केलं आहे..." आता हे सर्व ऐकून तर संत्या आणि शिऱ्या थरथरायलाच लागले...

"पण अजूनही तुम्ही आम्हाला महासागर आटेल ह्याचा अर्थ नाही सांगितला आहे... माहासागर आटेल म्हणजे होणार तरी काय आहे...?" संत्याने विचारले...

"ह्या समुदायात काळी आग सगळ्यात पवित्र वस्तू मानते आणि ते लोकं पाण्याला सगळ्यात खराब वस्तू मानतात... त्यामुळेच समुद्र कसा पाण्याचा असतो ना.. आणि माझ्या मते तो संदेश असा होता कि आगीने पाण्याला म्हणजेच महासागराला हरवलं आहे..."

"आणि तुम्ही पूर्ण पणे सांगू शकता कि तुम्ही ती माहिती चांगल्या प्रकारे डिकोड केली आहे..." संत्याने विचारले...

"हो... कारण हे मी खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं आहे... आणि हा जो शेवटचा चिन्ह आहे ना तो पाहा... तो असा आहे ┴, हा चिन्ह त्याच्या गुरूच्या नावाचा शेवटचा अक्षर आहे... आणि तो पापी समुदायात अश्याच प्रकारे लिहिला जातो..."

"काय नाव आहे त्याचं...?" दोघांनीही एकत्रच प्रश्न विचारला..

"वेंक┴ (वेंकट), काळ्या जादूचा बादशाह..."


क्रमशः...

No comments:

Post a Comment