Saturday, May 30, 2015

भाग ८ देव उपासना देव उपासना

भाग ८ देव उपासना
देव उपासना
"चल मुकाट्याने आतमध्ये..." विश्राम उर्मिलाला एका रूममध्ये ढकलत बोलला.
उर्मिलाने स्फुंदत एकदा मागे वळून त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
"बघतेस काय, देवाशी प्रार्थना कर कि तू अजून जिवंत आहेस ती.." विश्राम दात खात बोलला.
पल्लवी लांब उभी राहून सगळं काही पाहत होती. तिने आज पर्यंत आपल्या जीवनात हे सर्व पाहिलं नव्हतं कि माणूस एवढा पण निर्दयी असू शकतो ते, त्यामुळे ती आश्चर्यचकित उभी आहे. ती पळत पळत भाऊ साहेबांच्या रूममध्ये जाते.
"बाबा... बाबा... बघाना ह्यांनी कुणाला इथे उचलून आणलं आहे... तुम्ही ह्यांना थांबवत का नाही...?" पल्लवी ने प्रश्न केला.
"गप्प बस, एक वर्ष झालीत तुला ह्या घरात येवून.... पण अजूनपर्यंत तू हे नाही शिकलीस कि ह्या घरातील बायका वर तोंड करून बोलत नाहीत..." भाऊ साहेब तिच्यावर डाफरत बोलले...
"क्षमा करा... बाबा... पण हे जे काही करत आहेत ते चुकीचं आहे. एका बाईला असल्या अवस्थेत इथे खेचत आणलं आहे कि मी सांगू शकत नाही..." पल्लवी बोलली.
"विश्राम...!!!" भाऊ साहेबांनी जोराने ओरडून आवाज दिला...
विश्राम पळत पळत तिथे येतो... "काय झाला बाबा...?"
"सुनेला सांग इथून निघून जा नाही तर माझ्यावरचा ताबा सुटेल... आता हि मला सांगणार कि मी काय केले पाहिजे आणि काय नाही..." भाऊ साहेब रागाने बोलले...
विश्रामने लगेच पुढे येवून तिच्या बायकोचे केस पकडले आणि तिच्यावर ओरडून बोलला, "काय होतंय तुला...?"
"आह्ह्ह... काहीच नाही मी तर फक्त बाबांना हेच सांगत होते कि जे काही होत आहे ते सर्व चुकीचं होत आहे..." पल्लवी आपल्या केसांना पकडून बोलली.
"आणि जे काही आमच्या बहिणी सोबत झालं ते काय चांगलं होतं...?" विश्रामने विचारले.
विश्राम पल्लवीचे केस पकडून खेचत तिला आपल्या रूमपर्यंत घेवून आला आणि तिला पलंगावर आपटून बोलला.., "खबरदार जर आजच्या नंतर इथे कोणाला काही बोललीस तर, नाहीतर माझ्या पेक्षा वाईट कोणीच नसेल..."
"तुमच्या पेक्षा वाईट... कोणी आहेच नाही ह्या जगात..." पल्लवी स्फुंदत बोलली..
"एकदम बरोबर, खूप लवकर समजलं तुला..." विश्राम हासत बोलला...
तेव्हा विश्रामला बाहेरून आवाज ऐकायला येतो... "छोटे मालक..."
विश्राम बाहेर येवून विचारतो.., "काय झालं घनश्याम..?"
"छोटे मालक मी काही माणसांना घेवून मागल्या शेतात जात आहे, मला पूर्ण विश्वास आहे कि संतोषची छोटी बहिण तिथेच कुठेतरी लपली असेल.." घनश्याम बोलला.
"थांब मी पण येतो तुझ्यासोबत..." विश्राम बोलला..
"ठीक आहे छोटे मालक चला.."
"राहुल...!!" विश्राम राहुलला आवाज देतो...
राहुल पळत पळत येतो आणि आपली मान खाली झुकवत बोलतो..,"जी, छोटे मालक..."
"ते बाहेरच्या रूमला टाळा लाव, मी आता लगेच आलो.."
"जशी आपली आज्ञा मालक..."
विश्राम, घनश्याम आणि त्यांचे काही सहकारी मागल्या शेताकडे जातात.
शेतात उपासना खूप गोंधळलेल्या स्थितीत आहे, ती मनातल्या मनात विचार करते कि तिला घरी जायला पाहिजे कि इथेच शेतात राहिलं पाहिजे. एकीकडे ती आपल्या भावासाठी चिंतीत होते तर... दुसऱ्याच क्षणी तिला आपल्या बहिणीची चिंता होते. ती ह्या गोष्टीपासून पण अनभिज्ञ आहे कि तिची आई गतप्राण झाली आहे, तिचे बाबा रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत आणि तिची बहिण भाऊ साहेबांच्या वाड्यात बंधिस्त आहे. ती ह्या गोष्टीपासून पण अनभिज्ञ आहे कि विश्राम काही लोकांसोबत तिच्याजवळच येत आहे.
अचानक तिला कोणीतरी येण्याची चाहूल लागते. ती पळत जाउन शेतात लपून बसते.
"पूर्ण शेत पालथा घाला ती इथेच कुठे तरी असणार...?" विश्राम बोलला.
"छोटे मालक तुम्ही चिंता करू नका ती इथून पळून नाही जाऊ शकत..." घनश्याम बोलला.
भाऊ साहेबांची माणसं पूर्ण शेतात पसरतात.
उपासना, विश्राम आणि घनश्यामची गोष्ट ऐकते आणि तिला कळून चुकतं कि ते लोकं तिलाच शोधत आहेत.
"मालक मी इथे समोरच्या शेतात बघतो..." घनश्याम बोलला.
"हो हो बघ.., लवकर शोधून आण तिला..."
उपसनाच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले होते, कारण घनश्याम तिच्याच दिशेने येत होता.
पण तेव्हा विश्रामच्या जवळ त्यांचा एक माणूस ओरडत ओरडत येतो.
"मालक-मालक असं वाटतंय ती मुलगी जंगलात घुसली आहे..." तो धापा टाकत बोलला.
हे ऐकून घनश्याम पुन्हा मागे वळतो आणि त्याला विचारतो... "काय बोलतोयस... त्या जंगलात लोकं दिवसा जायला घाबरतात, आता रात्र होणार आहे, मग ती मुलगी कशी जाऊ शकते..."
"मी खरं बोलतोय घनश्याम, मी आत्ताच कोणाला तरी पलीकडे त्या शेतात जातांना पाहिलं आहे... मला पूर्ण विश्वास आहे कि ती संतोषची बहिणच असणार.., लांबून ती कोणा मुलीवानीच दिसत होती.." तो माणूस बोलला.
"घनश्याम लवकर सर्वांना बोलव आम्हाला कोणत्याही प्रकारे तिला पकडायचे आहे..." विश्राम बोलला.
"मालक ह्यावेळी त्या जंगलात जाणं उचित नाही आहे, माझी गोष्ट ऐका आपण तिला उद्या सकाळी शोधू, ती एकटी मुलगी पळून पळून जाणार तरी कुठे..." घनश्याम बोलला.
"पण मला भीती आहे कि सकाळ पर्यंत तिचा मृतदेहच सापडेल..." विश्राम बोलला...
"ते तर आहे मालक ह्यापलीकडे आपण करू तरी काय शकतो, तुम्हाला तर ह्या जंगला विषयी माहितीच आहे..." घनश्याम बोलला...
विश्राम कोणत्या तरी विचारात हरवतो आणि मग थोड्यावेळाने बोलतो, "ठीक आहे चला... उद्या सकाळी बघून घेवू..." विश्राम सगळ्यांना घेवून तिथून निघून जातो.
उपासना श्वास कोंडून चुपचाप बसली आहे. ती भगवंताचे लाख लाख आभार मानत होती कि ते लोकं जात आहेत. पण एक गोष्ट तिला मनातल्या मनात खूप टोचत होती कि भाऊ साहेबांच्या माणसांनी जंगलात जातांना कोणाला पाहिलं आहे...?
इथे वाड्यात पल्लवी आपल्या रूममधून निघून त्या रूमच्या दिशेने जाते जिथे उर्मिला बंधिस्त होती. ती मनातल्या मनात विचार करते कि जाऊन रूमचा दरवाजा उघडून तिला तिथून पळून लावावं.
पल्लवी हा विचारच करत होती कि अचानक तिला त्या रूममधून किंकाळीचा आवाज ऐकायला येतो. तिला तिथे जायचे आहे पण ती तिथे जाऊ शकत नव्हती.
थोड्यावेळाने तिला त्या रूममधून भाऊ साहेब बाहेर येतांना दिसले.
ती मनातल्या मनात बोलते, 'शी..!! जेव्हा बापच असा आहे तर मुलगा का नाही असणार..'
तेव्हा अचानक तिला घराच्या मागे काही तरी ऐकायला येतं. ती पळत तिथे जाते आणि बघते तर काय तिथे राहुल आपल्या हातावर चाकूने वळ काढत होता.
"अरे हे काय करत आहेस तू राहुल...?" पल्लवीने आश्चर्याने विचारले.
"सुन....बाई काही नाही..." राहुल अडखळत बोलला.
"काहीच नाही म्हणजे..!! हे रक्त का वाया घालवत आहेस तू..."
"सुनबाई कोणालाच सांगू नका..."
"हो-हो बोल काय गोष्ट आहे..?"
"हि जी मुलगी बाहेरच्या रूममध्ये बंद आहे, तिचं नाव उर्मिला आहे, मी एकेकाळी तिला प्रेम करायचो. तिला पण माझ्या प्रती प्रेम होतं, पण आम्ही कधीच एकमेकांना काहीच बोललो नाही आणि अचानक तिचं लग्न झालं. आज वर्षानंतर तिला ह्या दशेत पाहतो आहे. पण मी काहीच करू नाही शकत... त्यामुळे स्वतःला शिक्षा देत आहे.."
"मग जाउन आत्महत्या कर..." पल्लवी रागाने बोलली आणि मागे वळून आपल्या रूमकडे जायला लागली.
जाता जाता तिने त्या रूमवर एक कटाक्ष टाकला तर तिला दिसलं कि पुरुषोत्तम त्या रूममध्ये घुसत आहे.
पल्लवी मनातल्या मनात बोलली, 'ह्या घरातील सर्वच पुरुष एक सारखे आहेत... बस नाव, चेहरा आणि वय वेग-वेगळं आहे...'
पल्लवीला हे सगळं बघवलं गेलं नाही आणि ती परत मागे वळून राहुल जवळ आली आणि चिडून बोलली, "तू तिच्यावर कसा प्रेम करतोस...! तुला लाज नाही वाटत, इथे उभा राहून तमाशा बघत बसला आहेस, तुला काहीतरी केलं पाहिजे..."
"मी ह्या घरातला नोकर आहे सुनबाई, तुम्हीच सांगा ना मी काय करू शकतो.." राहुल उदास होत बोलला..
"नोकर होण्याचा हा अर्थ तर नाही होत ना कि तू माणुसकीच विसरून जावी..." पल्लवी त्याच्यावर डाफरली.
"सुनबाई मी काहीच करू नाही शकत, मी विवश आहे.." राहुल हताश होत बोलला.
"ठीक आहे मग मलाच काहीतरी केलं पाहिजे..." एवढं बोलून पल्लवी वाड्याच्या स्वयंपाक घरात जाते आणि एक मोठा सुरा घेवून त्या रूमकडे पळत सुटते ज्यामध्ये उर्मिला बंद होती. राहुल एकटक तिलाच बघत राहतो.
पल्लवी त्या रूमच्या बाहेर येवून बघते तर आतून तिला दरवाजा बंद आणि उर्मिलाच्या ओरडण्याचा आवाज येत असतो. ती हिम्मत करून दरवाजा ठोकते.
"कोण आहे...?" आतून पुरुषोत्तम रागाने विचारतो.
पण पल्लवी काहीच प्रतिउत्तर देत नाही आणि एकदा परत दरवाजावर थाप मारते. ती सुरा एका हाताने आपल्या पाठीमागे लपवते. थोड्यावेळाने पुरुषोत्तम दार उघडतो.
"अरे पल्लवी बेटा तू इथे काय करत आहेस...?" पुरुषोत्तम प्रेमाने तिला विचारतो.
"हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे काका..?" पल्लवी डोळे टवारून त्याला विचारते.
"गप्प बस, जाउन आपलं काम कर जा..." पुरुषोत्तमचा पारा आता चढला होता.
"आपलं कामच करत आहे काका चुपचाप मागे व्हा नाहीतर हा सुरा तुमच्या छातीच्या आरपार घुसवून टाकेन." पल्लवी तो सुरा पुरुषोत्तमला दाखवत बोलली.
पण पुरुषोत्तम एका झटक्यात तो चाकू तिच्या हातून हिसकावून घेतो आणि तिला ढकलतो, ढकलून दिल्याने पल्लवीचा तोल जातो आणि ती तिथेच पडते.
पल्लवी एक नजर उर्मिला वर टाकते. तिची हालत पाहून तिचे डोळे पाणावले जातात. उर्मिला पण निराशेने तिच्याकडे पाहते आणि आपले डोळे बंद करते.
राहुल पळत पळत तिथे येतो पण पुरुषोत्तमला पाहून तिथेच दचकतो.
"राहुल तू जा आणि आपलं काम कर इथे सर्व ठीक आहे..." पुरुषोत्तम बोलला.
"मालक पण..."
"पण काय... माझं डोकं खराब नको करूस आणि निघ इथून..." पुरुषोत्तम रागाने बोलला.
राहुल चुपचाप मागे वळून निघायला लागतो.
पल्लवी रूमच्या बाहेर तशीच पडून राहते आणि पुरुषोत्तम दरवाजा पुन्हा बंद करतो.
अचानक राहुल काहीतरी विचित्र करतो. तो भाऊ साहेबांच्या रूमकडे जातो आणि बाहेरून कडी लावून येतो.
मग पळत पळत पल्लवी जवळ येतो आणि बोलतो, "सुनबाई तुम्ही मागे व्हा..."
"त्या मुलीला वाचव राहुल.. नाहीतर मी देवाला काय तोंड दाखवणार..." पल्लवी स्फुंदत बोलली.
"मी काही तरी करतो सुनबाई तुम्ही उठा इथून.." पल्लवी तिथून उठते.
राहुल दरवाजाला एक लात मारून खोलून टाकतो.
"राहुल मुर्खा हे काय करतोयस तू..." पुरुषोत्तम त्याच्यावर डाफरत बोलला.
"तेच जे सर्वात आधी केलं पाहिजे होतं.." राहुलने पुरुषोत्तमचे पाय पकडून त्याला उर्मिलच्या वरून खेचलं आणि त्याला दुसरीकडे आपटलं.
"असं वाटतंय तुला आपल्या जीवाची काहीच पर्वा नाही आहे..." पुरुषोत्तम विव्हळत बोलला.
राहुल पुरुषोत्तमला काहीच बोलत नाही आणि रूमच्या बाहेर येवून पल्लवीला बोलतो "सुनबाई कपडे..."
"थांब मी आत्ताच माझे काही कपडे आणते..."
त्या वेळेत राहुल पुरुषोत्तमला एका दोऱ्याने बांधून एका कोपऱ्यात ठेवतो..
पल्लवी पळत जाउन आपल्या रूममधून उर्मिलासाठी कपडे आणते आणि रूममध्ये येवून उर्मिलाला कपडे देत बोलते, "घे लवकर घाल आणि पळ इथून..."
उर्मिला कशीतरी उठते आणि हळू हळू कपडे घालते.
सुनबाई मला पण हिच्यासोबत जायला हवं, तुम्ही माझे डोळे उघडले नाही तर मी जीवन भर स्वतःला कोसत राहिलं असतं.
"ह्या गोष्टी करण्यासाठी आता वेळ नाही आहे, लवकर निघ इथून... उर्मिलाला हिच्या सासरी सुखरूप पोहचवून ये."
"हो सुनबाई मी उर्मिलाला घेवून आत्ताच हिच्या बरोबर हिच्या सासरी निघेन पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या..."
"आता लवकर निघ इथून..."
उर्मिला हात जोडून पल्लवीचे आभार प्रकट करते.
पल्लवी भावुक होवून तिला आपल्या मिठीत घेते आणि बोलते, "जे काही तुझ्या सोबत झाले त्यासाठी मी खूप लज्जित आहे, जा स्वतःची काळजी घे..."
राहुल उर्मिलाला घेवून वाड्यातून बाहेर पडतो.
पल्लवी त्यांना जातांना पाहत राहते, ती मनातल्या मनात विचार करते कि तिलापण इथून निघून जायला पाहिजे. असल्या नरकात राहण्याचा काय फायदा. थोड्यावेळाने ती मागे वळून पुन्हा आपल्या रूमकडे जाते.
अचानक तिला आपल्या मागे कोणाच्या तरी येण्याचा आवाज ऐकायला येतो, ती मागे वळून पाहते तर काय, विश्राम आपल्या माणसांसोबत येत आहे.
विश्राम जसाच त्या रूमच्या समोर येतो तेव्हा तो समजून चुकतो कि पल्लवीने संतोषच्या बहिणीला पळून लावलं आहे.
तो पळत येवून पल्लवीचे केसं पकडतो आणि दात खात बोलतो, "तर... तू आपली माणुसकी दाखवलीच, आता मी तुझे ते हाल करणार कि तू कधी विचार पण केला नसेल."
घनश्याम रूममध्ये जाउन पाहतो तर काय पुरुषोत्तम तिथे बांधलेला पडला आहे, तो लगेच दोर खोलतो आणि तोंडातला कपडा पण काढतो.
पुरुषोत्तम पळत विश्रामकडे येतो आणि बोलतो, "विश्राम त्या मुलीला राहुल घेवून गेला आहे, आणि सुनबाईने त्याची मदत केली आहे..."
"काय राहुल...? पण राहुलने असं का केलं..?" विश्राम विचारात पडतो.
"माहिती नाही विश्राम... त्यानेच मला दोरीने बांधला होतं आणि माझ्या तोंडात कपडा भरला होता."
"तुम्ही चिंता नका करू काका, ते लोकं इथून जिवंत नाही जावू शकत, राहुलला मी जिवंत नाही सोडणार..." विश्राम दात खात बोलला.
विश्राम, भाऊ साहेबांच्या रूमच्या दिशेने वळतो तेव्हा पाहतो तर काय कि बाहेरून कडी लावली आहे. ते खोलून पाहतो तर काय त्याचे बाबा गाढ झोपले आहेत...
विश्राम, घनश्यामला बोलावून विचारतो कि, "हा राहुल कोणत्या रस्त्याने गेला असेल.."
"मालक तो जरूर वाड्याच्या मागल्या रस्त्याने गेला असेल, आपण समोरून येत होतो, तो आपल्यांना तर दिसला नाही. वाड्याच्या मागे शेत आहे आणि शेतांच्या पलीकडे जंगल, तो जरूर मागल्या रस्त्यानेच गेला असेल..." घनश्याम बोलला.
"हो-हो तो मागल्या रस्त्यानेच गेला आहे मी रूममधून त्यांना जातांना पाहिलं होतं..." पुरुषोत्तम विश्रामला बोलला.
इथे अजूनही शेतात उपासना चुपचाप लपून बसली आहे. काळोख पसरला आहे आणि चंद्राचं चांदणं चहु बाजूला पसरायला लागलं आहे.
उपासना चुपचाप बाहेर निघते, पण बाहेर निघताच ती कापायला लागते. तिला लांबूनच आपल्याकडे एक सावली येतांना दिसते. ती घाबरून परत त्या शेतात जाउन लपते.
ती सावली पण तिच्या मागे मागे त्या शेतात घुसते. तिच्या पावलांचा आवाज होवू नये म्हणून, उपासना एका जागेवर गपचूप उभी राहते. पण तेव्हा तिला झपाझप चालणाऱ्या पावलांचा आवाज ऐकायला येतो. ती मागे वळून पाहते तर काय ती सावली एकदम तिच्या चार पावलं लांबच उभी आहे. ती लगेच पळत सुटते पण ती सावली लगेच तिला मागून पकडते.
"क..क..कोण आहेस तू, सोड मला..." उपासना ओरडून बोलते आणि त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते.
ती सावली उपासनाच्या तोंडावर हात ठेवते, आणि बोलते, "गप्प बस उपासना हा मी आहे..." एवढं बोलून त्या सावलीने तिच्या तोंडावरून हात बाजूला केला.
उपासना काळोखात त्या सावलीचा चेहरा तर नीट नाही पाहू शकत तरीपण त्याचा आवाज ऐकून रडायला लागते.
"देव... काय..... हा तूच आहेस...?" उपासना स्फुंदत बोलते.
"तुला काय वाटतं...?" देव तिला विचारतो.
उपासना त्या सावलीला बिलगते आणि बोलते, "तू कुठे निघून गेला होतास देव...!! मी आज एवढी चिंतीत आहे कि आपल्या देवच्या पावलांचा आवाज देखील ओळखू शकले नाही... मला क्षमा कर देव..."
"गप्प बस हि वेळ बोलण्याची नाही आहे, भाऊ साहेबांची माणसं इथेच येत आहेत."
"तुला हे सर्व कसं माहिती... ते तर आत्ताच इथून गेले आहेत..."
"सांगतो सर्व काही सांगतो आता तू थोडा वेळ शांत एकदम गप्प बस..."
क्रमशः...

No comments:

Post a Comment