देव उपासना
भाग २१
जंगलामध्ये
आदित्य समजून चुकला होता कि ह्या गोऱ्या लोकांचे लक्षण काही ठीक नाही आहे... पण त्याला समजत नव्हते कि काय केले पाहिजे... लांबून एका झाडामागे लपून संगीता आणि संतोष पण पाहत होते...
"संतोष ह्या इंग्रजांनी सई आणि आदित्यला बंधक बनवलं आहे काय...?" संगीताने विचारले...
"वाटतं तर तसंच आहे, मला काहीतरी केलं पाहिजे..." संतोष बोलला...
"पण त्यांच्या जवळ बंदूक आहे..." संगीता चिंतीत होत बोलली...
"चिंता नको करूस, माझ्यावर विश्वास ठेव, तू असं ह्या झाडा मागेच लपून बस, " संतोष हळूच बोलला...
"पण तू काय करणार आहेस मला सांग तरी..." संगीताने विचारले...
"समजवण्यासाठी वेळ नाही आहे, जसं बोललो आहे तसं कर नाही तर त्या दोघांचा जीव धोक्यात पडेल..." संतोष बोलला...
संतोष हळूच चुपचाप पुढे गेला आणि एक मोठा दगड उचलला आणि अल्बर्टच्या डोक्याला निशाणा बनवून फेकला... दगड एकदम बरोबर निशाण्यावर लागला अल्बर्टच्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं आणि तो धडपडत खाली कोसळला...
त्याच्या पडण्याचा आवाज सगळ्यांनीच ऐकला आणि त्याचे सर्व सोबती घाबरले, कि अचानक काय झालं...
"व्हाट ह्यपन अल्बर्ट...?" जॉनने विचारले... पण अल्बर्टने आपली शुद्ध केंव्हाचीच हरवलेली होती... त्याचे सर्व सोबती त्याला चारही बाजूने वेढा लावून पाहू लागले... त्याच संधीचा फायदा घेत आदित्य आणि सई दाट जंगलात पळाले आणि त्यांच्या डोळ्यापासून लांब गेले...
आदित्य आणि सई त्याच दिशेला पळाले होते जिकडे संगीता आणि संतोष लपलेले होते... संगीता आणि संतोषला पाहून सई आणि आदित्य खुश झाले...
"मी तुला पाहिलं होतं जेव्हा तू दगड घेवून त्या इंग्रजावर निशाणा लावत होतास... धन्यवाद मित्रा नाहीतर कोणास ठावूक आज आमचं काय झालं असतं..." आदित्य बोलला...
"हि वेळ गोष्ट करण्याची नाही आहे... त्यांना आत्ता पर्यंत शंका आली असेल, चला चुपचाप पुढे जावूयात..." संतोष बोलला...
संतोषच्या दगडाचा वार एवढा भयंकर होता कि अल्बर्ट जागच्या जागीच मेला होता...
"oh god, he is dead, we must leave this forest immediately, this is not fun any more..." catherine said...
"you are right cath.... i am with you... those two indians are also missing..." Aliana said...
"oh... my god...! what is that...?" catherine souted...
"what...?" सर्वजण एकत्र बोलले...
कॅथरीन च्या चेहऱ्यावर भीतीयुक्त मिश्रित भाव होते, थिजल्या सारखी तिने थरथरत्या हातांनी इशारा केला...
सर्वांनी मागे वळून पाहिले... सर्वांच्या पायाखालून वाळूच सरकली... थिजल्या सारखे ते एका जागीच उभे राहिले...
"लेट्स गेट द हेल आउट ऑफ हिअर..." जॉन बोलला... पण पुढल्याच क्षणी त्या सर्वांची एक आगतिक, असहाय्य किंकाळी पूर्ण आसमंतात भिणली...
झाडाच्या मागे लपून संतोष, संगीता, आदित्य आणि सई हे सर्व दृश्य पाहत होते...
"हे काय आहे संतोष...?" संगीताने विचारले...
"जो कोणी आहे खूप भयानक आणि भयंकर आहे... ह्या आधी त्याची नजर आपल्यावर पडेल आपल्यांना इथून निघून जायला पाहिजे..." संतोष बोलला...
"मला एक गुहा माहिती आहे.. चला लवकर तिथे जावूयात... ती आपल्यांसाठी सुरक्षित राहील..." आदित्य बोलला...
"किती लांब आहे ती गुहा...!!" संतोषने विचारले...
"बस थोड्याच अंतरावर आहे... लवकर निघा इथून जर त्याची नजर आपल्यांवर पडली तर तो आपल्यांना पण चीरफाडून खाऊन टाकेल..." आदित्य बोलला...
ते चौघेही तिथून गपचूप निघाले आणि थोड्या वेळातच त्या गुहेजवळ पोहोचले...
"चला लवकर आतमध्ये..." आदित्य बोलला...
जेव्हा सगळे जण आतमध्ये गेलेत तेव्हा आदित्य ने तो दगड पुन्हा गुहेच्या तोंडाजवळ लावला...
जेव्हा सगळे जण आतमध्ये गेलेत तेव्हा आदित्य ने तो दगड पुन्हा गुहेच्या तोंडाजवळ लावला...
"ते काय होतं आदित्य... त्याने त्या इंग्रजांना चीरफाडून खावून टाकलं..." सई बोलली...
"चांगलं झालं हे इंग्रज लोकं त्याच लायकीचे आहेत..." आदित्य बोलला...
"हो पण... परमेश्वर असा मृत्यू कोणालाच न देवो..." संतोष बोलला...
"असला प्राणी मी पहिले कधीच नाही पाहिला... माहिती नाही काय होतं ते..." आदित्य बोलला...
"रात्री शेतात कुठे हाच तर प्राणी नव्हता ना...?" सईने प्रश्न केला...
"असू शकतो.. कारण ती सावली पण एवढीच भयंकर होती... जर हा तोच असेल तर आपल्यांना लगेच गावी जावून गावातील लोकांना इशारा केला पाहिजे..." आदित्य बोलला...
"पण आम्ही गावी पुन्हा नाही जावू शकत... तो पाटील आम्हाला जिवंत नाही सोडणार..." संतोष बोलला...
"आणि जर आपण ह्या जंगलात जरी राहिलो तरी पण वाचू नाही शकत... बघितलं नाही का कसं एका मिनिटांत त्याने सर्व इंग्रज लोकांना चीर फाडलं ते..." आदित्य बोलला...
"मी संगीताला घेवून दुसऱ्या गावात जात आहे..." संतोष बोलला.
"पागल नको बनू संतोष... तुला काय वाटतंय कि तू दुसऱ्या गावात जावून पाटील पासून सुरक्षित राहशील.. अरे आपल्या गावात तुमच्या दोघांची साथ देण्यासाठी खूप सारे लोकं येतील... आणि तिथे तुम्हाला कोण विचारणार..." आदित्य बोलला...
"पण आपण रस्ता पण भटकलो आहोत ना... आपण पुन्हा गावी पोहोचणार कसे...!!" संगीता जी आत्ता पर्यंत गप्प होती ती अचानक बोलली...
"काय... तुला गावात पुन्हा जायचे आहे...?" संतोषने विचारले...
"संतोष दुसरा कोणता इलाज पण नाही आहे..." संगीता बोलली...
"बस एवढीच साथ द्यायची होती तुला..." संतोष हताश होत बोलला...
"संतोष बघ संगीता एकदम बरोबर बोलतेय... आपण एकदम दाट जंगलात अडकलोय... आणि मला पूर्ण विश्वास आहे कि आपण आपल्या गावाच्या एकदम जवळ आहोत... आपण फक्त दिशा विसरलो आहोत..." सई बोलली...
******************************
वाड्यात....
वाड्यात....
"मला त्या खोली पर्यंत घेवून चल..." देव पल्लवीला बोलला...
पल्लवी त्याला त्या खोली पर्यंत घेवून आली जिथे विश्राम बंद होता... देवने जोर जोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली... पण कोणीच दरवाजा उघडला नाही... भाऊ साहेब आणि पुरुषोत्तम पण तिथे आले...
"पाटील आपल्या माणसांना सांग कि हा दरवाजा तोडून द्यायला..." देव बोलला...
"का तोडायचा... तू कोण आहेस हे बोलणारा.." पुरुषोत्तम बोलला...
"जर विश्रामला जिवंत पहायचा असेल तर जसं मी सांगतो तसंच करा..." देव चिडत बोलला...
"घनश्याम तोडून टाक दरवाजा..." भाऊ साहेब बोलले... जसाच दरवाजा तुटतो देव लगेच खोलीत घुसला...
"मी तुला इथून निघून जाण्यासाठी सांगितलं होतं ना..." खोलीत एक अमानवी आवाज घुमला...
"हो पण मी तुझी गोष्ट का ऐकू... दत्तू..." देव बोलला...
"तू विसरला नाहीस मला अजून ऑ..." पुन्हा तोच आवाज...
"कसा विसरणार... पण मला एक सांग तू हे सर्व का करत आहेस...!!"
"मी काहीच नाही करत आहे... जे काही केलं आहे ते ह्या हरामखोर विश्रामने केलं आहे..."
"म्हणजे काय दत्तू...! मला एक साफ आणि सरळ शब्दात सांगशील... आणि विश्राम कुठे आहे...??"
"ह्या पलंगाखाली लपून बसला आहे तो... पण जास्त वेळ वाचू नाही शकत त्याचे हाल हाल करून मारणार मी ह्याला..."
"तू असं का करत आहेस..." देवने विचारले...
"शेतामधल्या त्या किंकाळ्या ऐकल्यात तू ..."
"हो ऐकल्या आहेत... कोणाच्या आहेत त्या किंकाळ्या...?"
"माझ्या प्रेमळ सखी अक्षताच्या आहेत..."
"कोण अक्षता...??"
"तू तिला नाही ओळखत..."
क्रमशः...
No comments:
Post a Comment