iddharth Bangar गणूदा गावातील एकदम साध व्यक्तिमत्व.... लग्नानंतर खूप वर्षानी त्यांचा घरी एका लहान मुलाने जन्म घेतला.... खूप आवडीने त्याच नाव त्याचा आजीने मुकेश ठेवलं....हळूहळू तो मोठा होवू लागला..... पण तो कधीच रडत नव्हता... त्याचा तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता.... गणूदा वर जणू आभाळ कोसळल.... आधीच घरात अठराविश्व दरिद्र..... त्यात देवाने त्यांची क्रूर चेष्टा करत हे मुक पोर त्यांचा पदरात टाकलं होत..... पण गणूदा ने दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला..... मुकेश आता 10 वर्षाचा झाला होता.... घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे....... सर्व गावाचा तो लाडका बनला होता.... पण एके दिवशी विपरीत घडलं..... मुका कुठेच सापडत नव्हता... गणूदा त्याला सगळीकडे शोधू लागला..... घरात गणूदा ची बायको-आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता... त्यांचा घरात खूप लोक जमा झाले होते..... तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला...,”मी मुकाला जंगलात जाताना पाहिलाय....”. . . . त्याचा या एका वाक्याने उपस्थित लोकांचा छातीत धडकी भरली... सर्वत्र शांतता पसरली.... इतक्यात मुका चा आई आणि आजीने एकदम काळीज चिरून टाकणार हंबरडा फोडला........ आणि छातीवर जोरजोरात मारून घेऊन बोलू लागल्या...... ”ती हडळ माझा मुकाला नाही सोडणार..... देवा वाचव रे देवा......” हडळ........... हो हडळ....... गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता.... आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ........ तशी खूप साधी बाई होती ती आधी..... पण नवरा खूप छळ करायचा तिचा..... माणसाचा रूपातील सैतानच होता तो.... खूप दारू प्यायचा.... आणि खूप मारहान करायचा हिला..... मग नाही सहन झाल त्या बिचारीला..... आणि मग .... राहत्या वाड्यातच एक दिवस तिने गळफास लावून आत्महत्या केली...... पण .... मरणांनंतर ही तिची सुटका नाही झाली.... कारण ती हडळ बनली होती...... एक दुष्ट हडळ....... तिने पुढचा काही दिवसातच तिचा नवर्याचा हाल हाल करून जीव घेतला होता..... त्याची अवस्था पाहूनच गावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करण सोडून दिल होत...... यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला... आणि त्या वाड्यावर येणार्या प्रतेक माणसाचा तिने जीव घेतला.... ते पण ... खूप छळ करून...... अशा भयानक हडळीचा तावडीत मुका सापडला होता..... गणूदा उठला.... आणि गावकर्यांना बोलला आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणू..... पण ... कोणाचाच अंगात एवढं धाडस नव्हतं की गणूदा सोबत जावून मुकाला सोडवून आणव...... कोण स्वताहुन मरणाचा दारात जाईल.... हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला..... गणूदा रडून रडून सर्वांना हात जोडत होता... माझा सोबत चला म्हणून.... पण कोणीच त्यांचा सोबत यायला तयार झाल नाही.... शेवटी गणूदा ने डोळे पुसले..... आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागले..... त्याला जाताना पाहून त्यांची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या.... ”नका हो जाऊ..... आधीच मी पोटाचा गोळा गमवलाय.... आता कुंकू नाही गमवायच....” पण गणूदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुकाला परत आणायच होत.... आणि तो जंगलात शिरला..... सगळीकडे कुट्ट अंधार पसरला होता.... गणूदा तसा खूप घाबरला होता... पण त्याचातील बाप त्याला धीर देत होता.... आजूबाजूचाझुडपातून मधेच सळसळ आवाज व्हायचा..... जणूकाही एखादा साप तिथून निघून गेला असावा.... ते अंधारातून चाचपडत कसेबसे वाड्याचा बाहेर आले..... अगदी विजीर्ण झाला होता तो वाडा.... गणूदाला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली..... एकदम भकास वातावरण होत.... त्यांनी वाड्याच लोखंडी गेट ढकलल...... गंजलेल्या बिजागिर्याचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमला..... त्या आवाजाने आजूबाजूचे वटवाघूळचा थवा एकदम भयंकर चीत्कार करत गणूदाचा डोक्यावरुन गेला..... गणूदा मटकण खाली बसला.... हळूहळू आत जाऊ लागला.... आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला...... गणूदा वाड्यात आत आला..... हॉल मध्ये आला..... झुंबराच्या खाली..... आणि त्या झुंबर सोबत उलट लटकत होती. . . . . . . . ती हडळ..... . . . . . . त्या हडळीने अचानक गणूदा चा समोर उडी मारली..... . . . . . . . अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून गणूदा चार पावले मागे सरकला...... . . . . . .. . . . अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ.... . . . . .पांढरे डोळे,... . . . . .अंगावर पांढरी साडी.... . . . . . . निस्तेज त्वचा.... . . . . . . आणि मोकळे सोडलेले केस..... . . . . . . . आपले फावडे दात विचकत ती हसू लागली..... . . . . . . तीच ते विकट हास्य खूपच भयंकर होत...... . . . . . . . आणि तशीच हसत ती तिचा घोगर्या आवाजात बोलली...., . . . . . ”काय हवय तुला...?? " . . . . . गणूदा खूप घाबरला होता... तरीपण धाडस करून बोलला... , ”मला मुका हवाय..” . . . . . हडळ तीच बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली.... . . . . . . ”जीव घेईन मी तुझा..” . . . . . . . गणूदाने तिचा उलट्या पायावर लोटांगण घातल....... आणि बोलला.... . . . . . . . . ”तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे.... पण मला मुका दे...” . . . . . . अचानक . . . . . . . हडळ तिथून पळून जाऊ लागली... . . . . . . . गणूदा पण तिचा मागे पळू लागला... . . . . . . . . आणि रडत रडत विनवण्या करू लागला...... . . . ”हडळ...मुका दे...” . . . . . . . . हडळ वाड्याचा बाहेर पडली... . . . . . . . . . . मागोमाग गणूदा पण आला पण एका दगडाला ठेस लागून एका खडयात पडला.... तिथे अंधारात कोणीतरी होत ... . . . . . . गणूदा ने निरखून पहिलं तर तो मुका होता.... त्याचा काळजाचा तुकडा.... त्याने मुकाला कवटाळून धरलं... आणि घरी घेऊन आला... सर्वजन खूप खुश झाले... कारण गणूदा च्या धाडसामुळे मुका परत आला होता.... आणि तो वाडापण हडळमुक्त झाला होता....... गणूदा ची वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली..... पण एक प्रश्न गणूदा ला पडला होता...... हडळ पळून का गेली.....??? इकडे त्या जंगलापासून खूप दूर.... .. एका मोठ्या पिंपाळचा झाडाचा एकदम वरचा फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतशीच बोलत होती..... ”जळल मेल लक्षण..... काय निर्लज्ज माणूस होता.... सरळ सरळ मला मुका मागत होता.... मी माझा नवरा सोडून कधीच कोणाला मुका दिला नाही... आणि हा मागत होता... आले ग बया पळून एकदाची....
No comments:
Post a Comment