Thursday, May 28, 2015

पापी... एक गूढ सत्य भाग १०

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय चौथा - पुस्तक

भाग १०

"डॉ. साळुंखे आणि मी कॉलेज पासून मित्र होतो, त्यांनीच मला ह्या अंकशास्त्रत येण्यासाठी प्रेरित केलं. ते माझ्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार होते. ते फक्त अंकशास्त्र ह्या विषयातच हुशार नव्हते, इतिहास पण त्यांचा खूप आवडता विषय होता... जेव्हा आम्ही आमची डॉक्टरेट पूर्ण केली होती, तेव्हा आम्ही विचार केला होता कि काळ्या जादूचा इतिहास आणि त्यामध्ये वापरण्यात येणारं अंकशास्त्र विषयी संशोधन करणार, पण जेव्हा आम्ही त्याची सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळायला लागलं कि आम्ही जे काही करत आहोत ते खूप कमी आहे.... काळी जादू आणि त्यातील अंकशास्त्रत खूप शिकण्यासारखं आहे... आम्ही खूप जोमात आमचं संशोधन सुरु ठेवलं... डॉ. साळुंखे तर ह्यामध्ये पूर्णपणे गुंतले होते, जिथून माहिती मिळेल सर्वीकडून माहिती गोळा करत होते, पुस्तकं, पेपर्स, लेख आणि काही ठिकाणी स्वतः जावून भेट देणं हे तर त्यांचं दैनंदिन कार्यक्रम झालं होतं. ह्यातून त्यांनी खूप साऱ्या चिन्हांची जे काळ्या जादू मध्ये सुरुवातीला त्यांचा उपयोग होतो त्यांची माहिती आणि अर्थ शोधून काढला होता, ती माहिती घेवून आम्ही जगातल्या प्रतिष्टीत अंकशास्त्रज्ञांकडे पण गेलो आणि ती लोकं सुद्धा डॉ. साळुंखेचे तर्क मानायला लागले..." डॉ. अवधूत बोलता बोलता थांबले जसं कि पुढे काय बोलायचं आहे हे विचार करत आहेत...

"ह्या पूर्ण विषयात आम्ही दोघांनी एकत्रित होवून संशोधन केलं, आम्ही एकत्र मिळून अविश्वसनीय गोष्टी शोधल्या पण तरीही डॉ. साळुंखेला ह्या मध्ये अजून काहीतरी अपुरं राहिलं आहे आणि आम्ही ते शोधू शकलो नाही आहोत असं वाटायचं... आणि हे संशोधन करता करता शेवटी तो दिवस उजाडलाच ज्या दिवशी डॉ. साळुंखेने एका चिन्हाला डिकोड करून आणि त्याचं अर्थ जाणून त्या ठिकाणाचा पत्ता काढला, ती एका शहरातील इमारत होती, ती इमारत काळी जादू करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची होती... आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, ती इमारत प्राचीन काळातील काळी जादू करणाऱ्या लोकांचं घर होतं... आणि त्याच दिवशी आम्हाला माहित पडलं कि जसं काळ्या जादूत चिन्ह महत्वाचे असतात तसंच नंबर्स पण काळ्या जादूत खूप महत्व ठेवतात..."

"त्या इमारतीच्या तळघरात आम्हाला त्या भिंतीवर प्राचीन काळातील एक ओळ लिहलेली दिसली..."

"आणि ते काय लिहिलं होतं...?" संत्याने प्रश्न केला....

'कोणीही १ साठी नाही...'
'१ सर्वांसाठी आहे..."
'१११'

"पहिले पहिले तर आम्ही हि एक सामान्य ओळ वाटून, आम्ही तिला दुर्लक्ष केलं, आम्ही तर हा तर्क लावला कि हे फक्त अंकशास्त्रत वापरतात... नंतर डॉ. साळुंखेच्या डोक्यात पाल चुकचुकली कि जरूर काही ना काही तरी ह्यामध्ये एक संदेश लपलेला आहे, आणि तो काहीतरी दिशा दाखवत होता, त्यामुळे आम्ही त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि हे जेवढं सोप्प वाटत होतं तेवढं ते नव्हतं... मग आम्ही अंकशास्त्र चा पूर्ण इतिहास चाळायला लागलो आणि त्यात खूप खोलवर गेलो... खासकरून १११ हा नंबर कुठे सापडतो का ते पाहत होतो... " डॉ. अवधूत दोन मिनिटांसाठी पुन्हा थांबले....

"तुम्ही दोघांनी इंग्लंड क्रिकेट टीमच्या म्याचेस तर पहिलेच असतील...?" डॉ. अवधूतचा हा प्रश्न त्यांना खूप वेगळाच वाटला...

"हो पण त्याचा इथे काय संबंध आहे...?" दोघांनी विचारले...

"तेव्हा तुमच्या निदर्शनास आले असेल कि १११ ह्या नंबरला ती लोकं खूप अशुभ मानतात... ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १३ ह्या नंबरला खूप अशुभ मानतात... जेव्हा पण १०० रनला १३ बाकी असतील तेव्हा ती लोकं आपली बोटं क्रॉस करतात म्हणजेज फिंगर क्रॉस करतात.... हम्म हे तर झाले क्रीस्चन लोकं, पण बुद्ध लोकं पण १ ह्या नंबरला अपवित्र मानतात, लिस्ट तर खूप मोठी आहे त्यामुळे ते सर्व काही एवढं महत्वाचं नाहीये, तर १ हि संख्या सर्व जातीमधील काळी जादू करणाऱ्यासाठी खूप महत्वाची संख्या आहे, त्यामुळे आम्ही १ ह्या संखेबद्दल अजून काही मिळते का जाणण्यासाठी अजून खोलात जावून अभ्यास करू लागलो..."

"तुम्हा लोकांना तर आठवतच असेल कि मी एकदा इजिप्त मधील पिरामिड्स विषयी काय बोललो होतो..?"

"हो तेच कि ते पिरामिड्स ५ साईड आणि ३ कोनांनी बनलेलं आहे..." शिऱ्या बोलला...

"हो एकदम बरोबर बोललास, पण लक्ष देण्यासारखी एक गोष्ट म्हणजे सर्व लाईन्स शेवटी येवून एकालाच मिळतात, म्हणजेच ती १ बनते, अंकशास्त्र असो किंवा काळी जादू १ हि संख्या एक पावरफुल संख्या सिद्ध झाली आहे, आम्ही ह्या विषयी इतिहासकार आणि अंक्शास्त्रज्ञ लोकांशी पण विचारपूस केली, पण शेवटी आम्हाला माहिती पडलं कि १११ हि कोणत्या शिक्तीशी निगडीत नसून ती संख्या एक कॉम्बिनेशन आहे..."

"कोणत्या प्रकारचा कॉम्बिनेशन..?" आता संत्याने हा प्रश्न केला होता...

"हाच प्रश्न आमच्याहि मनात घोंगावत होता, कि काय आहे हा कॉम्बिनेशन पण जो पर्यंत आम्हाला ह्याचं उत्तर नाही सापडलं तो पर्यंत आम्ही त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा गेलो... पण आम्हाला त्या तळघरात त्या ओळींशिवाय दुसरं काहीच नाही सापडलं..."

"तर मग तुम्ही ह्याला डिकोड कसं काय केलंत..?"

"तुम्हाला आठवतंय पिरामिड्स आणि त्याचे ५ साईड, ३ कोन सरळ रेषेत येवून एकाच जागी मिळतात... सगळ्यात वरती..." डॉ. अवधूत हासत बोलले...

"म्हणजे त्याचं उत्तर तळघरात नसून सर्वात वरच्या माळ्यावर होतं.." संत्या खुश होत बोलला...

"एकदम बरोबर बोललास, त्याचं उत्तर सर्वात वरच्या माळ्यावर होतं, १११ हि संख्या सूचना देत होतं आणखीन एका कोडकडे आणि ते कोड आहे SSS..."


क्रमशः....  

No comments:

Post a Comment