Sanjay Kamble
माझा एक भयानक अनुभव .. या जगात भुत पिशाच्च, अमानवीय शक्ती, मरणा नंतरच जग या गुढ गोष्टी जाणुन घेण्याची आवड सर्वानाच असते... काहीना विचित्र अनुभव येतात पन त्याची टर उडवली जाते... असाच एक अनुभव मला आला... खुप जण मस्करी करतील, घाणेरड्या कमेन्ट्स टाकतील.. असो... व्यक्ति तीतक्या प्रकृति दोन महीण्या पुर्वीची गोष्ट... मी आणि माझा चुलत भाऊ जो आमच्या शेजारीच रहातो, फिल्म बघून येत होतो.. शेवटचा शो ९ ते १२... 'बेबी' फिल्म एक थ्रिलरपट म्हणून पहायला गेलेलो.. १२:२० ला रात्रि फिल्म संपली आणि गाडीवरुन घरी यायला १:०० वाजला... भाऊ गाडी चालवत होता. गाडी घराशेजारी लावली आणि भावाला म्हणालो "लघुशंका करून येऊ"... मी मागे बसलेलो त्यामुळे लगेच उतरून चालत आमच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका रीकाम्या प्लॉट मधे गेलो... त्या प्लॉट मधे एक छोटीशी पडकी लाकडाची खोप आहे .... काही वर्षापुर्वी एका गरीब कुटुम्बाला तीथली देखभाल करण्यासाठी तात्पुर्ती रहायला जागा दीलेली... नव-याच्या त्रासाने त्या बाईन तीथ आत्महत्या केलेली... त्या घटने नंतर ते कुटूम्ब कायमच निघुन गेले... आता फक्त त्यांची पडकी लाकडाची खोप तेवढीच आहे... मी अजुनही फिल्म मधेच अडकलो होतो... दुसरा कसलाच विचार माझ्या मनात आला नव्हता...तीथेच उभा राहीलो, माझ्यापासुन वीस एक फुटावर ती पडकी झोपडि असेल... अंधार खुप होता... भाऊ माझ्या पासुन काही अंतरावर डाव्या बाजुला समांतर रेषेत असल्यासारखा दिसला... मी त्याच्याकडे पहात नव्हतो. पण बाजुच्या गोष्टीची हलचाल आपल्या नजरेची आवक टीपू शकते तसा त्याच्या कडे न पहाताच भावाशी बोलू लागलो... " काय मस्त फिल्म होती... मस्त काम केलय ...... म्यूजिक पन छान आहे ....पुन्हा पहायला जाऊ ..." ..वेगैरे... वगैरे....मी बडबडत होतो आणि माझ्या प्रत्येक वाक्याला हूं ....हूं .... एवढ मोजकच उत्तर होता... मी आवरून बोलता बोलताच त्याच्या कडे पाहील तर बाजुला कोणीच नव्हत... थोड आश्चर्य वाटल .... मनात म्हणालो...' आता इथ होता कुठ गायब झाला लगेच...' मागे कुठ दिसतो का पाहिल पन कुठच दिसत नव्हता... तशी माझी नजर त्या झोपडीकडे गेली ... तीथ एक पांढरी आकृति उभी आसल्यासारख वाटला... आणि झटकन मनात त्या बाईचा विचार आला तस काळजात धस्स झाल .... लगचेच मी तीथुन काढता पाय घेतला... मला भास झाला की खरच तीथ कोणी उभ आहे हे पहाण्यासाठी मी पुन्हा त्या दिशेेला पाहिल तर ती पांढरट आकृति माझ्याकडेच पहात तीथच उभी होती... आणि तशीच त्या झोपडीत गेल्याच दिसल .. अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला.. तसा मी वेगाने चालत तीथुन घरी आलो... घरी येऊन झोपायचा प्रयत्न करू लागलो पन तो प्रसंग आठवू लागला...म्हणून बाहेर हॉल मधे टीवी पहात सोफ्यावर बसलो... रात्रि खुप वेळाने झोप लागली... पन एक भयानक स्वप्न पडले... ' स्वप्नात मी तीथच सोफ्यावर झोपलो होतो... मी डोळे उघडले तर हॉल मधील लाईट्स बंद होत्या पन टीवी मात्र तसाच सुरु होता... तो बंद करण्यासाठी नजर आजुबाजूला फिरवत रिमोट कुठे दिसतो का तसाच पाहू लागलो तशी माझी नजर दरवाजाकडे गेली, तर दरवाजा उघडाच होता... मी थोडा घाबरून म्हणालो... " बापरे...दरवाजा बंद करायच विसरलो की.." माझ्या रूमच्या उघड्या दरवाजातून बाहेरचा लख्ख काळोख दिसत होता... दरवाजा बंद करायला मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो पन चिखलात रूतावे तसे माझे हात पाय जड झालेले... अस का होतय समजत नव्हत.. तोच माझी नजर पुन्हा त्या दरवाजाकडे गेली तशी बाहेरच्या काळोखात काहीतरी हलचाल होत असल्यासारख वाटु लागल.. त्यामुळे मी आणखीनच घाबरलो.. दरवाजा बंद करायला मी आईला हाक मारायचा प्रयत्न केला पन माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते...मला कोणीतरी जखडून ठेवल्यासारख शरीर जड झाल होत... अचानक बाहेच्या काळोखातून हळू हळू एक पांढरी आकृती स्पष्ट होत दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर काही पावलावर उभी असल्याच दिसु लागल... तशी भीतीने माझ्या श्वासांची गती वाढली... त्या आकृतिला पाहुन काळजाचे ठोके वाढले होते... धड, धड, धड.. ह्रदय धडधडत होत... उठण्याचा प्रयत्न करू लागलो पन काहीच हलचाल करता येत नव्हती... भीतीने माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली.. तसेच डोळे मोठे करुन त्या आकृतिला न्याहाळू लागलो तीला काहीच रंग, रूप नव्हते...गडद्द काळोखात एक पांढरट मानवी आकृति तेवढी दिसत होती... मला आता अक्षरशा: घाम फुटला होता ... पन काही समजायच्या आत मघापासुन बाहेरच्या गडद अंधारा उभी ती आकृति चौकटीतून आत येत तशीच उभी राहीली... तीला पाहील तसा मी ओरडण्याचा प्रयत्न करु लागलो पन तोंडातून आवाज येत नव्हता तर फक्त हवाच जात होती... तोच डोळ्याचे पाते लवते न लवते एका सेकंदात ती आकृति वेगात माझ्या सोफ्याजवळ आली, तसा मी जोरात आई म्हणून ओरडलो.. आई, बाबा धावतच बाहेर हॉल मधे आले... बाबांनी मला झोपेतून जागे केले तसा मी थरथरतच म्हणालो... "तो...तो... बाहेरचा दरवाजा बंद करा.." बाबा दरवाजाकडे पाहात म्हणाले.. " दरवाजा बंदच आहे..." तोच आई म्हणाली... " अमावस्या बघायची नाही पौर्णीमा बघायची नाही... कुत्र्यासारख वार वार फिरायच... आणि रात्रि ओरडत उठायच.." दोघेही परत त्यांच्या रूममधे गेले... भितीने घसा कोरडा झाला होता, उठून थोड पाणी पिऊन मी बाजुच calendar पाहील तर पैर्णिमा होती... त्या रात्रि झोप लागलीच नाही.. दुस-या दिवशी भावाला विचारल.. " काल रात्रि तु कधी गेलास..." त्याच उत्तर ऐकुन मी हादरुन गेलो.. तो म्हणाला.. " फिल्म बघायला जाताना गडबडीत काहीच खाल्ल नव्हत त्यामुळे खुप भुक लागलेली म्हणुन गाडी लावली आणि लगेच घरात गेलो..." मला कहीच सुचत नव्हते... तो लगेच घरी गेला होता तर मग माझ्याशी कोण बोलत होते... कोणाला काहीच न सांगता मी त्या ठिकानी आणखी कोणाला काही अनुभव आला का ते पहू लागलो आणि एक एक घटना ऐकून थक्क झालो... काहीनी सांगितल की ' मध्यरात्रि नंतर त्या बाईचा आत्मा त्या जागेवरच भटकतो. कधी तर झोपडी जवळ उभी दिसते. ' त्या नंतर पुढे काही दिवसानी दोन, तीन वेळेला रात्रि १ ते १:३० च्या दरम्यान मला तेच स्वप्न पडले... " कोणीतरी माझ्या बेडशेजारी उभ आहे.. माझ्या रूमच्या कोप-यात उभे कोणीतरी मला पहातय..." त्या स्वप्नाने दरदरून घाम फूटायचा आणी मी दचकुन जागा व्हायचो... पन मागिल पंधरा दिवसापासुन सगळ व्यवस्थित आहे अस वाटतय... 'देव पाहिला नाही म्हणून आपन देवाच अस्तित्व नाकारत नाही,,,, तसच भुत पाहील नाही म्हणून त्याच अस्तित्व नाकारू शकत नाही...' या दोन्ही शक्ति आपल अस्तित्व दाखवून देतातच... आपल्या भोवती त्यांचा आभास ओळखण्याची आपल्यातही तेवढी शक्ती हवी.. धन्यवाद......!!!
No comments:
Post a Comment