नमस्कार मित्रानो
खालील घटना १० वर्षपूर्वी घडलेली आहे जेव्हा आमच कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यातील गावठाणे या गावी राहायचो. आमचा घर तास गावच्या लोकवस्ती पासून दूरच होत मुख्य गावात जायला १० मिनिटे लागत आमच्या घरापासून काही अंतरावर एक मोकळ माळरान होत आणि १४ वर्षापूर्वी तिथे एक स्त्री रहायची अस म्हणतात ती काळीजादू करायची आणि त्याच काळ्या विद्येने तिने आपल्या पतीचा जीव घेतला होता त्यामुळे गावकर्यांनी त्याच माळरानाच्या एका झाडावर तिला फाशी वर लटकवल आणि तिथेच पुरून टाकल कारण ती चेटकीण होती अशी गावाची लोक म्हणायची. पण मी मुंबईत जन्मलो होतो आणि अशा गोष्टींवर माझा विश्वास मुळीच नव्हता पण मी नास्तिक मुळीच नव्हतो देवावर माझा विश्वास होता. पण श्रद्धा आणि अंधश्रधा यातला फरक मला कळत होता
तर झाल अस एक दिवस माझे आई बाबा माझ्या मामाकडे कामा निम्मिताने गेले होते १० दिवस मला एकट्याला घर सांभाळायचे होते . त्या रात्री मी एकटाच घरी होतो गाव असल्यामुळे ९ वाजताच सगळीकडे शांतता आणि भयानक काळोख पसरतो. मी लवकर जेवण आटोपून टी. व्ही. बघत बसलो होतो. आणि काही वेळातच माझा डोळा लागला.
अचानक कसल्या तरी आवाजाने माझी झोप उडाली मी लगेच लाईट लावली रात्रीचे ३ वाजले होते इथे तिथे पाहिलं काही दिसलं पण अचानक नजर दरवाज्यावर गेली आणि भीतीने थरकाप उडाला. दरवाजात एक भली मोठ्ठी काळी मांजर माझ्याकडे टक लावून पाहत होती आणि मी बंद केलेला दरवाजा चक्क उघडा होता. मी घाबरलो पण स्वताला सावरून बाजूला पडलेली एक काठी हातात घेतली आणि पुढे गेलो मी जसा दरवाजा जवळ गेलो तशी ती मांजर अंधारात निघून गेली. मला वाटल चुकून मी कडी नीट लागली नसेल त्यामुळे वाऱ्याने दार उघडल गेल असेल आणि ती मांजर आत आली असेल म्हणून मी पुन्हा दरवाजा बंद केला आणि झोपी गेलो.
अचानक कसल्या तरी आवाजाने माझी झोप उडाली मी लगेच लाईट लावली रात्रीचे ३ वाजले होते इथे तिथे पाहिलं काही दिसलं पण अचानक नजर दरवाज्यावर गेली आणि भीतीने थरकाप उडाला. दरवाजात एक भली मोठ्ठी काळी मांजर माझ्याकडे टक लावून पाहत होती आणि मी बंद केलेला दरवाजा चक्क उघडा होता. मी घाबरलो पण स्वताला सावरून बाजूला पडलेली एक काठी हातात घेतली आणि पुढे गेलो मी जसा दरवाजा जवळ गेलो तशी ती मांजर अंधारात निघून गेली. मला वाटल चुकून मी कडी नीट लागली नसेल त्यामुळे वाऱ्याने दार उघडल गेल असेल आणि ती मांजर आत आली असेल म्हणून मी पुन्हा दरवाजा बंद केला आणि झोपी गेलो.
मला रोज सकाळी ५ ला उठून देव पूजा करायची सवय होती आणि सवयी प्रमाणे मी ५ ला उठलो तसा उजेड पडायचा बाकी होता. म्हणून मी लाईट लावायला गेलो पण लाईट गेली होती देव घरात संपूर्ण काळोख पडला होता. आणि अचानक मांजरीच्या रडण्याचा आवाज येवू लागला. तो आवाज फारच भयानक होता. जणू कोणीतरी माणूसच रडतंय अस वाटत होत. मी भीतीने पुन्हा झोपून गेलो आणि माझ्या देव पूजेत खल पडला.
आता हे रोज होऊ लागल मी देव पूजेला उठलो कि अचानक घराची लाईट जात असे आणि बाहेरून मांजरीच्या रडण्याचा आवाज येत असे. जस कोणीतरी मला पूजा करण्यापासून रोखत आहे असे वाटे . म्हणून त्यादिवशी मी ठरवलं कि दिवे लागणीच्या वेळी संध्याकाळी पूजा करावी. संध्याकाळचे ७ वाजले होते आणि सूर्य मावळला होता. मी पूजा करायची तयारी करत होतो पण पाहतो तर काय सकाळी तोडलेली ताजी फुले कोमेजून काळी पडली होती. घरातील तेलाचा डब्बा उपडी पडला होता आणि सगळ तेल बाहेर सांडल होत आणि अचानक दिवे सुधा गेले आणि पुन्हा तो मांजरीच्या रडण्याचा भयावह आवाज ऐकू आला .
मला काय करावे सुचेना आमच घर लोकवस्ती पासून थोड लांब होत आणि तिथ पर्यंत पोहचायला ते मोकळ माळरान पार करून जाव लागे. काळोख पडत चालला होता मी धीर केला आणि एक काठी हातात घेतली आणि बाहेर पडलो. चांदण्यांचा लक्ख प्रकाश पडला होता चंद्र पूर्ण होता याचाच अर्थ ती पौर्णिमेची रात्र होती. मनात भीतीने थैमान मांडल होत. मी हळू हळू वाट शोधत चाललो होतो माळरान जवळ येवू लागल. अचानक दूरवर माळरानावर दिव्यान्सारखा प्रकाश दिसला जणू कोणी दिवेच लावले आहेत. एक काळी कुट्ट स्त्री सदृश्य आकृती त्या दिव्यांच्या मध्ये बसलेली दिसत होती आणि काहीतरी अघोरी मंत्रजाप मला ऐकू येत होता. एवढ्यात अचानक पाठीमागून मांजरीच्या रडण्याच्या आवाज आला आणि भीतीने मी अर्धमेला झालो मागे वळून पाहिलं तर काहीच नव्हत आणि पुन्हा वळलो तर माळरानावर दिसणारे ते दिवे आणि ती आकृती सुधा गायब झाली होती.
आता सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती गार वारा सुटला होता मी जीव मुठीत घेऊन हळू हळू चालू लागलो जणू पायात ताकदच नव्हती उरली माझ्या पावलांचा आवाज मला स्पष्ट जाणवत होता. हातात काठी घट्ट धरून मी चालत होतो अचानक समोरच्या झाडावर पाहिलं चांदण्यांच्या लक्ख प्रकाशात ती स्पष्ट दिसली . झाडाच्या त्या फांदीला एका दोरखंडाला तीच ते भयानक शरीर लटकत होत सोडलेले केस पांढरे डोळे आणि विद्रूप चेहेरा माझ्याकडे बघून ती हसत होती आणि एक जोरदार किंकाळी तिने फोडली आणि तो दोरखंड तोडून ती माझ्या दिशेने आली आणि त्याचक्षणी मी जमिनीवर कोसळलो.
जेव्हा जाग आली तेव्हा त्या घटनेला ३ महिने उलटून गेले होते आणि मी हॉस्पिटल च्या बेड वर पडलो होतो . मी ३ महिने कोमात होतो मी शुद्धीत आल्यावर सगळे खुश झालें आई रडत होती आणि तिने मला कवटाळले मी सुधा रडू लागलो आणि म्हणालो आई मला घरी नाही जायचं. आई म्हणाली बाळ ते घर केव्हाच जळून खाक झालंय आणि आता आपण दुसरीकडे राहायला आलोय. मी विचारलं जाळून खाक झाल म्हणजे. तेव्हा आईने मला सगळी हकीकत सांगितली.
आई म्हणाली कि जेव्हा ते मामाच्या इथून परत आले तेव्हा घरचा दरवाजा उघडा होता आणि एक अतिशय घाणेरडा वास संपूर्ण घरात पसरला होता आईने मला खूप आवाज दिला पण माझा कुठेच पत्ता नव्हता. आणि सगळ्यात जास्त वास देवघरातून येत होता. आई घाबरली तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण तोः आतून बंद होता बाबा सुधा सगळ घर शोधून देवघरा जवळ आले आणि त्यांनी जोरात धक्का मारला तसा दरवाजाची कडी तुटली आणि तो उघडला गेला समोरच दृश्य पाहून आईचे तर पायच थरथरले. देवघरात एकही देवाची मूर्ती नव्हती एका रिंगणात दिवे लागले होते आणि एक मानवी सांगाडा सदृश्य हाडे ठेवली होती आणि त्या हाडांवर एक काळी मांजर जिचा गळा चिरून त्या सांगाड्यावर ठेवलेलं होत त्याचाच वास पसरला होता. मी त्या रिंगणाच्या बाहेर बसून कसलेसे अघोरी मंत्र पुटपुटत होतो. बाबा धावत गावात गेले आणि तिथून त्यांनी भगताला बोलावून आणले सोबत काही गावकरी मंडळी सुधा आली. लगेच भागात आत शिरला तो जसा आत शिरला तसा मी किंचाळलो आणि देव घरातून बाहेर आलो माझे डोळे लाल लाल होते आणि एका स्त्रीच्या घोगर्या आवाजात मी बोलू लागलो. तुम्ही माझी अर्धी पूजा पहिला पण तोडली आहात आणि आता तसा प्रयत्न कराल तर सगळे मराल.
भगताने गावकर्यांना मला घट्ट पकडायला सांगितले आणि भगत बाहेर गेलात्याने त्याच्या पोटली मधून आणलेली कसलीशी राख घराच्या भोवती टाकली जणू एक रिंगण तयार केल त्याने व आत येवून म्हणाला हि त्या माळरानावरची जखिण आहे आणि जर हिने आता हिची पूजा पूर्ण केली तर तुमच्या मुलाचा आणि या गावाचा सर्वनाश होईल कारण तुमच्या मुलाच्या अंगात हिने प्रवेश करून स्वताची पुरलेली हाड उकरून काढली आहेत आणि इथे येवून पुन्हा त्याची अघोरी पूजा सुरु केली आहे. मी रक्षा कवच घटल आहे आता ती या घरातून बाहेर नाही जाऊ शकत फक्त आता तुमच्या मुलाला यातून काढायचा आहे. आणि यात आईचा वाट महत्वाचा आहे. भागात म्हणाला मी माझी मंत्र विद्या वापरतो पण तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा प्रेमाने बोलवा त्याला हाक द्या आईने ने रडत रडत ते मान्य केल आणि मोठा मंत्र जाप भगताने सुरु केला तसा मी तडफडायला लागलो माझी आई मला हाक देऊ लागली कि बल परत ये आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो तू परत ये असा सतत २ तास चालू होत किंकाळ्या मंत्र आणि आईची मायेची हाक आणि अचानक एक शांतता पसरली माझ शरीर थंड पडल भगताने लगेच मला बाहेर न्यायला सांगितलं आणि सगळे बाहेर आले. मी बेशुद्ध होतो मला आई आणि काही गावकर्यांनी मिळून हॉस्पिटल ला नेल इथे भगतने बबन एक कठोर निर्णय घायला सांगितला तो म्हणजे आमचा संपूर्ण घर जालायचा होत कारण ती वाईट शक्ती आत होती आणि जाळल्या शिवाय करणे शक्य नव्हते बाबांनी माझ्यासाठी घराचा विचार केला नाही आणि राहत भरलेल घर त्यांनी आगीच्या स्वाधीन केल आणि अशा प्रकारे त्या चेत्कीनीचा अंत झाला पण हे जे काही ऐकल त्यावर विश्वास करण मी शिकलो होतो कारण त्या चेत्कीनीला मी माझ्या डोळ्याने पाहिलं होत.
म्हणून जपून रहा अवेळी अपरिचित ठिकाणी जाऊ नका देवाला मानता म्हणजेच भूतही असतात हि माझी मान्यता खरी ठरली पण अशी वेळ कोणावरही येवू नये हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
No comments:
Post a Comment