Wednesday, May 27, 2015

अचानक तिने माझ्याकडे वळून बघितले. तेव्हा तर माझी फुल्लटू

मी धीरज ढोबळे माझे गाव कोकणातलेच. मी, माझा चुलत भाऊ आणि एक माझा
मित्र असे ३ जण आम्ही आमच्या गावी जानेवारी मध्ये देवीच्या
जत्रेला गेलो होतो. जत्रा संपल्यानंतर आम्ही परतीच्या
प्रवासाला लागलो. दुपारची "मांडवी" ही ट्रेन पकडून आम्ही
मुंबईला यायला निघालो. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टेशनवर
पोहोचलो आणि ट्रेनमध्ये चढलो. नशिबाने आम्हाला बसायला
जागापण मिळाली. ट्रेनमध्ये अजुन एक मुलांचा ग्रुप होता.
त्यांनी गोव्यावरुन ट्रेन पकडली होती. त्यांचा ६ जणांचा ग्रुप
होता. ते मस्त मजा-मस्ती करत दरवाजाजवळ ऊभे होते.
मलासुद्धा बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी पण उठलो
आणि दरवाज्यात जाऊन उभा राहीलो.
थोड्या वेळाने मीही त्यांना सामील झालो. बोलता-बोलता मी
त्यांना विचारले की कोठे गेलेलात आणि आता कुठे चालला
आहात. त्यांच्यातील अजय नावाचा एक मुलगा होता. तो मला
म्हणाला की आम्ही गोव्याला Enjoy करायला गेलो होतो
माझ्या मावशीकडे आणि आम्ही सांताक्रुझला राहतो. चांगले ६
ते ७ दिवस राहणार होतो रे, पण एक लोच्या झाला म्हणून
आम्हा सर्वांना तिथुन निघावे लागले. मी विचारले की काय रे
असे काय घडले की ज्याने तुम्हाला लवकर निघावे लागले. मग
त्याने मला जे गोव्याला घडले ते सांगायला सुरुवात केली.
आम्ही मस्त मज्जा करायच्या हिशोबाने गोव्याला माझ्या
मावशीच्या घरी गेलो होतो. पहिल्या दिवशी आम्ही मस्त गोवा
बिचेस वगैरे फ़िरलो. पहिल्याच दिवशी आम्ही खुप मज्जा केली.
दुस-या दिवशी आम्ही आराम करायचे ठरविले आणि रात्री जंगी
पार्टी करायचा बेत आखला. रात्र झाली. ठरल्याप्रमाणे
आमच्यातले ३ जण बिअरच्या बाटल्या आणायला बिअरच्या
दुकानामध्ये गेले आणि उरलेले तिथेच थांबून चकणा वगैरेची
तयारी करु लागलो. सर्व होईपर्यंत रात्रीचे १० वाजले. तसेही
पुर्ण रात्र मज्जाच करायची होती आम्हाला. मग आम्ही माझ्या
मावशीच्या घरामागे खुप मोठी जागा आहे. आम्ही सर्व निघालो
पार्टी करायला. मावशीने अगोदरच आम्हांला बजावले की जास्त
लांब जाऊ नका. रात्रीची वेळ आहे. आम्ही सर्व हो बोलुन
निघालो. आम्हाला कधी एकदा तिथे पोहोचतो आणि पार्टी सुरु
करतो असे झाले होते. ५ मिनिटे चालल्यावर आम्ही एक जागा
निवडली आणि तिथे बसुन प्यायचे ठरविले. आम्ही बॅटरी आणि
कंदिल दिवे पण सोबत घेतले होते. सर्वांनी चिअर्स केले आणि
तोंडाला बाटल्या लावल्या. वातावरण पण मस्त रंगात आले होते.
तेवढ्यात आमच्यातला एकजण बोलला की अरे आज तर
अमावस्या आहे. मग मी म्ह्णालो की त्यात काय तु पी. एकदा
टाइट झाल्यावर कसली अमावस्या आणि कसली पौर्णिमा. असे
बोलून आम्ही आमचा कार्यक्रम चालूच ठेवला. आमच्यामध्ये
राज नावाचा एक मित्र आहे तो पित नाही. तो फक्त सिगरेट
ओढतो. एवढे बोलून अजय आणि मी राजकडे बघू लागलो. राज
शांत दरवाज्यात उभा होता. मग मी राजकडे वळलो आणि
राजला विचारले की तु गप्प का? अजय बोलला की, काल आम्ही
पार्टी करत होतो तेव्हा जे काही घडले त्यामुळे राज शांत आहे.
मग राजने ती घटना पुढे सांगण्यास सुरुवात केली.
ठरल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत चालू होते. पार्टी करेपर्यंत १
कधी वाजला काही कळलेच नाही. काही वेळेतच वातावरणात
अचानक बदल जाणवू लागला. पण हे सर्व टल्ली असल्यामुळे
त्यांना काही होशच नव्हता. मला सिगरेट प्यायची तलप आली.
तसेही ह्यांची पार्टी चालू झाल्यापासुन मी सिगरेट पितच होतो.
सिगरेटचे पाकिट घेतले तर त्यात शेवटचीच सिगरेट होती. मग मी
ती लाइट केली आणि झुरके मारु लागलो.
आम्ही जिथे बसलो होतो तिथून २० फुटांच्या अंतरावर एक
विहीर होती. तिथे मला काही हालचाल जाणवली. म्हणून मी
उठलो आणि १ ते २ पाऊले पुढे गेलो बघायला की काय आहे तिथे
ते. मी जे काही पाहिले ते पाहुन मला तर धक्काच बसला. एक
बाई त्या विहीरीजवळ उभी होती. सफेद साडी घातलेली आणि
केस मोकळे सोडलेले. मला कळून चुकले होते की ती बाई कोण
आहे ते..... अचानक तिने माझ्याकडे वळून बघितले. तेव्हा तर
माझी फुल्लटू फाटली. ती बाई हळूहळू माझ्या दिशेने चालू
लागली. मीपण हळूहळु मागे सरकू लागलो. ती बाई जवळ-जवळ
आमच्या १० फुट अंतरावर आता उभी होती. मला काय करावे
तेच सुचत नव्हते. म्हणून मी माझ्या हातातली सिगरेट वर घेतली
आणि एक दम मारला. माझ्या हातातली सिगरेट पाहून ती बाई
जागच्या जागी थांबली. मी विचार करु लागलो की त्या बाईचे
भूत अचानक का थांबले? आणि नंतर लक्षात आले की भूत-
आत्मा आगीला घाबरतात. ते आगीच्या कधीच जवळ येत नाहीत.
नंतर मी ती सिगरेट त्या बाईच्या दिशेने दाखवतच उभा राहीलो.
एक झुरकाही मारला नाही, कारण जर एक्तरी झुरका मारला
असता तर सिगरेट संपली असती लवकर. आणि ह्या बाकीच्यांचे
आवरेपर्यंत ती सिगरेट पेटत राहणे गरजेचे होते. तेवढ्यात
अजयने पाठून आवाज दिला, ’ए राज एक दम दे रे.’ मी त्याला
बोललो की आता नाही, घरी चल मग देतो हवे तेवढे. आणि त्या
सर्वांना आवरायला सांगितले. ते ऐकायलाच तयार नव्हते. म्हणू
लागले की, आता तर पार्टी चालू झाली आहे. मग मी म्हणालो
की, खुप उशिर झाला आहे. आपल्याला आता निघायला हवे. तसे
आम्ही सर्व आटोपून निघालो.
मी बघितले तर ती बाई तिथेच उभी होती आणि मंद हास्य करत
होती. नशिबाने आम्ही सर्व घरी सुखरुप परतलो. सर्वजण मला
विचारु लागले की का तु आम्हाला एवढ्या लवकर तिथुन घेऊन
आलास हा. मी त्यांना बोललो की आता झोपा. सकाळी
उठल्यावर मी सर्व सांगेन तुम्हाला. सकाळी उठल्यावर मी तो
प्रकार मावशी आणि बाकी सर्व मित्रांन सांगितला. तेव्हा
मावशीने सांगितले की एका बाईने १० वर्षांपुर्वी आपल्या नव-
याच्या जाचाला कंटाळून त्या विहीरीत उडी मारुन जीव दिला
होता आणि ती बाई खुप जणांना दिसली पण होती. हे सर्व ऐकुन
सर्वांची घाबरगुंडीच उडाली आणि सर्वांनी आपापल्या बॅगा
भरायला घेतल्या आणि ७ दिवसांची पिकनिक ३ दिवसातच
आटपून आम्ही तेथून निघालो. राज मला बोलला की ह्यांना जर
मी रात्रीच सांगितले असते तर ह्यांची सर्व नशाच उतरली
असती म्हणून मी ह्यांना काही सांगितले नाही.
ह्या गोष्टीला आता १ वर्ष उलटले आहे आणि खरच गोव्यात
आजही अशा खुप जागा आहेत जिथे असले भयानक अनुभव
येतात.

No comments:

Post a Comment