Sunday, May 31, 2015

फोनच्या कर्ण कर्कश रिंग मुळे मी दचकलो पण लगेच उठलो

They Can’t see us.. either!!!
Viraj Kanekar
आपल्या कल्पना किती वेगळ्या असतात.. स्वार्थी... स्वतः भोवतीच फिरणाऱ्या...
स्वतःच अस्तित्व मोठ मानणार्या .... किवा स्वतःच अस्तित्व मांडणाऱ्या... आपण आपल्या भोवतीच्या अनेक गोष्टींकडे लक्ष कुठे दिसतो..
दिसणाऱ्या , जाणवणार्या घटना, वस्तू , माणसं... आपण लक्ष देतो का? मग ज्या गोष्टी दिसत नाहीत.. त्यांना तुम्ही काय किंमत देणार... तुमच्या खूप चुकीच्या कल्पना असतात...
तुम्ही लोक स्वतःला खूप शहाणे समजतात.. तुमचा स्वतःवर जाम विश्वास असतो... पण सत्य समोर आल्यवर तुम्ही हडबडून जाता.....
दुसऱ्यांच अस्तित्व न मांडणाऱ्या व्यक्तीला स्वतःच अस्तित्व न जाणवल्यास मला नवल नाही वाटत... निदान आता तरी.. त्या घटनेचा अनुभव घेतल्यावर...
फोनच्या कर्ण कर्कश रिंग मुळे मी दचकलो पण लगेच उठलो..... मनातल्या मनात शिव्या घातल्या असत्या कुणीतरी ...साला...हे बरंय... आपण त्या फोन वर अलार्म लावायचा... आपण लवकर उठावे म्हणून... आणि झाला कि त्यालाच शिव्या घालायच्या... ( नाही झाला वेळेवर तरीही तेच करायचं) .... खूप विचित्र जीवन जगतो आपण.. विचित्र .. अनुत्तरीत... अनेक गोष्टी आपण का करतो.. याला काहीच लॉजिक नसते... मला नाही जमत असा जगायला.. मी खूप लोजिकली जगणारा माणूस आहे... म्हणून तर घेतला न.. Engineering ... पण बोललो न.. जग साला नॉन लॉजिकल आहे...
आज उठल्यावर जरा वेगळा वाटला... म्हणजे मीच तसा रात्री असतो लायब्ररीत ... रात्रभर अभ्यास करतो.. ३-४ ला डुलकी मारून तासाभरात पुन्हा अभ्यास... कॉलेज खूप मोठं आहे... लायब्ररी पण २४ तास... अभ्यासासाठी.. रात्री तसा मी एकता नसतोच..माझ्याबरोबर १-२ जन असतात अभ्यास करायला.... आणि एक नाईट शिफ्ट ला वाचमन कम पिउन कम लाइब्रारिअन... ... आज जरा शांतच होता... आज कुणीच नाही... कदाचित गेले असतील बाहेर फुकायला...ही काय टेबलावर पुस्तक पडलीत.. जाउदे.. येतील...मी उठलो.. टेबल बाजूला करून बाहेर डोकावलं.. पण पिउन पण जाग्यावर नव्हता... नाहीतर झोपलेला असतोच तो.. पण तोही नाही... जाउदे गेला असेल...
तसा मी घाबरत नाही... लहान आहे का मी... पुन्हा जागेवर येउन बसलो... पुस्तक उघडला...चाळल... पण लक्ष लागत नव्हत... उगाच एकटेपणाची एक अनामिक भीती...
छे छे.. भीती कशाला वाटून घ्यायची... लॉजिकल राहायचा...
आता येईल कुणीतरी... मग हा एकटेपणा जाईल...
पण काय मूर्ख आहेत... सर्व एकदम निघून जातात... असा कुणाला एकट सोडून जातात का... एवढ्या मोठ्या लाइब्ररित...
हुश्ह्ह... दरवाजा करकरला... आणि बंद झाला... मग खुर्ची खडखडली ... आले शिंपी काका.. मी आपला उगाचच ... जाउदे...
मी उगाच हाक मारली... " काय काका पुडी मारायला गेला होता काय... "...
उत्तरच नाही... झोपले कि काय ... कि ऐकलाच नाही...
मी उठलो... लायब्ररीच्या डेस्क वर जाण्यासाठी ... अरे डेस्क वर कुणीच नाही... .. डेस्कच्या पलीकडच्या मोठ्या कपाटामागे जाऊन बघितला... कदाचित पुस्तक काढायला गेले असतील... छे ... कुणीच नाही हो...
पण आवाज ऐकला होता मी... भासच तो.. घाबरायला काय झाले... होतात भास... नाहीतर हवेने वाजला असेल...
मी स्वताची समजूत घालत होतो... पण तेवढ्यात...
असला टरकलो मी...
हा भास नक्कीच नव्हता... कुणीतरी मी बसलो होतो त्या बाजूची खुर्ची हलवली... म्हणजे मी आवाज ऐकला... पाहिला नाही...
पण कस शक्य आहे.. .. आत तर कुणीच नव्हत.. मी पुन्हा आत गेलो... कुणीच नाही... पण उगाच असे वाटले.. त्या टेबलावरचे पुस्तक कुणीतरी उघडले का... चल रे... काहीतरी...
कोण उघडणार.... कोण आहे इथे... भूत?? .. छे छे... असा काही असता का? illogical... भूत वगैरे काही असता का... आणि माझ्यासारख्या माणसाने विश्वास ठेवावा?
पण तास माझ काहीच चुकला नाही... सामान्य माणसाला एकटे पणात भीती वाटते ती भूताचीच... असा मी नाही .. एक psychology च्या पेपर मध्ये होता... म्हणजे हे पण लॉजिकल आहे...
आणि म्हणे भूत... हट ... मी झटकून टाकली भीती... पण झुरळ झटकून टाकता येत... जिवंत असत... भीती पण सजीव असते... पण कशाची वाटते... ते सजीव असते का..
मी विचार केला... जरा फ्रेश होऊन येऊ.. झोपेत असेल मी.. भास होत आहेत...
मी बाहेर निघालो... पण उगाच त्या पलीकडच्या खुर्चीकडे चोरट्या नजरेने पाहिले.. .. कुणी नव्हते.. पण असा वाटला कुणीतरी बसलंय...
कुणी दिसला नाही तेव्हा बर्र वाटला... .. भीती वाटली की माणसाला भास होतात... विचित्र भास.. आता हेच घ्या.. मला आता भास होत आहेत.. कि माझ्या आजू बाजूला कुणीतरी आहेत... आणि मला पाहत आहेत...
मी बाहेर आलो... जवळच रिफ्रेश रूम आहे.. आत गेल्यावर बेसिन वर तोंड धुवायला नळ चालू करणार.. तेवढ्यात दचकलो ... कुणीतरी toilet मध्ये आहे. हो.. कारण फ्लश केल्याचा आवाज ऐकला मी... असेल कुणीतरी... घाबरायचं काय... उलट बर्र वाटला पाहिजे.. आपण एकटे नाहीत... मी बाहेर आलो... पण तिथेच थांबलो... दडपण कमी होण्याऐवजी वाढले होते.. 'त्या ' फ्लश वाल्याची वात बघत थांबलो... रिफ्रेश रूम चा मेन दरवाजा उघडा ठेवला.. १० मीन झाली कुणीच येईना.. मी जरा घाबरत आत गेलो पुन्हा...
आता खरच थंड झालो... toilet चा दरवाजा उघडाच होता... कस शक्य आहे.. मी तर पाहिला नाही कुणाला बाहेर जाताना.. ..
हा भास नक्की नाही... कुणीतरी आहे... कि कुणीच नाही...
कुणीतरी खेचताय माझी... नक्कीच... MTV बकरा असेल... जुनं करून कोण पाहत नाही .. म्हणून असा ' लाइव ' शो ठेवला असेल..
लायब्ररीचा दरवाजा खाडकन आदळला.. मी तसाच बाहेर पळत तिथे गेलो... पुन्हा कुणी नाही... दरवाजा हलत होता.. नुकताच कुणीतरी आत गेल्यासारखा... मी आत घुसलो.. पण पुन्हा तेच.. आत कुणीही नाही.. आता बस झाल...
मी तडकलो... साल्ला .... आता नाही सोडायचं...
मी तसाच तिरमिरीत बाहेर आलो... .. जोरात शिव्या घातल्या... ' साला भुक्कड भ** , भे*** , चू ** साले' बाहेर या.. काय साले लपून मजा घेताय... या समोर... एकेकाची *** '
पण कुणीच नाही...
आता मी खूप घाबरलोय... खरच... जीव जाईल... मला सारखे भास होत आहेत...
हे काय.. बाजूने कुणीतरी गेलाच.. हा काय...
ते बघ... तिथे कुणीतरी आता होता...
मी वेडा झालो होतो... इथून तिथे फिरत होतो.. धावत होतो...
माझ्यामागे सावल्या लागल्या होत्या.. मी त्या सावल्यांच्या मागे लागलो होतो.. भीती... दाटून राहिलेलेई भीती... एकदम बाहेर येत होती...
मी वेडा झालो होतो का... सारखे भास...
आता मी खरच गळून गेलो होतो... थकलो होतो... भीती कधी कधी एवढी वाढते... कि त्याचा पण थकवा येतो...
मी रडून पण बघितला... वाटत होता आता कुणीतरी येईल... आणि म्हणेल ... ' u r बकरा'
किवा .. हे एका स्वप्नासारखा असेल.. आता संपेल... आणि मग सर्व मस्त.. पण काहीच नाही...
जवळपास ६ वाजायला आले होते... आता वर्दळ वाढेल... कॉलेज उघडेल...
पण मी अडकलो होतो... त्या दुष्ट्स्वप्नात... जशी जशी सकाळी होत होती...
भास अजून वाढत होते... माझे सर्व कयास चुकत होते... खरच सकाळ होतेय का... कि मी अजून गडद अंधारात जात होतो...
सर्व जन बाजूने जात आहेत... पण मला दिसत नाहीत... धुरळा उडतोय.....
मला सुटका हवी होती...
ते बघा... हा भास नाही... हा मला दिसतोय ... हो.. अस्तित्व जाणवतंय... तो बघा... पळत जातोय .. गच्चीवर...
मी उठलो.. 'त्या' च्या मागे पळत सुटलो... ओरडत होतो... पण तो पळत होता.. तो पोहचला गच्चीवर...
मी मागून गेलो... .. गच्ची च्या लांबच्या कट्ट्यावर तो बसला होता... हातात एक पेपर... एकदम कट्ट्यावर ... पाय खाली सोडून... भीती नाही वाटत का याला...
याच कट्ट्यावरून.. उडी मारून जीव दिलेत किती मुलांनी... हा त्यातलाच असेल.. एक भूत.. यानेच हा सगळा डाव रचलाय...
काही कल्पना पण मन गार करणाऱ्या असतात... हा दिसतोय तो माणूस आहे का कि भूत आहे ..
पण निदान दिसतोय... नसेल भूत वाटतय ... मी त्याच्या जवळ गेलो.. मी जवळ गेल्याची चाहूल लागली त्याला...
" सवय घे करून आता... मला तर सांगणारे कुणीही नव्हते...मी एकटाच शिकलो.."
" काक्क्क काय बोलताय तुम्ही...ममं मी समजलो नाही..."
" अरे घण्टा बोलतोय... साला तू तर लकी आहेस.. तुझा काय मस्त फोटोसकट छापलंय , आपली बातमी ४ थ्या पानावर होती.."
माझा गोन्धालेला चेहरा पाहून त्याने समजवायला सुरवात केली... आणि पेपर माझ्या हातात सरकवला
तो बोलत होता ....मी थंड हाताने...त्याच्या हातातला पेपर घेतला...
" "अरे हाच तर लोचा आहे.. जिवंत माणसांला वाटत कि आपल्याला भूत दिसत नाही.. तसंच आपल्या भूतांच असतं... आपल्याला पण माणसे दिसत नाहीत... पण जस जिवंत माणसाला भुताचे भास होतात.. तसेच भुताला जिवंत माणसाचे भास होतात... पण दिसत नाहीत... जसे आपण त्यांच्या आजू बाजूला घुटमळत असतो .. तसे ते पण आपल्या आजूबाजूला घुटमळत असतात फक्त जाणीव क्वचित होते...एकदा आपल्या सभोवतालच्या जगाची सवय करून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं.. THEY CAN'T SEE US EITHER"
मी वाचत होतो .
त्यात बातमी होती.. माझ्या नावाची फोटोसकट..
" दि. २६ जून .. अभ्यासाच्या अति ताणामुळे अभियांत्रिकी २ र्या वर्षातील तरुणाची कॉलेजच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या !!!"
मी सुरवातीलाच म्हटलं..
आपण आपल्या भोवतीच्या अनेक गोष्टींकडे लक्ष कुठे दिसतो..
दिसणाऱ्या , जाणवणार्या घटना, वस्तू , माणसं... आपण लक्ष देतो का? मग ज्या गोष्टी दिसत नाहीत.. त्यांना तुम्ही काय किंमत देणार... तुमच्या खूप चुकीच्या कल्पना असतात...
तुम्ही लोक स्वतःला खूप शहाणे समजतात.. तुमचा स्वतःवर जाम विश्वास असतो... पण सत्य समोर आल्यवर तुम्ही हडबडून जाता.....
............
दि. २७ जून...पान क्रमांक ५ - अभियांत्रिकी कॉलेज मध्ये रात्री विचित्र भास... अंधश्रद्धा, भास कि... भूत ?
या ब्लॉग वर तुम्हाला रोज नवीन नवीन कथा पाहायला मिळतील … मग लगेच भेट द्या वाट कसली पाहताय…. तुमची कोणती भयकथा वाचायची राहून गेली असेल तर तुम्हाला ती ब्लॉग वर जरूर भेटेल….
भुताटकीच्या गोष्टी आवडतात ना ????
जास्तीत जास्त LIKE आणि SHARE करून हे Page सगळ्या पर्यंत पोहचवण्यास मदत करा …

No comments:

Post a Comment