Wednesday, May 27, 2015

Amol Hinge Patil
बंधुनो आणि त्यांच्या भगिनीनो, आपल्या पेजचे वाचक श्री. अमोल हिंगेपाटील आपल्याला एक ऐकीव अनुभव सांगणार आहेत..
पुढील कथानुभव त्यांच्याच शब्दात..
खरंतर ही एक मी ऐकलेली कथा आहे आणि तिच आज मी तुम्हाला सांगणार आहे..
प्रतिक आणि त्याच कुंटुंब गेले बरेच दिवसापासून कोलकात्त्यास स्थायिक आहेत...शहरातलं वाढत प्रदुषण आणि वर्दळीला कंटाळून नुकत्याच गेल्या वर्षीच शहरापासून थोड्या लांब अंतरावर त्यांनी बंगला बांधला आणि कायमचे तिथेच स्थिरावले...आजुबाजुलला मस्त दाट झाडी होती..एक छोटेखानी जंगलच म्हणा ना हवंतरं...सगळ काही आलबेल होतं फक्त आजुबाजुला शेजारी कुणी नव्हते ...तसं म्हणायला गेलं तर प्रतिकच्याच बंगल्यासमोर एक मस्त अलिशान बंगला होता पण त्या बंगल्यात सहसा कुणाचा वावर नसे..चौकशीअंती कळलं की, तिथे कुणी डाॅ. माथुर नावाचे गृहस्थ ऐकटेच राहत होते पण ते कधीही बाहेर पडत नसतं की, कधी कुणाशी बोलतही नसे..थोड नवलच होतं.. असो असते एकेकाची इच्छा...
असाच एकदा प्रतिक बाल्कनीत सहजच उभा असताना समोरच्या बंगल्यात एक साधारण अडीच तीन वर्षाचा मुलगा त्याला खेळताना दिसला आश्चर्य वाटून प्रतिकने त्या मुलाला हाक मारली पण प्रतिकची हाक ऐकून घाबरून त्या मुलाने बंगल्यात धुम ठोकली..प्रतिकही मग त्याच्या पाठोपाठ बंगल्यात शिरला..
अचानक प्रतिकला आपल्या घरात शिरताना बघून डाॅ. माथुर थोडेसे डाफरले...मग प्रतिकने त्या मुलाविषयी त्यांना सांगितलं...नेहमीचच आहे हे असं वाटून खिन्न मनाने डाॅ.माथुर "तुला पण दिसला शिणू" ( माथुर यांचा मुलगा) इतकचं म्हणू शकले..काहिच न कळल्यासारखे करून प्रतिक स्तब्ध उभाच राहीला..तेव्हा डाॅ. माथुर सांगू लागले...
दहा वर्षापुर्वी मी, माझी बायको मेरी आणि माझा मुलगा असे आम्ही तिघे मिळून राहत होतो...मी पेशाने डाॅ असल्यामुळे मला शहरात कधीही रात्री अपरात्री जावं लागतं..त्यामुळेच कधीही संपर्क करता यावा म्हणून मी नविन मोबाईलसुद्धा विकत घेतला होता..तेव्हा इथे जवळच काही थोड्या अंतरावर रिचार्ज करण्याच दुकान होतं..नेहमी नेहमी जात असल्यामुळे आणि ह्या विभागातला एकटाच मी डाॅक्टर असल्यामुळे त्या दुकानवाल्याची नि माझी बर्यापैकी ओळख होती..
त्यादिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस होता तोच आम्ही साजरा करत होतो की, इतक्यात त्या दुकानदाराचा मला काॅल आला एका अपघातात त्याची बायको आणि मुलगा जखमी झाले होते..आणि त्यासाठीच तो मला मदतीसाठी बोलवत होता..मला खुप कंटाळा आला होता त्यात ही अपघाताची केस म्हणून मी सरळ काही न बोलत फोन कट केला..दुसर्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली होती.मायलेकरांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता आणि हेच दुःख सहन न होऊन त्या दुकानदाराने फाशी लावून घेतली होती...
त्याच्याच काही 15 दिवसानंतर आम्ही रात्री झोपलेलो असताना आमच्या मुलाच्या ( शिनूच्या) पोटात खुप दुखायला लागले परंतु दुर्दैव असं की, हाॅस्पिटलला पोहचेपर्यंत त्याने प्राण सोडला होता त्याच्याच काही सेकंदानंतर माझ्या मोबाईलवर "Your account balance is 163" असा मॅसेज आला..याचा अर्थ तेव्हा मला कळला नव्हता..एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने माझी बायको (मेरी) पुरती खचली होती..हल्ली ती खुपच वेड्यासारखी वागू लागली होती.. मी तिला खुप समजवण्याचा प्रयत्न केला पण छे सारे व्यर्थच..असाच एकेदिवशी मी कामावरून घरी आलो तर मेरीने तर वेडेपणाचा कहरच केला होता..तिने संपूर्ण भिंतीवर " EMERGENCY PLEASE" असे लिहून ठेवले होते.. असला विचित्र प्रकार पाहून मी अनावर झालो आणि तिच्या जोरात कानाखाली लगावली व तिला खेचतच बेडरूममध्ये नेऊन झोपवले..
तेवढ्यात माझ्या मोबाईलवर पुन्हा एकदा मॅसेज आला..
" You have succefully recharged, your account balance is 263." मला त्याचा अर्थ आता कळू लागला होता...जेव्हा माझ्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा मला 163 चा बॅलन्सचा मॅसेज आला होता आणि त्यादिवशी नेमकी तारीख 16/3 अशी होती..आणि आज 263 म्हणजे 26/3 म्हणजे मेरी पण जाणार की, काय डोक्याला पार मुंग्या आल्या होत्या आणि अशातच माझा कधी डोळा लागला हे कळलेच नाही.. सकळी उठून बघतो तर मेरी हे जग सोडून निघून गेली होती..तेव्हापासून शिनूची आत्मा जास्तच प्रभावीपणे इतरस्त फिरताना दिसते..मेरीलाही शिनू त्या रूपात दिसला होता.त्यानंतर मला त्यानंतर आज कितीतरी दिवसानी तुला दिसला..मी इथेच मरणाची वाट पाहत आहे ...ते जे कुणी आहे मला सोडणार नाही..याची पुरी खात्री आहे मला..तेव्हापासून एकटाच राहतो मी इथे.." छे छे डाॅक्टर तुम्ही एकटे कुठे आहात?? मी ही आहे तुमच्यासोबत" दुर कुठुनतरी आवाज आला..त्यानंतर हसण्याचा आवाज... तो आवाज ऐकून डाॅक्टर कोलमडून खाली कोसळले..टेबलावर ठेवलेल्या त्यांच्या मोबाईलची मॅसेजटाॅन वाजली..सहजच म्हणून उचलून पाहल तर " You have sucessfully rechaeged..Your account balance is 283"..
आणि आज नेमकी 28/3 अशी तारीख होती..
तेव्हा कुणाचा अननोऊन बॅलन्स आला की, सावधान!!!!

No comments:

Post a Comment