Thursday, May 28, 2015

तो मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता मुंबई उन्हात तापुन निघत होती म्हणून विशाल ने त्याच्या गावी सातार्याला पिकनिक ला जायचा प्लान बनवला आणि बाकी तिघानाही तो प्लान आवडला म्हणून ते टाटा सुमो ने सातार्याला निघाले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर सुसाट गाडी हाकून अवघ्या ७ तासात त्यांनी गाव गाठले मुंबई पेक्षा बर्यापैकी चांगल वातावरण होतआणि उकाडाही तितका जाणवत नव्हता.
३ दिवस खूप धमाल मस्ती त्यांनी केली आणि सातारी जेवणाची चव तोंडावर घेऊन यांनी परतीचा प्रवास करण्याची तयारी केली. संध्याकाळी ५ ला ते लोक निघाले दोन तासांचा हसत खेळत प्रवास झाला होता आणि अचानक त्यांची गाडी थांबली निखिलने विशाल ला विचारले काय झाले. यावर विशालला सुधा उत्तर देता आले नाही कारण गाडी अचानक बंद पडली होती आणि खूप प्रयत्न करून सुधा चालू झाली नाही शेवटी त्यांनी बाजूने जाणार्या एका गाडीला ला थांबवले आणि एखादा ओळखीचा Mechanic आहे का असे विचारले. त्या गाडी वाल्याने सांगितले कि इथून ५ मिनिटांच्या अंतरावर एक Mechanic आहे तुम्ही तिथे जा. मग त्या चौघांनी गाडी ढकलत ढकलत तिथपर्यंत नेली . Mechanic ती गाडी पहिली आणि म्हणाला साहेब वेळ लागले इंजिन मध्ये कचरा गेलाय. हे ऐकून ते चौघे निराश झाले आणि गाडी दुरुस्त होण्याची वाट पाहू लागले. त्या गाडीवाल्याला गाडी दुरुस्त करण्यासाठी तब्बल ४ ते ५ तास लागले इकडे हे लोक उभे राहून कंटाळले होते. काही वेळाने Mechanic ने गाडी दुरुस्त करून त्यांना दिली आणि ते निघायला तयार झाले.
गाडी विशाल चालवायचा पण त्याने कधी रात्रीची गाडी चालवली नव्हती आणि ते थकले सुधा होते त्यांना झोप सुधा येत होती त्यामुळे त्यांनी असा ठरवल कि ती रात्र आसपास कुठे छोटस हॉटेल बघून तिकडेच घालवावी आणि सकाळी निघावं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्या Mechanic कडे विचार पूस केली. तेव्हा तो Mechanic म्हणाला साहेब या मुख्यारस्त्यावरून पुढे डावीकडे वळलात कि ८ किलोमीटर अंतरावर एक सर्किट हाउस आहे तिथे तुम्हाला राहायला जागा मिळेल. तसे विशाल ने गाडी काढली आणि mechanic ने सागीतल्या प्रमाणे काही अंतर जाऊन डावीकडे वळला तो रस्ता गर्द दाट झाडीचा होता उंच उंच आणि दाट झाडांमुळे रस्त्यावर काळा कुट्ट अंधार पडला होता अवघ्या १५ मिनिटात ते लोक त्या सर्किट हाउस जवळ पोहचले. ते सर्किट हाउस मुख्यत्वे सरकारी अधिकारी , आमदार , खासदार अशा लोकांना त्या भागाच्या दौर्यावर आल्यावर राहण्यासाठी बनवले होते . पण मुळात तिथे जास्त वर्दळ दिसली नाही आवारात फक्त एक गाडी उभी होती.
विचारपूस केल्यावर त्यांना एका कोपर्यातली तळमजल्यावरची खोली दिली गेली. खोली तशी लहानच पण हवेशीर होती आणि एक मोठी खिडकी त्या रूम ला होती सगळे थकले होते त्यामुळे ते झोपी गेले. पण महेश ला मात्र झोप येत नव्हती म्हणून तो त्याच्या मोबाईल वर सिनेमा पाहत बसला होता रात्रीचे २ वाजले होते सिनेमा अर्धा पाहून झाला होता कि अचानक महेश ला महिलांच्या पायातील पैंजणीचा आवाज ऐकू आला प्रथम त्याला वाटले कि त्याला भास झाला पण आवाज काही काही मिनिटांनी सारखा सारखा खिडकीच्या दिशेतून येत होता. महेश ने विचार केला कोणी गावातील महिला किवा मुलगी असेल पण त्या आवारात फिरण्याची ती वेळ नक्कीच नव्हती. महेश घाबरणारा नव्हता म्हणून तो उठला आणि त्याने खिडकी उघडली बाहेर काळाकुट्ट अंधार होता पण चांदण्यांचा प्रकाश पडला असल्यामुळे थोड थोड दिसत होत.
पण कोणतीही महिला किवा मुलगी तिथे नव्हती फक्त पैंजण वाजत होती कधी वाटे समोरून कोणी तरी चालत येतंय कधी वाटे डावी कडे जातंय कधी वाटे उजवी कडे जातंय पण दिसत मात्र कोणीच नव्हत फक्त आवाज होता तो. त्याला काय करावे सुचेना त्याने लगेच आपला मोबाईल उचलला आणि विडीओ कॅमेरा सुरु केला आणि आवाजाच्या दिशेने फिरवू लागला काही क्षण गेले असतील आणि अचानक त्याच्या पाठीवर एक हाथ येवून पडला. " काय करतोयस रे महेश" अचानक झालेला स्पर्श आणि आवाज यामुळे महेश भीतीने दचकला मागे वळून पहिले तर तो आनंद होता. महेश स्वताला सावरत म्हणाला काही नाही चल झोपूया आणि महेश ने मोबाईल कॅमेरा बंद केला आणि खिडकी लावून तो आनंद च्या शेजारी येवून बसला. कॅमेर्यात काय शूट झाले ते बघण्यासाठी त्याने पुन्हा मोबाईल चालू केला आणि जे त्याने पाहिलं तेव्हा त्याला दारारून घाम फुटला. त्याने लगेच सर्वाना उठवले आणि त्याने जे शूट केल ते दाखवले. विडीओ मध्ये एक स्त्री होती पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते पायात पैंजण, हातात बांगड्या पण शरीर अर्धवट जळालेल वाढलेली नखे सोडलेले केस असा विद्रूप चेहेरा. ते बघून सगळेच घाबरले. आणि महेश ला लगेच तो विडीओ डिलीट करायला सांगितला.
पण महेश तसा निडर होता तो म्हणाला हे जे शूट झालय ते सगळ्यांना कळाल पाहिजे म्हणून त्याने कोणाचेच ऐकले नाही आणि मोबाईल बंद करून खिशात ठेवला. सगळे घाबरले होते पण कसेबसे झोपले सकाळ होताच त्यांनी परतीचा प्रवास करायचा ठरवलं. सगळ आटोपून त्यांनी ते सर्किट हाउस सोडलं विशाल ने पुन्हा एकदा महेश ला तो विडीओ डिलीट करण्याचा इशारा केला पण महेश ने ते करण टाळल महेश ला तो विडीओ सगळ्यांना दाखवयाचाच होता. सगळे बसले विशाल ने गाडी सुरु केली आणि सगळे परतीला एक विचित्र अनुभव घेऊन निघाले पण महेश शी कोणच बोलत नव्हत . गाडीने काही अंतर कापलच असेल कि अचानक त्यांची गाडी बंद पडली आणि त्या गर्द झाडांच्या रस्त्यावर ते एकाकी पडले सुमसान रस्ता आणि भयानक शांतता पसरली होती रस्त्यावर अचानक विशाल ला काही तरी आठवले पण तरी सुधा तो गप्प होता . त्याने त्या कालच्या mechanic चा मोबाईल नंबर घेतला होता त्याने त्याला फोन लावला पण त्याचा फोन हि बंद येत होता. आणि बघता बघता जोरजोराने वारे वाहू लागले आणि मुसळधार पाऊस सुरु झाला विजा कडाडू लागल्या याप्रकाराने ते घाबरले श्वास घेतो न घेतो तोच गाडीच्या मागच्या बाजूस एक मोठ झाड उन्मळून पडले त्यांचा नशीब कि ते झाड गाडीवर नाही पडले आणि आता काहीतरी विपरीत होतंय यांची त्यांना कल्पना झाली महिना होता मे पण तरीही अचानक पाऊस पडू लागला विजा आणि काळोख पडला याचा त्यांना अचंबा वाटला. पाऊस इतका मुसळधार होता कि त्यांना गाडीतून बाहेर पडणे शक्य नव्हते आणि समोरचे काही दिसत सुधा नव्हते. सगळे घाबरले होते विशाल ने मग न राहवून महेश चा मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हणाला मी हा विडीओ डीलीट करतोय कारण आपल्याला इथून सुखरूप परत जायचा आहे. आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता तो विडीओ डिलीट केला.
आणि काय चमत्कार काही क्षणातच पाऊस पडण थांबल होत. आता त्यांच्या जीवात जीव आला होता पाऊस गेला तरी वातावरण आता खूप थंड झाल होत विशाल ने गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला आणि पण गाडी दचके देत सारखी पुन्हा पुन्हा बंद पडत होती. महेश एकटाच निराश मागे बसला होता आणि मागच्या खिडकीतून पडलेल्या झाडाकडे न्याहाळून पाहत होता पावसाने संपूर्ण परिसर ओला झाला होता असाच बघता बघता त्याची नजर पुढे रस्त्यावर गेली आणि भीतीची एक लहर त्याच्या अंगातून गेली कारण मोबिल मध्ये शूट केलेली ती विद्रूप बाई त्यांच्या गाडीच्या मागच्या दिशेने जवळ येत होती येत होती आणि विचित्र पणे महेश ला बघून हसत होती महेश घाबरून ओरडला त्यामुळे अचानक महेश चा आवाज ऐकून सगळ्यांनी मागे पहिले आणि महेश ने बोटांनी इशारा मागच्या दिशेने इशारा केला सगळ्यांनी रस्त्याकडे पहिले पण त्यांना काहीच दिसले नाही. आता विशाल ला कल्पना झाली होती कि काहीतरी नक्कीच गडबड आहे. त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि नशिबाने गाडी सुरु झाली. विशाल आता सुसाट गाडी हाकत होता त्यांना कसाही करून मुख्य रस्त्यावर पोहचायचे होते न घाबरणारा महेश पूर्ण बिथरला होता आणि थरथर कापत होता. काही मिनिटातच ते लोक मुख्य हायवे ला पोहचले आणि त्यांना हे बघून डोळ्यावर विश्वास बसला नाही कि संपूर्ण हायवे सुकलेला होता उन रणरणत होत पावसाचा काही पत्ता नव्हता.
आता फक्त घाई होती ते घरी पोहचायची कसेबसे ते घरी पोहचले आणि आपापल्या घरी गेले पण झाल्या प्रकाराच विशाल ने संशोधन थांबवलं नाही आणि त्या सर्किट हाउस ची माहिती मिळवली तेव्हा कळाल कि ती सरकारी सर्किट हाउस आहे . पण सरकारी अधिकारी , आमदार तिथे जाण्यास टाळतात कारण त्या सर्किट हौस च्या मागेच एक स्मशान भूमी आहे आणि तिकडे असे अमानवीय प्रकार बहुतेकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे फारसा तिथे कोणी जात नाही आणि ते सर्किट हाउस ओसाड पडलंय .
विशाल ने हे सगळ मित्रांना सांगितलं आणि अश्या गोष्टींवर विश्वास न करणारा महेश सुधा आता या गोष्टींवर विश्वास करायला लागला होता.
मित्रानो पुढच्यावेळी कुठे हि आसरा घेण्या आधी त्या ठिकाणाची नीट माहिती करून घ्या. आणि देवावर विश्वास ठेवा
समाप्त

No comments:

Post a Comment