नमस्कार मित्रानो हा अनुभव मी घेतलेला नाही. पण आमच्या वाडीतल्या लोकांनी घेतलाय. त्यात माझे आई बाबा सुद्धा सामील आहेत. साधारण दोन महिन्यांपूर्वी मुंबई गोवा हायवेवरील एका माळावर एका गरोदर मुलीचा खून झाला होता व तो तिच्याच चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला होता. ती मुलगी आमच्याच वाडीतली तर झाले असे की,
त्या मुलीचे दिवसकार्य झाले व त्यानंतर तिचे वडील व भाऊ मुंबईला आले त्यावेळी घरात भीती वाटते म्हणून तिची आई रात्री आमच्याकडे झोपायला आली. त्यावेळी माझे आई बाबा गावी होते. रात्री बारानंतर अचानक घराच्या कौलांवर कोणीतरी चालत असल्यासारखा आवाज घरातल्या सर्वांनाच येऊ लागला.
त्यानंतर घरातल्यांना सर्वाना तिचा आवाज येऊ लागला. ती तिच्या आईला हाक मारत घराभोवती फिरत होती. "आई मला दुखतंय ग... ये ना...." हा तिचा आवाज सर्वानीच ऐकला. ती रात्र घरातल्या सर्वानीच बसून काढली. दुसर्या रात्री तिची आई वाडीतल्या दुसर्या एका घरात झोपायला गेली. त्या घरात रात्री मांजरांची जीवघेणी भांडणे जुंपली. त्यानंतर परत तिचा आवाज येऊ लागला. घराजवळून ती वेदनेने ओरडत धावत होती.
तिसर्या दिवशी तिचे वडील गावी आले आणि तिची आई त्यांच्या घरातच झोपू लागली. त्यानंतर कोणाला घराजवळ त्रास झाला नाही. पण तिच्या घराजवळून रात्री यायला लोक घाबरू लागलेत.

No comments:
Post a Comment