नमस्कार मित्रांनो मी अविनाश गुरव
आज तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे न तुम्ही पुन्हा याही स्टोरी वर तुमचे comedy comments ची बरसात करणार असाल तर सावधान !!!!!!! कारण मीही अश्या कारणाने माझा एक जिवलग मित्र रवि गमावला आहे....तर कृपया मला तुम्ही योग्य ते सहकार्य कराल याची अपेक्षा आहे... दिंनांक 25/ 1 / 2010 रोजी माझ्या मित्राची हळद होती बोम्बे सेन्ट्रल इथे न दुसर्याच दिवशी लग्न होते म्हणून आम्ही सर्व मित्र हल्दिच्या दिवशीच गेलो होतो रात्रभर हळद करून लग्न आटपून माघारी यायचा आमचे नियोजन ठरले मग काय सर्वान्नी आप आपली 2चाकी वाहन काड्ले होते माझ्या कड़े वाहन नसल्या मुळे मी रविच्या गाड़ी वर बसलो अश्या आमच्या चार गाड्या न त्या वर आम्ही दोघे दोघे बसलो आम्ही आठ जन झालो , आम्ही निघत असतानाच एका मित्राचे सुधिरचे वडिल आम्हाला बोलले की आठ जनानी कुठे जाऊ नये हे अपशकुनी आहे... मी त्यांना खोटेच सांगितले की " काका...पुढे आणखी दोघे जन आहेत " म्हणून न आम्ही निघालो....पण जाता जाता आम्ही सुधीरला हैरान करून सोडले मुद्दामच गाड़ी त्याच्या गाड़ी जवळ नेउन ओरडायचे "ये अपशकुनी" "ये अपशकुनी"... न खरच सांगतो या सर्व प्रयोगान मधे आमचा दोन वेळा अपघात होता होता वाचला... रवि न मी खुप खोडकर होतो म्हणून ना त्याच्या गाडीवर दुसरे कोण बसत ना मला त्यांच्या गाड़ी वर बसवत म्हणून अवि आणि रवि अशी आमची जोडी कुप्रसिद्ध होती... आम्ही 8/8:30 च्या दरम्यान मुंबई सेन्ट्रल येथे पोहचलो आमच्या मधे सर्वच(मदिरा) घेणारे होते म्हणून आम्ही सर्वच नाच गाने करत न मदिरा प्राशन करत हल्दिची मजा लूटत होतो... आमच्या मधे रवि न मीच खुप कमी घ्यायचो बाकि सर्व नो लिमिट वालेच होते... अशीच आम्ही हल्दिची शोभा वाड्वत होतो न वेळ आपले काम करत होता घडयाळाचा काटा पूढे सरकत होता सुमारे 11:30 वाजले असतील न हल्दिचा कार्यक्रम संपला असे घोषित करण्यात आले न आता विधि होता तो पेटपूजेचा मी पूर्णपणे शाकाहारी असल्या कारणाने माझी वेगळी व्यवस्था केलि होती...या सर्वांना बाहेरच खुर्ची टेबल वर बसउन मला एका खोलीत जेवायला नेले ....मी पोटभरुन जेवण केले न बाहेर आलो ...बाहेर बघतो तर काय सर्व टेबल खुर्च्या आस्था वेस्थ झाल्या होत्या न सर्व जन गर्दी करून उभे होते...मी गर्दी मधुन आत गेलो बघतो तर विनोद जो आमच्या बरोबरच आला होता त्याचे डोके फुटले होते रवीने त्याला आपल्या मांडीवर घेतले होते...विनोद न रविचे कपडे रक्ताने माखले होते ....मला तर काय करावे काय नाही हे कळतच नव्हते ...विचारना केलि तर कळले की विनोद अगदी अधाश्या सारखा जेवत होता न जेवता जेवता अचानक वेड्या सारखा करू लागला सर्व खुर्च्या टेबल वर लाथ मारू लागला हे बघून रवीने विनोद्च्या एक मुस्काटात लगावली तसा विनोद जमिनीवर कोसळला न त्याचे डोके फुटले हे एकुन माझे तर डोकेच फिरले विनोदला जास्त झालिकी तो कायतरी लफड़ा करतोच पण आज तर कहरच केला होता त्याने पण तो बेशुद्ध पडला होता याचे ही दडपण आले होते अथक परिश्रम घेउन सर्वांनी विनोदला सुस्थितीत आणले तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला होता ,तो शुद्धीवर येताच त्याला काय लागले न कसे झाले हे विचारू लागला न कहर तर तेव्हा झाला जेव्हा तो "खुप भूक लागलीय यार जेवायला दया यार" हे बोलला हे ऐकुन तर सर्वच जन अवाक् झाले न राहउन सुधिरने त्याला विचारलेच "अरे ..आत्ताच तर बकसुरा सारखा जेवलास तू.....बेवड्या" न विनोदने त्याच्या कड़े रागाने पाहातच बोलला " ये अपशकुनिच्या कार्ट्या....तुझा बाप जेवला असणार रे *वड्या " मी मध्यस्थी करून त्यांची भांडने थाम्बवली न त्याला जेवण द्यायला सांगितले तर सुधीर माझ्या वर भडकूनच बोलला " अरे मघाशी हाच भे*** आमचेही जेवण खाउन मला विचारतो तूझा बाप जेवला का म्हणुन आय*** " दोन चार शिव्या हसड्ल्याच बहादराने मी म्हणालो "तुला माहित आहे ना त्याची सवय " तेव्ह्डयात विनोद जेवता जेवता तिथुन ओरडला " ये अपशकुनी जेवायला ये रे भ**" आता रवीची सटकली न त्याने विनोदला शिविगाळ सुरु केलि " तुझे हे कायमचेच झालेय भे** तुला कुठे न्हेलाच नाय पाहीजे" विनोद दुखते डोके पकडत " ये तुला खुप पुळका आला का त्या अपशकुनिचा" रवि " साला तुझा कायमचाच आहे थोड़ी दारू नाय पियाला तर कळ काडनारच तू कोणाची तरी ....तरी अवि बोलतच होता तुला घेउ नका म्हणून ....पण न्हाय या अपशकुनी सुधिरच बोलला की त्याला घ्या त्याला घ्या.....मग घेतलास ना चडून ये सुधीर घे मग आता" विनोद राहिला बाजूला न सुधीर न रवीची जुपली मी कसे तरी रविला बाजूला घेतले न समजावण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्याला विनोद न सुधीर या दोघांचा राग आला होता रवि मला म्हणाला " चल आपण घरी जाऊया ..." मी "अरे पण लग्नाला आलोय ना आपण गन्याच्या " सुधीर " सकाळी येउया परत इथे थांबलो तर हे दोघे माँ**** डोक्याची आइबहिन एक करतील न आपल्याला इथे लफडा नकोय .....चल" मी " अरे पण जाणार कसे 26 जानेवारी मुळे पोलिस बंदोबस्त कडक आहे drink & drive मधे पकडला तर" रवी हो यार ...चल आपला सरकार जिंदाबाद 66 ने जाऊया (66 हा बस क्र. आहे जिवरात्र दिवस चालू असते ) न उद्या पण सरकारी गाडीतून येउया फिर आपका Driver आपको आपके गाडी BMW दोन चाकी से घर छोड़ेगा......गुरव साहब" मी हसतच त्याला होकारअर्थी मान हलउन "चल" म्हणालो ....रवि " मी जेवण घेतो न घरीच खातो...जेउन पण दिला नाही...गा**" तो गेला न काहीतरी मासाहारी जेवण घेउन आला ....पिशवी कडे नजर करुण बोलाला "तू लांब रहा या पासून शिऊ नकोस नाही तर बम फुटेल" न जोर जोरात हसू लागला..... आम्ही सर्वांचा निरोप घेतला न निघालो .... आम्ही चाळी बाहेर आलो मी रविच्या पुढे चाललो होतो अचानक रवीने माझा हात पकडला न बोलला " अवि ....ज्या आयला याला देउया का शॉट भे### " मी " कोणाला " रवि "तो बघ भ## गाल चोळत ठस्सन देतोय " मला कोण दिसले नाही मी विचार केला कोण गर्दुल्ला फिर्दुल्ला अंधारात बसलेला दिसला याला बहुतेक .....मी "जाऊदे आपल्याला उशीर झालाय आधीच "" रवि "होउदे ...याची आ# ### आपण आधी" मी रविला समजावत पुढे खेचतच न्हेऊ लागलो
पण रवि काही केल्या ऐकत नव्हता न बोलू लागला " बघ बघ काय बोलतोय तो ....की मारल त्याला म्हणून,....तू सोड मला मी दाखवतो त्याला मी कसा मारतो ते" मला माहित होते हा मला घाबरवन्याचा केविलवाण प्रयत्न करतोय....मी " झाले तुझे चालू ...मी घाबरलो बाबा चल लवकर" रवि " तू कश्याला घाबरतोस मीच शॉट देतो बघ त्याला" मी " नाटके बंद कर ....उगाच उशीर होतोय यार" मी वैतागुनाच बोललो ....कधी घरी जाऊ असे वाटत होते मला न याला मस्कारी सुचतेय ...रवि "मी नाटके करतोय तो मी मारले त्याला बोलतोय न तू बोल मी नाटके करतोय" रवि चांगलाच रागाने बोलत होता रात्रीच्या एकांता मधे त्याचा आवाज खुपच घुमत होता, मी विचार केला की आपण याला घाबरलोय हे दाखवले तर हा अजुनच नाटके करेल पण जर आपणच मस्करी केलि तर हा त्याची नाटके बंद करेल... मी " चल तर मग ...जा आणि दे शॉट त्याला"...रवीने हातातली पिशवी बाजुच्या बंद स्टॉल वर ठेवली न 20/25 फुट लांबचा पल्ला त्याने झपझप पार केला न बोलू लागला " आता बोल कोणी मारला तुला....भे##" रवि असा बोलतो न बोलतो तोच जलद गतीने तिथून माघारी 10 फुट वर येउन पडला ....मी धावत गेलो न रविला उचलले बघतो तर रवीची हनुवटी न होट फुटले होते....डोळे बंद करून तो ओरडत होता "भे## अवि सोडायचे नाही याला मला मारला मा#### ने" मी त्याला पकडून उभा केला "रवि " कुठे गेला तो आय### पळाला काय" मला तर काहीच कळत नव्हते हा नाटक करतोय की काय विचित्र घड़तेय.... मी " हो...पळाला तो " रवि "आ## ## पळाला ....तू पण बघत बसलास ...पकडायचा ना त्याला" मी गप्पच उभा होतो मला काय चालले आहे हे कळतच नव्हते ....मी "चल ...उद्या बघू त्याला" असे बोलून मी त्याला समजाउन निघालो...रवीने त्याची जेवणाची पिशवी घेतली आम्ही बस स्टॉप वर आलो ...रवीची शीविगाळ चालूच होती , थोड्याच वेळात बस आली बस डबल डेकर असल्या मुळे आम्ही वरच्या बाजूला मागच्या सिट वर बसलो....बसलो होतोच की रविला बसच्या मागे तोच माणुस दिसला रवि बस मधुनच त्याला शिविगाळ करू लागला बस मधे आम्हि दोघे न एकच व्यक्ति होती जी साखर झोपेत होती याच्या आवाजाने तोहि उठून खाली गेला....न कंडक्टर वर आला मी दोन फुल जैन सोसायटी म्हणून सागितले न पैसे देउन टिकिट घेतले ...पण रवि मागे पाहून विनोद विनोद करू लागला तर पुन्हा शिविगाळ करू लागला....याचा आवाज यैकून एक पोलिस हवालदार साहेब वर आले न रविला चांगलाच दम देऊन गेले .. रवि डोके दोन्ही पायात ठेउन रडू लागला ...मी "आता हे काय नवीन.....साल्या तू रडायचे नाटक केलेस की मी काय घबरनार आहे का, तुला acting ची येव्ह्ड़ी खाज आहे मला माहित नव्हते....काय stunt केलास पण बाकि....न स्वताचिच फाडून घेतलीस..." न मी जोरजोरात हसू लागलो...न रवि रडत रडत झोपी गेला...आमचे बस स्टॉप येताच मी रविला उठवले ...त्याचे डोळे लाल झाले होती ..आम्ही दोघे बस मधून उतरुन घरच्या दिशेने निघालो...सिने मैक्स ला मागे टाकून आम्ही रेल्वे पटरी पुला जवळ आलो रात्रीचे दिड एक वाजले असतील त्या गल्लीत खुप अंधार होता आम्ही पूला वरुण न जाता घालुनच पटरी वरुण पलिकडे जाण्याचा निर्णय घेतला आम्ही पटरी जवळ जाताच रविला कोण तरी हसण्याचा आवाज येऊ लागला न रवि माझ्या कडे पाहून "कोण हस्तेय रे जोर जोरात" मला वाटले पुन्हा हा मला घबरवतोय मी "कोण तरी चुकुन सकाळ झाली समजुन हसण्याचा व्यायाम करत असेल....तू चल" माझ्या कड़े रागानेच पाहिले त्याने न पट पट चालू लागला ...न आम्ही पहिली पटरी ओलान्डनार तोच आम्हा दोघांच्या समोरच एक रक्त बम्बाळ व्यक्ति ऊभी होती त्याचे शिर न एक हाथ नव्हता त्या जागेतुन रक्तच रक्त वाहत होते माझी तर बोबडिच वळलि होती मी न रवि मागे फिरलो...
न समोरच एक बाई आडवी पडली होती तिचे शरीर तिन भागात पडले होते मधे धड त्याच्या 2/3 फूटावर मुण्डके धडाच्या 3/4 फुट खाली पाय न हे सर्व अवयव हलत होते मुण्डके वेदनेने विवळत होते धड न पाय तडफडत होते आता तर आमची पूरी नशा उतरली आम्हाला कुठे पळावे हेच कळत नव्हते मागुन रक्त बम्बाळ भुत (आता भुतच म्हणावे लागेल व्येक्ति नाही) आमच्या जवळ येत होते आता आम्ही सरळ GTB स्टेशन कड़े धाव घेतली जस जसे आम्ही पुढे जात होतो तस तसे भूतांची संख्या वाढ़त जात होती सर्वांचे प्रकार वेग वेगळे होते न ते सर्व पाहून आम्ही दोघे अगदी जीव मुठीत घेउन धावत होतो....न अचानक आमच्या समोरच मान नसलेले भूत उभे होते ते आपले हाथ कात्री प्रमाने फिरवत होते....आम्ही दोघे वेगवेगळ्या पटरी वरुण धावायला लागलो पायाला खुप ठेचकाळे लागत होते पण बूट घातल्या मुळे काही धुकापत होत नव्हती मी धावता धावता एका ठिकाणी पडलो न मला काहीच हालचाल करता येत नव्हती...हळुहळु माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला न मी तिथेच बेशुद्ध पडलो..... जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी सायन हॉस्पिटल मधे होतो न माझे सर्व मित्र न घरचे ही आले होते...सर्वांच्या चेहर्यावर दुखाचे सावट दिसत होते...मी रवि बद्दल विचारले तर कोणीच काही बोलत नव्हते मला सर्वांनी स्मशानात न्हेले न तिथे रविचे पार्थिव ठेवले होते ...मी ओक्सा बोक्षी रडू लागलो तसे सर्वच जन रडायला लागले ...सर्व कार्य उरकून झाल्या वर माझी पोलिस चौकशी करण्यात आली तेव्हा झाला प्रकार मी सर्वांना सांगितला ,तेव्हाच सर्वांनी त्याच रात्रि विनोद ही वेड्या सारखा करत हॊता न सकाळी उठल्यावर सांगत होता की रात्रि तो लघवी करायला चाळीच्या संडासात गेला न तिथेच तो तम्बाखू मळत हॊता त्याला तिथे एका माणसाने तम्बाखू मागितलेली त्या नंतर काय झाले त्याचे डोके कसे फुटले हे कायच आठवत नाही बोलतोय ...तेव्हा मला कळले की रवि ट्रेनखाली सापडला न त्याच्या अवती भवति उष्टी बिरयांनी पडलेली होती ...जी त्याने पिशवितुन घेतली होती, पोलिसांनी या आधीही पटरी मधे असले प्रकार झालेले आइक्ले होते तरी पण वेळ पडल्यास मला पुन्हा चौकशी बोलवतील असे सांगितले..... पण.....झाला प्रकार आम्ही... मी तर नाहीच नाही आयुष्य भर विसरु शकत नाही....रविला कोण दिसतेय त्याला कोठून आवाज येत होते हे मी त्याला विश्वासात घेउन विचारले पाहिजे होते ..न मी त्याची मस्करी करत राहिलो न त्या मुळेच त्याचा जिव गेला या बद्दल मी अजूनही स्वताला जबाबदार मानतो....
No comments:
Post a Comment