देव उपासना
भाग ११
उपासना धावत पळत येवून आपल्या आईच्या मृत शरीराला आलिंगन देवून हुंदका देवून रडायला लागते... सगळेचजण खूप भावुक अवस्थेत चुपचाप उभे राहून पाहत असतात. गावातील लोकं पण हळू हळू त्यांच्या घराच्या दिशेने येत असतात.
उपसनाचे वडील पळत प्रेमकडे येतात आणि विचारतात, "बेटा... उर्मिला कुठे आहे...!!!"
"आता ते तर नाही माहिती... पण हो ती भाऊ साहेबांच्या वाड्यातून पळून सुटली आहे. तुम्ही चिंता नका करू सगळं काही ठीक होईल.."
"काय ठीक होईल बेटा... संतोष सकाळ पासून गायब आहे... श्यामला (उर्मिलाच्या आईचे नाव) गेली आणि उर्मिलाचा काहीच पत्ता नाही... आता अजून काय ठीक होणार...??" उपसानाचे वडील एवढं बोलून आपलं डोकं पकडून खाली बसतो.
"मी समजू शकतो... राहुलने उर्मिलाला वाड्यातून सुटका करून आपल्या सोबत घेवून गेला आहे.. आणि मला पूर्ण विश्वास आहे कि ती व्यवस्थित असणार..." देव त्यांना सांत्वना देत बोलला.
तेव्हा उपासना आपल्या आईच्या मृतदेहाला सोडून स्फुंदत स्फुंदत देवपाशी येते आणि आपले अश्रू पुसत बोलते, "राहुल ताईला घेवून आपल्या शेताकडेच येत होता ना... मला भीती वाटते देव..."
"चिंता नको करूस उपासना मी पुन्हा शेताकडेच जातोय, मी फक्त तुला इथे सोडण्यासाठीच आलो होतो." देव बोलला.
"देव मी पण तुझ्यासोबत येणार..." गोविंद मध्येच बोलला..
उपासना गोविंदकडे पाहते. देव त्याचा पण परिचय देतो, "उपासना हा गोविंद आहे... माझा खास मित्र..."
ते सर्व गोष्टी करतच होते कि उपसना मध्येच बोलते, "अरे...!!! ती ताई येत आहे काय...??"
देव मागे वळून पाहतो, उर्मिला अडखळत राहुलचा हाथ पकडून घराकडे येत असते.
उपासना पळत जाउन उर्मिलाच्या मिठीत घुसते आणि विचारते, "ताई तू ठीक तर आहेस ना..!!"
उपासना, उर्मिलाला आपल्या आईच्या बद्दल काहीच सांगू शकत नाही. उर्मिला स्वतः आतमध्ये येवून आपल्या आईच्या मृत शरीराला पाहते आणि उपासनाला रडत रडत विचारते, "उपसाना, काय झालं आईला...??"
उपासना पुन्हा हुंदके देत रडायला लागते आणि आपल्या ताईला मिठी मारते. उर्मिला स्फुंदत, हुंदके देत आपल्या आईच्या शरीराला मिठी मारते... सर्व जण पुन्हा एकदा भावुक होतात.
"तू इथेच थांब मी मंदिरात जावून येतो..." देव गोविंदला बोलतो आणि तिथून निघून जातो.
उपासना देवला जातांना पाहते आणि पळत पळत त्याच्याकडे येते, "तू एकटा कुठे चालला आहेस देव...??"
"मंदिरात जातोय उपासना.. बाबांना भेटून येतो, नाहीतर ते बोलतील कि एवढ्या वर्षा नंतर आलो आणि येवून एकदापण पाहिलं नाही..." देव बोलला...
"ठीक आहे.. पण आत्ता शेतात नको जावूस..."
"एक गोष्ट सांग उपासना...?? शेतात पहिले पण कधी असं काही झालं आहे का...??" देव तिला विचारतो
"नाही देव... पहिले तर कधीच असं काही नाही झालं होतं...??"
"संतोष ह्या आगोदर पण कधी असं ना सांगता गायब झाला होता..?"
"नाही देव... दादा कधीच असा ना सांगता कुठेच गेला नाही... मला खूप भीती वाटते... दादा कुठे कोणत्या संकटात तर नसेल ना...??"
"तू चिंता नको करूस... मी बघतो कि काय गडबड आहे ती...!!"
"हो पण तू आत्ता रात्री शेतात नको जावूस..." उपासना चिंताक्रांत होत बोलली...
"नाही आता मी मंदिरात जातोय... मग घरी जाणार... सगळ्यांना एकदा भेटून घेतो. सकाळी बघू कि शेतात काय गडबड आहे ती...?"
"देव पण ते भाऊ साहेबांची माणसं पुन्हा आलीत तर...?"
"गोविंद इथेच आहे उपासना आणि अजय विजय पण इथेच आहेत, खरं म्हणजे गोविंद इथे आहे तर चिंतेचं काहीच कारण नाही आहे. मी पण लवकर येण्याचा प्रयत्न करतो."
"ठीक आहे देव स्वतःची काळजी घे..."
आपली मान होकारार्थी हलवून देव मंदिराच्या दिशेने निघतो...
क्रमशः
No comments:
Post a Comment