Saturday, May 30, 2015

भाग ९ देव उपासना...

भाग ९ देव उपासना...
देवचं अचानक तिथे येणं हे उपासनासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. उपासना मनातल्या मनात हाच विचार करत असते कि शेवटी अचानक देव इथे आला तरी कसा. गेल्या तीन वर्षांपासून तो गावामधून गायब होता, कुठे होता तो? काय करत होता?.... हे काही असे प्रश्न होते, जे तिच्या मनात उमडत होते. उपासना देवला खूप काही विचारायला पाहत होती, पण हालत तशी नव्हती. देवला पण उपसानाला खूप काही सांगायचे होते पण ह्यावेळी तो गप्पच होता.
पण तरीही उपासना हळूच बोलते, "देव... भाऊ साहेबांची माणसं उर्मिलाला घेवून गेले आहेत..."
"घाबरू नकोस... उर्मिला आता तिथे नाही आहे, मी तिथूनच येत आहे. उर्मिलाला राहुल आपल्या सोबत घेवून गेला आहे..." प्रेम हळूच पुटपुटला...
"तुला हे कसं माहिती..."
"मी काही आत्ताच २ तासांपूर्वी गावात पोहोचलो होतो, रस्त्यामध्ये तुझे वडील मला बेशुद्ध अवस्थेत सापडले..."
"काय...!!! अरे भगवंता..." साधना भावुक होत बोलली... "पण बाबांना काय झालं होतं...???"
"उपासना, छोट्या मालकाने त्यांना खूप निर्दयी पणे मारलं होतं... ज्यामुळे ते बेशुद्ध होवून रस्त्यावर पडले होते. पण तू काळजी करू नकोस ते आत्ता ठीक आहेत आणि सुरक्षित आहेत. त्यांनीच मला सर्व काही सांगितलं. मी त्यांची गोष्ट ऐकून उर्मिलासाठी लगेच वाड्यावर गेलो, पण माझ्या तिथे पोहोचण्याच्या आधीच राहुलने उर्मिलाला तिथून घेवून गेला होता. राहुलला तर तू पण ओळखतेस ना...? तो एक चांगला माणूस आहे. नंतर मग मी हळूच वाड्यात चाललेल्या सर्व गोष्टी ऐकत बसलो होतो... तेव्हा मला हे माहिती पडलं कि भाऊ साहेबांची माणसं राहुल आणि उर्मिलाला शोधण्यासाठी इथेच येत आहेत. तेव्हा मी पळत पळत इथे आलो... कारण तुझ्या वडिलांनी मला आगोदरच सांगितले होते कि तू इथेच आहेस..."
"माझी आई तर ठीक आहे ना देव...?"
देव हे ऐकून गप्प बसतो...
उपासना त्याला पुन्हा विचारते, "आई तर ठीक आहे ना... प्रेम...?"
"त्या... आता ह्या जगात नाही आहेत, मला दुखः आहे... काश...!! मी अजून थोडा लवकर आलो असतो तर हे सगळं होवू दिलं नसतं..."
उपासना रडायला लागते आणि आपल्या चेहऱ्याला हातांनी लपवून चुपचाप स्फुंदत बसते.
देव तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देतो. पण ती रडणं थांबवतच नाही..
"आज हे काय होत आहे आमच्यासोबत देव, सकाळ पासून दादा गायब आहे... ताईला भाऊ साहेबांची माणसं घेवून गेलेत... एका दिवसात एवढं काही झालं... आणि आजच तू परत आलास... आणि आता माझी आई ह्या जगात नाही आहे हे तू सांगतोयस... मला सर्व काही विचित्र वाटतंय..."
"विचित्र तर मला पण वाटतंय..."
देव आणि उपसना चुपचाप बोलतच होते कि त्यांना कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकायला येतो.
"विश्वंभर जर राहुल त्या मुलीला घेवून त्या जंगलात गेला असेल तर..."
"तर आपण परत वाड्यात जावू... काळू..."
"पण छोटे मालक आपल्यांना खूप ओरडतील विश्वंभर..."
"तू चिंता नको करूस त्यांच्या ओरडण्याच्या भीतीने आपण एवढ्या रात्री त्या भयानक जंगलात तर नाही जाणार... तरीपण मला पूर्ण खात्री आहे कि राहुल त्या मुलीला घेवून इथेच कुठे तरी लपून बसला असेल... "
देव आणि उपासना, काळू आणि विश्वंभरची गोष्ट ऐकत होते कि तेव्हा अचानक एका मोठ्या आगतिक, भयावह किंकाळीचा आवाज पुन्हा आला.
"ह्ह्ह्ह्हहे काय.... होतं... विश्वंभर...??""
"माहिती नाही काळू... बाकीची माणसं कुठे गेलीत...?"
"तूच तर सर्वांना दोन दोनच्या टोळीत जायला सांगितलं होतं ना..."
"हो पण कोणीच दिसत नाही आहे..." विश्वंभर सगळी कडे पाहत बोलला...
इथे शेतात उपासना, ती किंकाळी ऐकून कापायला लागते आणि देवच्या बाहुपाश्यात शिरते. आता ती काही बोलणार तेव्हड्यात तो तिच्या तोंडावर हाथ ठेवतो आणि हळूच बोलतो, "घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या सोबत... एकदम शांत राह..."
"विश्वंभर ते बघ समोर कोणीतरी उभं आहे..."
"कुठे...?"
"तिथे समोर... पण हा आपला तर माणूस नाही वाटत... हा तर कोणी दुसराच वाटतो..."
"ओय हा तर मला माणूसच नाही दिसत, चल पळ... इथून..."
एवढं बोलून विश्वंभर तिथून वाड्याच्या दिशेने पाळायला लागतो त्याच्या मागोमाग काळू पण... रस्त्यात त्यांना आणखीन त्यांची दोन माणसं दिसतात जे दुसऱ्या दिशेने पळत पळत येत असतात.
"काय झालं विश्वंभर तू पळत का आहेस...??"
"आम्ही ना... ना.... तिथे काही तरी विचित्र पाहिलं मनोहर..." विश्वंभर धापा टाकत बोलला.
"आम्ही पण... माहिती नाही काय ताप आहे..... भाऊ... लवकर निघ इथून..." मनोहर बोलला.
भाऊ साहेबांची सर्व माणसं पळत पळत वाड्यात पोहोचतात आणि विश्रामला पूर्ण गोष्ट सांगतात...
"तुम्ही सर्व बावळट आहात... कधी तुम्हाला जंगलाची भीती वाटते तर कधी तुम्हाला कोणत्या सावलीची... कोणत्याच कामाचे नाही आहात तुम्ही लोकं. शेतात असं काय होतं जे तुम्ही असं पळत सुटलात... असं असू शकतं कि हि राहुलची एक युक्ती असेल... आणि काय माहिती तो राहूलच असेल.." विश्राम रागाने बोलला.
"नाही मालक तो राहुल मुळीच नव्हता, राहुलला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याला मी कोणत्याही हालातीत ओळखू शकतो. शेतात जो कोणी होता... तो माणूस नव्हताच..."
इथे शेतात उपासना भयाने देवला सोडायचं नावच घेत नाही...
"देव हि लोकं कोणाला बघून पळून गेले...?"
देव लगेच तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि बोलतो, "गप्प बस आणि इथेच थांब... मी बघून येतो कि मामला काय आहे..."
पण तेव्हा पुन्हा एकदा एक भयावह किंकाळी शेतात प्रतिध्वनित होते जी ह्यावेळी वाड्याला पण हलवून सोडते...
"नाही देव थांब... कुठेच नको जावूस... मला भीती वाटते, आज शेतात जरूर काहीना काहीतरी गडबड आहे..."
"तेच तर बघायला जातोय उपासना कि काय गडबड आहे, घाबरू नकोस..."
"नको देव... थांब... मला इथे एकटीला भीती वाटते..."
दुसरीकडे त्याचवेळी वाड्यात...
"हा आवाज ऐकलात मालक... हा जरूर त्याच भयानक सावलीचा आहे... एवढ्या जोराने तर कोणी माणूस किंकाळू नाही शकत..." विश्वंभर बोलला...
विश्राम पळत जाउन आपल्या रूममध्ये जातो आणि पल्लवीला विचारतो.. "तू काल रात्री ह्याच किंकाळी विषयी बोलत होतीस...?"
पल्लवी त्याच्याकडे बघते पण काहीच बोलत नाही...
"मी तुला काहीतरी विचारतोय... तू बहरी झालीस कि काय...?"
"हो अशीच किंकाळी ऐकली होती... काल रात्री तर माझी गोष्ट ऐकली नाही.. आत्ता का विचारत आहात..."
विश्राम पळत पळत भाऊ साहेबांच्या रूममध्ये जातो...
भाऊ साहेब पण ती भयावह किंकाळी ऐकून उठतात..
"बाबा मला वाटतं कि संगीता कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे..."
"काय बोलतोयस तू... पहिले हे तरी माहिती पडलं पाहिजे कि संगीता आहे तरी कुठे..."
"बाबा घनश्यामच्या काकानुसार संगीता काल रात्री संतोषला शेतात भेटणार होती... पण काल रात्री पण पल्लवीने शेतातून असल्या भयावह किंकाळ्या ऐकल्या होत्या..."
क्रमशः...

No comments:

Post a Comment