Saturday, May 30, 2015

देव उपासना भाग ~~ ५ ~~ शोध

देव उपासना
भाग ~~ ५ ~~ शोध
इथे आदल्या रात्री संगीताच्या घरातील दृश्य...
दोन जोडे सहवास करत होते पण त्या सहवासात जरबीपणा जास्त होता... एक हवस होती... वासनेची... हा आहे विश्राम संगीताचा मोठा भाऊ आणि भाऊ पाटील साहेबांचा जेष्ठ पुत्र... पल्लवीचं लग्न विश्रामशी एक वर्षा आधी झालं आहे, पण त्यांच्या संसारात वासने शिवाय आणखीन काहीच नाही आहे.
विश्राम आपली वासनेची तहान भागवून झोपला आहे, पण पल्लवी अजूनही दुसरीकडे कड बदलून स्फुंदत आहे.
अचानक तिला बाहेरून एक किंकाळी ऐकायला येते, ती घाबरते आणि आपला कड बदलून विश्रामला बिलगते.
विश्राम गडबडून ताडकन उठून बसतो...
"काय झालं..." विश्राम पल्लवीला दटावून रागाने विचारतो.
"तुम्हाला काही ऐकायला आलं का...??" पल्लवीने त्याला भयभित अवस्थेत विचारले.
"काय आहे... झोपून जा आरामात..." विश्राम चिडत बोलला..
"अरे तुम्हाला काही ऐकायला येतंय का...?" पल्लवीने पुन्हा विचारले...
"पल्लवी चुपचाप झोपतेस कि नाही, का देवू पुन्हा कानाखाली..." विश्राम तिच्यावर खास्कन ओरडून चिडत बोलला...
पल्लवी काहीच न बोलता पुन्हा आपली कड बदलून झोपून जाते आणि आपल्या नशिबावर रडायला लागते. ती विचार करत असते कि तिच्या जीवनात कदाचित नवऱ्याचे प्रेम लिहिलंच नाही आहे...
हाच विचार करता करता पल्लवीला केंव्हा झोप लागते तिलाच कळत नाही...
पण ती रोजच्या सारखी सकाळी लवकर उठते... आपली सर्व रोजची कामे आटपून जशीच ती आपल्या रूममधून बाहेर निघते तिला पुरुषोत्तम पाटील भेटतो...
"काका सुप्रभात..." पल्लवी त्याच्या पाया पडत बोलते.
"अरे पल्लवी बेटा पाया नको पडूस..." पुरुषोत्तम तिचे दोन्ही खांदे पकडून तिला पाया पडण्यापासून रोकतो..
"काय झालं काका..!!" पल्लवीने विचारले...
"काहीच नाही... काहीच नाही, अच्छा मला हे सांग विश्रामने तुला पुन्हा त्रास तर नाही दिला ना.." पुरुषोत्तमने विचारले.
"नाही...!!" पल्लवीने विचार करून उत्तर दिलं. ती अजून बोलणार तरी काय.
आदल्या दिवशी पुरुषोत्तमने विश्रामला स्वयंपाक घरात पल्लवीला कानाखाली मारतांना पाहिलं होतं. त्यावेळी पुरुषोत्तमने येवून विश्रामला समजावले होते कि सुनेवर ह्या प्रकारे हात उचलणे चांगलं नसतं.
"मंदिरात जात आहेस का बेटा...!" पुरुषोत्तमने विचारले..
"हो काका, संगीता सोबत मंदिरात जाईन, आता बघते जाउन कि ती उठली आहे कि नाही..." पल्लवी चेहऱ्यावर स्मिता आणत बोलली...
"हो-हो जा बेटा... जा.." पुरुषोत्तम हासत बोलला...
पल्लवी जिना चढून संगीताच्या रूमच्या बाहेर पोहोचते, आणि तिला आवाज देते..., "संगीता उठलीस काय, चल मंदिरमध्ये जाऊयात..." पल्लवी बाहेरून आवाज देत बोलली...
पण आतून काहीच प्रतिउत्तर नाही आलं...
ती आत जाउन पाहते तर काय संगीता आपल्या रूममध्ये नव्हती...
पल्लवी मनातल्या मनात विचार करते, "अरे संगीता आज काय पुन्हा एकटी मंदिरात गेली, हि माझी वाट का नाही पाहत. ह्या घरात फक्त काकाच आहेत जे माझ्याशी नीट बोलतात, नाहीतर प्रत्येकजण आपापल्या तंद्रीत असतो..."
ती ह्या गोष्टीने अनभिज्ञ आहे कि शेवटी का पुरुषोत्तम काका तिच्याशी एवढ्या प्रेमाने का बोलतात आणि वागतात.
पल्लवी एकटीच मंदिरात जाते. पण मंदिरात पोहोचून पण तिला संगीता सापडत नाही ...
"अरे हि संगीता आहे तरी कुठे, मंदिरला येण्याचा रस्ता तर एकच आहे, ती मंदिरात आली होती तर गेली कुठे... असं असू शकतं ती घरातच असेल.." पल्लवी विचार करते आणि मंदिरात देवाच्या पाया वैगेरे पडून पुन्हा घरात परतते..
पल्लवी जेव्हा घरी पोहोचते तर पूर्ण घरात, सर्व ठिकाणी सांगितला शोधते, पण ती तिला कुठेच सापडत नाही.
तेव्हा तिला समोरून भाऊ साहेब येतांना दिसतात...
"सुप्रभात बाबा..." पल्लवी आपल्या सासऱ्याच्या पाया पडून बोलते...
"खुश राह बेटा, संगीता कुठे आहे...??" भाऊ साहेब तिला आशीर्वाद देत विचारतात...
"बाबा मी पण तिलाच शोधत आहे, पण ती कोणास ठावूक कुठे आहे..." पल्लवी बोलते...
"काय बकवास करत आहेस...!!" भाऊ साहेब विचलित होवून रागाने बोलतात...
भाऊ साहेबांचा राग पाहून पल्लवी भयाने थरथर कापायला लागते...
"जा बोलावून आण तिला, आज तिला बघण्यासाठी लोकं येणार आहेत..." भाऊ साहेब ओरडत बोलले...
"हो बाबा... मी पुन्हा जाउन पाहते, असेलच इथे कुठे तरी..." पल्लवी एवढं बोलून पळत सुटते संगीताला शोधण्यासाठी...
पण पल्लवीला संगीता घरात कुठेच सापडत नाही...
क्रमशः

No comments:

Post a Comment