Thursday, May 28, 2015

Niranjan Shete
आजची post कदाचित पूर्णपणे bouncer जाईल ..
तरीपण जे आहे जस आहे तस सांगतो .
///////////////////////////////////////////////
///////////////////////////////////////////////////////
आज आपण गूढ पिशाच्च सृष्टी कडे वळू .ही माहिती प्रत्यक्ष पिशाच्चानेच सांगितलेली असल्याने ती बरीच विश्वसनीय व वस्तुस्थितीला धरून असण्याचा संभाव आहे .ही हकीकत १९६६ सालच्या ' पुरुषार्थ 'मासिकात प्रसिध्द झाली असून हे पिशाच्च दुसर्या मनुष्याच्या अंगात येउन कोणत्याही प्रश्नाची खडान्खडा माहिती नेहमीच अचूक देत असे .विशेष म्हणजे त्याने सांगितलेल्या भविष्यकालीन घटनाही तंतोतंत तशाच घडून येत .प्रस्तुतचा लेख ' एक भगिनी ' हे टोपण नाव धारण करणाऱ्या एका लेखिकेने लिहिलेला आहे .एके दिवशी या भगिनीच्या मनात पिशाच्च्योनिसम्बंधी कुतूहल निर्माण होऊन तिने एकदा रात्रीच्या वेळी त्या पिशाच्चास पाचारण करून पिशाच्च सृष्टीच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले . ( प्लानचेट सारखे एखादे माध्यम वापरून) त्या वेळी त्या पिशाच्चाने कसलेही आढेवेढे न घेता स्वतःच्या गूढ व अद्भुत सृष्टीबाबत सविस्तर माहिती तिला सांगितली . ते पिशाच्च म्हणाले "मनुष्य मरण पावला म्हणजे जीव जडदेह सोडून लिंगदेहात वावरतो . जडदेह सोडणे जीवाला अर्थातच नको असते ; परंतु नाईलाज असतो व जडदेह डावाच लागतो .तो सोडत असताना जीव मनुष्ययोनितील वासना बरोबर घेऊन जातो . मनुष्यायोनितील सुखदुःखे भोगण्याचा मोह या जीवाला सुटत नाही . त्यामुळे हा लिंगदेह अतिशय अतृप्त अशा अवस्थेत वावरू लागतो . तो पितृलोकात प्रवेश करू शकत नाही . "
ते पिशाच्च पुढे म्हणाले " आमचे वास्तव्य नेहमी हवेत असते ; पण हवेत म्हणजे पितृलोकाच्या खाली व मृत्युलोकाच्या वर , अशा पातळीवर असते . आम्ही पितृलोकात जाऊ शकत नाही . मृत्युलोकाप्रमाणेच या योनीच्या वेगवेगळ्या श्रेणी असतात .प्रत्येकाच्या पुर्वकर्माप्रमाणे प्रत्येक पिशाच्चाला विविक्षित श्रेणी मिळते .वरच्या श्रेणीतील पिशाच्चे येथे अधिकार्याचे काम करतात . त्या अधिकार्याने पुनर्जन्म घेतला म्हणजे त्या जागेवर दुसरी पिशाच्चे त्यांच्या अनुक्रमाप्रमाणेजागेवर येतात ." " पितृलोकातील बरेच नियम आम्हाला लागू आहेत . उदाहरणार्थ , श्राध्दपक्षातीलनैवैद्य
आम्ही वासाने ग्रहण करू शकतो . तो न दिला तर आम्ही त्रासही देऊ शकतो .आमची कुणी खोडी काढली तर त्याला इजा करण्याची आम्हाला परवानगी असते .आम्हाला बंधने फार आहेत . पुन्हा जन्म घेण्यासाठी आम्हाला वर्षानुवर्षे तडफडत
राहावे लागते .
( admin Note :-पितृलोक :- जो मनुष्य आयुष्यात कोणाचे काही वाईट करत नाही पण आयुष्यात पुण्यही कमवत नाही किंवा फार कमी पुण्य कमावतो असा जीव मेल्यावर पितृलोकात जातो . पितृलोकाचे वातावरण जवळ जवळ पृथ्वी सारखेच आहे. पितृपक्षात दाखवला जाणारा नैवैद्य येथे राहणाऱ्या आपल्या पुर्वज्जांना मिळतो . )
आमच्या पुढे अनुक्रम असलेल्या जीवांनी जर विविक्षित जागी जन्म घेतला नाही तर आमची अतिशय कुचंबणा होते .
अशा परिस्थितीत आमच्या वंशजांना ' नारायण नागबळी ' नावाचा एक विधी करून पुढील जीवांना दूर सारून आमचा मार्ग मोकळा करून देता येतो ."ते पिशाच्च पुढे म्हणाले "आमच्यावरील सर्वात मोठे बंधन म्हणजे आमची रोजची तीन
वेळची हजेरी . रोज दुपारी बारा , संध्याकाळी सहा आणि रात्री बारा अशी आमची हजेरी घेतली जाते .
पहिल्या दोन हजेर्यांत थोडी सवलत मिळू शकते ; पण रात्री बाराच्या हजेरीत मात्र कधीही सवलत मिळत नाही . अश्विन शुध्द अष्टमी ही आमची सर्वात मोठी सुट्टी असते . त्या खालोखाल अमावस्या व पौर्णिमा .(admin Note :- म्हणूनच
अमावास्येला आणि पौर्णिमेला भूतांचा प्रभाव जास्त असतो . भूतांना मोकळीक मिळाल्याने ते या दिवशी आपला प्रभाव जास्त प्रभावीपणे गाजवतात. )
अष्टमीच्या दिवसाला तुमच्यामध्ये 'घागरी फुन्कण्याची अष्टमी ' असे म्हणतात .त्या दिवशी काही विवक्षित
पिशाच्चान्नाच देवळात अगर देवीजवळ जाण्याची परवानगी असते . ही पिशाच्चे देव नाहीत याचा पुरावा म्हणजे
रात्री बारा वाजता ती निघून जातात ; पण आम्ही देवीच आहोत असे भासवतात . खालच्या श्रेणीतील पिशाच्चांना मात्र
देवळात अगर देवळाजवळ कधीच जात येत नाही .हजेरी न देण्याबद्दल किंवा कुणाची खोडी काढल्याबद्दल आम्हाला अतिशय कठोर शिक्षा देण्यात येतात .हा शिक्षा देण्याचा अधिकार फक्त उच्च श्रेणीतील पिशाच्चांना असतो . "
" आम्हाला दुसर्या कुळात जन्म घेता येत नाही व तशी आमची इच्छाही नसते . कुळ नष्ट झाले तर आजोळ घरी किंवा मुलीचे घरी नाईलाजाने जावे लागते .... आमचे श्राध्द वगैरे झाले नाही तर आमचे इष्टमित्र आम्हाला बरोबर घेऊन जातात .त्यांच्या बरोबर आम्हालाही अन्नाचा वास मिळतो ." एवढे सांगून त्या पिशाच्चाने त्या स्त्रीचा निरोप घेतला .
त्या पिशाच्चाने स्वतःच्या आश्चर्यकारक व गूढ सृस्ठीविषयी ही जी हकीकत कथन केली ती खरोखरच अद्भुत व विलक्षण आहे . साधुसंतांच्या चरीत्रातही पिशाच्चाबाद्दलच्या अनेक हकीकती वाचावयास मिळतात .
श्रीक्षेत्र गाणगापूर व श्रीनृसिन्ह्वाडी या ठिकाणी आरतीच्या वेळी पिशाच्चबाधा झालेल्या व्यक्ती घुमू लागतात व पुष्कळदा तर त्यांच्या अंगातील पिशाच्च श्रीदत्तात्रेयांना ' दत्याsssss ' अशी हाक मारतानाही पहावयास मिळते .
प्राचीन ग्रंथानपैकी " तैत्तिरीय उपनिषदा”त माणसाच्या देहासाम्बंधी विस्र्तुत चर्चा केली असून जीव मरणोत्तर कोणत्या देहात राहतो , या संबंधी माहिती देण्यात आली आहे . आपला आत्मा ४ देहाचा बनला असून हे देह एका खोक्यात एक खोका ठेवावा तसे ठेवलेले असतात .
पहिला अन्नमय कोष . आपले शरीर हाच अन्नमय कोष. हा अन्नावर पोसला जातो म्हणून याला अन्नमय कोष असे म्हणतात .आपला हाडामासाचा देह हाच अन्नमय कोष होय ..
दुसरा प्राणमय कोष . हा अत्यंत विरळ द्रव्यांचा बनलेला असल्यामुळे हा आपल्या डोळ्यांना दिसत नाही .अन्नमय कोशाच्या आत प्राणमय देह ठेवलेला असतो . याचा आकारही जवळ जवळ अन्नमय देहा एवढाच असतो . हे वासनांवर जगते .
तिसरा मनोमय कोष . प्राणमय देहाच्या आत हा कोष असतो . हा प्राणमय कोशाहुनही विरळ असतो . याचा आकार
हाताच्या अंगठ्या एवढाच असतो .याला कारणदेह असेही म्हणतात . हे विचारांवर जगते .
आणि चौथा महाकारण देह . मनोमय कोशाच्या आत हा कोष असतो . याचा आकार राईच्या दाण्या एवढा असतो . योगी ,महायोगी , सिद्धपुरुष या देहाशी तादम्य पावतात .यातल्या तिसर्या आणि चौथ्या कोषा बद्दल अधिक माहिती सांगणे योग्य ठरणार नाही . आणि तो आपला विषयही नाही . तो अत्यंत गहन आणि अत्यंत विषय आहे.
हा तर....
मनुष्य मेल्यानंतर त्याचे शरीर , म्हणजे पहिला अन्नमय कोष गळून पडतो आणि बाकीचे एकात एक ठेवलेले कोष भूर्वलोकात तरंगत राहते .पिशाच्चांचे शरीर हे प्राणमय कोष असते . ते वासनांवर जगते . मृत व्यक्तीकडे ज्या प्रमाणे
पापपुण्याच्या आणि वासनांच्या राशी असतील त्याप्रमाणे त्याचा प्राणमय देह त्या त्या योनीत प्रवेश करतो व
त्या त्या योनीतील रूपे धारण करतो .
उदाहरणार्थ :- पिशाच्च , प्राणी , पक्षी, कीटक योनी इत्यादी .. पुण्यवान व्यक्ती स्वर्गात जाते तर पापी व्यक्ती अंधकार
लोकात शिक्षा भोगत बसते . हा अंधकार लोक म्हणजेच पिशाच्च सृष्टी .
मृत मनुष्य एखादी अतृप्त वासना पूर्ण करून घेण्यासाठी किंवा जिवंत आत्म्याला संदेश देण्यासाठी त्याच्या समोर प्रकट
होण्याचा प्रयत्न करते .अशा वेळेस ते दृश्य रूप घेण्यासाठी जिवंत माणसाच्या शरीरातील ectoplasm नावाचे द्रव्य खेचून घेऊन तो आपल्या विरल शरीराभोवती थापटून घेतो व त्यामुळे तो त्याचे अदृश्य अश्या विरल द्रव्याचा बनलेला प्राणमय कोष हा काही काल दृश्य होऊ लागतो .
इन्फ्रा रेड फिल्मच्या सहाय्याने भूताचे काही छायाचित्र काढण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत . सायकलिक रिसर्च
सारख्या कंपन्यांनी ते प्रसिध्द ही केले आहेत . अशा प्रकारे बाहेरील ectoplasm खेचून घेऊन ते स्वतःच्या विरल शरीराभोवती थापटून बराच काल घन स्वरुपात राहणे काही थोड्या पिशाच्चांनाच साधते व ती तुमच्या - आमच्या सारखीच जिवंत माणसाशी व्यवहार करतात . पण त्यातही गोम अशी आहे ,की या उसन्या घेतलेल्या द्रव्यावरून त्यांचे
चित्त थोडे जरी विचलित झाले तरी ते द्रव्य चटकन विरून आपल्या मुळ स्थितीत जाते व त्याच क्षणी पिशाच्चही अदृश्य होते.

1 comment:

  1. अजिबात bouncer नाही गेली आणि अगदी बरोबर लिहिले आहे. ह्याचा त्याच्या तोंडून ऐकलेल्या, अडाणी , बुद्धीहीन लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा, योगी साधक काही संतांच्या चरित्रात सांगितलेल्या आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवावा. त्याने अलौकिक सृष्टीची माहिती मिळेल.

    ReplyDelete