Thursday, May 28, 2015

पापी... एक गूढ सत्य भाग चौथा

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय दुसरा नंबर्स आणि चिन्ह

भाग चौथा

ती छोटीशी खोली मधोमध ठेवलेल्या मेणबत्त्यांनी आणि धुरांनी भरलेली होती एक वेगळ्याच प्रकारचं सावट त्या खोलीत पसरलं होतं... त्या खोलीच्या भिंतीवर काही चित्रविचित्र चिन्ह आणि अक्षरं बनवलेले होते... त्या खोलीच्या मधोमध बनवलेल्या वर्तुळात एक माणूस बसलेला होता... खरं म्हणजे त्या माणसाचा चेहरा एकदम साधा होता... त्याचे डोळे बंद होते पण त्याचं तोंड पुटपुटल्या सारखं सुरु होतं... कदाचित तो व्यक्ती मंत्रोच्चारण करत होता...

त्या व्यक्तीच्या समोर दोन हाडं एक क्रॉस करून ठेवलेले होते... काही वेळाने तो सारखा सारखा जवळ ठेवलेल्या भांड्यातल्या भस्माला चिमटीतून उचलून त्या हाडांवर फेकायचा... काही वेळ वारंवार हे केल्यानंतर त्याने आपले डोळे उघडले... आणि त्याच्याच जवळपास अजून एका भांड्यात ज्यामध्ये रक्त भरलेलं होतं... ते रक्त घेवून तो त्या हाडांच्या बाजूला वर्तुळाकार शिंपडत राहिला... ३ चक्कर मारून झाल्यावर काही रक्त तो त्या हाडांवर पण शिंपडायचा, हे तो तोपर्यंत करीत राहिला जोपर्यंत भांड्यातील पूर्ण रक्त संपत नाही...

आता ती व्यक्ती उठून उभा राहिला आणि एकटक तिथे पाहायला लागला, जसं काहीतरी होणार आहे... लवकरच त्या हाडांमधून आगीचा भडकाव उठायला लागला... पण ती व्यक्ती ह्याहीपेक्षा जास्त अनुमान लावत होती... त्या आगीचा भडकाव पिवळा नसून काळा होता... लवकरच तो आगीचा भडकाव घराच्या छपरांना शिवायला लागला...

तो लगेच आपल्या गुढग्यांवर बसून नमस्कार करण्यासाठी झुकला आणि त्याच्या तोंडून शब्द निघाले, "माझे मालक, माझे महाराज... तुमच्या येण्याचे मी तुमचा सेवक स्वागत करत आहे..."

तो ती आग शांत होईपर्यंत तसाच राहिला आणि आग विझल्यानंतर तो तिच्याजवळ आला... ती हाडं अजूनही तशीच होती जशी काही वेळापूर्वी ठेवल्या होत्या... पण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आणि एक वेगळीच चमक होती... काही तरी मिळवण्याचा आनंद, जो कि त्याच्या किती तरी वर्षांच्या परिश्रमाचं फळ होतं... आज एवढ्या वर्षांनी त्याची पूजा पास झाली होती... आज तो क्षण लांब नव्हता त्याच्या कित्तेक वर्षाचं स्वप्न पूर्ण होणार होतं...

आता तो माणूस त्या वर्तुळातून बाहेर पडला आणि खोलीतील एका कोपऱ्यात ठेवलेल्या बेड जवळ गेला... बेडवर बसून जवळ टेबलावर ठेवलेला एक सुरा त्याने उचलला आणि त्या सुऱ्याने त्याने आपल्या छातीवर एक क्रॉसचा निशाण बनवला.. निशाण बनवून त्याने तो सुरा जिथून उचलला होता तिथेच पुन्हा फेकून दिला... आणि तो त्या पलंगावर असा पहुडला जसं कि केवढा थकला आहे... त्याच्यावर सुऱ्याच्या जखमेचा लवलेश मात्र जाणीव हि झाली नाही... तो पहुडल्या पहुडल्या लगेच गाढ झोपला... त्याच्या छातीवरून रक्त वाहत आता जमिनीवर पोहोचलं होतं पण त्या माणसाची शुद्धच जणू हरवली होती...

क्रमशः...

No comments:

Post a Comment