Friday, May 29, 2015

मित्रानो कधी हॉस्पिटल च ऑपंरेशन थीएटर पाहिलं आहे का. जेव्हा एखादा रुग्ण मरण पावतो तेव्हा त्याच्या हाताला एक सफेद रंगाची फीत बांधली जाते आणि त्यावर मृताची माहिती लिहलेली असते. आणि शव हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवले जाते जोपर्यंत नातेवाईक ते ओळख पटवून घेण्यासाठी येत नाहीत.
तर हि कथा आहे एका डॉक्टर ची एकदा तो रात्रीच्या शिफ्ट ला होता. नुकतच ऑपंरेशन उरकून तो हॉस्पिटलच्या तळमजल्यावर असलेल्या डॉक्टर रूम मध्ये जाण्यास निघाला. पाचव्या माळ्यावर तो लिफ्ट साठी थांबला होता लिफ्ट १० व्या म्हणजेच शेवटच्या माळ्यावर होती जिथे हॉस्पिटल चे शवगृह होते . एक एक माळे खाली येत लिफ्ट ५ व्या माळ्यावर येवून थांबली. दरवाजा उघडला तसा त्याला समोर एक महिला पेशंट दिसली तीने डॉक्टरांना बघून स्मित हास्य केले. डॉक्टर ने सुधा एक स्मित हास्य त्या पेशंट कडे बघून दिली आणि आत शिरले आणि तळमजल्याचे बटन दाबले.
लिफ्ट खाली जाऊ लागली डॉक्टर त्या महिला पेशंट शी काही बोलणार इतक्यात लिफ्ट ३ र्या माळ्यावर थांबली डॉक्टरांचे लक्ष दरवाजाकडे गेले दरवाजा उघडला तसे डॉक्टरांचे डोळे पांढरे पडले कारण समोर अजून एक महिला पेशंट उभी होती. डॉक्टरांना काहीतरी आठवले व क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लिफ्ट बंद होण्याचे बटन दाबले आणि त्या घाईत पुन्हा १० व्या मजल्याचे बटन दाबले गेले.
लिफ्ट आता वर जाऊ लागली डॉक्टर खूप घाबरले दिसत होते. त्यामुळे न राहवून बाजूला उभ्या असलेल्या महिलेने त्यांना विचारले डॉक्टर एवढं झाल तरी काय घाबरायला आणि तुम्ही त्या बाईला आत का नाही येवू दिलात.
डॉक्टरांनी स्वताचा श्वास सावरला आणि म्हटलं अहो बाई तुम्ही त्या महिलेला नीट पाहिलात नाही का ती तीच महिला होती जिच ऑपंरेशन करून मी नुकताच बाहेर आलो पण काही कारणास्तव मी तिला वाचवू शकलो नाही आणि ती मेली. तुम्ही तिच्या हातात ती सफेद रंगाची फीत नाही पहिलीत का. आम्ही ती माणस मेल्यावर त्यांच्या हातात बांधतो आणि तिच्या हातात सुधा मीच फीत बांधली होती
ती महिला हसली आणि तिने आपला हात वर केला आणि म्हणाली हो माहित आहे डॉक्टर हि बघाना सकाळी एका डॉक्टर ने माझ्या हातात सुधा अशीच बांधली होती. एक स्मशान शांतता आणि लिफ्ट १० व्या माळ्यावर जाऊन खुलते आणि आत मध्ये एक निपचित पडलेला डॉक्टर असतो.
समाप्त

No comments:

Post a Comment