पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी
कथा)
अध्याय तिसरा विधी
अध्याय तिसरा विधी
भाग ८
“अरे देवा...” खुनाच्या ठिकाणी पोहचून आणि
तिथलं दृश्य पाहून डॉ. अवधूतच्या तोंडून हे उद्गार निघाले.
जसं त्या मुलीचा मृतदेह तो खुनी सोडून
गेला होता ती त्याच अवस्थेत खोलीच्या मधोमध सिलिंग पंख्याला लटकलेली होती... तिच्या
डोळ्यातून बुबुळ बाहेर निघाले होते… तिला पाहूनच कोणीही सांगू शकतं कि
त्या मुलीने मरणापूर्वी किती वेदना सहन केल्या असतील…
“हा खुनी आता खूप भयानक होत जात आहे…” डॉ.
अवधूत मृतदेह पाहताच उद्गारले…
“हो पण ह्यावेळी काही तरी नवीन आहे जे,
आपण ह्या पूर्वी कधीच पाहिलं नाही…” संत्या बोलला…
“काय…?” शिऱ्या आणि डॉ. अवधूत दोघांनी
एकत्र प्रश्न केला…
“शिऱ्या तू गेल्या १० वर्षात झालेल्या
खुनाच्या फाईल्स पूर्ण वाचल्या आहेत...?"
“हो मग…”
“शिऱ्या तू त्या फाईल्स एकदम व्यवस्थित
आणि नीट नाही पाहिल्यास किंवा वाचल्यास, लक्षपूर्वक बघ ह्या मुलीची हत्या तिच्या
पोटात चाकू खुपसून झाली आहे, जे आज पर्यंतच्या एकाही खुनात झालेले नाहीये…” संत्या
मुलीच्या पोटाजवळ इशारा करत म्हणाला…
“तुम्ही दोघांनी मला अजून पर्यंत नाही
सांगितलं कि खुनी गेल्या १० वर्षांपासून हत्या करत आहे ते…!!” डॉ. अवधूत चमकत
बोलले…
“क्षमा करा आम्ही सांगायला विसरलो कि
गेल्या १० वर्षात असले ५ खून झाले आहेत, पण त्यामध्ये ह्या प्रकारे हत्या कधीच
करण्यात नाही आली…” संत्या शवाकडे बोट दाखवत बोलला…
“आज पर्यंत त्या खुन्याने मुलीचा गळा
कापून किंवा छातीत चाकू खुपसून हत्या केली आहे, जे ह्या आधीच्या दोन हत्यांमध्ये
झालं आहे, पण ह्या प्रकारे आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत…”
“ह्याचं एकच कारण आहे कि आज पर्यंत त्या
खुन्याची जी काही उद्दिष्टे होती त्यामध्ये तो यशस्वी होत नव्हता… कदाचित तुम्हाला
माहिती असेल कि ३ हि संख्या काळ्या जादू करणाऱ्याला खूप फायदेशीर असते… ३ ह्या
संख्येचा तो तेव्हाच वापर करतो जेव्हा त्याला स्वतः वर पूर्ण विश्वास असेल कि तो जे
काही काम करत आहे ते पूर्ण होणारच…. कदाचित गेली कित्तेक वर्ष तो ह्यामध्ये यशस्वी
झाला नसेल… त्यामुळे ह्यावेळी हा तिसरा खून ह्या प्रकारे झाला आहे…” डॉ. अवधूत त्या
मृतदेहाच्या अवतीभोवती फिरत नीट पाहत बोलला…
“असं काय खास आहे ह्या ३ संख्या मध्ये…?”
संत्याने हा प्रश्न विचारला…
“प्रत्येक माणसाचं जीवन ह्या नंबर्समध्येच
गुंतलेलं आहे… खरतर अंकशास्त्र खूप आधी पासून आपल्या अवतीभोवती आहे… ती फक्त काळ्या
जादूमध्येच महत्व ठेवते असं नाही, ती कुठेही कधीही उपयोगी पडते… राजा, वैज्ञानिक,
कलाकार, संगीतकार, नेते किंवा आपल्या क्रिकेटर्स लोकांचं उदाहरण घ्या… हि लोकं
नंबर्सना खूप महत्व देतात… खूप मोठ्या वैज्ञानिकां पैकी एक सर इसाक न्यूटन, ३ ह्या
संखेला खूप मानत होते…”
“७ हि संख्या खूप चांगली आणि एक विलक्षण
संख्या आहे, हिंदू ह्याचा उपयोग लग्न कार्यासाठी करतात… मुस्लिम त्याचा उपयोग
आपल्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी करतात… खूप सारे असे उदाहरणं आहेत, आणि ह्या
विश्वात अशी कोणतीच वस्तू नाही जी संख्यांपासून वेगळी राहू शकते…”
“तुम्ही त्या इजिप्तमध्ये बनलेल्या
पिरामिड्स पाहिल्या आहेत काय…?” डॉ. अवधूतने त्यांना प्रश्न केला…
“हो मी पाहिला आहे मी एकदा इजिप्तमध्ये
गेलो होतो..” शिऱ्या बोलला...
“तर मला हे सांग कि पिरामिड्समध्ये किती
बाजू आहेत!!…”
“चार" शिऱ्याने पटकन उत्तर दिलं …
“हि एक मूळ चूक आहे… खरंतर पिरामिडचं बेस
तर तुम्ही पकडतच नाहीत, ती पण तर एक बाजू आहे… ह्याचा अर्थ असा कि हि पण एक ऑड
संख्या आहे… आणि एक गोष्ट पिरामिड त्रिकोणमध्ये बनला आहे… हा पण एक ऑड नंबर आहे…
आजही पिरामिडशी प्रेरित होवून सर्वीकडे इमारती बनवल्या जातात..., कारण फक्त
ह्याच्यासाठी त्या इमारतीचा आकार असा राहिला पाहिजे कि त्या मध्ये शक्ती राहिली
पाहिजे…”
“तुम्ही दोघांनी एक डॉलरची नोट तर पाहिलीच
असेल…. ज्या मध्ये अंधुक अश्या पिरामिडच्या ३ बाजू दिसतात… आता ह्या मध्ये तर काहीच
योगायोग नसू शकतो ना...." डॉ. अवधूत आपल्या चेहऱ्यावर स्मिता आणत बोलले...
“आपण आपल्या जवळपासच्या वस्तूंवर लक्ष
नाही देत, अंकशास्त्र पाहिल्या पासूनच आहे... आजही आहे आणि उद्याही राहणार, बस आपण
ते पाहणं बंद करतो..., अंकशास्त्र काळ्या जादुमध्ये उपयोगी पडते…” डॉ. अवधूत अजूनही
त्या मृत देहावर काही सापडतं कां ते शोधत होते…
“आणि मी हे एकदम अचूक सांगू शकतो कि
त्याने ह्या पूर्वीही केव्हा तरी त्या मृत देहांवर असले नंबर्स काढले असतील..." डॉ.
अवधूत त्या मुलीच्या पाठीवर इशारा करत बोलले…
“ह्याचा अर्थ काय आहे…?” शिऱ्याने त्या नंबर्स आणि चिन्हांना पाहून अचंबित होत विचारले...
“हा एक म्यासेज आहे त्या आत्म्यासाठी, कि
ती आत्मा एकदा येवून त्या शरीराला भेटावं ज्यामुळे त्याला रक्त प्राप्त होईल…”
“पण ह्या चिन्हांचा काही तरी अर्थ असेलच,
जसं कि तुम्ही ह्या आधीही सांगितलं होतं…” संत्या बोलला..
"हो पण... पण जसं मी सांगितलं होतं, ह्या चिन्हांचा अर्थ
सांगणे कठीण आहे, हे चिन्ह वापर करणार्यांवरती अवलंबून असतं कि तो त्या चिन्हांचा
वापर कसा करणार आहे, तरीही ठीक आहे मी एकदा प्रयत्न करून पाहतो, मी ह्यांना लिहून
घेतो, कारण मी इथे लगेच विचार करून काहीच सांगू शकत नाही... मला थोडा वेळ
पाहिजे..." एवढं बोलून डॉ. अवधूतने ते चिन्ह आपल्या डायरीमध्ये उतरवायला लागले आणि
ते झाल्या नंतर ते इमारतीतून बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग डोक्यात असंख्य
प्रश्नचिन्ह घेवून संत्या आणि शिऱ्या पण निघाले...
'Ω, Ð, ┴ , शेवटी तो त्या आत्म्याला सांगतोय तरी काय...' डॉ. अवधूत मनातल्या मनातच पुटपुटले... शिऱ्या आणि संत्या काही तरी बोलण्यात गुंतले होते पण डॉ. अवधूतला वाटत होते कि त्यांनी हे चिन्ह ह्या पूर्वीही कधी तरी पहिले आहेत... ते आपल्या विचारचक्रात त्यांना शोधायला लागले, जेव्हा ते आपला मित्र साळुंखे सोबत अंकशास्त्र शिकत होते तेव्हाचे ते विचारचक्र होते... त्यांच्या मनात अचानक साळुंखेचे बोल ऐकायला आले...
'हे चित्र पाहिलेत का तू अवधूत...? हि एक आग आहे, आणि ती आग पिवळी नसून काळी आहे...' साळुंखे त्याला एक चित्र दाखवत बोलला...
'काळी आग इथे काही तरी डेमोनिक म्याजीक असल्याकडे इशारा करते आहे कि नाही...?' अवधूतने विचारले...
'हो पण फक्त एवढंच नाही, ज्यांना कोणाला कोणत्या आत्माला पुन्हा बोलवायचे असेल तर तो आल्या जादूच्या उपयोगाने ते करू शकतो, खरंतर ती व्यक्ती त्या जादूने त्या आत्म्याला पुन्हा एक नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ह्या काळ्या आगीचा वापर होतो... आणि हि विधी पूर्ण करण्यासाठी तीन मुलींच्या रक्ताची गरज भासते...' साळुंखे बोलले...
'काळ्या आगीपासून जन्म म्हणजेच काळ्या शक्तीशी मैत्री...?' अवधूतने विचारले...
'हो.... देवाची निंदा करणारी लोकं एकत्र येवून आपलं एक स्वतःच साम्राज्य बनवतात... देवाने सर्व काही दोन वस्तू मध्ये विभागून ठेवलं आहे... जसं कि स्वर्ग-नर्क, पुरुष-स्त्री , आणि त्या हरामखोरांनी काळ्या आगीला आपल्यासाठी पवित्र वस्तू मानलं..' एक विचित्रच भाव अवधूतच्या चेहऱ्यावर आले...
'हे माहिती करणं किती सोप्प होतं तो तर त्या साम्राज्य पैकीच कोणाला तरी एकाला बोलावत आहे... तो तर त्याचा विद्यार्थी आहे... अरे देव ह्याने कोणाच्या आत्म्याला बोलावलं आहे...' आता तर सर्व काही आरश्या सारखं साफ झालं होतं पण मनात एक विचित्र भीती यायला लागली होती, पुढच्या होणाऱ्या घटनांची कल्पना करून...
"मला माहित पडलं ह्याचा अर्थ काय आहे..." डॉ. अवधूत खूप हळू आवाजात बोलले खरे, पण लगेच संत्या आणि शिऱ्या त्यांच्या जवळ आले...
"आज तर महासागर आटणार आहे..." एवढं बोलून डॉ. अवधूत ने तो कागद ज्यावर त्याने ते चिन्ह आणि नंबर्स लिहिले होते तो कागद त्यांच्या समोर केला आणि ते पाहून संत्या आणि शिऱ्याचा चेहरा पण भीतीयुक्त भयाने व्यापलेला दिसायला लागला...
क्रमशः...

No comments:
Post a Comment