Sanjay Kamble
भाग ३..... कथा एका जन्माची
काही वेळात वाचमन आत येऊन म्हणाला.. " मालकीन बाई... माझी नात लय आजारी हाय...तीला बघायला जाव लागल.." प्रियंका काही पैसे देणार तोच वाचमन म्हणाला... पैसे आहेत मालकीनबाई...लागले तर सांगेन.. त्याच्याकडे पहात प्रियंका शंभर रुपयाची नोट देत म्हणाली... हे घ्या .. माझ्याकडून तीला खाऊ घेऊन द्या... वाचमन निघुन गेला तशी प्रियंका पुन्हा आपल्या विचारात गुरफटली.. रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रियंका अविनाशची वाट पहात बसलेली... अविनाश नेहमीप्रमाने पिऊन रात्रि उशीरा आला... तशी प्रियंका त्याला या घटना बद्दल विचारू लागली... पन पुन्हा abortion न करण्यावरून दोघामधे खुप मोठ भांडन झालं... अविनाशच्या डोळ्यात क्रौर्य दाटल होत, त्याने प्रियंकावर हात उचलला आणि पन प्रियंका काहीच ऐकण्याच्या मनस्थितीन नव्हती... तीन स्पष्टच सांगतल... " वाट्टेल ते झाल तरी मी या मुलीला जन्म देणारच..." तीच बोलन ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली...तीला फरफटत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला.. "मला कोणाचा नकार ऐकालची सवय नाही..." एवढ बोलून तो आपल्या रुम मधे येऊन दारू पित बसला... तोच त्याला एक पांढरी आकृति त्याच्यापासुन काही अंतरावर उभी दिसली... दारेच्या नशेतच तो बोलु म्हणाला... " प्रियंका तु परत इथ कशी आलीस.... तु तशी ऐकणार नाहीस..." त्याने कमरेचा बेल्ट काढत उठला तशी ती आकृति चालू लागली...तसेच बडबडत अविनाश ने तीच्या मागे चालायला सुरवात केली...ती आकृति तशीच जिन्यावरुन उतरून खाली निघाली तसा अविनाशही पडत धडपडत तीला शिवीगाळ करत चालू लागला.. इकडे... अडगळीच्या खोलीत बंद प्रियंका, तशीच त्या रुमचे दार बडवून तीथुन बाहेर काढण्यासाठी अविनाशला विणवनी करत होती...शेवटी थकुन रडत त्या खोलीत बसली होती...तीची नजर त्या खोलीला न्याहाळू लागली.. बाजूला एक जुने लागडी कपाट, एक टेबलवरील पंखा, मोडलेल्या खुर्च्या, टेबल, एक खराब सोफा.. तीन थोड निरखुन पाहिल तर त्या सोफ्या खाली एक छोटी बाहुली पडलेली दिसली... त्या बाहुली वर लालसर डाग दिसले. तीन पाहील तर ते कोणाच तरी सूकलेल रक्त होत... प्रियंकाला थोड आश्चर्य वाटल तशी ती त्या खोलीची झडती घेऊ लागली... तोच त्या लाकडी कपाटाखाली तीला एक वही पडली असल्यासारखी वाटली..तीचा हात खाली जात नव्हता तसा तीन लाकडी खुर्चीचा पाय तुटलेला भाग उपसुन काढला आणि ती वही बाहेर काढली...ती कोणाचीतरी डायरी होती... प्रियंकान डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला त्यात एक खुपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती... डायरीची पाने पलटत प्रियंका वाचू लागली.. 'आज अविनाश खुप आनंदी होते... मला दिवस गेलेत हे समजताच म्हणाले..की " 'अश्विनी'...मुलगाच हवा मला.. " मी त्यांच बोलन मनावर घेतल नाही ... ते माझी काळजी घेऊ लागलेत...' .. प्रियंकाला वाचुन धक्काच बसला... ' अविनाशच आधी लग्न झालेल..' भरल्या डोळ्याने ती पाने पलटत वाचु लागली तसे एक एक गुढ उकलू लागले... .. . ' मला आज खुप वाईट वाटल.. माझ्या बाळाच्या ह्रदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आलाय, अस अविनाशने सांगितल..' . .. . 'ते माझ्याशी खोट बोलले.. माझ बाळ व्यावस्थीत आहे पन मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्याच्या घरच्याना ते नको झालय...पन मी तीला जन्म देणारच' . . . त्यांनी मला घराबाहेर काढली.. .. . प्रियंका एक एक पान पलटत होती तस एक एक गुढ उकलत होत. . 'माझ पहले बाळंतपन माहेरी झाले...पन माझ्या माहेरचे सर्वच खुप उदास आहेत .. मुलगी झाली म्हणून नाही तर मला सासरच्यानी घरातून बाहेर काढली म्हणून..' . . 'इस्टेटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासरच्यानी मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतली..पन कोणी माझ्याशी बोलत नाही.' . . 'सासरच्यानी तीच नाव 'नकुशा' ठेवलय कारण ती यांना नकोशी झाली आहे ' . . 'घरातील नोकराना काढून टाकलय मलाच सर्व कामे करावी लागतात... आज माझी मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती, पन त्यानी मला तीला दुधही पाजु दिल नाही '... . . ' आज नकुशाचा पहीला वाढदिवस, पन साजरा करण खुप लांबची गोष्ट ..तीला तीच्या बाबाने किंवा आजी आजोबाने साध wish ही केल नाही ....' प्रियंका तशीच पान पलटत राहीली. ' आज माझ्या मुलीच्या तोंडतून पहिला शब्द बाहेर पडला आणि तो ही 'बाबा'...' ' माझी मुलगी तीन वर्षाची झाली आणी मला पुन्हा दिवस गेलेत..." . ' आज अविनाशन दुपारी नकुशाला खुप मारल.. ते घरी बेडवर आराम करत होते.. आणि नकुशान गमतीन पायाच्या तळव्यावर बोट फिरवून पळून गेली...त्याना खूप राग आला... रागाच्या भरात त्यानी माझ्या पोरीला जनावरासारख मारल. माझ बाळ,रडत रडत माझ्या मांडीवरच झेपल.. ' . "आज तीचा तीसरा वाढदिवस पन तीची तब्बेत बरी नाही... तीच अंग कालपासुन तापाने भाजतय.. पन कोणालाच तीची पर्वा नाही ... बाहेर जोराचा पाऊस पडतोय... डॉक्टरांचा फोन लागत नाही...तापाने ती झोपेत जाबडत आपल्या बाबांचीच आठवण काढतेय, तीच्या डोळ्यातून अश्रु येत आहेत.."
वाचता वाचता प्रियंकाचेही डोळे पाणावले... " आज तीन दिवस नकूशाच्या अंगात ताप आहे.. अविनाश घरी येताच त्याला बोलले पन मी abortion साठी नकार दिल्याने त्याने मला चमड्याच्या बेल्टने खुप मारले... त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडतच माझ्या आडवी आली, आणी त्याच्या समोर हात जोडून उभी राहात म्हणाली.. ' बाबा.. आईला मालू नका हो.."..पन त्याने तीला जोरात धक्का दीला तशी ती बेडच्या कोप-यावर आपटली तीच्या डोक्यावर खोल जखम झाली.... खुप रक्त येत होत... ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली पन तीचा पाय घसरला आणी जीन्याच्या पाय-यावरुन खाली पडली... तीचे आजी आजोबा समोर होते पण कोणीच तीला उचलल नाही....तीचा हात फ्रॉक्चर झालाय...."
प्रियंकाला त्या पानावर अश्रुचे सुकलेले व्रण दिसले...तीने ते पान पलटले " नकुशाच्या डोळ्यातून एकसारख पाणी येतय..तीच अंग तापान भाजतय.. डोक्यातही खोल जखम झालीये. त्यावर साडीचा पदर फाडून बांधलाय... पन तीच्या मोडलेल्या हाताला खुप वेदना होत आहेत... ती माझ्या मांडीवर डोक ठेऊन हूंदके देतेय. पन कस सांगु तीला की तीच्या वेदना पाहून माझ काळीज फाटत होत.... माझ्या डोळ्यातली पाणी बघताच रडत रडत आपल्या बोबड्या शब्दात मला म्हणाली... 'आई तू कशाला ललतेस ग..' एवढ बोलून नकुशा उठली आणि माझ्या पाठवर उठलेले वळ पहात त्यावरून आपला एक हात फिरवत म्हणाली ' आई तुला पन खुप दुखतय का ग.' तीच्या बोबड्या शब्दाने काळीज आणखीनच तुटतय. काय करू देवा...' वाचता वाचता प्रियंकाच्या डोळ्यातून अश्रु आले.. तीने आणखी एक पान पलटले.. ' मी आज नाईलाजान abortion करायला गेले होते... करण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणार म्हणालेत...घरी यायला रात्र झाली ... पन घरी परत असताना बागेच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला..' मला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत ठेवल.. आत गेले तसे वेदनेन 'आई...ग आई..ग' म्हणत कळवळणा-या नकुशाचा आवाज आला... मला पहाताच तीला आणखीच हूंदका आला... ती खाली रडत बसलेली... आपला मोडलेला हात किंचीत पुढे करत केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात म्हणाली. "आई ...खुप दुखतय ग..." तीचे पाणावलेले डोळे पाहून गहीवरून आल..तीला जवळ घेत मी पाहील तर तीचा हात सुजून काळा निळा पडू लागला होता... तीन वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याश्या जीवाला किती ह्या यातना... आज पहील्यांदा वाटल की का जन्म दिला असेल तीला...तीची अवस्था पाहून हूंदका आवर कठिन झाल होत... मी मदती साठी जोरजोरात दरवाजा वाजवून अविनाशला बोलवू लागले... तो गाढ झोपेतून उठून आला...खुप राग आला होता त्याला... मी त्याच्या पायावर डोक ठेऊन नकुशाला दवाखान्यात नेण्यासाठी विणवनी करु लागले.. पन त्याने मला पुन्हा बेदम मारला.. माझ ओरडन बंद करण्यासाठी माझे हात पाय बांधुन तोंडावर पट्टी बांधली, माझ ओरडन शांत झाल तसा तो नकुशाकडे वळला...' प्रियंकाने आपल्या डोळ्यात आलेले अश्रु स्वच्छ करत पान उलटले... हे पान सुकलेल्या अश्रुनी जड झाले होते... कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जसा च्या तसा तीन उतरवला होता.. तो नकुशा जवळ गेला.. तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून हूंदके देत त्याला म्हणाली... "बाबा... ओ बाबा आईला शोला हो... मला डॉक्टल अंकल कले नका नेऊ पन आईला शोला... माझा हात आता बला झाला.. माझा हात आता नाही दुखत.....' नकुशाच बोलन ऐकत तो खाली बसत म्हणाला... 'आता हात नाही दुखत' अस म्हणत त्याने नकुशाचा मोडलेला हात आपल्या हातात घेत जोरात दाबला.. तशी माझी मुलगी जीवाच्या आकांताने कळवळली... ढसाढसा रडता रडता केविलवाण्या नजरेने आपल्या बाबाकडे पहात ती बोबड्या शब्दात म्हणाली...' बाबा ओ बाबा... तस कलू नका हो.. खुप दुखतय ... मी पलत कदी कदी तुम्हाला त्लाश देणाल नाही..." तीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रु तीच्या इवलाशा जीवाला होणा-या यातना सांगत होते.. प्रियंकाला हूंदका आवरण कठिन झाल आपले अश्रु पुसत ती पुन्हा वाचु लागली.. अविनाशने तीचा मोडलेला हात आणखी जोरात दाबला तसे नकुशाने विव्हळत भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात मला म्हणाली...' आई.... तु तली शांग की ग बाबाना...खुप दुखतोय ग माझा हात...' तीच्या डोळ्यातल्या यातना पहावत नव्हत्या.. मी ही रडत होते माझे हातपाय बांधल्याने उठताही येत नव्हत.. माझ डोक मी जमीनीवर आपटत त्याच्या कडे नकुशाच्या जिवाची भीक मागत होते... पन कुणाच्याच काळजाला पाझर फुटत नव्हता... तशीच रांगत,सरपटत तीच्याकडे जाऊ लागले... नकुशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमान फिरवत म्हणाली.. " बाबा... माझ काय चुकल हो.... मी पलत तुमच्या पायाला गुदगूल्या नाही कलनाल....." तीच बोलन ऐकताच अविनाश म्हणाला.. " तुझ चुकल या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस हे... माझ्या आई बाबाना वंश चालवायला मुलगा हवा होता..." एवढ बोलुन त्याने माझ्या नकुशाचा मोडलेला हात पकडून खसकन जवळ ओढली ... एखाद्या गाईच वासरू जिवाच्या आकांतान जोरात हंबरावे तशी नकुशा ओरडू लागली... तीचा टाहो ऐकुन काळीजच फाटल... तोच तीला खाली जमीनी वर पाडले... आपल्या दुस-या हाताने तीच नाक आणी तोंड दाबुन धरल .. ती टाचा घासत होती, तडफडत होती... तीच्या शरीराला होणा-या यातना पाहुन मी ही तडफडत होते.. माझी लेक गुदमरून टाचा घासत होती तस माझ्या काळीजाच्या चिंधड्या होऊ लागल्या... पन त्याला दया आली नाही.. मी सरपटत येऊ लागले पन तोवर तीचा धडपड शांत झाली.. इवलासा जीव तीच्या देहातून निघून गेला होता... मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पहात होते... अविनाश निघून गेला... पन माझ्या लेकीच्या देहापुढ आपल डोक आपटत होते... तशीच सरपटत पुढ आले आणि तीच्या छातीवर डोक ठेऊन रडू लगले... तीला आता वेदना होत नव्हत्या... तीचे डोळ उघडेच होते... अस वाटत होत की झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरेल... पन ती आता कधीच उठणार नव्हती... खाली जमीनीवर पडलेल तीच प्रेत पाहाताना तीच तीचा एक एक शब्द आठवत होता... " आई... आपल्या घलात कोणीच का माझ्याशी बोलत नाही... एक दिवश मी पन कोनाशीच बोलनाल नाही..." ती आता कोणाशीच बोलणार नाही, अगदी तीच्यावर जिवापाड प्रेम करणा-या आईशी पन.. . . . माझे हात कसेबसे सोडवून मी ही डायरी लिहीतेय...तीच प्रेत माझ्या मांडीवरच आहे... माझ्या मुलीचा खुन त्यानी माझ्या समोर केलाय त्यामुळे ते मला जीवंत सोडणार नाहीत ... पन ही डायरी त्याला फासावर चढवेल.. या नंतरची सर्व पाने रिकामी होती...

अविनाशच हे भयंकर रूप प्रियंकासमोर आल तशी ती खुप चिडली... अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पानावर काही शब्द उमटू लागले... प्रियंका निरखुन पाहात वाचू लागली... ' माझाही गळा बेल्टने आवळून अविनाश ने मला ठार केल...घरच्या वाचमन आणि अविनाशने आम्हा दोघीच प्रेत बागेतील त्या खड्यात पुरून त्यावर नारळीच झाड लावल.. आमची शरीर संपली पन आत्मे या घरात तसेच फिरत आहेत... माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेतेय. मी माझ्या लेकीसाठी खुप तळमळले... आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल... पन मी नेहमी तीच्या सोबत असेन तीला प्रत्येक संकटातून वाचवायला ....' उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले... वाचता वाचता पहाटे तीला डोळा लागला.. कसल्याशा आवाजाने प्रियंकाला जाग आली... सकाळ झाली होती. बाहेर पोलीस होते.. त्यानी प्रियंकाला बाहेर आणून बसवत म्हणाले... " माफ करा madam पन काही प्रश्न विचारावे लागतील.. तुम्ही त्याना ओळखु शकाल..." ते काय बोलत आहेत तीला काही समजत नव्हत...तोच एक लेडी काँन्स्टेबल म्हणाली... " madam..त्यांचे चेहरे झाकले होते का.." प्रियंका प्रत्येकाकडे आश्चर्याच्या मुद्रेने पाहात होती...काय बोलाव तीला सुचत नव्हत.. तोच ती लेडी काँन्स्टेबल सब इन्स्पेक्टर ना म्हणाली.. " सर त्या शॉक झाल्या आहेत ... ही केस खुपच काँम्प्लिकेटेड आहे मागिल दिड वर्षापुर्वी याच बंगल्यातील बाई आणि तीची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती... ती वेडी होती अशी कम्प्लेन्ट तिच्या सास-याने दिली होती त्या नंतर वर्षभरात याच बंगल्यात तीन खुन झालेत आणि हा चौथा.... तोच बाजुला उभा दुसरा काँन्स्टेबल म्हणाला.." साहेब.. मला तर वाटते की हे खंडणी साठी झाल असाव.." त्याच बोलन ऐकून सब इन्स्पेक्टर म्हणाले.. " जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्यावर ताण कशाला देत.." त्यावर तो काँन्स्टेबल म्हणाला " अगदी बरोबर बोलताय सर.. पन तुम्ही कशाबद्दल बोलताय...." त्यावर त्याच्या थोड जवळ जात इन्स्पेक्टर म्हणाले.. " मी तुमच्या बुद्धि बाबात बोलतोय... कारण ..जर खंडणी साठीच खुन झालेत तर मग इथल्या वाचमनला मारायची काय गरज होती..." काय झालय हे प्रियंका पहायला बाहेर गेली तर त्या नारळीच्या झाडाखाली अविनाशचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पडला होता... त्याच्या कडे पहाताच प्रियंका गावच्या गुरवानी सांगितलेले कोडे उकलले... 'जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही..' करण आई इतके शक्तीशाली जगात कोणीच नाही... प्रियंकाच्या चेह-यावर एक समाधान होत... एका राक्षसाचा अंत झाला, आणि तीच्या मुलीला आता जन्म घेण्यापासुन रोखणार कोणीच नव्हत... कदाचित म्हणूनच एक वाक्य नेहमी ऐकायला मिळत... ' तीन्ही लोकाचा नाथ,,, आई वीना भिखारी.'
धन्यवाद.....!!!
No comments:
Post a Comment