Saturday, May 30, 2015

देव उपासना भाग १२

देव उपासना
भाग १२
(तापोळा महाराष्ट्रातील सर्वात घनदाट जंगल) तापोळ्याच्या जंगलात रात्रीच्या वेळी कोणत्या माणसाचं अस्तित्व असणं एक विचित्र गोष्ट आहे. पण जेव्हा प्रेमाने ओथंबून भरलेलं हृदय जंगलात फसलं तर काय करू शकतात.
"हे आपण कोणत्या संकटात सापडलो संतोष...?" संगीता चिंतीत होत बोलली.
"घाबरू नकोस संगीता... भगवंत जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो.." संतोष बोलला
"काय चांगलं आहे ह्यामध्ये... सकाळ पासून आपण भुके-तहानलेले इथे भटकत आहोत... आपल्यांना हे देखील माहिती नाही कि, आपण कुठे आहोत आणि कुठे जात आहोत..." संगीता निराश होत बोलली.
"असं मन छोटं करून काहीच भेटणार नाही संगीता... नाहीतरी आपल्यांना घरातून पळून जायचेच होते..." संतोष थोडा मिश्किल हासत बोलला.
"पण अचानक तर नाही ना... आणि ते पण ह्या जंगलाच्या रस्त्याने तर मुळीच नाही, काय रे संतोष तुला माहिती तरी आहे ना हे जंगल किती भयावह, किती खतरनाक आहे ते..." संगीता त्याच्या पुढे पुढे चालत बोलली.
"थांब..." संतोष बोलला.
"आत्ता काय झालं...?" संगीता दचकून मागे वळली.
"हे झाड ठीक राहील... चल रात्र ह्याच झाडावर काढायची... मग सकाळी बघू काय करायचे आहे ते...??" संतोष विचार करत बोलला.
"काय...? पूर्ण रात्र आपण ह्या झाडावर काढायची.." संगीता अचंबित होत बोलते. वाड्यात राहणाऱ्या संगीतासाठी हे सर्व एक विचित्र गोष्ट होती. ती खूप चिंताक्रांत आणि भयभीत आहे. पण प्रेमापायी सर्व काही करत होती.
"आपल्यांना गावाच्या दिशेने पाळायला पाहिजे होतं... आपण काल का ह्या जंगलाच्या रस्त्याने आलो..??" संगीता बोलली.
"आता आलो तर आलो... ह्या गोष्टी सोड आणि चल पटापट झाडावर चढ... कोणता जंगली जनावर आला तर आपल्या दोघांची चटणी बनवून खावून टाकेल..." संतोष बोलला...
"मला घाबरवू नकोस संतोष... मी पहिल्यापासूनच खूप घाबरलेली आहे..."
"अच्छा ठीक आहे... आता लवकर चढ..." संगीता कशी-बशी झाडावर चढते. ती चढल्यानंतर संतोष पण झाडावर चढतो. दोघेही झाडावर एका रुंद फांदी वर बसतात आणि दीर्घ श्वास सोडतात.
"ते दोघे कुठे असतील संतोष...?" संगीता पुन्हा चिंतीत स्वरात त्याला विचारते.
"माहिती नाही... होते तर आपल्या मागोमागच पण जंगलात घुसताच न जाणो ते कुठे गेले..."
"हे तर मला पण माहिती आहे... मी हे विचारतेय कि आता ते दोघं कुठे असू शकतात..."
"कोणास ठावूक कदाचित तेही आपल्याच सारखे जंगलात भटकत असतील... ह्या जंगलातून निघणं वाटतंय एवढं सोप्पं नाही आहे."
"मग आपण कसं निघणार इथून...??"
"निघणार, जरूर निघणार... मी बोललो सोप्प नाही आहे... पण एवढं कठीण पण नाही आहे... मी आहे ना तुझ्यासोबत..."
"मला भूक लागली आहे संतोष...?"
"आता रात्री काही मिळणं कठीण आहे... मी खाली उतरून काही तरी बघतो... कदाचित कोणत्या तरी फळांच झाड सापडेल..."
"नको नको तू आत्ता खाली नको जावूस... मला एवढी पण भूक नाही लागली आहे..."
"खोटं बोलतेस ना... सकाळ पासून काहीच नाही खाल्लस आणि वरून बोलतेस एवढी पण भूक नाही लागली. मी पूर्ण रस्त्यात सर्वीकडे पाहिलं पण कोणतंच फळाच झाड दिसलं नाही... एकदा पुन्हा इथे पण बघतो...?"
संगीता संतोषकडे पाहून स्फुंदत रडायला लागते, "नको कुठेच नको जावूस मला खरोखर भूक नाही लागली आहे..."
संतोष पुढे होवून संगीताच्या चेहऱ्याला हातांनी पकडून तिच्या कपाळावर एक चुंबन देतो आणि बोलतो, "तू चिंता नको करूस... सगळं काही ठीक होईल... उद्या सकाळी सर्वात पहिले तुझ्या खाण्याची व्यवस्था करतो..."
"पण संतोष ते शेतात काय होतं...?"
"काय माहिती... मी स्वतः असलं काही पहिल्यांदा पाहिलं होतं..."
"ते दोघेही ठीक तर असतील ना...?"
"हो-हो ठीक असतील... ते पण तर आपल्या सोबतच जंगलात घुसले आहेत... तू काळजी नको करूस..."
"ह्या जंगलाविषयी खूप वाईट वाईट अफवा पसरलेली आहे संतोष..."
"हे सर्व सोड संगीता आणि आपली वार्ता कर..."
"तुला असल्यात पण प्रेम सुचत आहे...?"
"मनात प्रेम जिवंत ठेव संगीता... आपल्याकडे हीच तर सर्वात बहुमोल शक्ती आहे."
क्रमशः

No comments:

Post a Comment