Wednesday, May 27, 2015

मी तुम्हाला अनुभव सांगण्यासाठी पुन्हा एकदा आलोय.

नमस्कार प्रेक्षक मंडळी मी कु. संतोष दिवाडकर राहणार कल्याण. बर्याच महिन्यानंतर मी तुम्हाला अनुभव सांगण्यासाठी पुन्हा एकदा आलोय. ही कथा आहे मावळ तालुक्यातील शिळीम गावातील.
दोन वर्षापुर्वीची गोष्ट आहे मी आणि माझे 3 मावस भाऊ असे आम्ही चौघे जण जवळच्या कातकर वाड्यावर गोंधळ घालण्याकरिता गेलथो. आम्ही गोँधळी असल्याने आमच्याजवळ संभळ,तुनतुणं, होतं. आमचं सर्व साहित्य आमचा काकानी अगोदरच तिकडे नेऊन ठेवलं होतं. तारिख होती मे च्या पहिल्याच आठवड्यातली. संध्याकाळी 7 ला गोँधळ होता. सचिन म्हणजे माझा मोठा मावस भाऊ त्याने चौक भरला,देव मांडले. त्यानंतर काडी कुडापणे काढले आणि आम्ही गोँधळाला सुरुवात केली. उत्तम गाण्यांच्या आधारावर आम्ही खुप गर्दी जमवली. अनेकांच्या अंगात वारं घुमत होते. इतक्यात एका बाईचा अंगातील वारं किँचाळु लागलं. आमच्यासाठी या गोष्टी नविन नाहित पण ती माझा कडे बघुन किँचाळत होती व त्यामुळे जमाव माझाकडे पाहत होता. माझा मावस भावांना प्रकार समजेना. आणि या मुळे माझा अंगाचं काफरं झालतं. मी मनात विचार करु लागलो," माझाकडुन काय चुक झालीये? पण मी काय चुक करणार मी तर गाणीचं म्हणत होतो.चौक तर सचिनभाऊनी लावलाय". त्या कातकरवाड्यावर वीजेची सोय नसल्याने केवळ दिवटी आणि बत्तयांच्या उजेडावर कार्यक्रम चालला होता. वाड्यावर जेमतेम 4 घर तर आजुबाजुला नुसती झाडी आणि चिनभीन अंधार. आकाशात चांदणं आणि मध्ये मध्ये येणारी ती थंड हवेची झुळुक आणि त्या हवेने भुरभुरणार्या जळत्या दिवटीचा आवाज असे त्या वाड्यावरील भयावह वातावरण मला आणखीणच भवर्यात पाडणारे होते.
अशा वातावरणात त्या अंगात आलेल्या वार्याने मला म्हटले,"हा कार्यक्रम झाला की कुठे जाणार तु?". मी घाबरलो व मला समजली माझी चुक व घाबरतंच म्हटलं "कुठं नाय मावले हिकडंच मुक्काम". त्यावर ती म्हटली,"अरे ती शक्ती तुझापुढे चालणार नाय तु काळजी नको करु. आणि आता वरल्या बाजुला फिरु पण नको बघ. शांतपणे झोप बघ. तुला कळेन नंतर मला काय बोलायचंय ते. हि दया घे आणि झोपताना उशाला ठेव बघ". गोँधळ झाल्यानंतर जेवण करुन आम्ही त्याच वाड्यावर झोपलो.
रात्री मला एका ठिकाणी जायचे होते पण मी गेलो नाही. दुसर्या दिवसाची सकाळ उजाडली आम्ही आंघोळ व नाश्ता करुन गावाकडे निघालो तोच तिथल्या एका मुलाने मला विचारले,"गोंधळी दादा कालच्याला काय भानगड झालती?". मी म्हटलं काहि नाय. त्यावर तो म्हटला,"दादा घाबरु नका पण आम्हांला थोडी कल्पना आलिये तुम्ही खरं खरं सांगा नायतर तुम्हाला कालचं कोडं सुटायच नाय आण कायम त्याचाच विचार करसाल. आताच बोला म्हणजे खुलासा होईल. माझे भाऊ पण म्हटले बोल बच्च्या. सामान खाली ठेवलं नि बाजुच्या खुर्चीत बसुन माझा प्रकार सांगु लागलो. " आंकु भाऊ आम्ही काल जेव्हा दुपारी इकडं आलथो ना तेव्हा आम्ही तुझाचं घरात चहापाणी केला आण मग मी माडी साठी आजिवली गावचा मित्राला फोन करायला रेँज शोधत माळावरच्या पाण्याच्या टाकीवर गेलो.फोन केला नि ठेवला". माळावरली टाकी म्हणताच तो चपापला आणि त्याच्या भुवया तानल्या गेल्या. मी पुढे सांगु लागलो. "फोन ठेवला तेव्हा तिथं एक पोरगी होती मग आमची ओळख झाली नी तासभर बोलता बोलता त्या पुरीनी भलताच विषय काढला त्यामुळे मला बिथरल्यागत झालं पण गोंधळाचा कार्यक्रमासाठी परत खाली आलो पण ती मला म्हटली की रात्री 11 ला ये इथेच मी पण येते". माझं हे वाक्य ऐकुन कुणी माझावर खेकसेल का हे पाहु लागलो तर सगळे पेचात. त्याने विचारलं कशी होती? मी सांगु लागलो,"गोरीशी होती नि काळा ड्रेस घातला होता. आखुड केस होते आणि डोळ्याच्या बाजुला काळ्या रेषा होत्या". इतक्यात तो पोरगा मला म्हणाला,"मला वाटलंच. ती आय****ची आसणार यात. वाचलास तु बरं झालं गेला नाय तु".
मी हळुच शर्मेने पुटपुटलो,"फालतु असेल ना ती? कुठे राहते ती पोर? माझा या प्रश्नाचं उत्तर जेव्हा त्याने दिलं त्यावेळी माझ्या पायाखाली जमीन आहे का नाही असा प्रश्न पडुन मी रडवेला झालो. तो म्हणाला,"अरं यड्या ती पोर नाय च्याटुक ए च्याटुक. आरं ती आमचा वाड्यावरल्या लोकांना तरास देती म्हणुन गावदेवानी टाकीच्या कडंनी रिँगाण घातलंय नि काशीच पाणि शिपाडुन तिची बांधी केली. तु असा एकटा दुकटा अंधाराचा तीच्या बांधीत गेला आसता तर तुझं काय खरं नव्हतं. वाचलास". माझ्या भावांनी मला कसंबसं सावरलं आणि गाडीवर बसवुन घरी नेलं वाड्यापासुन पुढे जाता जाता मागे नजर टाकली तर तिथुन वाड्यावरल्या माळावरच्या टाकीची अर्धी बाजु दिसत होती. नजर हटवली आणि परत पुढे पाहु लागलो. अंग रसरस करित होतं आणि अशा प्रसंगामुळे मला ताप भरत होता. पुढे 2 दिवसात ताप उतरला. गावदेवाचा भैरीनाथाचा आंगारा लावला नि काहि दिवसात कल्याण ला परतलो. यानंतर परत कधी मी त्या वाड्यावर गेलो नाही. कालच सचिनचा फोन आला "बच्चा 9 जुलै ला आपल्याला गायनाचा कार्यक्रम आहे आणि तु येणारेस". मी म्हटलो,"आ.... पोमगावला कि शेर्यावर". सचिन म्हटला,"शिळीमलाच आहे. कातकरवाड्यावर"..........

No comments:

Post a Comment