खालील स्टोरी " आर्या केंगार " या आपल्या पेजच्या एका मेंबर ने मला पाठवली आहे.
तो म्हणतो मी पुण्यातील डेक्कन या ठिकाणी राहतो. मला व्यायामाचा फार छंद आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून " Morning Walk " ला जाण्याची सवय आहे. त्यासाठी मी लवकर पहाटे ५ किवा ५. ३० ला उठायचो आणि जवळच असलेल्या कमला नेहरू उद्यानात धावायला जायचो.
हि गोष्ट तेव्हाच घडलेली आहे एक दिवस मी " Morning Walk " करत असताना समोरच असलेल्या उद्यानातील एका दगडी खुर्चीवर एक मुलगी बसलेली मला दिसली जेमतेम २० ते २५ वयोगटातली असेल ती. दिसायला फारच सुंदर, निरागस डोळे व हातात पुस्तक घेऊन काहीतरी वाचत बसली होती ती . मी विचार केला एवढ्या सकाळी हि मुलगी एकटी इथे या बागेत अजून नीटसा उजेडही पडला नाही आहे तरी अभ्यास करायला आली आहे . मला अचंबा वाटला पण ओळख नसल्यामुळे मी माझ " Morning Walk " सुरु ठेवल आणि काही वेळातच ते संपवून घरी आलो.
दुसर्या दिवशी पुन्हा मी उद्यानात धावत होतो आणि मला पुन्हा तीच मुलगी त्याच खुर्चीवर पुस्तक वाचताना दिसली यात नवल अस काहीच नव्हत पण मला थोड विचित्र वाटल ते तिच्या कपड्यांना बघून कारण तिने आज सुद्धा तेच कपडे घातले होते जे तिने काल घातले होते . तोच सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस तेच निरागस डोळे आणि लोभस चेहेरा. पाहून कोणीही प्रेमात पडेल असा. बहुदा संपूर्ण पुण्यात मी तिच्यासारखी सुंदर मुलगी पहिली नव्हती आणि आता मला तिच्याशी मैत्री करावीशी वाटत होती बोलावस वाटत होत . पण त्या मुलीचे लक्ष पुस्तकातच होत म्हणून मी आज सुधा घरी निघून आलो.
आजचा तिसरा दिवस होता पुन्हा ती दिसली काहीच बदल नाही तीच खुर्ची तेच कपडे आणि तेच रूप आणि तीच वेळ मला दिवसेंदिवस ते सगळ विचित्र वाटू लागल . अशा प्रकारे ५ दिवस झाले ती मला सतत बागेत दिसत होती मग मी ठरवलं कि उद्या काहीही करून त्या मुलीशी संवाद साधायचा. माझ्या मनात एक प्रकारचा विचीत्र्तेचा भाव एक विलक्षण आकर्षण अशी स्थिती निर्माण झाली होती. तो दिवस होता रविवारचा मी ठरल्या वेळी उठलो आणि उद्यानात गेलो आणि त्या खुर्ची जवळ पोहचलो. पण आज ती मुलगी तिथे नव्हती मला वाटल दुसर्या ठिकाणी बसली असेल म्हणून मी पूर्ण बाग हिंडून काढली पण ती मला कुठेच दिसली नाही एक दिवस दोन दिवस असे तीन दिवस गेले पण ती पुन्हा कधी दिसलीच नाही.
मी रोज निराश घरी परतत होतो पण मला उद्यानाचे वॉचमेन काका दिसले आणि मी न रहावून त्यांना विचारले काका ती दररोज सफेद रंगाचा ड्रेस घालून एक मुलगी उद्यानात यायची ती आता येत नाही का. त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पहिले आणि विचारले कोणती मुलगी मग मी मला आलेले सर्व अनुभव त्यांना सांगितले आणि ते माझ्याकडे बघतच राहिले. त्यांच्या डोळ्यात भीतीचा भाव मला जाणवला आणि त्यांनी माझा हात पकडला आणि उद्यानाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या घरी मला घेऊन गेले. तडक दरवाजा उघडला आणि समोर भिंती जवळ बोट दाखवलं मी तिकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या भिंतीवर तिचा फोटो होता जी मला उद्यानात दिसली होती पण चंदनाच्या फुलानाचा हार त्या फोटोवर लावला होता. आता आकर्षणाने भीतीचे रूप घेतले होते मी पुरता घामाघूम झालो पण स्वताला सावरून मी वॉचमेन काकांना सगळ विचारलं.
तेव्हा त्यांनी सांगितलं कि ती त्यांची मोठी मुलगी होती अभ्यासात खूप हुशार पुस्तकच तिचे मित्र होते आणि पांढर्या रंगाचा ड्रेस तिला फार आवडायचा पण काहीवार्षापुर्वी याच उद्यानात त्याच खुर्चीवर बसून अभ्यास करत असताना अचानक तिला हृदय विकाराचा झटका आला आणि तिथेच ती मरण पावली. तेव्हापासून तिची आत्मा तिथे घुटमळत आहे पण कोणाला त्रास देत नाही आणि घरच्यांना ती फक्त दिसते. पण आता ती तुलाही दिसली आणि हे चांगल नाही. ते म्हणाले तू घरी जा मी बघतो काय ते .
मी फार घाबरलो होतो आणि तसाच घरी आलो. त्यानंतर तब्बल एक महिना मी " Morning Walk " ला मी त्या उद्यानात गेलो नाही.
पण एक दिवस असाच मित्रांबरोबर मी पुन्हा त्या उद्यानात गेलो न चुकता खुर्चीवर गेली ती तशीच मोकळी होती. मनात जुने किस्से पुन्हा जागे झाले आणि मी त्या वॉचमेन काकांना भेटण्यासाठी गेलो पण घराला कुलूप होते. दुसर्या वॉचमेन न विचारपूस केल्यावर कळले. कि काका एक महिन्यापूर्वीच घर सोडून आणि काम सोडून निघून गेलेत आणि पुण्यातील कात्रज ला जाऊन स्थायिक झालेत.
मित्रानो मला माहित नाही ती मुलगी मलाच का दिसली आणि ते काका लगेच घर सोडून का गेले ते पण मी जे काही अनुभवलं ते आयुशाभर आठवणीत राहील . तुम्हाला काही सांगायचा असेल कथे बद्दल तर नक्की कमेंट करा.
धन्यवाद
आर्या केंगार
धन्यवाद
आर्या केंगार
लेखक
जय शिर्के
जय शिर्के
No comments:
Post a Comment