Raaj Namtosunahoga
मित्रांनो आज आपल्या पेजचे वाचक "राज" इथे एक अनुभव सांगणार आहेत. तशा या आधीही त्यांनी आपल्याला ४-५ कथा सांगितल्या आहेत. तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दांत.
हा अनुभव मला मी ५ वि ६ वीत असताना आला आहे. आम्ही उल्हासनगर कोर्ट एरीयामध्ये एका लग्नाच्या निमित्ताने गेलो होतो. हळदीच्या कार्यक्रमाला पोहोचायचं होत आम्ही त्यादिवशी तिथेच राहून मंडपात जाणार होतो. आम्ही अंदाजे ५-६ वाजता संध्याकाळी पोहोचलो. दारातच म्हणजेच अंगणातच कार्यक्रम होणार होता. खूपशा गडबड गोंधळ घाईत सर्व काही चालू होत. नवरदेवाला हळद लाऊन घरात पाठवण्यात आल. त्या नंतर नवरदेव घराबाहेर आलाच नाही, नाच गाण सार झाल पण नवरदेवाशिवाय. ज्याच लग्न तोच मंडपात हजर नव्हता. नंतर जेवणाची तयारी सुरु झाली. ९ च्या आत जेवण आटपून घ्या अस सांगण्यात आल. त्यानंतर झोपण्याचीसुद्धा तयारी चालू झाली. लग्न घर आणि जागरण नाही हे थोड विचित्रच होत. घर एवढही ऐसपैस नव्हत त्यामुळे सगळ्यांनी घरात झोपण हे अडचणीच होत.
त्यामुळे माझे बाबा म्हणाले, "बाहेर अंगणात मंडप तर आहेच घरात झोपण्यापेक्षा मी आणि आणखीन काही पुरुष मंडळी बाहेरच झोपतो, आम्हाला काही हरकत नाही. " हे ऐकल्यावर नवरदेवाची आई थोडी घाबरली आणि ओरडतच म्हणाली, "बाहेर कोणीही झोपायचं नाही आणि घराच्या बाहेर पडायचं हि नाही" त्यांनी आम्हा सर्व मुलांना तिथून जायला सांगितले आणि बाबांशी काहीतरी सल्ला मसलत करून घरातच झोपायला सांगितले. शेवटी बाबानीदेखील हेच सांगितले की घरातच झोपावं लागेल. घराचा दरवाजा आतून नीट बंद करण्यात आला आणि त्याचावर त्रिशूळ ठेवण्यात आला. (हे सारच अजब वाटत होत.) मी सार काही पहिल्यांदाच पाहत होतो.
९.३० -१० च्या दरम्यान सगळेच झोपून गेले. कार्यक्रमातली धावपळ, नाच - गाणी यामुळे सर्वच थकलेले. मी आणि माझ्या काकांचा मुलगा आम्ही दोघ बर्याच दिवसांनी भेटल्याने गप्पा मारत बसलो होतो. बराच वेळ बोलत होतो.. रात्रीचे किती वाजलेले ठाऊक नाही पण अचानक काहीतरी वाजण्याचा आवाज येऊ लागला. आधी आवाज हळू येत होता म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. पण थोड्या वेळातच तो आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. गुबूगुबू अशा प्रकारचा तो आवाज होता. कोणीतरी काहीतरी वाजवत होत पण आवाज अजूनही लांबून येत असल्यासारखा भासत होता. भावालाही आवाज ऐकू येतो का विचारल्यावर त्यानेही "हो" म्हणत मान डोलावली . आवाज येत होता आणि तो लांबून जवळ येत होता, का असा आवाज येतोय काहीच कळत नव्हत. लग्नातल नाच गण केव्हाच संपल होत. पुन्हा कोणी कशाला येईल आणि अशा चाबुक्वल्याच्या तालीवर कोण कस नाचेल? थोड्या वेळातच आवाज वाढायला लागला आणि तो करण्कर्काष्य वाटत होता.
आम्ही दोघ एकमेकांकडे पाहत होतो पण नक्की काय चालल आहे दोघानाही कळत नव्हत. आवाज अगदी दरवाज्याच्या बाहेरून येत आहे वाटू लागल. खूप जोर जोरात त्यासोबत "छन छन " असा पैजणांचा आवाज. भीती वाटत होती त्या आवाजाची . मी उठून बसलो दरवाजाबाहेर कोणीतरी (जरी - मरी कि ते चाबूक मारून घेतात ते ) उभ राहून आवाज काढताय अस वाटत होत . खरतर तसच घडत होत. मी आणि भाऊ उठून बसलो. बाबाही जागे झाले होते.
मी उठून दरवाजा उघडणार होतो तर बाबांनी हात पकडून मला मागे खेचले आणि झोपायला सांगितले. मी त्यांच्याजवळ जाऊन पहडलो. भाऊ देखील काकांकडे जाऊन झोपला होता . पण एवढ्या मोठ्या आवाजात कसली झोप लागतेय? बाबा काय म्हणाले तेही ऐकू येत नव्हत. आवाज वाढता वाढता हळू हळू दूर जाऊ लागला. कमी होत गेला .मग एकदम नाहीसा झाला. पण परत अस काही झाल तर ? हि भीती मनात होतीच. तशा गोंधळातच रात्री कधीतरी झोप लागली.
सकाळी उठलो तर सर्व तयारी करत होते .. जणू काही घडलेच नाही. पण माझ्या डोक्यात तोच आवाज घुमत होता. मी वडिलांना उठल्या उठल्या विचारलं कि काय घडत होत तर ते उत्तर टlळल त्यांनी आणि निघून गेले. पण मला जाणून घ्यायचं होत कि काय होत ते. मग मी शेजारच्या काकांना शोधल आणि आजू बाजूला कोणी नाही पाहून त्यांना सार विचारलं. तेही आधी काही सांगायला तयार नव्हते पण मी हट्टच धरला. मग ते सांगू लागले. कि काही वर्षापूर्वी त्या गावात एक चाबुक्वल्याच (काही जण जरी - मरी म्हणतात ) जोडप राहायचं . तिथेच आजू बाजूंच्या लोकांकडे पैसे मागून ते घर चालवायचे .. एका जमिनीवर त्याचं झोपडीवजा घर होत. पण तिथल्याच काही वाईट लोकांची त्यांच्या जमिनीवर नजर होती. त्या दोघांना अनेकदा मारून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते दोघे घर काही सोडत नव्हते . गरीब दोघे मुकाट मार खाउन राहायचे. असेच दिवस जात होते पण एक दिवस ती दोघ आलीच नाहीत .. १ - २ -३ असेच दिवस जात होते .. शेवटी गावातील काही लोक त्याच्या घराजवळ पोहोचली तर घरातून घाणेरडा वास येत होता.. झोपडीचे दार ढकलले आणि उघडले तर दोघांचा सडलेला मृतदेह सापडला . पोलिस केस झाली आणि पुढे ती बंदही पडली. खुन्याचा तपास लागला नाही आणि कोणी त्या गरिबांसाठी आवाजही उठवला नाही . त्याचं घरहि बंदच होते .
काही दिवसांनी अचानक एका रात्री त्या बंद घरातून पुन्हा आवाज येऊ लागला , "गुबू गुबू ". कोणी नाचत असल्यासारख भासत होत , पैन्जानांचा आवाज हि येत होता. लोक घाबरली काहीतरी विपरीत होणार याची चाहूल लागली . 10-२० मिनिटे हा आवाज वाजत होता नंतर बंद झाला.
काही दिवसांनी अचानक एका रात्री त्या बंद घरातून पुन्हा आवाज येऊ लागला , "गुबू गुबू ". कोणी नाचत असल्यासारख भासत होत , पैन्जानांचा आवाज हि येत होता. लोक घाबरली काहीतरी विपरीत होणार याची चाहूल लागली . 10-२० मिनिटे हा आवाज वाजत होता नंतर बंद झाला.
दुसर्या दिवशी मात्र वेगळेच थरार नाट्य घडल्याचे समोर आले.
त्या जागे मधल्या २ जणांचा मृत्यू झाला होता . त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या दोघांना रात्रभर तो आवाज ऐकू येत होता . ते दोघे घरभर ओरडत फिरत होते , "मला माफ कर , मला माफ कर .. " त्या भयानक आवजाने त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले . त्यांच्या अंगावर चाबकाचे वार दिसू लागले . रात्रभर ते ओरडत होते आणि शेवटी त्यांनी प्राण सोडला .
त्या जागे मधल्या २ जणांचा मृत्यू झाला होता . त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या दोघांना रात्रभर तो आवाज ऐकू येत होता . ते दोघे घरभर ओरडत फिरत होते , "मला माफ कर , मला माफ कर .. " त्या भयानक आवजाने त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले . त्यांच्या अंगावर चाबकाचे वार दिसू लागले . रात्रभर ते ओरडत होते आणि शेवटी त्यांनी प्राण सोडला .
त्या नंतर प्रत्येक रात्री १०.३० नंतर ते जोडप तिथेच फिरत राहत आणि म्हणूनच घराबाहेर कोणीही पडत नाही .
No comments:
Post a Comment